Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मांजरे द्यायची आहेत

आ
आगाऊ कार्टा
Tue, 02/09/2016 - 11:48
🗣 27 प्रतिसाद
माझ्याकडे सध्या ७ मांजरे आहेत. त्यांपैकी १ बोका आहे आणि १ मांजरी आणि तिची ५ पिल्ले आहेत. पिल्ले सुमारे १ महिन्याची आहेत. कोणाला पाहिजे असल्यास कृपया सांगावे. हा धागा मी काथ्याकूट या सदरात टाकत आहे. तरी हे सदर या धाग्यासाठी योग्य नसल्यास कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया द्या
4986 वाचन

💬 प्रतिसाद (27)
ख
खेडूत Tue, 02/09/2016 - 12:17 नवीन
कुठल्या गावाला आहेत?
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ कार्टा Tue, 02/09/2016 - 12:35 नवीन
नर्हे पुणे येथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
अ
अभिजित - १ Tue, 02/09/2016 - 12:21 नवीन
इतका अति शहाण पणा अजून कुठे बघायला मिळणार ? तुम्ही समजून घ्या न राव गावाचे नाव !!
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ Tue, 02/09/2016 - 12:28 नवीन
हा तर बोचकारलेपणा झाला... अहो, मांजरी तुमच्याकडे इतक्या सुखेनैव नांदताहेत... कशाला उगाच कुणाकडे धाडताहेत...
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/09/2016 - 12:31 नवीन
यांना द्या =))
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 02/09/2016 - 12:33 नवीन
Olx /Quikr वरुन पण मांजरांची देवाणघेवाण होते. बाकी वस्तूना हल्ली Quikr वाले ने-आण (डीलिवरी) करण्याची पण सोय करतात, मांजरांसाठी पण करत असतील का ? बाकी फोटोज टाका पिलांचे... फ्लॅटवर मांजरी पाळणे थोडे कठीणच म्हणून नाही पाळत मी ...नाहीतर खूप मस्त आहे हा प्राणी अगदी रुबाबदार.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/09/2016 - 12:41 नवीन
मांजराची पिल्लं कितीही गोड असली तरी त्यांची वाढती संख्या ही समस्याच असते. विशेषतः ती पिल्लं मोठी झाल्यावर मांजरी म्हणजे खुद्द त्यांची आईच त्यांना ठेवून घ्यायला नाखूष होते तेव्हा.. कधीकधी पंजे मारुन हाकलते.
माझ्याकडे सध्या ७ मांजरे आहेत. त्यांपैकी १ बोका आहे आणि १ मांजरी आणि तिची ५ पिल्ले आहेत.
समस्येचं मूळ हायलायटेड भागात आहे. बोकाच दिला तर? ;) जोक्स अपार्ट. पिल्लं अजून लहान आहेत. अजून दोन महिन्यांनी दिलीत कोणाकडे तर बरं.
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ कार्टा Tue, 02/09/2016 - 13:00 नवीन
अहो गवि, त्या पिल्लांचा बाप आमच्या सोसायटीत येणारा एक चोरटा बोका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/09/2016 - 12:41 नवीन
१ महिन्याची पिल्लं देउ नका. किमान दोन अडिच महिन्याची झाल्यावर द्या. अजुन आईच्या अंगावर पीत असतील ती.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Tue, 02/09/2016 - 12:48 नवीन
http://www.misalpav.com/comment/801401#comment-801401 मिपा मोघुल त्याचा आनंदाने स्विकार करतील :))
  • Log in or register to post comments
म
मोगा गुरुवार, 02/11/2016 - 10:45 नवीन
दर्शनमात्रे मन...... http://www.maayboli.com/node/38734
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
आ
आगाऊ कार्टा Tue, 02/09/2016 - 12:58 नवीन
आत्ता लगेच देनार नाही आहे. २-३ महिन्यांनंतरच देणार आहे. पण शोध आत्तापासुनच सुरु केलेला बरा. मांजारांचे फोटो
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Tue, 02/09/2016 - 14:49 नवीन
गाजरे द्यायची आहेत माझ्याकडे सध्या ७ गाजरे आहेत. त्यांपैकी १ गाजर आहे आणि १ गाजरी आणि ५ छोटी गाजरे आहेत. छोटी गाजरे सुमारे १ इंचांची आहेत. कोणाला पाहिजे असल्यास कृपया सांगावे. ही प्रतिक्रिया मी धागा या सदरात टाकत आहे. तरी हे सदर या प्रतिक्रियेस योग्य नसल्यास कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे. -कळावे आपलाच गाजरवाला.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/09/2016 - 15:22 नवीन
यावर एक खंग्री प्रतिसाद लिहिता येईल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
आ
आगाऊ कार्टा Tue, 02/09/2016 - 15:32 नवीन
लय भारी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
य
याॅर्कर Tue, 02/09/2016 - 17:26 नवीन
खॅ खॅ खी खी . . खे खै खो खौ खं खः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
स
सुनील Wed, 02/10/2016 - 07:06 नवीन
अट एकच - मी प्रत्येक गाजराची पुंगी करून वाजवून पाहीन. वाजली तरच घेईन. नाहीतर नाही! बोला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
अ
अन्नू Wed, 02/10/2016 - 07:41 नवीन
मेलो!... "गाजराची पुंगी करून वाजवून पाहीन" ठ्ठो!! आवरा रे कोणीतरी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चेक आणि मेट Wed, 02/10/2016 - 07:46 नवीन
अट मान्य आहे. पण आवाज पुंगीसारखा येणार नाही, थोडा निराळाच येईल !!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Wed, 02/10/2016 - 07:49 नवीन
पुंगीचा आवाज हाच तिचा युस्स्पी आहे. सबब, आवाज पुंगीसारखाच हवा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Wed, 02/10/2016 - 07:58 नवीन
गाजर ही नैसर्गिक वस्तू आहे, आणि आपल्याला हवा तसाच आवाज पाहिजे म्हणजे निसर्गाला आव्हान देण्यासारखे आहे! तेव्हा सबब अट अमान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Wed, 02/10/2016 - 09:23 नवीन
GM गाजराचे वाण वापरून पहा. कदाचित पुंगी वाजेल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
प
प्रमोद देर्देकर Wed, 02/10/2016 - 09:56 नवीन
अरे वा एका दिवसात बरीच मजल मारलीत की तुम्ही. लगे रहो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
अ
अस्वस्थामा Tue, 02/09/2016 - 15:11 नवीन
एक भयाण पोटेन्शियल असलेला धागा.. या वरुन हा "उपाय सुचवाल?" धागा आठवला.. (छ्या, पूर्वीचं मिपा राह्यलं नै .. ;) )
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 02/09/2016 - 15:30 नवीन
(छ्या, पूर्वीचं मिपा राह्यलं नै .. ;) )
पूर्वीचे मिपाकर पण दिसत नाहीत मिपावर जास्त . त्या काळचे रथी , महारथी जवळजवळ अदृश्य झालेत . पण नवीन फळीही चांगलीच आहे की. (कधीकधी शिनीयर मिपाकर झाल्यासारखं वाटतंय अन् पोटात गुदगुल्या झाल्यासारखे वाटतंय बघा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 02/09/2016 - 16:09 नवीन
उपाय सुचवा धागा वाचुन (प्रतिक्रिया)बेक्कार हसतोय ऑफिसमध्येच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
श
श्रीगुरुजी Wed, 02/10/2016 - 13:21 नवीन
ही मांजरे होय? मला वाटले की तुम्हाला पैसे (मनी) द्यायचे आहेत. =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा