Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राम बहादुर थापा च्या केस च्या निमीत्ताने

म
मारवा
Mon, 02/01/2016 - 13:04
🗣 17 प्रतिसाद
ओरीसातील बालासोर जिल्ह्यातील रासगोविंदपुर या गावात एक वापरात नसलेले विमानतळ होते. तिथे मोठ्या प्रमाणावर असलेल्या किंमती भंगारमालाची राखण करण्यासाठी दिबाकर व गोविंद या दोन चौकीदारांना नेमलेले होते. या विमानतळाच्या सभोवतालच्या परीसरात संथाळ इ.आदिवासींची मोठ्या प्रमाणात वस्ती होती. या लोकांचा भुताखेतांवर विश्वास होता व या उजाड विमानतळावर भुताखेतांचा वास आहे अशी त्या परीसरात समजुत पसरलेली होती. एक दिवस कलकत्त्याच्या चटर्जी फ़र्म कडुन एक जगतबंधु चटर्जी नावाचा माणुस त्याचा नेपाळी नोकर राम बहादुर थापा बरोबर येथील भंगारमाला च्या खरेदीसाठी गावात दाखल झाला. ते दोन्ही गावातील किशनचंद्र पात्रो या माणसाकडे मुक्कामाला उतरले. त्याचा गावातच एक चहाचा स्टॉल होता. एका खेड्याहुन दुसर्‍या खेड्याला जाणारे अनेक छोटे रस्ते या विमानतळाच्या परीसरामधुन जात होते. भुतांच्या भीतीने रात्रीनंतर कोणी विमानतळाचा रस्ता वापरुन दुसरीकडे असलेल्या गावात जाणे टाळत असे. असाच एक शेजारील टेलकुंडी गावचा रहीवासी चंद्रा माझी रात्री उशीर झाल्याने विमानतळाचा रस्ता टाळण्यासाठी पात्रोच्या चहास्टॉलवर रात्रीच्या मुक्कामास आला. येथे अगोदरच असलेल्या चटर्जी व थापा ला भुतांना बघण्याची अनिवार इच्छा झाली. त्यांनी पात्रो ला पटवले की चंद्राला सोबत करुन आपण त्याच्या गावी पोहोचवुन येऊ व भुते असतील तर पाहुन घेऊ. त्याप्रमाणे या तिघांनी रात्री निघुन चंद्रा ला टेलकुंडी गावी पोहोचवले. तेथुन पुन्हा विमानतळाच्या फ़ुटपाथ च्या रस्त्याने परतत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना तेथुन काही अंतरावर तेव्हा वारा वेगाने वाहत होता, काही आकृत्या अंधारात हलत नाचत असलेल्या दिसल्या व एक प्रकाशाकृती इंग्रजीत ज्याला 'will-o' the wisp.' म्हणतात तसा दिसला. त्यावरुन त्यांना काही भुते एका प्रकाशाभोवती नाचत आहेत असे द्र्श्य प्रतीत झाले. ते तिन्ही त्या दिशेने धावले.तिथे सर्वात अगोदर नेपाळी नोकर थापा पोहोचला त्याने त्याच्याजवळील "कुकरी" या घातक शस्त्राने भुतांवर बेभान सपासप वार करणे सुरु केले. त्याच्या हल्याने जखमी झालेले ओरडु लागल्यावर काही क्षणांनी थापा भानावर येऊन थांबला. प्रत्यक्षात झाले असे होते की ज्यांच्यावर त्याने हल्ला केला होता त्या शेजारच्या परीसरातील "माझी" आदिवासी स्त्रीया होत्या. त्या तेथे कंदिल घेऊन आलेल्या होत्या व तेथील मोहुआ च्या झाडाखाली "मोहुआ" ची फ़ुले रात्रीच्या वेळेस वेचत होत्या. दुरुन बघितल्याने ,या आदिवासी स्त्रीयांच्या हातातील हलत्या कंदिलाच्या प्रकाशाने वा मनातल्या भीतीने म्हणा 'will-o' the wisp चा भास या तिघांना झाला. व त्या समजतुतीतुन थापाने यांना खरोखर भुत समजुन कुकरीने वार केले. थापाच्या या हल्ल्यात एका आदिवासी स्त्रीचा गेल्ही मांझियानी चा जागीच मृत्यु झाला आणि इतर दोन स्त्रीया गंभीर जखमी झाल्या.मागुन आलेल्या पात्रो वर सुद्धा अंधारात न ओळखल्याने गोंधळुन भुत समजुन थापाने काही वार करुन जखमी केले. थापावर कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला व ३२४ व ३२६ अंतर्गतही इतरांना जखमी करण्यासाठी गुन्हा दाखल झाला. या खटल्यात सेशन कोर्टाच्या जज ने थापा ला निर्दोष मानुन त्याची मुक्तता केली. यासाठी सेशन जज ने जी कारणीमीमांसा दिली ती अशी की थापा ने केलेले कृत्य हे " अंडर अ बोना फ़ाइड मिस्टेक ऑफ़ अ फ़ॅक्ट " होते. तो पुर्ण विश्वासाने भुतांवर हल्ला करत होता मानवांवर नाही म्हणुन तो आयपीसी च्या कलम ७९ अंतर्गत (चा फ़ायदा घेऊन) दोषी मानला जाऊ शकत नाही. या निकालाला हाय कोर्टात आव्हान देण्यात आले. हायकोर्टाने किशन चंद्र पात्रो ज्याला थापाने जखमी केले होते त्याची साक्ष ग्राह्य धरली नाही कारण पोलिसांना दिलेल्या जबानीत त्याने म्हटले होते की जगतबंधु चटर्जी ने त्याला रात्री भुते बघण्यासाठी घराबाहेर पडण्यास भाग पाडले होते. मात्र कोर्टात त्याने मी त्यांच्या बरोबर गेलोच नव्हतो अशी जबानी दिली. व चंद्रा ने सुद्धा अगोदर पोलिसांसमोर तो घाबरला होता म्हणुन रात्री त्याच्या टेलकुंडी गावास जाणे टाळत होता असे सांगितले मात्र कोर्टात त्यानेही मी भुतांना घाबरत नाही इ. उलटी बाजु मांडली. त्यास्तव हायकोर्टाला दोन्ही साक्षीदार फ़ारसे " रीलायबल" वाटले नाहीत. पुढे ज्या फ़ॅक्ट्स हायकोर्टाने महत्वपुर्ण मानल्या त्यांच्या दृष्टीने त्या अशा १- जगतबंधु व नेपाळी थापा या परीसरात नविन होते घटनेच्या केवळ काही महीनेआधी पुरता त्यांचा या परीसराशी संबंध आला होता. २-या परीसरात अशी अफ़वा वंदता होती की मंगळवारी व शनीवारी रात्री विशेषत: या विमानतळाच्या परीसरात भुते मोकाट फ़िरतात गाणी गातात, नाचतात, इ. ३-त्या रात्री मंगळवार होता. व त्यामुळेच सुरुवातीला चंद्रा ने टेलकुंडी गावी जाण्याऐवजी पात्रो च्या चहा स्टॉल वर मुक्कामाचा निर्णय घेतला होता. ४- अशा रीतीने " विमानतळ परीसरात भुते आहेतच " या पुर्ण विश्वासाने सर्व झपाटलेले चौघे त्या मंगळवार च्या रात्री निघालेले होते. ५- त्यानंतर तिघे परततांना वाटेवर त्यांना जेव्हा 'will-o' the wisp. दिसला तेव्हा टी स्टॉल वाला पात्रो जोरात ओरडला " ते बघा तिथे भुते आहेत" ६- ते ऐकताक्षणीच नेपाळी थापा वेगाने त्या दिशेने एका शॉर्ट कट ने त्या दिशेने व इतर दोघेही दुस‍र्‍या थोड्या लांब मार्गाने त्या दिशेला धावले. ७- गोंधळात जेव्हा मागाहुन आलेल्या पात्रो ला ही थापाच्या कुकरीचा वार बसला तेव्हा तो ओरडला त्याच्या आवाजानेच नेपाळी थापा भानावर आला. ज्या आयपीसी च्या सेक्शन ७९ चा फ़ायदा थापा ला मिळाला त्यातील तरतुद अशी आहे. The benefit of Section 79 I.P.C. is available to a person who by reason of mistake of fact in good faith, believes himself to be justified by law in doing an act. मात्र सेक्शन ५२ प्रमाणे Good faith requires due care and attention . म्हणजे गुड फ़ेथ तेव्हाच मान्य होतो जेव्हा व्यक्तीने सत्यता तपासण्याची पुरेशी काळजी घेतलेली आहे व त्याकडे अवधान दिलेले आहे. या केसमध्ये थापाच्या विरोधी वकीलाने आक्षेप घेतला तो असा की .घटनेच्या संदर्भात दिलेल्या साक्षीवरुन असे सिद्ध होत होते की थापा कडे त्या वेळेस टॉर्च होता. तर त्यांच म्हणण अस की थापा ने टॉर्च चा प्रकाशझोत टाकुन जर एकदा जरी खात्री करुन घेतली असती तर त्याच्या तात्काळ लक्षात आले असते की तिथे त्या स्त्रीया आहेत व भुते नाहीत , व त्यांचा जीव वाचला असता. मात्र त्याने तसे काहीही केले नाही व पात्रो चे " ते बघा तिथे भुते आहेत " हे विधान ऐकता बरोबर तो तिकडे पळत सुटला व बेभान होऊन कुकरीने वार करु लागला. त्याने ड्यु केअर घेतली नाही म्हणुन तो दोषी आहे. अशी बाजु मांडली. हायकोर्टाने त्या विरोधात जो मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा ग्राह्य धरला तो असा होता. ( हा एका जुन्या केस लॉ वर आधारीत होता एम्परर व्हर्सेस अब्दुल वदुद अहेमद.) त्यातील निकालावरुन केअर व कॉशन घेतली जाण्यासंदर्भात ते त्या संबंधित व्यक्तीच्या क्षमता आणि इंटेलीजन्स वर अवलंबुन आहे व त्याहुन सर्वात महत्वाच विधान म्हणजे एखाद्या माणसाने शांत व चिंतनीय मनाने विचारपुर्वक काढलेला निष्कर्श हा दुसर्‍या एखाद्या सांप्रदायिक उन्मादाच्या प्रभावाखाली अतीउत्साहात झील मध्ये काढलेल्या व जो सारासारविवेकी विचाराला सरावलेला नसलेला असा माणुस आहे त्याने काढलेला निष्कर्श यात फ़रक असतो. हाच विचार रेफ़रन्स मध्ये खालील शब्दात मुळ असा मांडलेला आहे. जो हायकोर्टाने महत्व देऊन ग्राह्य मानला. तो मुळ उतारा असा. "The standard of care and caution must be judged according to the capacity and intelligence of the person whose conduct is in question. It is only to be expected that the honest conclusion of a calm and philosophical mind may differ very largely from the honest conclusions of a person excited by sectarian zeal and untrained to the habits of reasoning.'' "The question of good faith must be considered with reference to the position of the accused and the circumstances under which he acts .... .. ....... The law does not expect the same standard of care and attention from all persons regardless, of the position they occupy तर या केसमध्ये हायकोर्टाने कलम ७९ चा लाभ नेपाळी थापा ला देतांना खालील बाबींचा निर्देश केला. १-नेपाळी थापा या परीसरात नविन होता व भुताखेतांवर दृढ विश्वास ठेवणारा माणुस होता. २-नेपाळी थापा पेक्षा तुलनेने अधिक सुशिक्षीत अशा त्याच्या मालकाने चटर्जी ने त्याला या विश्वासापासुन तो नेपाळी परावृत्त होइल असे काहीही सांगितले सुचविले नाहे. ३-जेव्हा पात्रा ओरडला की "ते बघा तिथे भुते आहेत " तेव्हा तो सर्वाधिक विचलीत व एक्सायटेड झाला होता. जज चे त्यावर असे म्हणणे होते की Considering the status and intellectual attainments of the respondent and the place and time and the circumstances, I do not think it can be said that he acted without due care and attention. When even persons with a higher standard of attainments like P.Ws. 26 and 29 thought that there were ghosts around the flickering light find when neither of them dissuaded the Nepali from going there and when on the other hand P.W. 26 cried out pointing out that it was a ghost it would not be proper to expect that the Nepali should have paused and examined carefully whether the persons moving round the figures were human beings or not. जज ने महत्व दिलेला भाग की त्याच्याहुन नेपाळी थापा पेक्षा तुलनेने अधिक क्षमता असलेल्या इतर दोघांना सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसला की तिथे भुते च आहेत. आणि त्या दोघांनीही त्याला थांबवण्याचा जराही प्रयत्न केला नाही तेव्हा नेपाळी थापा सारख्या सामान्य तुलनेने कमी क्षमता असलेल्या व्यक्ती कडुन त्याने थोडे थांबुन अधिक विचारपुर्वक विवेकाने निर्णय घ्यायला हवा होता टॉर्च मारुन खातरजमा करावयास हवी होती अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. कोर्टाच म्हणण अस की थापा च्या मनात अगदी कणभर जरी संशय निर्माण झाला असता तर त्याने टॉर्च मारुन पाहीलाच असता मात्र तसे नव्हते त्याला पुर्ण खात्री झालेली होती व इतर दोघांनी त्याला तो चुकतोय असे न सांगता उलट त्याचा समज अधिक दृढ होईल असेच वर्तन केले. या आधारावरुन हायकोर्ट जज ने नेपाळी राम बहादुर थापा ला कलम ७९ चा फ़ायदा देऊन या आदिवासी महीलेच्या खुनाच्या व इतरांना जखमी करण्याच्या सर्व आरोपांतुन आरोपी राम बहादुर थापा ची पुर्णपणे निर्दोष मुक्तता केली. आता एक दुसरा भाग मला तुर्तास हाच मुद्दा चटकन आठवतोय म्हणुन हा घेतोय बाकी अनेक समकालीन इतर मुद्दे या दिशेने जाणारे असु शकतात. कृपया या कडे सध्या घेतलेले एक प्रातिनीधीक उदाहरण म्हणुनच बघावे ही विनंती. भारतात विच हंटींग च्या केसेस चे म्हणजे एखाद्या पुरुष वा महीलेला ( अशा केसेसमध्ये तुलनेने महीलांची संख्या नेहमीच अधिक असते ) ती चेटकीण आहे असे ठरवुन समुहाने मारण्याच्या अनेक घटना झालेल्या आहेत. यात टीपीकली गावात एखाद बाळ वा माणुस आजाराने दगावला किंवा एखादा पाळीव पशु जरी अगदी बैल बकरी दगावु लागले. तरी इतक्या पुरेशा कारणास्तव एखाद्या महीलेला एखाद्या लोकल ओझा मांत्रिकाच्या निर्णयावरुन चेटकीण ठरवले जाते, व तिच्या चेटुक करण्यामुळे असे मृत्यु होत आहेत असा आरोप करण्यात येतो. आणि त्यानंतर अनेकदा भयानक पाशवी रीतीने त्या महीलेचा बळी घेतला जात असतो. हा प्रकार भारतात आसाम व झारखंड या राज्यात मोठ्या प्रमाणावर झाल्यावर या दोन राज्य सरकारांनी विशेष कायदे या संदर्भात पास केलेले आहेत. एक डायन प्रथा नावाने व दुसरा अजुन एका नावाने. राजस्थान सरकारने पास केलेल्या एका कायद्यात ही या डायन संदर्भात ली विशेष तरतुद करण्यात आलेली. आहे. झारखंड इ. च्या विशेष कायद्यात हा गुन्हा कॉग्नीझेबल ऑफ़ेन्स व अजामीनपात्र गंभीर गुन्हा मानण्यात आलेला आहे. खुनापेक्षा अधिक कठोर शिक्षेची त्यात तरतुद करण्यात आलेली आहे. या विषया वरील अभ्यासकांच्या मते जमीनीतील वाटा हिसकावण्यासाठी प्रामुख्याने विधवा महीलां विरोधात या चेटकीण ठरविण्याच्या तंत्राचा सर्वात जास्त उपयोग संबंधितांकडुन केला जातो. अनेक विधवा महीला आपण चेटकीण ठरवले जाऊ या भीतीच्या सावटाखाली जगतात. हे प्रकार प्रमाणाबाहेर वाढल्यानेच वरील दोन्ही राज्यांना स्वतंत्र कठोर कायदा पास करण्या इतकी गरज भासली. वरील दोन केसेस समोरासमोर ठेवल्यावर मला एक विसंगती जाणवली. उदा. समजा एक केस झाली समजा चा अर्थच हायपोथेटीकल आहे या संदर्भातील स्वतंत्र तरतुदींचा माझा अभ्यास नाही व त्याचा मला पुरावा पाहीजे ही अपेक्षा नाहीच मी फ़क्त एक विरोधी जाणारी प्रातिनिधीक बाजु म्हणुन मांडतोय. तर अशा चेटकीण म्हणवुन ठरवल्या गेलेल्या महीलेची एका समुहाने हत्या केली. तर समजा वरील थापा च्या केसचा दाखला ( कायद्यात हा प्रीसीडन्स म्हणतात बहुधा अगोदर च्या केसमध्ये दिलेल्या समान स्वरुपाच्या खटल्याच्या निकालाचा संदर्भ केस बळकट करण्यासाठी देणे चुकभुल देणे घेणे ) जर दिला तर. काय होईल ? म्हणजे गावकरींचा वकीलाने खालील मुद्दे मांडले. १- गावकर्‍यांचा दृढ विश्वास होता की महीला चेटकीण आहे. २- गावकरी सेक्टरीयन झील मध्ये ओझा व लोकल मांत्रिकाने दिलेल्या निर्णयावरील श्रद्धेने हे कृत्य करण्यास प्रवृत्त झाले वा समजा त्याने रोखले नाही. ३- भीतीने त्यांचा सारासार विवेक हरवला होता. व ड्यु केअर व कॉशन घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते व त्या सिच्युएशन मध्ये ते योग्य होते. कारण त्यांच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न होता. ४- त्यांना पुर्ण विश्वास होता की मुल मारण्याचे हे कृत्य ( आजारावरील उपचाराअभावी न होता ) चेटकीणीच च आहे. व तीच या मुलांची मारेकरी आहे. तीने केलेल चेटुक याला कारणीभुत आहे. ५- त्यांना समजावणारा व परावृत्त करणारा गावात कोणी नव्हता त्यांच्यापेक्षा थोडा बरा स्थितीत असलेला अधिक क्षमता असलेला मांत्रिक ओझा त्यांना उलट प्रोत्साहनच देत होता. ६-त्यांना विचाराचा विवेकाचा टॉर्च पेटवणं त्या परीस्थीतीत शक्य नव्हत त्यांचा मिसगायडेड थापा झालेला होता. या कारणास्तव या समुहाला वरील महीलेच्या हत्येच्या आरोपातुन मुक्त करण्यात याव. हा निकाल योग्य होइल का ? वरील निकाल योग्य होता का ? परीस्थीती कायदा वर्तन व शिक्षा आणि न्याय हे कसे काम करतात यांची प्रक्रिया गुंतागुंतीची व्यामिश्र वाटते. एखादा कायदा तयार करतांना एक संदर्भ आठवतो मोडका तोडका आठवणीच्या भरवशावर तो असा " कुठलाही कायदा हा नुसता गुन्हा व त्याची शिक्षा इतकच निश्चीत करत नाही तर त्याचा उद्देश अप्रत्यक्षरीत्या जनतेला ( तो कायदा मानत व बनवत असलेल्या ) काही हेतुंपासुन काही भावनांपासुन काही विश्वासांपासुन काही वृत्ती काही मुल्यांपासुन परावृत्त वा काही कडे प्रवृत्त करणे असा असतो. तर असे निकाल कुठल्या दिशेला समाजाला प्रवृत्त वा परावृत्त करतात ? करत असावेत ? मी फ़क्त समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय माझा कुठलाही दंड थोपटुन दावा नाही, तुम्हाला वरील सर्व बाबींविषयी काय वाटत ? तुम्ही या कडे कसे बघतात ? जाणुन घ्यायला आवडेल. .
वर्गीकरण
कायदा

प्रतिक्रिया द्या
3749 वाचन

💬 प्रतिसाद (17)
व
विजय पुरोहित Mon, 02/01/2016 - 13:17 नवीन
अगदी अनोखा खटला आहे... तुम्ही फॅक्ट्स पण चांगल्या मांडलेल्या आहेत... बघू आता प्रतिसादाचा धुरळा काय उठतो ते...
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/01/2016 - 13:22 नवीन
मला एक वेगळाच प्रश्न पडला.. जिहादी हत्या देखील या प्रकारे निर्दोष ठरवल्या जाऊ शकतात का? तो देखील एक good faith चाच प्रकार आहे असे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
उ
उगा काहितरीच Mon, 02/01/2016 - 13:22 नवीन
इन्ट्रेस्टिंग...प्रकरण !
  • Log in or register to post comments
म
मन१ Mon, 02/01/2016 - 13:55 नवीन
योगायोगाने ओल्मोस्ट अशीच काहिशी केस मी काल्पनिक उदाहरण, थॉट एक्स्परिमेण्ट म्हणून उल्लेख केली होती. http://www.misalpav.com/node/24403 . . शेवटचे तीन चिमुकले परिच्छेद पहावेत. (तीन्ही मिळून आठ दहा ओळींच्या वर नाहित)
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 02/02/2016 - 12:46 नवीन
मनोबा तुमचा लेख पुर्ण वाचला आणि फार आवडला. वरील थापा ची केस मात्र पुर्ण वास्तव आहे. मला यातील इन गुड फेथ मध्ये केलेल्या कृत्याला समर्थन देणे. हा मुद्दा फार रोचक आश्चर्यजनक वाटला व त्याहुन महत्वाच म्हणजे त्याचे रीपरकशन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
श
श्रीरंग_जोशी Mon, 02/01/2016 - 23:30 नवीन
आजवर ठाऊक असलेल्या खून खटल्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे हा. याबद्दल तपशीलवारपणे लिहिल्याबद्द्ल लेखकाचे आभार. कुणा निरपराधाचा जीव जावूनही ज्यांच्यामुळे जीव गेला आहे त्यांची निर्दोष सुटका होणे पटत नाही. शस्त्राचा वापर स्वसंरक्षणार्थ करणे एक वेळ समजू शकतो पण स्वतःहून तथाकथित भूतांपर्यंत जाऊन शस्त्राने वार करणे हा अपराधच वाटतो. शस्त्र बाळगणाऱ्या प्रत्येकाने कुणावर वार करण्यापूर्वी तसे करण्याची गरज आहे का याची खातरजमा करणे आवश्यकच. त्या तथाकथित भूतांचे लांबूनही निरिक्षण करता आले असतेच. थापा व इतर दोघांनाही काही ना काही शिक्षा व्हायला हवी होती.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Tue, 02/02/2016 - 01:44 नवीन
सहमत. कुणावरहि प्राण्घातक हल्ला करण्याचे समर्थन होउच शकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
संजय पाटिल Tue, 02/02/2016 - 01:45 नवीन
सहमत. कुणावरहि प्राण्घातक हल्ला करण्याचे समर्थन होउच शकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ब
बाजीप्रभू Tue, 02/02/2016 - 03:33 नवीन
हा निकाल योग्य होइल का ? वरील निकाल योग्य होता का ?
अतिशय चुकीचा निर्णय!! चुकीचा पायंडा पडेल असं वाटतंय. ह्या केसचा रेफरन्स देऊन अश्या केसेसची वकील मंडळी कायद्याचा 'किस' पाडणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 02/03/2016 - 18:02 नवीन
श्रीरंग जोशी ह्यांच्याशी सहमत. थापाने शास्त्र चालवण्यापूर्वी खात्री करून घेणे गरजेचे होते.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/04/2016 - 05:02 नवीन
ते पंचतारांकीत "मानव हक्क" वाले नक्की काय करीत असतात ??? याकुब मेमन्च्या वेळी बरोबर बाहेर येतात कायम अश्याच प्रश्न भेंडोळ्यातला नाखु आरोपीला शिक्षा व्हायला हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
असंका गुरुवार, 02/04/2016 - 07:12 नवीन
डिस्क्लेमरः १. कोर्टाच्या निर्णयाचा पूर्ण आदर आहे. कोर्ट निर्णयावर कुठलेही मत खाली व्यक्त केलेले नाही. २. मी वकील नाही. खाली दिलेली ही माझी वैयक्तिक मते असून त्याबद्दल कुठलीही जबाबदारी स्विकारलेली नाही. आपण कोर्ट निकाल आणि दुसर्‍याच एका कायद्याच्या तरतुदी यांची तुलना करून त्यातली विसंगती दाखवत आहात -आपल्या मतानुसारची. पुन्हा तो कायदा अशा राज्यातला आहे जिथे ही केस झालेली नाही(- असं आपला लेख वाचल्यावर वाटतं. मी फॅक्टस चेक केलेल्या नाहीत. ओरीसातच असे कायदे असले अस्ते, तर पोलीसांनी त्या कायद्याखाली केस तयार केली असती असं वाटतं.). तेव्हा या दोन गोष्टींमध्ये विसंगती नसेल तरच आश्चर्य! कारण प्रत्यक्षात एकाच कायद्यामध्येही अनेक ठिकाणी विसंगती दिसून येतात. याची जाणीव ठेवूनच, ज्या तरतुदी अधिक महत्वाच्या असतात त्यांना एक ओवररायडींग इफेक्ट दिलेला असतो. अशा तरतुदी सुरु होतात तेच त्यांची सुपिरीयारीटी दाखवत- 'नॉटविथ्स्टँडिंग एनिथिंग टू द कॉण्ट्ररी कंटेंड एनिव्हेअर एल्स इन धिस अ‍ॅक्ट....' प्रॅक्टीकली ही केस प्रेसिडेंट म्हणून त्याच राज्यात वापरली जाईल जिथल्या हायकोर्टाने हा निकाल दिलाय आणि त्यातही फॅक्टस अगदी जशाच्या तशा सारख्याच असतील तर. ज्या राज्यात या प्रकारच्या घटनेसाठी वेगळे कायदे आहेत, तिथे ही केस 'प्रेसिडेंट' 'सेट' करू शकणं (पायंडा पाडणं) अवघड आहे. (माझ्या तर्कात /माहितीत काही उणीवा असतील तर कृपया आवर्जून दाखवा.)
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 02/04/2016 - 11:30 नवीन
समजा काही उदाहरण बघु या केस चा निकाल ज्या निकषावर दिला गेलाय ते निकष मला फार खास वाटले. म्हणजे ते निकष जर एखाद्या मुरब्बी वकिलाने वापरले तर काय होईल ? एक सर्वात महत्वाचा निकष म्हणजे इन गुड फेथ त्याने हे कृत्य केलं याला महत्व देणं इन गुड फेथ कुठलाही व्यक्ती वा झुंड काहीही करु शकतो. ते योग्य कसे मानावे ? न्याय या निकषावर कसा ? सध्याची ताजी केस महाराष्ट्रातील कंजारभाट समाजाच्या गावपंचायतीने एका विधवेला चारित्र्य सिद्ध करण्यासाठी दोन पर्याय दिले. १- तीला सर्वांसमोर नग्न करुन एक पारदर्शक वस्त्र घालावे व मग भाजलेल्या पिठाचे ९ गोळे तिला मारुन फेकावेत. २- दुसरा पर्याय तिच्या १२ वर्षाच्या मुलाच्या हातात एक रात्रभर तापवलेली कुरहाड द्यावी व ती धरुन त्याने ७ पावले अंतर चालावे. तिच्यावर व्याभिचाराचा आरोप आहे व जो पुरुष यात तथाकथित गुंतलेला आहे त्याने आपला गुन्हा मान्य केलेला आहे आता या विधवेवर पाळी होती की तीने आपले चारित्र्य सिद्ध करावे. यांच्या मते फोड आले नाही इ. तर ती व्याभिचारी नाही असे सिद्ध होईल. हा या झुंडाचा गुड फेथ आहे हा या झुंडाचा विश्वास श्रद्धा आहे त्यातुन प्रेरीत होऊन ते हे सर्व करत आहेत. अधिक तपशिलात गेल्यावर ते नक्की त्यांच्या कुठल्यातरी ग्रंथ परंपरेचा दाखला देतील अर्थात वरील केस प्रमाणे त्यांच्या जीव धोक्यात नाही हे सत्य आहे. त्यासाठी इतरत्र या चर्चेत दिलेला खालील प्रतिसाद पुन्हा देतो. १- तो मांत्रिक गावातला त्याच्या पुर्ण गुड फेथ मध्ये जो त्याच्या संस्कारबद्धत्ते / अनुभव / अंधश्रद्धा इ. तुन आलेला आहे. त्याला प्रामाणिकपणे वाटतय त्याच्यापुरता तो अगदी खरा खुरा दावा आहे. की अमुक एक स्त्री चेटकीण च आहे आणि तीच्यामुळेच गावातील लहान मुले दगावत आहेत. व या स्त्री चेटकीण ला तात्काळ ठार मारण अत्यावश्यक आहे अन्यथा अजुन बालकांचा बळी जाऊ शकतो. पुढे तो इतर त्याच्याहुन निन्म स्तरावर असलेल्यांना मार्गदर्शन करतो. व ते सर्व त्या चेटकीणीचा सामुहीकरीत्या वध करतात. वरील कायदा पुन्हा तेच त्याची भीती सार्थ होती त्याने गुड फेथ मध्ये ते केले त्याची क्षमता नव्हती विवेकपुर्ण विचार करण्याची अजुन एक शब्द सेक्टरीयन झील सांप्रदायिक उन्मादातुन त्याने ते कृत्य केले त्याच्या खालच्या स्तरात जे होते ते तर जाउच देत. विच हंटींग माझ्या अल्प माहीतीप्रमाणे युरोपात ही मोठ्या प्रमाणात होत असे. आपल्याकडे आजही मोठ्या प्रमाणावर होतेच. मी मांत्रिक आहे माझ्या वकीलाने वरील केसचा संदर्भ दिला व या लाइनवर आर्ग्युमेंट केले तर ? २- विदेशात सरदारजींना मुस्लिम अतिरेकी समजुन त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना आपणास माहीत असतील. त्या विदेशी व्यक्तीला शिखांच्या विशीष्ट पोशाखावरुन दिसण्यावरुन व त्याचे एशियन समुदायाप्रती असलेले अज्ञान यातुन समजा फरक करता आला नाही व इन गुड फेथ त्याने अतिरेकी समजुन ( आता मुस्लिमच आहे हे जरी बरोबर ओळखले तरी तो अतिरेकीच आहे हे गुड फेथ मध्ये मानणे हा त्यातलाच एक प्रकार ) पण समजा त्याने इन गुड फेथ हल्ला केला घाबरुन. तो कुटुंबासोबत रात्री सबवे मध्ये आहे एकटा आहे घाबरलाय इ. इ. त्याला वाटल इन गुड फेथ की हा घातक आहे ड्यु केअर व कॉशन घेण त्याला परवडणार नाही. गांधीजींचा ही एक अंतरात्मत्याचा आवाज खरा आवाज वगैरे होता. म्हणजे इतक सिद्ध केल इतका इनफ इनोसन्स प्रुव्ह केला की झाल. मग न्याय कसा होणार ? म्हणजे मी विचार करतोय कुठल्या निष्कर्शांवर पोहोचलेलो नाही मात्र वरील थापाची केस काल्पनिक नसुन प्रत्यक्ष झालीय या केसला सुप्रीम कोर्टात आव्हान मिळायला हव होत. आदिवासीच होते गरीब बहुधा म्हणुन फार रेटु शकले नसतील पुढे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका गुरुवार, 02/04/2016 - 14:27 नवीन
आपण दिलेली पहिली दोन उदाहरणं आणि ही केस यांच्यातील फॅक्ट मध्ये मुळीच साम्य नाही. थापाने समोर जे आलं त्यावर तत्काळ कृती केली ही वस्तुस्थिती वादातीत असावी. आपण जे म्हणताय त्यात पोलीसांना सुनियोजित कट कदाचित सिद्ध करता येइल. ज्या कलमांआधारे पोलीस केस दाखल करतील आणि ती कलमे लावण्यासाठी उप्लब्ध असलेले सर्व साक्षी पुरावे यानुसार निर्णय होइल. तीन नंबरचे उदाहरण - अगदी चपखल उदाहरण आहे. निष्णात वकिलाला नक्कीच आरोपीचा बचाव करता येइल. ( हेट क्राइम बद्दल मला अजिबात माहिती नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
माहितगार गुरुवार, 02/04/2016 - 07:22 नवीन
केस मुळातून न वाचता मत व्यक्त करणे योग्य नाही (तुर्तास त्यासाठी मला वेळही नाही) पण धागा लेखकाच्या विवेचनावरून प्रथम दर्शनी केस सुप्रीम कोर्टा समोर जाण्यास लायक असावी (चुभूदेघे)
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 02/04/2016 - 10:32 नवीन
केसचे निकालपत्र तपशीलासकटः http://indiankanoon.org/doc/1489567/ १९५९ सालची केस आहे बरीच जुनी. निकालही १९६० मधला वाटतोय. मधल्या अनेक दशकांत या केसचा आधार कोणत्याही मुरब्बी वकिलाने घेतला नसेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 02/04/2016 - 12:25 नवीन
बरीच जुनी दिसते आहे की केस, आणि दोन जज्जांचा मिळून निकाल तेही त्या पुर्विच्या निकालावर आधारीत दिसतो. नेपाळी त्या स्त्रीयांना भूत समजून मारतो आहे म्हणून त्यास बेनिफित ओफ डाउट न्यायालयाने दिला असावा. माझ्या व्यक्तिगत मतानुसार काही किमान स्वरुपाची शिक्षा नेपाळीस व्हावयास हवी होती. किमान राज्यसरकारने सुप्रिम कोर्टात जावयास हरकत नव्हती.
मधल्या अनेक दशकांत या केसचा आधार कोणत्याही मुरब्बी वकिलाने घेतला नसेल का?
निम्न स्तरीय कोर्टात घेतला गेला असेल तर कल्पना नाही आणि कदाचित कलम ७९ साठी अधिक चपखल केसचे दाखले उपलब्ध असल्यास हि वापरली नाही असे होऊ शकते. पण किमान इंडियाकानून.ओर्ग वर कलम ७९ खाली क्मी उल्लेख दिसत आहेत. कदाचित बचावासाठी अधिक चांगले पर्याय असतील का याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा