अरे बापरे! असा काही पॅटर्न दिसुन येतो काय? विशेष असे काहीच कारण नाही! पण ती एक सवय लागून गेली आहे मला, आवडते जाणून घ्यायला. प्रत्येक मातीचे वाण वेगळे गुण वेगळा त्या मातीतल्या लोकांत असलेल्या कलाकारी वेगळ्या, ढबी वेगळ्या , समजून घ्यायला आवडते, माणसे वाचायला मजा येते. म्हणून विचारतो, त्यात काही ulterior motive नसतो सहजच विचारले जाते :)
काल पुणेरी पलटन ची मॅच पाहिली स्टेडियम ला, अन एक लक्षात आले, पुणेरी पलटन ही टीम एक खांबी तंबु आहे. अन हा पुर्ण सर्कस डोलारा फ़क्त मनजीत छिल्लर ह्या एका खांबावर तोलला गेलाय!
एक छिल्लर सोडला तर बाकीचे मुर्ख आहेत
डीफेन्सवाले तर मॅच घालवण्याची सुपारी घेतल्यासारखे खेळतात.
आणि प्रशान्त चव्हाण एवढा मंद डीफेंडर तर गल्ली कबड्डी मधे सुद्धा नसेल
काल तर प्रशांत चव्हाण पाहिली रेड सुरु झाली तेव्हा चक्क लॉबी मधे उभा होता राव! असली घाण विकेट तर क्रिकेट मधे इंजमाम ने सुद्धा रन आउटमधे फेकली नसेल कधी!आजुबाजूची माणसे हसत होती चव्हाण ला! बोदल्या मेला ! नंतर सुद्धा एक टच पॉइंट असाचदिला त्याने!
प्रशांत चव्हाण ने प्रथम वजन कमी करावे असे वाटते! :D
खर तर आत्ता प्रो कबड्डी चा सिझन नाहीये पण लोकांना जर कोणत्याही गोष्टीची सवय लावायची असल्यास ती गोष्ट त्याच्या समोर सातत्याने येत राहिली पाहिजे, आपल्याकडे क्रिकेट सोडून इतर खेळ म्हणजे किस झाड कि पत्ती समजले जात होते, त्यातून कबड्डी सारखा रांगडा आणि मातीतला खेळ म्हणजे अगदीच गायी गुजरी बाब होती ना ह्या खेळत पैसा होता ना प्रसिद्धी आणि शारीरिक इजा तर पाचवीला पुजलेली पण ह्या सगळ्यावर मात करत ह्या रांगड्या खेळाची आकर्षक मांडणी करून त्याला काही नवीन नियमांची साथ देत आपल्या अस्सल देशी खेळाची चटक लोकांना लावली जात आहे हे हि नसे थोडके...
सॅफ स्पर्धेमुळे बरेच महत्वाचे खेळाडू जरी काही मॅचेस खेळणार नसले तरी त्यामुळे त्याचा फायदा इतर खेळाडूंनी घ्यायला हवा. ह्या वेळचा प्रो कबड्डीचा सिझन आणि सॅफ स्पर्धे एकत्र होणार असल्यामुळे १२ सेनादलच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. व्यावसायिक खेळाडूंपेक्षा सेनादलाच्या खेळाडूंचा फिटनेस खूपच उजवा असल्यामुळे त्यांची कामगिरी पण छान होत आहे ( अमित राठी , नितीन तोमर , प्रशांत राय) तसेच मोठे खेळाडू जरी सॅफ स्पर्धेमुळे खेळत नसले तरी स्पर्धा मात्र तशीच चुरशीची होत आहे. मात्र काही मोठ्या खेळाडूंना त्यांच्या नावाप्रमाणे अजून कामगिरी करता आलेली नाहीये (राकेश कुमार- यू मुंबा, मनप्रीत सिंग - पतन पायरेट्स , धर्मराज - तेलगु टायटन ) पण त्यांच्या अनुभवाचा फायदा मात्र ते आपापल्या संघाला करून देताना दिसत आहेत.
प्रो कबड्डी सिझन ३ च्या विजयाचा दावेदार कोण आहे हे आत्ताच सांगणे कठीण आहे कारण कोणत्याही संघाचे स्टार खेळाडू संघाबाहेर गेल्यावर संघाला सावरायला आणि आहे ते खेळाडू घेऊन रणनीती आखून ती प्रत्यक्षात आणायला थोडा वेळ लागतोच. ८ पैकी ६ संघाच्या पहिल्या ७ खेळाडूमध्ये मोठा बदल झाला आहे. पुणे आणि बंगाल ह्या संघाचे पाहिले ७ खेळाडू जवळपास तेच असल्यामुळे ह्या दोन्ही संघाना त्याचा जास्त फायदा मिळू शकतो. जसे जसे दिवस जात आहेत तसे तसे प्रत्येक खेळाडूचा कस लागत आहे.
एकूण काय तर अवघ्या ४० मिनिटात एका खेळाच्या निमित्ताने आपले आयुष्य व्यापून राहिलेले आक्रमण, प्रतिकार, झुंज, बचाव आणि रणनीती हे गुण बघायला मिळतात.
सुरुवातीला फ़क्त मनजीत छिल्लर वर आधारित वाटत होती पण आज उत्तम टीम गेम खेळली ! अजय ठाकुर च्या सुपर रेड अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे जसमेर सिंह गुलिया चा डिफेन्स
प्रो कबड्डी लिग फॉलो करतो..
पण टिवी वर पाहण्यापुरते...
बाकी काय माहिती नै..
कबड्डी..कबड्डी..कबड्डी..कबड्डी..कबड्डी..कबड्डी..कबड्डी...
मी पयला..
.
.
.
आणी शेवटचा बहुतेक..
मुळात हा सीझन नाहीच प्रो कबड्डीचा...हाही खेळ पैशात अडकणार.....
+1
ओव्हरकिलींग..!!
आपण ( मी तरी नक्की ) टीवी वर कबद्द्ड्डी पाहायला तरी लागलो
फॉलो नाही सद्ध्या वेळेअभावी. पण मागचे सीझन बघितले होते. जबर!
कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढली या निमित्ताने. बाकी सोडा.
+१
ह्याचं क्रेडीट स्टार वाल्यांना पण द्यावं लागेल. अशीच खो-खो ची स्पर्धा झाली पाहीजे आणि स्टार वालेच चांगला न्याय देतील त्याला.
आणि चारू शर्माला सुद्धा क्रेडीट द्याव लागेल.
कबड्डी काय बघायची गोष्ट नाय.या आमच्या सोसायटीत खेळुयात घटकाभर.
बाकी ते प्लेयर् लोक्स डेंजर दिसतात. बघवत नाहीएत.
खर तर क्रिकेट जो आपल्या देश राष्ट्रीय खेळ नसून हि त्या सारखी प्रसिद्धी बाकी कोणत्या खेळला मिळाली नाही आपल्याकडे.
पण कब्बडी सारखा पक्का रांगड्या मातीतला खेळ या उंचीवर नेल्या बदल खर तर प्रो कब्बडी लीगचे कौतुकाच करावेसे वाटते
तो ४० मिनिटाचा थरारक खेळ खेळाडूंची क्षमता आणि खिलाडू वृत्ती बरोबरच खेळाडूच्या आत्मविशावसाला पण पणाला लावतो.
प्रो कब्बडी चा ३ भाग खूपच रोमांचीत चालू आहे .सर्वच संघ चांगले प्रयत्न करत अहेत. अजून बर्याच म्याचेस आहेत नेहमी प्रमाणेच उत्तम खेळाची अपेक्षा.
यंदा बेंगाल वर्रिओर्स आणि पटना पायरेटस भरपूर अपेक्षा आहेत , अतिशय उत्तम खेळत आहेत. :)
कब्बडीमधे भारत
Asian Games ९ सुवर्ण
Kabaddi World Cup ७ वेळा वि़जेता the unbeaten champion winning every edition
म्हणुन कब्बडीला प्रसिद्धिच्या उंचीवर नेल्या बदल खर तर प्रो कब्बडी लीगचे आणखीच कौतुक करावेसे वाटते.
आईपीएल नंतर सगळ्यात जास्त viewership प्रो कबड्डी लीग ची आहे म्हणे! मी तर रोज पाहतो नियमाने
कोणाला प्रो कबड्डीचं अंकुश चौधरीचं गाणं आंजावर कुठे मिळेल ते माहिती आहे का?
नेमाने बघतो
काशिलींग आडके, अनुपकुमार, संदीप नरवाल, मनजीत चिल्लर हे आवडते आहेत.
पावनं ,काशीलिंग जत आटपाडी कड़ील असतंय का हो?
मंडल बी भारी हाय पटनाचा!
सांगली. (?)
कासेगांव.
बापुसाहेब माफ करा एक प्रश्न आहे.
-
तुमी दरवेळेस हा इकडचा तो तिकडचा,
गाववाला,
असे का शोधता?.
अरे बापरे! असा काही पॅटर्न दिसुन येतो काय? विशेष असे काहीच कारण नाही! पण ती एक सवय लागून गेली आहे मला, आवडते जाणून घ्यायला. प्रत्येक मातीचे वाण वेगळे गुण वेगळा त्या मातीतल्या लोकांत असलेल्या कलाकारी वेगळ्या, ढबी वेगळ्या , समजून घ्यायला आवडते, माणसे वाचायला मजा येते. म्हणून विचारतो, त्यात काही ulterior motive नसतो सहजच विचारले जाते :)
मला पण सवय आहे अशी. वाईट हेतू काहीच नाही. फक्त उत्सुकता. सोलापूरचा माणूस कसा बोलतो, लातूरचा कसा बोलतो..
असतंय का हो ?
:) कन्नड माणसाने मराठी बोलल्यागत वाटलं बघा.
ह.घ्या.
होर्डिंग पब्लिसिटी भारी केलीय. आवडली सेपरेट प्लेयरला इंट्रोड्युस करायची आयड्या.
पण मोंडल चा पहिला सेव ( ज्यात पटना ची टीम ऑल डाउन होता होता वाचली ) थोडासा डौटफुल वाटला
+१
पहिल्या सीझनच्या एका लीग मॅचला यू-मुंबा अशाच डौटफुल परिस्थितीत (जिंकता जिंकता) हारले होते. बहुदा जयपूर विरूद्ध.
+२
यावेळी बर्याच मॅचेस शेवटच्या ५ मिनिटांपर्यंत जात आहेत.
यंदाच्या स्पर्धेमधील अंपायरींग दर्जा खालावलेला वाटला.
अतिअवांतरः तुम्ही गिर्यारोहण करता का?
:)
बाबौ!!!
आजची बेंगलुरु बुल्स वि यु मुंबा मॅच
ही अस्सल साजुक कबड्डी होती!! ३२व्या मिनट पर्यंत मुंबई अकरा पॉइंट्स मागे होती!! लेकाचे जिंकले शेवटी एक पॉइंट न!!
राकेश कुमार ने जबरदस्त पकडी केल्या न भाऊ
पूणेरी पलटन यावेळी तरी जिंका!
मध्ये कुणी म्याच बघायला येणार आहे का वीकेंडला ?
१३ तारखेला मी आहे
मी १४ ला आहे
पूणेरी पलटनचे सामने खुपच अटीतटीचे झाले.
काल पुणेरी पलटन ची मॅच पाहिली स्टेडियम ला, अन एक लक्षात आले, पुणेरी पलटन ही टीम एक खांबी तंबु आहे. अन हा पुर्ण सर्कस डोलारा फ़क्त मनजीत छिल्लर ह्या एका खांबावर तोलला गेलाय!
एक छिल्लर सोडला तर बाकीचे मुर्ख आहेत
डीफेन्सवाले तर मॅच घालवण्याची सुपारी घेतल्यासारखे खेळतात.
आणि प्रशान्त चव्हाण एवढा मंद डीफेंडर तर गल्ली कबड्डी मधे सुद्धा नसेल
काल तर प्रशांत चव्हाण पाहिली रेड सुरु झाली तेव्हा चक्क लॉबी मधे उभा होता राव! असली घाण विकेट तर क्रिकेट मधे इंजमाम ने सुद्धा रन आउटमधे फेकली नसेल कधी!आजुबाजूची माणसे हसत होती चव्हाण ला! बोदल्या मेला ! नंतर सुद्धा एक टच पॉइंट असाचदिला त्याने!
प्रशांत चव्हाण ने प्रथम वजन कमी करावे असे वाटते! :D
शुक्रवारी दोन लढती असलेले सामने पाहिले ( बरं झालं शविवारची तिकिटे मिळाली नाहीत ते) एका तिकिटातच दोन सामने !
घरी आल्यावर तर चेहर्यावर सामने पाहिल्याचा आनंद ओसंडत होताच पण तिथे असतानाही फोनवर सामन्याबाबत उत्साहाचे सांगणे चालू होते.
एकूण हा प्रकार चांगला दिसतोय, "क्रिकेट" व्यतिरिक्तही (थरारक आणि आकर्षक) खेळ आहेत हे प्रो-कबड्डीने दाखवून दिले हे नक्की.
खर तर आत्ता प्रो कबड्डी चा सिझन नाहीये पण लोकांना जर कोणत्याही गोष्टीची सवय लावायची असल्यास ती गोष्ट त्याच्या समोर सातत्याने येत राहिली पाहिजे, आपल्याकडे क्रिकेट सोडून इतर खेळ म्हणजे किस झाड कि पत्ती समजले जात होते, त्यातून कबड्डी सारखा रांगडा आणि मातीतला खेळ म्हणजे अगदीच गायी गुजरी बाब होती ना ह्या खेळत पैसा होता ना प्रसिद्धी आणि शारीरिक इजा तर पाचवीला पुजलेली पण ह्या सगळ्यावर मात करत ह्या रांगड्या खेळाची आकर्षक मांडणी करून त्याला काही नवीन नियमांची साथ देत आपल्या अस्सल देशी खेळाची चटक लोकांना लावली जात आहे हे हि नसे थोडके...
सॅफ स्पर्धेमुळे बरेच महत्वाचे खेळाडू जरी काही मॅचेस खेळणार नसले तरी त्यामुळे त्याचा फायदा इतर खेळाडूंनी घ्यायला हवा. ह्या वेळचा प्रो कबड्डीचा सिझन आणि सॅफ स्पर्धे एकत्र होणार असल्यामुळे १२ सेनादलच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. व्यावसायिक खेळाडूंपेक्षा सेनादलाच्या खेळाडूंचा फिटनेस खूपच उजवा असल्यामुळे त्यांची कामगिरी पण छान होत आहे ( अमित राठी , नितीन तोमर , प्रशांत राय) तसेच मोठे खेळाडू जरी सॅफ स्पर्धेमुळे खेळत नसले तरी स्पर्धा मात्र तशीच चुरशीची होत आहे. मात्र काही मोठ्या खेळाडूंना त्यांच्या नावाप्रमाणे अजून कामगिरी करता आलेली नाहीये (राकेश कुमार- यू मुंबा, मनप्रीत सिंग - पतन पायरेट्स , धर्मराज - तेलगु टायटन ) पण त्यांच्या अनुभवाचा फायदा मात्र ते आपापल्या संघाला करून देताना दिसत आहेत.
प्रो कबड्डी सिझन ३ च्या विजयाचा दावेदार कोण आहे हे आत्ताच सांगणे कठीण आहे कारण कोणत्याही संघाचे स्टार खेळाडू संघाबाहेर गेल्यावर संघाला सावरायला आणि आहे ते खेळाडू घेऊन रणनीती आखून ती प्रत्यक्षात आणायला थोडा वेळ लागतोच. ८ पैकी ६ संघाच्या पहिल्या ७ खेळाडूमध्ये मोठा बदल झाला आहे. पुणे आणि बंगाल ह्या संघाचे पाहिले ७ खेळाडू जवळपास तेच असल्यामुळे ह्या दोन्ही संघाना त्याचा जास्त फायदा मिळू शकतो. जसे जसे दिवस जात आहेत तसे तसे प्रत्येक खेळाडूचा कस लागत आहे.
एकूण काय तर अवघ्या ४० मिनिटात एका खेळाच्या निमित्ताने आपले आयुष्य व्यापून राहिलेले आक्रमण, प्रतिकार, झुंज, बचाव आणि रणनीती हे गुण बघायला मिळतात.
http://www.ibnlive.com/news/sports/south-asian-games-india-beat-pakista…
आज यु मुंबा आणि कोलकाता चा सामना होणार आहे.
पुणे छान खेळले गेल्या दोन सामन्यांत.
इराणी पोरे
१ फ़ज़ल
२ मेराज
३ हादी
_____________/\_____________
मेराज चा टैकल टैलेंट अद्भुत आहे राव!
बंगालकडून खेळणारा साउथ कोरियन जंग कुन ली सुद्धा उत्तम आहे
सुरुवातीला फ़क्त मनजीत छिल्लर वर आधारित वाटत होती पण आज उत्तम टीम गेम खेळली ! अजय ठाकुर च्या सुपर रेड अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे जसमेर सिंह गुलिया चा डिफेन्स
पुणेरी पलटण छान खेळत आहे
प्रो कबड्डी चे ऑफिशल मार्कंडाइज म्हणजे टी शर्ट्स वगैरे कुठे मिळू शकते ऑनलाइन ??
कोणी ह्या बाबतीत गाइड करू शकते काय??
कालची यु मुंबा आणि पुणेरी पलटणची match निव्वळ जबराट होती.
शेवटी मुंबा ने तेच जेते आहेत हे सिद्ध केले.
मनजीत नसल्याचा चांगलाच फटका बसला पुण्याला.