काय बोलणार यावर ?
आज मुंबईत एका माॅलमध्ये फिरत असताना माझ्या समोर एक अडीच तीन वर्षांचा गोड छोकरा अखंड बडबड करत आईसोबत चालला होता. ती बाई कुणाशी तरी मोबाईलवर बडबडत होती...याला ते कळलं नव्हतं. एका क्षणात काय झालं कुणास ठाऊक, त्या बिनडोक बाईने क्षणार्धात मुलाच्या तोंडावरच जोरात हात उगारला (कानशिलात मारल्यासारखं केलं) पण मारलं नाही...त्या इवल्याश्या जीवाने एकदम दचकून पापण्यांची केविलवाणी फडफड केली आणि पोरगं बिचारं काहीतरी मोठ्ठा अपराध केल्यासारखे गप्प झाले. हे दोन सेकंदाचं दृश्य बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं यार....ती बाई आहे हे एक सेकंद विसरून तिला तुडवून काढावं की काय असा क्रुर विचार आला डोक्यात...
हे xxxXX पालक आपल्या पोरासोबत असतानाही स्वतःच्या विश्वात दंग असतात. आपण इवल्याश्या जीवाचा किती अपमान करतोय हे या XxXX च्या ध्यानीमनीही नसतं. एखाद दिवशी मी स्वतःवरचा ताबा सुटून एखादा किंवा एखादीला भर रस्त्यात मारहाण केली नाही म्हणजे मिळवलं यार....
💬 प्रतिसाद
(13)
ज
जयन्त बा शिम्पि
Mon, 02/01/2016 - 20:27
नवीन
मग तुमच्या व त्या बाईमध्ये काय फरक राहिला ? बाई तिच्या विश्वात दंग आणि तुम्ही तुमच्या भडक विचारांनी ग्रस्त . जमेल तर समजावून सांगा अन्यथा सोडून द्या.
- Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू
Tue, 02/02/2016 - 04:02
नवीन
कदाचित ती बाई फोनवर महत्वाचं बोलत असेल. छोकऱ्याच्या आवाजाने डिस्टर्ब होत असेल.… नाण्याची दुसरी बाजू.
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 02/02/2016 - 04:12
नवीन
तुडवून टाकण्याचा विचारही मनात येणे क्रौर्य नाही का ?
मुलाबाबत कळवळा आला तो येणं स्वाभाविकच आहे.पण एकाचा अपमान झाला म्हणून दुसर्याला मारहाण करायचे विचार येणं हे पण भडक डोक्याचेच लक्षण आहे!
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Tue, 02/02/2016 - 04:21
नवीन
गेल्या दोन दिवसात तीन बायका पाहील्या ज्या फोनवर बराच वेळ बोलत होत्या, रडत होत्या , एक नवरा करत असलेल्या मानसिक छळामुळे आणि दुसरी नवरा दुर असल्याने सासु आणि दिर करत असलेल्या छळामुळे. अशीही कारणे असु शकतात.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 02/02/2016 - 06:38
नवीन
काही चर्चा प्रतिसाद उडन खटोलांच्या प्रतिक्रीयेवरून त्या स्त्रीचे पाल्याप्रतीचे वागणे जस्टीफाय करू पहात आहेत, आपला प्रतिसाद स्त्रीयांवर होणार्या कल्पित अन्यायाच्या शक्यतेमुळे मुलाच्या दृष्टीने विनाकारण उगारलेला हात जस्टीफाय करू पहात आहेत, एकाचा राग दुसर्यावर काढणे क्षम्य असेल तर उडन खटोलांवरही लहानपणी कुणी असाच विनाकारण हात उगारला असू शक्यता असू शकेल असे समजून त्यांचा या विषयावरील राग समजून घेणे शक्य होणार नाही का ?
आपल्या देशात आईने पाल्यांना केलेली अगदी अघोरी शिक्षा सुद्धा क्षम्य समजली जाते. -शिक्षा प्रोपोर्शनेट असावयास नकोत का ? त्यांना दिलेल्या शिक्षेचे कारण समजावून द्यावयास नको का ?- पण बर्याचदा मुलांवर क्षूल्लक कारणांवरून अथवा अगदी कारण नसताना हात उगारला जाताना (पिटाई करताना) बर्याचदा निदर्शनास येते, स्त्री काहीही महत्वाचे काम करत नसताना वरच्या प्रतिसादात जयन्त म्हणतात तसे समजावून सांगूनही कोणत्याही कारणा शिवाय स्त्रीया (पुरुष सुद्धा) मुलांवर हात उगारताना पाहीले आहे, अगदी विनाकारण आहे हे दाखवून दिल्या नंतर काही सुशिक्षीत स्त्रीयांनी (अनेक वचन वापरतो आहे) त्यांच्या हार्मोनल इम्बॅलन्सचे कारण पुढे केले त्यावेळी तरी मला त्यावर उत्तर सापडले नव्हते आणि त्याचे उत्तर मला आजही माहित नाही सुज्ञ आणि जाणकारांनी जरुर या विषयावर प्रकाश टाकावा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 05:05
नवीन
sitting on judgement of disputed facts is poor in eyes of law
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 02/02/2016 - 08:30
नवीन
आय अॅग्री
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 02/02/2016 - 07:03
नवीन
असं हात उगारणं चुकच.. मी सुद्धा उगारते.. फार राग आला तर फटकाही मारते. पण नंतर पश्चाताप होतो. राग कोणत्याही कारणाने आलेला असेना.. तो आवरता न येणे आणि मुलावर निघणे हे चुकच. मुलं पण अनेकदा डोकं पागल करतात. एकट्या माणसाला अति होऊन जातं, स्वतःसाठी क्षणही मिळत नाही. सतत कुणाच्या तरी समोर नाचणे सोप्पे नाही. तेव्हा तोल जातो. पण शेवटी ते मुल आहे. ९९ वेळा आवरुन १ दा जरी स्फोट झाला तरीही मुलाला त्या ९९ वेळा समजत नाहीत.. फक्त १ लक्षात रहाते.. तेव्हा काहीही करुन राग आवरता यायला हवाच..
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 02/02/2016 - 07:04
नवीन
हल्ली स्टेशन वर किंवा सार्वजनिक ठिकाणी फोन वर बोलताना किंवा टाईप करत रडतानाचे प्रमाण बेक्कार वाढलेलं आहे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 02/02/2016 - 07:52
नवीन
+१ त्रास दायक प्रकार आहे. झेब्रा क्रॉसींग शिवाय वर्दळीतून रस्ते पायी क्रॉस करतानाही लक्ष मोबाईल मध्ये असते. गाड्या चालवत मोबाईल वाले कुणालाच जुमानत नाहीत. उड खटोलांनी दिलेल्याच केस मध्ये लक्ष सगळे मोबाईलवरच बोलण्यात असेल मॉल मध्ये गर्दी असेल तर एखादा लहानगा हरवूही शकणार नाही का ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 02/02/2016 - 08:23
नवीन
माई मोड ऑन>>>
अरे खटोल्या, उडू नको रे. ही विसाव्या शतकाची देणगी आहे. एकोणिसाव्या शतकात मोबाईल पण नव्हते. मॉल पण नव्हते. लोक परदेशात नोकर्यांना जात नव्हते. आणि घरात मुलंच मुलं असायची. ती काय करत आहेत याचा आईबापांना पत्ता नसायचा की आपण आपल्याच मुलाला फटकवतो आहोत की नातेवाईकाच्या मुलाला याचाही. तरी कोणाचे काही अडले नाही.>>>
माई मोड ऑफ
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Tue, 02/02/2016 - 10:54
नवीन
झक्कास जोक पैसाताई...
- Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड
Tue, 02/02/2016 - 12:46
नवीन
ज्यांना मुलं होत नाहीत / लवकर झालेली नाहीत, असे लोक सर्वपरिने स्वतःला मूल व्हावं म्हणून प्रयत्न करतात (माझे दोन मित्र या अनुभातून गेलेले आहेत त्यामुळे थोडीफार कल्पना आहे.)
ज्यांना मुलं विनासायास (एक नैसर्गिक प्रक्रिया या अर्थानं) झालीयेत त्यातल्या बर्याच लोकांना त्या मुलांची (किंवा त्या मुलांच्या बालपणाची) किंमत नसते (हे ही पाहिलंय प्रत्यक्ष).
लहान मुलांच्या (वय वर्षे १ ते ५) बाललीला हा एक आनंददायक प्रकार असतो (शी-शू, जेवण, रडणं, झोपणं इ. वेळ सोडून).
माझ्याकडून सुद्धा माझ्या २ वर्षांच्या लहान मुलावर ओरड्ण्याचा प्रकार २ वेळा घडला. पण त्यानंतर मी लहान मुलावर चिडणं बंद केलं कारण एकदा शांतपणे विचार करताना जाणवलं (एका मित्राला वैकुंठात पोचवून आल्यावर - कारण वेळ गेलेली आहे म्हणजे नक्की काय हे तेव्हा समजलं.) आपण आपल्या २ वर्षांच्या मुलावर चिडतोय कारण क्लाएंटचा कॉल सुरु आहे, त्याचवेळी ते मूल आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय कारण आपण दिवसभर त्याला मिळत नाही / दिसत नाही, आपण फटकन चिडून जातो पण त्याच्या आणि आपल्यापण आयुष्यातून तो क्षण निघून जातोय .. त्याच्या चिमण्या मनावर ओरखडा उमटवून. त्याची चूक काय?.. असलीच तर ती माझी चूक आहे, अवेळी क्लाएंटचे कॉल स्वीकारून मी माझ्या मुलाचा हक्काचा वेळ वाया घालवतोय. आणि गेलेली वेळ परत येत नाही.
त्या दिवसापासून मी माझ्या मुलावर ओरडणं बंद केलंय.
आजकाल बर्याच जणी आपली लहान मुलं घेऊन मॉलमधे फिरायला (फक्त टाईमपासला) येतात कारण,
१) तिथे रहदारी नसते
२) तुम्ही एकाचवेळी फोनवर बोलत राहून मूल पण हातात धरून फिरू शकता (बर्याच वेळेस मुलांना कॅडबरी/ लॉलीपॉप / आईसक्रीम वगैरे देऊन "गप्प" बसवलेलं असतं)
३) फक्त फिरण्यासाठी मॉलवाले पैसे आकारत नाहीत
४) मॉल मध्ये तुमचं मैत्रिणी बरोबरचं / इतर कुणाबरोबरचं फोनवरचं बोलणं "नको असलेल्या" कुणी ऐकायची जवळपास शक्यता नसते.
... अजून बरेच फायदे असावेत
पण पिराताईंच्या मुद्द्याशी मी सुद्धा पूर्ण सहमत आहे.
कविता१९७८ ताईंचा मुद्दा बरोबर आहे पण खटोलाजींनी ती बाई रडत असल्याचा काही उल्लेख केला नाहीये, सबब तीपण टाईमपास साठीच आली होती असं गृहित धरू.
माझ्या समजूतीप्रमाणं धाग्याचा मुद्दा हा असावा की..
मोठ्या माणसांनी आपल्या (किंवा कुणाच्याही) चिमुकल्यांसोबत वागताना जरा भान ठेवणं जरूरी आहे.
- Log in or register to post comments