Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घरात जरा उदासच वाटलं

अ — अन्नू, Sun, 02/07/2016 - 14:30
जव्हेरजींच्या उदासीकडे बघून आमचेही दु:ख खदाखदा करत वर आले... ;) ;) Smiley face crying घरात जरा उदासच वाटलं हापिसात काल, जरा मटणंच हाणलं सायबाच्या स्टेनोला बघण्यात पण- पाणी प्यायचं राह्यलं! बोंबलून-ओरडून जवा घसा कोरडा पडला मेल्या जोश्यानं त्यात जगभर पाणीच कोंबलं! यावर हसून तिनं माझ्याकडे पाह्यलं सगळ्या रागाचं जणू 'पाणी-पाणी' झालं! दुपारी तिनं फिरायचं आमंत्रण दिलं सिक नोटीस मागे ठेऊन, मी ऑफिस सोडलं- रेल्वेनं मग दादर गाठलं टॅक्सीत बसून हळूच तिनं चौपाटी सांगितलं सावली बघून बसकण मारली. बघता-बघता चार कणसं, तिनं माझ्याआधी संपवली! समुद्राकडं बघत तिचा अर्धा तास चरण्यात गेला तिला न्याहाळन्यातच माझा आईस्क्रीम-कोन वितळून गेला.. संध्याकाळची किरणं जवा समोर चम-चम चमकायला लागली 'आहा.....' तिसरा पुडा फोडत तिने मला, 'एक' बिस्कीट ऑफर केली! :( गॉसिप सांगून-सांगून जेव्हा तिच पुरती कंटाळली "चला- जाऊ" म्हणत, तिने 'डेट' आपली संपवली. आपल्याच कर्माला दोष देत आंम्ही कपाळावर हात मारुन घेतला अन् उठता-उठता तिने मागितलेला पॉपकॉर्न (तिच्या) हातात ठूसून दिला! मऊ-मऊ वाळूत चालत तिने हळूच एक कटाक्ष टाकला खुदू-खुदू हसत मग माझा हात हातात घेतला 'कित्ती रे लाजरा?' म्हणत तिने (स्वतःच्याच तोंडात) पॉपकॉर्न कोंबला समुद्रात हुदडून आंम्ही परतीचा रस्ता धरला. पाण्यात चालताना दुप्पटा तिचा फडफडला तो सावरुन देत असतानाच- (आमच्या) महामायेनं मला हेरला! त्या दिवसापासून- हापिस आमचं, कायमचं बंद आहे बाहेर तरी जाऊ कसा, महामाया समोरच आहे रोज उठून धुणं-भांडी करुन मन आज वैतागलं काहीही म्हणा मंडळी पण- तेच-तेच वरणभात खावून ...घरात जरा उदासच वाटलं! :( :(

प्रतिक्रिया द्या
4608 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पैसा Sun, 02/07/2016 - 15:13 नवीन
:) कविता अगम्य नाही. तुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का?
  • Log in or register to post comments
अ
अन्नू Sun, 02/07/2016 - 15:16 नवीन
तुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का? त्यांच्याच शोधात आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Sun, 02/07/2016 - 15:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 02/07/2016 - 15:27 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 02/07/2016 - 18:25 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 03/01/2016 - 13:46 नवीन
मस्तय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा