Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्यात जरा ऊदासच वाटलं

ज — जव्हेरगंज, Sun, 02/07/2016 - 05:35
पुण्यात जरा ऊदासच वाटलं शुक्रवार पेठेत एक माकड मारलं रेल्वेने मग कोल्हापूरला गेलो महालक्ष्मी मंदिरात एक विंचू ठेचला मग बसस्टँडवर बिस्किटाचा पुडा खाल्ला चालत चालत मिरजेला गेलो वाटेत रुकडीला मुक्काम ठोकला सांगोल्याला मावशीच्या घरी तुऱ्याचा कोंबडा कापून खाल्ला पंढरपुरात जेव्हा पोहोचलो विठ्ठलाच्या नावानं टाळ कुटला चंद्रभागेत बुडी मारुन पुन्हा परतीचा रस्ता शोधला पुण्यात आल्यावर जरा ऊदासच वाटलं _________________ (आधारीत )

प्रतिक्रिया द्या
8157 वाचन

💬 प्रतिसाद (33)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/07/2016 - 05:41 नवीन
पण पुण्यात उदास का वाटलं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 02/07/2016 - 06:02 नवीन
कशावर आधारित? मस्त आहे पण.. ;-)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 02/07/2016 - 08:46 नवीन
यावर आधारित आहे: मुंबईनं भिकेस लावलं कल्याणला गूळ खाल्ला ज्या गावाला नाव नव्हतं पण एक धबधबा होता तिथं एक ब्लँकेट विकलं अन पोटभर पाणी प्यालो पिंपळाची पानं चघळत नाशकापर्यंत आलो तिथं तुकाराम विकला अन् वर खिमापाव खाल्ला जेव्हा आग्रारोड सोडला तेव्हा एक चप्पल तुटलं न मागता मिळालेली कांदाभाकर खाऊन ऊठलो ढुंगणाखालची हॅवरसॅक उचलून पाठीवर घेतली मग दोन मैल विचार केला अन परतायचं ठरवलं - अरुण कोलटकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 02/07/2016 - 08:50 नवीन
ह्यासाठी धन्यवाद! अर्थगर्भ आहे कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्राची अश्विनी Sun, 02/07/2016 - 10:50 नवीन
या कवितेसाठी धन्यवाद! खूप सुरेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ज
जव्हेरगंज Sun, 02/07/2016 - 10:52 नवीन
हो , यावरच आधारित आहे धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
भ
भक्त प्रल्हाद Sun, 02/07/2016 - 11:07 नवीन
मुंबईने भिकेस लावल्यावर पुण्याला आलात. मग उदास वाटणारच! असो. तुमची कविता समजली नव्हती. हि कविता दिल्यावर आता न समज्लेल्या दोन कविता झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अजया Sun, 02/07/2016 - 06:30 नवीन
कशावर आधारित समजले नाही.पण कविता मस्तच आहे.
  • Log in or register to post comments
R
Rahul D Sun, 02/07/2016 - 06:41 नवीन
पण पुण्यात उदास का वाटलं ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 02/07/2016 - 08:27 नवीन
पुण्यात जरा काय...फुल्ल उदास असते हो. मी येतच नाही आजकाल. :(
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 02/07/2016 - 09:44 नवीन
पुणे आवडलं नै तर हुंबैला चला. विचार करायला पण वेळ भेटणार नाय. अरुण कोलटकरांच्या कविता वाचणार्‍या सर्वांना लांबूनच साष्टांग नमस्कार.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 02/07/2016 - 09:47 नवीन
पण पुण्यात उदास का वाटलं ? >>>> कवितेतच ऊत्तर द्यायचा प्रयत्न केलाय . बघा सापडले तर :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 02/07/2016 - 09:57 नवीन
माकड मारल्याचं ( एका हुच्चभ्रूला सुनावलं) त्याचं प्रायश्चित्त घेऊन परत आल्यावरसुद्धा शुक्रवारपेठेत स्वागतच झालं "या एकदा सवड काढून."
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sun, 02/07/2016 - 10:18 नवीन
कोल्हापुरचे सहकार मसाला दुध आणी मिरजेची शिवाप्पा हलवाइची लस्सी .
  • Log in or register to post comments
त
तर्री Sun, 02/07/2016 - 10:24 नवीन
पूर्वीचे पुणे राहिले नाही.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 02/07/2016 - 10:55 नवीन
पुण्यात उदास वाटले तर बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे. तिथल्या स्वर्गिय वातावरणाने आणि जेवणाने उदासिनता कुठल्या कुठे पळून जाते. निदान तिथल्या बिलाने तरी नक्कीच जाईल.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 02/07/2016 - 12:46 नवीन
बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे, आल्यावर त्यावर धागे काढावेत मग आपला आणि बऱ्याच मिपाकरांचा उदासपणा नक्की जातो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Mon, 02/08/2016 - 05:30 नवीन
सूज्ञ मिपाकर "उदास"(आडनाव नाही चित्तवृत्ती) झालेले लोकच बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीलाच जातात असा जावईअशोधाच्या धाग्याच्या प्रतीक्षेत रहावे लागेल आम्हाला !!! नाखु वाटपहाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अजया Sun, 02/07/2016 - 11:02 नवीन
मलाही पुण्याला येऊन माकड मारायचे आहेच एकदा.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 02/07/2016 - 11:11 नवीन
माकडाने काय घोड मारलाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Sun, 02/07/2016 - 11:23 नवीन
काय हे....कोणी माकड मारायची भाषा करतयं...कोणी हत्ती मारायची भाषा करतयं.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
उ
उगा काहितरीच Sun, 02/07/2016 - 12:42 नवीन
जव्हेरभाऊ नाही आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 02/07/2016 - 13:42 नवीन
मै भाभीको बोला क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? भड़क गयी साली रहमान बोला गोली चलाऊँगा मै बोला एक रंडीके वास्ते? चलाव गोली गांडू. - अरुण कोलटकर
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 02/08/2016 - 10:00 नवीन
हे विडंबन वा अजुन जे काय तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय ते अजिबात आवडल नाही. मुळ कविच्या वहीवर विनाकारण चिंखडण्यासारख वाटलं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
न
नीलमोहर Mon, 02/08/2016 - 05:50 नवीन
एकतर पुणं.. त्यात पेठ.. तीही.. असो. पुण्यात सर्वाधिक माकडं स... आणि श... पेठेत आढळून येतात बहुधा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 02/08/2016 - 07:58 नवीन
हे नियमांत बस्ते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Mon, 02/08/2016 - 09:38 नवीन
मी खर्‍र्रया - खुर्‍र्या शेपटीवाल्या प्राण्यांबद्दल (स्वतः पाहिलेले) लिहीले आहे. आपण कशाबद्दल म्हणताय ;) (पेठ निवासी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 02/08/2016 - 09:50 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ब
बॅटमॅन Mon, 02/08/2016 - 09:44 नवीन
पेठेतली माकडं म्हणे आजकाल कोथ्रुडात ट्रान्स्फर झालीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 02/08/2016 - 10:50 नवीन
काहीतरी समजेल असे लिहा ना जव्हेरभौ!! उगीच डोक्याला शॉट
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/08/2016 - 15:14 नवीन
@
पुण्यात जरा ऊदासच वाटलं
>> अस्स्सं!!!
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 02/08/2016 - 18:35 नवीन
गेले आंब्याच्या वनी म्हटली मैनेसवे गाणी चाफा बोलेना, चाफा चालेना
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Tue, 02/09/2016 - 00:07 नवीन
ऊदास वाटल... काहिहि हा जव्हेरजी ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा