Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर्दळी वनात जात आहात का ?

न
नितीनचंद्र
Fri, 02/05/2016 - 13:00
💬 54
कर्दळी वन ही जागा अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय जागृत अशी सांगीतली जाते, यु ट्युब वर तर प्रा क्षितीज पाटकुले एक करोड व्यक्तीतली एक व्यक्ती कर्दळीवनाची यात्रा करते असा प्रचार करतात. कारणही तितकच प्रभावी आहे. इथे स्वामी समर्थ प्रकटले. ही यात्रा आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या टुरिझम पॉलीसीत बसते का यावर कोणी काही बोलत नाही. ही जागा आंध्र सरकारच्या वनखात्यात येते. या प्रदेशात वन्य पशुंचा संचार आहे. जिथे जेवणाची व्यवस्था नाही. जिथे संपर्काचे साधन नाही. कोणला साप चावला तर औषध नाही. एखादा व्यक्ती यात्रेच्या अतिश्रमाने आजारी पडला तर औषध उपचार नाहीत अश्या ठिकाणी ट्रेकर्स मंडळी सोडुन काही सामान्य माणसे जातात आणि त्यांचे अतोनात हाल होतात. ज्याने एकही ट्रेक केलेला नाही अश्या कोणत्याही वयाच्या स्त्री/पुरुषाला कर्दळीवन सेवा संघ जाहीरात करुन भुरळ घालते. कधी कधी आंध्र प्रदेश सरकार परवानगी नाकारते. अश्या वेळी ह्या सहली अ‍ॅरेंज करणारे विना-परवाना लोकांना जंगलात घुसवतात. एकेका दिवशी २५ किलोमीटर्स पेक्षा जास्त जंगलातल्या पायदळीवर चालण्यास भाग पाडतात. वनखात्याचे पोलीस धमक्या देतात आणि स्वतःच्या जबाबदारीवर लोक ही यात्रा पुर्ण करतात. माझी ही श्रध्दा आहे की स्वामी कोणाचे काही बिघडु देणार नाहीत. पण स्वामींना त्रास कशाला. या ऐवजी ह्या म्हहत्वाच्या स्थळी जर स्त्री पुरुष यांना न्यायचे असेल तर अश्या सोयी सुविधा उपलब्ध होतील याकडे आयोजक आणि शासन लक्ष देईल का ?

प्रतिक्रिया द्या
18408 वाचन

💬 प्रतिसाद (54)
य
यशोधरा Fri, 02/05/2016 - 13:14 नवीन
ओह! हे माहित नव्हते.. कर्दळीवन यात्रेचे पत्रक वगैरे पाहिले आहे पण हे असे काही असेल हे माहित नव्हते.
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Fri, 02/05/2016 - 13:16 नवीन
सहमत... पण सर्व सोयी सुविधा पुरवल्या तर त्या यात्रेतील थरार कमी होईल. आज अनेक प्रसिद्ध देवस्थानांचा जसा बाजार झालाय तसे इथेपण होईल.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/05/2016 - 13:30 नवीन
हि यात्रा धार्मीक कार्य म्हणून करतात की थरार म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
व
विजय पुरोहित Fri, 02/05/2016 - 14:07 नवीन
कदाचित थरार हा चुकीचा शब्द आला. पण मला काय म्हणायचंय ही यात्रा पण अगदी सामान्य लोकांना अॅक्सेसिबल ठेवली तर आज अनेक देवस्थानांची जशी वाट लागलीये तसे इथे पण नक्कीच होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सतिश गावडे Fri, 02/05/2016 - 18:18 नवीन
लोक देवस्थानांना गेल्याने देवस्थानांची वाट कशी काय लागेल? तुम्ही बरोबर उलट म्हणत आहात. सामान्य लोकांना देवस्थाने अॅक्सेसिबल ठेवली तर अधिकाधिक रंजले गांजले, दु:खी कष्टी लोक तिकडे जातील. देवस्थानाच्या पावित्र्यामुळे, तेथील दैवी शक्तीच्या प्रभावामुळे त्यांची दु:खे दूर होतील. जर कुणाच्या मनात काही वाईट विचार असतील तर ते दूर होऊन त्यांचा मनात सद्विचार उत्पन्न होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
S
sagarpdy Fri, 02/05/2016 - 19:38 नवीन
काही देव आधी भक्ताची कठोर परीक्षा घेतात, पास झाला तरच पावताय. त्यामुळे या यात्रा सोप्या करणे पेपर फोडल्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 02/05/2016 - 19:58 नवीन
काही देव आधी भक्ताची कठोर परीक्षा घेतात, पास झाला तरच पावताय.
संत तुकारामांचा एक अभंग आहे: जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्‍त ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी दया करणें जें पुत्रासी, तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ति अभंगाच्या मतितार्थावरून आपण ही त्यांच्या मनातील देवाची प्रतिमा होती असे म्हणायला हरकत नाही. यात देव भक्ताला जवळ करण्याआधी कठोर परीक्षा घेतो याचा उल्लेख नाही. म्हणजे ही प्रतिमा अपुर्ण आहे असे म्हणता येईल का? (तुमचा प्रतिसाद उपहासात्मक नाही असं समजून मी प्रतिसाद दिला आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
S
sagarpdy Fri, 02/05/2016 - 20:19 नवीन
प्रतिसाद उपहासात्मकच होता.:) तुकोबांची डिग्री ची ब्रँच वेगळी, रावणादी राक्षस तसेच हरीश्चंद्रादी भक्तांची वेगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्राची अश्विनी Fri, 02/05/2016 - 13:32 नवीन
ही यात्रा एका ओळखीच्यांनी गेल्या वर्षी केली. १५ जणांचा ग्रुप होता. त्यांच्या मागून त्यांचे खाणे घेउन येणार्‍या माणसावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला होता. तो जगला की मेला कळले नाही . या ग्रुप्चे देखिल हाल दोन दिवस हाल झाले.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 02/05/2016 - 14:05 नवीन
कशाला जावे मग?
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Fri, 02/05/2016 - 14:09 नवीन
हेच म्हणतो. घरी बसून नामस्मरण केले तर काय देवाला चालत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Fri, 02/05/2016 - 14:34 नवीन
+११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
प
प्रचेतस Fri, 02/05/2016 - 15:07 नवीन
टक्या घरी बसून नामस्मरण करतोय हे चित्र डोळ्यांसमोर आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
विजय पुरोहित Fri, 02/05/2016 - 15:14 नवीन
आरोएफएल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Fri, 02/05/2016 - 18:55 नवीन
आम्चे पुजाविधी हे वेगळे असतात...इथे मिपावरच शास्त्रोक्त पुजा कशी करावी याचा जुना धागा आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सतिश गावडे Fri, 02/05/2016 - 19:21 नवीन
ती पुजा सांगणारे गुरुजी आता उत्क्रांतीच्या नादी लागलेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रचेतस Sat, 02/06/2016 - 01:37 नवीन
हो. आणि एक धर्म सुधारणा करणारे गुरूजी अता शास्त्रोक्त पूजेच्या नादी लागलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/06/2016 - 03:02 नवीन
कर्दळी वनात नेऊन हत्तीला ठार मारायचा विचार करत असलेला :- आत्मुभट कुठारकर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा Sat, 02/06/2016 - 08:03 नवीन
काल खफवर अजयाने एक कोडं घातलं होतं. आणि आज तुमचा हा प्रतिसाद बघितला.
काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Sat, 02/06/2016 - 08:18 नवीन
कापूस ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 02/06/2016 - 08:23 नवीन
कापूस गोरा असतो. आणि बुवा कुठचा हती मारणार आहेत? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 02/06/2016 - 08:59 नवीन
कर्दळीवनातला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Sat, 02/06/2016 - 12:13 नवीन
कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे यात काही छुपा अर्थ आहे काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा Sat, 02/06/2016 - 12:43 नवीन
>>>>काळ्या रानात हत्ती मेला>>> या कोड्याचं उत्तर माझ्या माहितीत 'ऊ' असं आहे, आणि बुवा कर्दळीवनात हत्तीला ठार मारणार म्हणाले ना, म्हणून विचारलं, कोणता हती. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
भ
भीमराव Sun, 02/07/2016 - 04:48 नवीन
पै का . ते कापुसच हाय, बोंडासकट आसलेला वाळका कापुस ऊपसुन बाहेर काडत्यात त्यो प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सतिश गावडे Sun, 02/07/2016 - 06:55 नवीन
कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे यात काही छुपा अर्थ आहे काय? ;)
त्यात फार गहन असा अध्यात्मिक अर्थ आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक पांढरा हत्ती असतो. हा हत्ती असतो "अहं"चा. कर्दळीवनासारख्या पवित्र ठिकाणी जाऊन हा अनावश्यक आणि न परवडणारा अहंचा पांढरा हत्ती मारायचा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/07/2016 - 07:01 नवीन
सालं 'उठाबसायला' भारी जागा आहे ती असा विचार आला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Wed, 02/10/2016 - 05:35 नवीन
" मोक्षासाठी कुणी उठा म्हणत नसेल तरच बसायला अर्थ आहे !! अन्यथा बसणेच काय कर्दळीवन यात्राही व्यर्थ आहे !!! नाखुष चारोळीकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 06:23 नवीन
हे कधी झाले? धर्म सुधारणेकडून शास्त्रोक्त पूजेकडे वळणे हे पुरोगामित्वाचे लक्षण की प्रतिगामित्वाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मृत्युन्जय Sat, 02/06/2016 - 07:31 नवीन
मुळात पुजा करणे (देवाची), सत्यनारायणाची पुजा सांगणे वगैरे हे पुरोगामित्व की प्रतिगामित्व? (शास्त्रोक्त की धर्मसुधारोक्त ही नंतरची गोष्ट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Sat, 02/06/2016 - 07:32 नवीन
गल्ली चुकलि ओ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 08:04 नवीन
ते तुमचा देवावर (किंवा देव या संकल्पनेवर) विश्वास आहे की नाही यावर अवलंबून आहे असं वाटतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रचेतस Sat, 02/06/2016 - 07:37 नवीन
ते मनुष्यत्वाचे लक्षण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 08:20 नवीन
वाह... मान गये. लेबल लावण्याच्या पलिकडे जाऊन तुम्ही अशा गोष्टींकडे मानवी अनुभव म्हणून पाहता तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 02/06/2016 - 08:59 नवीन
हो हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
पिलीयन रायडर Sat, 02/06/2016 - 04:15 नवीन
आमचे? पुजा जोडीने करायची असते. ते बघा आधी!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 02/06/2016 - 06:44 नवीन
मी त्याबाबतच लिहिले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रमोद देर्देकर Wed, 02/10/2016 - 04:37 नवीन
पण कोणाचे नामस्मरण करतोय Image removed. ? हे पण महत्वाचे आहे नाही का वल्लीदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
R
Rahul D Fri, 02/05/2016 - 22:23 नवीन
कर्दळी वनात का जात आहात? स्वामी सगळी कडे आहेत. मनापासून भक्ति करा. चांगले आचरण ठेवा.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 06:25 नवीन
या धाग्यात तसेच तुमच्या या प्रतिसादात उल्लेख असलेले स्वामी म्हणजे अक्कलकोट स्वामी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rahul D
व
विजय पुरोहित Sat, 02/06/2016 - 06:44 नवीन
हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 08:02 नवीन
मांत्रिकबुवा, याच धाग्यावर मी तुमच्या प्रतिसादाला उल्लेखून एक प्रश्न विचारला आहे. त्याचेही उत्तर दया जमले तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
व
विजय पुरोहित Sat, 02/06/2016 - 08:24 नवीन
आज प्रवासात आहे. सोमवारी देईन उत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मोगा Sat, 02/06/2016 - 09:02 नवीन
घरात बसुन पाच वेळा अजाण ऐकावी
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/10/2016 - 08:30 नवीन
कित्ती कित्ती अजाण प्रतिसाद ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ब
बॅटमॅन Wed, 02/10/2016 - 11:15 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
त
तर्राट जोकर Sat, 02/06/2016 - 09:08 नवीन
मक्केला कशाला मरायला जातात मग...?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2016 - 05:38 नवीन
"मानसपूजा हीच खरी..." असो, "जो जे वांछील तो ते लाहो."
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 02/07/2016 - 05:38 नवीन
जाऊ द्या ते अजाणच आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/07/2016 - 05:50 नवीन
सुखाचा जीव धोक्यात घालायचाच कशाला ? कंटाळा आणला राव या लोकांनी. कशाला मरायला जायचं जिथे त्रास होतो तर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा