Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?

स
सुरवंट
Sun, 02/07/2016 - 15:01
🗣 31 प्रतिसाद
निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का? निसर्गाने कोकणात आपले अनेक रंग ऊधळले आहेत. एवढ्या हिरव्यागार प्रदेशात पाण्याची कमतरता नक्कीच नसणार. शेतीची नक्की काय अवस्था आहे माहित नाही. बहुदा खडकाळ जमीनीवर शेती करता येत नसावी. कोकणस्थांची रोजगार मिळवण्याची साधने कोणती? किनारपट्टी लाभल्याने मासेमारी हा मुख्य व्यवसाय असावा. मात्र बोटींवर काही परराज्यातील तरुण आढळले. आंबे फणस सुपारी यांचाही पारंपरिक व्यवसाय होत असावा. कोकणातील बरेच तरुण नोकरीधंद्यानिम्मित्त पुण्या-मुंबईसारख्या शहरात स्थायिक झाले आहेत. कोकण हा म्हाताऱ्यांचा प्रदेश झाला आहे काय? कोकणातील वाढत्या बेरोजगारी मागील कारणीमामांसा जाणून घेण्यास धागा काढण्यात आला आहे. ऐकीव माहिती मी वरती लिहीलेली आहेच. आपलेही मत जाणून घेण्यास उत्सुक. चित्र यापेक्षा वेगळे असल्यास तेही स्पष्ट करा.
वर्गीकरण
कोकण बेरोजगारी

प्रतिक्रिया द्या
5424 वाचन

💬 प्रतिसाद (31)
ज
जेपी Sun, 02/07/2016 - 15:10 नवीन
मी पयला. (रोजगारी)जेपी
  • Log in or register to post comments
स
सुरवंट Sun, 02/07/2016 - 15:51 नवीन
मूळ कोकण निवासी सदस्यांनी याबाबत विस्तृत लिहावे ही विनंती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
पॉइंट ब्लँक Sun, 02/07/2016 - 15:17 नवीन
प्रश्न अर्धाच आहे. राहिलेला भाग - "ऱोजगारी आल्यावर कोकण निसर्गरम्य राहिल काय? " कोकण बेरोजगार ठेवा असं सुचवायचं नाही आहे. पण प्रगती करायची म्हंटलं की त्याची किंमत मोजावी लागते. थोडक्यात आपल्या दुखांना अंत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुरवंट Sun, 02/07/2016 - 15:49 नवीन
<<राहिलेला भाग - "ऱोजगारी आल्यावर कोकण निसर्गरम्य राहिल काय? ">> हा पुढचा प्रश्न आहे आधी ' निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?' यामागील कारणीमामांसा हवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
ब
बोका-ए-आझम Sun, 02/07/2016 - 16:28 नवीन
पण पु.ल.देशपांड्यांचा एक किस्सा आठवला. त्यांना कोणीतरी कोकणातले सुतार काम का करत नाहीत असं विचारल्यावर ते मिस्किलपणे म्हणाले होते, " करवत नसेल." (संदर्भ - कोट्याधीश पु.ल. - चतुरंग प्रतिष्ठान)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 02/07/2016 - 16:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 02/07/2016 - 17:19 नवीन
पण कोंकणी स्वभावाला जागून विचारते. ही सगळी माहिती कशासाठी हवी आहे?
  • Log in or register to post comments
स
सुरवंट Sun, 02/07/2016 - 17:38 नवीन
आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटनेला विकायची आहे :( ;-) (थोडेफार ज्ञानकण वेचायचे आहेत बाकी काही नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
S
sagarpdy Mon, 02/08/2016 - 07:16 नवीन
कोकणस्थांची रोजगार मिळवण्याची साधने कोणती?
कोकणस्थ = कोकणात राहणारे कि सदाशिव पेठेत ? =))
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 02/08/2016 - 08:17 नवीन
कोकणात राहणारे कि सदाशिव पेठेत ? =))
तिथून कधीच क्यालिफोर्नियाला गेले अन तिकडेच कोकण केलाय म्हणतात! मधे झी २४ तास वाहिनीवर सुवर्ण कोकण ही चांगली मालिका सहा महिने चालली होती. त्यावरून बेरोजगारी वगैरे असेल असं वाटत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
श
शरद Tue, 02/09/2016 - 07:18 नवीन
कोकणात बेरोजगारी ? श्री.सुरववंट याना ही माहिती कुठे मिळाली ? आज कोकणात अशी परिस्थिती आहे की भाताची शेती करावयाला माणसे मिळत नाहीत. पोफळी-नारळ काढावयास माणसे नाहीत. आंब्यांच्या बागा राखावयाला परप्रांतीय माणसे आणावी लागतात. घरकामाला बाई-माणुस मिळवणे अवघड झाले आहे. पर्यटन उद्योगाला चांगला वाव आहे पण कामगार मिळणे अवघड झाल्याने बरेच जण तो विचार सोडून देतात. याला माझ्या मते पुढील कारणे. पूर्वी भातशेतीची ३-४ महिन्यांची कामे सोडली तर तेथे कोणतीच कामे मिळत नव्हती. त्यामुळे माणसे आळशी झाली. ती स्वभावत: अल्पसंतुष्टही आहेत. रोज दोनशे रु. मिळत असतील तर २५ दिवव्स काम करून ५००० रु. मिळवण्याऐवजी दहा दिवसच काम करा व मिळणार्‍य़ा पैश्यात महिना भागवा हीच मनोवृत्ती. त्यात मायबाप सरकार दोन रु. किलोने ३५ किलो धान्य देते. कशाला काम करावयाचे ? ही परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तलुक्याच्या भागातील, माझ्या माहितीची. ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवावयाचा तर इतरही ठिकाणी फरक नाही. शरद
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/09/2016 - 07:34 नवीन
अगदी सत्य आहे. माझ्या मामेभावाने रेवदंड्याला आपली नारळी पोफळीची बाग विकून टाकली. कारण नारळ काढायला कोकणी माणूस मिळत नाही. फक्त शिरजोर मल्याळी माणसे उपलब्ध आहेत. वयामुळे त्याला त्यांच्या मागे जाणे जमत नाही. बाकी या पट्ट्य़ात बहुतांश माणसे पर्यटनाच्या व्यवसायात आहेत. नुसत्या घराच्या एक किंवा दोन खोल्या विकांताला भाड्याने दिल्या तरी फारसे कष्ट न करता पैसे मिळतात. दारू पार्टी करता मुंबईतून येणारी माणसे पैसे फेकायला तयार असतात. शिवाय सामिष जेवण बाहेरून( हॉटेलातून)आणून / उपलब्ध करून देता येते त्यामुळे बायका सुद्धा घरी "करण्याच्या" फंदात पडत नाहीत. असे जे लोक कष्टाळू आहेत त्यांनी भरपूर पैसा कमावला/ कमावत आहेत. बाकी चिपळूण गुहागर कडे पण पर्यटन उद्योग किंवा आंब्याच्या बागांना माणसे मिळत नाहीत हि वस्तुस्थिती. तेथे हॉटेलात भय्ये आणी नेपाळी आहेत. नेपाळ्याना भारतीय ५००० रुपये नेपाळात पाठवले कि ८००० नेपाली रुपये होतात. त्यामुळे (त्त्यामानाने) कमी पैशात हि माणसे आनंदात काम करतात.आणी कोकणी माणसे बसून खातात. कष्ट करण्याची तयारी असलेली माणसे मुंबईत आलेली आहेत किंवा तेथेच या व्यवसायात आहेत. आणी तेथे राहिलेली बाकी माणसे आळशी आणी ऐदी आहेत. त्यामुळे रोजगार उपलब्ध असला तरीही करण्याची तयारी नाही. कोण म्हणतो बेकारी आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
म
मराठी कथालेखक Tue, 02/09/2016 - 10:29 नवीन
विकांताला
?? मराठी आणी इंग्रजीचा एकत्रित आकांत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
S
sagarpdy Tue, 02/09/2016 - 10:50 नवीन
एकदम बरोबर. १० दिवस काम करायचं, बाकी वेळ पत्ते कुटायचे, जाकडी-झगडे करायचे/पहायचे, लाईफ एन्जॉय करायची असं आमचं तत्त्व आहे. (आम्ही लांजाचेच :P ) विनोदाचा भाग सोडा, पण कोकणात विविध कारणास्तव कारखानदारी व पर्यायाने नोकऱ्या (नियमित रोजगार) फार कमी, त्यामुळे बहुतेक लोक मुंबई-पुण्याकडे येउन नोकरी धरतात. कोकणात उरले आहेत ते आंबा-काजू बागायतदार, म्हातारी मंडळी, सरकारी नोकर. समुद्रकिनारच्या गावात मात्र पर्यटन व्यवसायामुळे मानसं आहेत. भातशेतीला माणसं मिळत नाहीत कारण तरुण मंडळी मुंबईत आहेत. म्हाताऱ्या माणसाना नांगर धरायला झेपत नाही (देवळाच अंगण करून घेणंही कठीण झालाय). हल्ली भात शेताचे हळूहळू काजू मळे होत आहेत, उन्हाळ्याचे ४ दिवस काम, बाकी वर्षभर आराम. आशा आहे कि मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच होऊन कारखानदारी वाढावी आणि आहेत त्या माणसांना तरी नियमित रोजगार मिळावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
प
पैसा Tue, 02/09/2016 - 12:44 नवीन
कितीही पैसे द्या. माणसं मिळत नाहीत. आले तर उपकार केल्यासारखे काम करतात. प्रामाणिकपणे काम करण्यापेक्षा मालकाला चुना कसा लावला याच्या गमजा ऐका नंतर. ज्यानी जमिनी सांभाळून ठेवल्यात त्यांच्या जमिनीत खोटेनाटे उपद्व्याप कोर्ट केसेस करून कूळ लावून जमीन हडप करणे हा मोठा धंदा झालाय. मामलेदार कचेरीतले लोक त्या हरामखोराना सगळी मदत करतात. मालक बाहेरगावी रहात असलेल्या लोकांच्या जमिनी लँड रेकॉर्डमधून या रिकामटेकड्याना दाखवणे, केससाठी पैसे पुरवणे इत्यादि. गावात एक अख्खी वाडी आहे, त्याना सरकार इतके काही देते की पोटापाण्यासाठी काम करायची बिलकूल गरज नाही. पण म्हणून जास्तीचा वेळ काम करून जास्त पैसे मिळबतील किंवा शिकून शहाणे होतील, नाव नको. आजच काजूच्या बागेत कामाला ठेवलेल्याने आमच्या गैरहजेरीत गवताला आग लावून आणि मग हलगर्जीपणा करून ३५ झाडे होरपळल्याची बातमी थोड्या वेळापूर्वी दिलीय. आता आधी सगळे टाकून तिकडे धावत जाणे भाग आहे. झाडे लावा, वाढवा, खते घाला हे उपद्व्याप करून पैसे कोणाला नकोत. त्यापेक्षा दुसर्‍याने लावलेल्या झाडांच्या बिया चोरणे सोपे. येता जाता पाच एक किलो बिया उचलल्या की ५०० रुपयाची सोय झाली. मग ३/४ दिवस काही करायला नको. कहर म्हणजे आमच्या शेजारी ज्याची जमीन आहे तो त्याच्या झाडांना खते बिते घालत नाही. आम्ही घालतो. मग त्याला आयत्याच बिया मिळतात! फक्त गडगा ओलांडला की काम झाले. सकाळी संध्याकाळी आम्ही झाडाखाली जायला घाबरतो. साप बिप असतील म्हणून. या लोकांना कधीच साप चावत नाहीत. एकूण बियांपैकी ३० टक्के तरी चोरीला जातात. :( आमचा गावही लांजा तालुक्यातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
म
मंदार कात्रे Tue, 02/09/2016 - 11:24 नवीन
पूर्वी भातशेतीची ३-४ महिन्यांची कामे सोडली तर तेथे कोणतीच कामे मिळत नव्हती. त्यामुळे माणसे आळशी झाली. ती स्वभावत: अल्पसंतुष्टही आहेत. रोज दोनशे रु. मिळत असतील तर २५ दिवव्स काम करून ५००० रु. मिळवण्याऐवजी दहा दिवसच काम करा व मिळणार्‍य़ा पैश्यात महिना भागवा हीच मनोवृत्ती. त्यात मायबाप सरकार दोन रु. किलोने ३५ किलो धान्य देते. कशाला काम करावयाचे ?
१००% सहमत आमचे गाव रत्नागिरी कोल्हापूर हायवे वर ... रत्नागिरी पासून ३० किमी ... अगदी सेम सिच्युएशन आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
क
काकासाहेब केंजळे Tue, 02/09/2016 - 08:33 नवीन
तसे नाही हो खरे साहेब,सुपिक जमीन नेहमी जेते किंवा जेनेटीकली सुपिरीअर लोक ताब्यात घेतात.अनेक नद्या घाटमाथ्यावर उगम पाऊन प.महाराष्ट्राक्डे वाहतात ,त्यामुळे नाशिकपासुन सांगलीपर्यंत सुपिक पट्टा आहे,माफक पाउस ,उत्तम हवामान यामुळे पुरातन काळापासुन जेनेटीकली सुपिरीअर व काँम्पीटीटीव लोकांनी हा भाग ताब्यात घेतला ,त्यामुळे उर्वरीत महाराष्ट्रात फक्त जेनेटीकली इन्फेरीअर लोकच राहीले,जे बुद्धी उद्यमशिलता यात सुमार होते व आजही राहीले.त्याचाच परिपाक म्हणून कोकण मराठवाडा मागास आहेत. हेच तत्व युरोपला लागू होते ,तिथले हुशार ,रिस्कटेकर्स अमेरिकेत गेले व युरोपात सुमार लोक शिल्लक राहिले.त्यामुळे अमेरिका एकूण युरोपपेक्षाही प्रगत आहे.बेरोजगारीचा असा संबंध आहे.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Tue, 02/09/2016 - 11:00 नवीन
वाल्गुदस्वामिनी परवा टिळकांच काय वाक्य सांगितल हो विठाकाकांना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/10/2016 - 07:45 नवीन
काकेंसाहेब, धागा हजारप्रतिसादी करायला काडी टाकण्यासाठी आजकाल तुमचा काय रेट आहे ?! =)) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
क
कोंकणी माणूस Tue, 02/09/2016 - 09:05 नवीन
भरपूर काम हा ओ कोकणात … चार दिवस झाले माडाची अळी काढूक माणसा शोधतय गावनत नाय , दिवसाचे ३५०-४०० रुपये देयन. असली तर सांगा.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर Tue, 02/09/2016 - 10:51 नवीन
compnya nastil koknat pan kaam khup aahe.... karun karrun sampat nahiy.... naal kadhuk manasa gavanat naay. naal soluk manasa naay, sadhya kalmanka paanimaruk sudha zilge gavanat naay..... tumka berojgari khay deesali....
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Tue, 02/09/2016 - 13:12 नवीन
खैसुर्ले तुमि वो? अस्सल मालवनी बोलतास बाकी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
म
मंदार कात्रे Tue, 02/09/2016 - 11:26 नवीन
सध्या पुरुषाना ३०० तर महिलाना १५० रुपये मजुरी दिली जाते ... कारागीर (गवन्डी /सुतार )असेल तर ५००/- मिळते ... तरी ही कामाला माणसे मिळत नाहीत
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Tue, 02/09/2016 - 13:03 नवीन
नुकतेच मामाने घर बान्धले... ५००/- रोज... मोजून ५-६ माणसे... जास्त माणसच उपलब्ध होत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
स
सतीश कुडतरकर Tue, 02/09/2016 - 13:23 नवीन
घरची धुणीभांडी करायला माणसे मिळत नाहीत म्हणून एव्हढा राग राग! बेरोजगारी कोकणात??? मग नक्कीच आत्महत्यांचहि प्रमाण जास्त असावं.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 02/09/2016 - 13:27 नवीन
इथे प्रतिसाद वाचून अचानक कोकणाबद्दल मनात कसेसेच व्हायला लागलेय कारण १) "हिच्या गोवाला कोकण दाखवा" हे गाणे... 2) आमच्या गावाकडे रिकामटेकडे/आयतखाऊ मलातरी अपवादाने पहायला मिळाले. गावात गेलो तर सगळे बिझीच दिसतात शिवाय जे गावाकडून पुण्या-मुंबैला कामानिमित्त येऊन राहिलेत त्यांचाही कामात कोणी हात धरू शकत नाही - इंक्लूडिंग मी!! ;) वर आणि प्रामाणिकपणामध्ये तर आमच्या भागाने तर आख्ख्या भार्ताला..... नाही नाही, जगाला, कधीच मागे टाकलेय. जास्त होत असलं तर येतो मी...चला! :) Sandy
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 02/09/2016 - 14:43 नवीन
घोवाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
आ
आनन्दा Tue, 02/09/2016 - 14:41 नवीन
कोकणात काम नाही हा शोध लेखकाने कश्याच्या आधारावर लावला काही कळत नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 02/09/2016 - 16:54 नवीन
अशी बेरोजगारी सर्वत्र पहायला मिळते. आमच्या गावात मित्राच्या पानटपरी वर फुकट सुपारी घासत कितेक जण बसलेले असतात,पण काम करतो का विचारले की,तोंड वाकडे करतात..
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 02/10/2016 - 07:59 नवीन
हे आयतोबा घराने(खोट्या प्रतिष्ठे भ्र्मातून)+भाऊबंदानी+गावाने+सरकारी योजनांनी आणि हो कधी-कधी आऱक्षणाने ही (घरातला एक सरकारी नोकरीत चिकटलाकी बाकीच्यांना अस्ले डोहाळे लागलेच म्हणून समजा, अगदी ताजे उदाहरण आहे) यांना स्थल-प्रदेश-जात सापेक्षता नसते. कुठल्याही खेडेगावात जा दिसतीलच (वाघोली+खेडशिवापुर्+काम्शेत अश्या ठिकाणांना खेडेगाव म्हणून उदाहरण दिल्यास चिमणचा फाटा आहेच) खेडे गाव म्हणजे पाणी लांबून आणावे लागतेय आणि यष्टी फाट्यापर्यंतच येते (तिथुन गावाला फटफटी नाहीतर एम ८० चा भरोसा अश्याच गावांबाबत).

पण काम करतो का विचारले की,तोंड वाकडे करतात..

प्रत्यक्ष अनुभवी (नावालाच गांव असलेला) पांढरपेशा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कोंकणी माणूस Wed, 02/10/2016 - 07:24 नवीन
एक गोष्ट मात्र हा, कि कोकणातलो झीलगो सरकारी नोकरीच्या तितकोसो मागे नाय, म्हणजे स्पर्धा परीक्षा MPSC वैगरेत, काय आपली भारती वैगरे असली तर मात्र Form भरतीत. आमच्याकडे पोर / पोरा (मुलगा /मुलगी ) हुशार निघाली कि डायरेक डॉक्टर नायतर Engineer. मग ती एकदा शिक्षणासाठी भायर पडली कि नोकरी घेवनच परत येतत. बाकी रवलेले सगळे बारीक सारीक धन्दो करतत. मगे ती शेती असो नायतर कॉम्पुटर क्लास असो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा