चिनाब रेल्वे पूल - भाग २
भाग १: लवकरच येत आहे - चिनाब रेल्वे पूल नावाचा चमत्कार
काश्मीर रेल्वेच्या चिनाब पुलाबद्दल इथे पूर्वी लिहिलं होतं. नुकताच तिथे पुन्हा जाण्याचा योग आला. या पुलाचे काम अजूनही सुरू आहे. पुलाचे तीन पडाव (कृपया Span ला मराठी शब्द सुचवावा) टाकण्यात आले आहेत.
तिथे पोचण्याचा रस्ता आधी कच्चा होता, तो आता पक्का करण्यात आला आहे.
पण काश्मीर रेल्वे सुरू व्हायला अजून बरीच वर्षे लागतील असे कळले. कारण कटरा ते बनिहाल या सुमारे २०० किमीपैकी तीस किमीचे कंत्राटच अद्याप प्रलंबित आहे.
चिनाब पुलाचे महाकठीण काम आहे, ते वेगळेच.


मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram