Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निरागस ‘हिजार्बी’

प
पी महेश००७
Tue, 02/09/2016 - 12:19
🗣 8 प्रतिसाद
निर्जीव बाहुलीशी लहानग्या मुलीचं कधी काळी घट्ट नातं होतं. आता मोठ्यांचं आहे! म्हणजे चिमुरडीसाठी बार्बी डॉल घेऊन यायची आणि शोकेसमध्ये ठेवायची! असो... पण या बाहुल्यांना धर्म नव्हता. तो तिच्याशी खेळणाऱ्या मुलीकडेही कधीही नसेल आणि नसणार. कशीही असो, ती त्या चिमुरडीची छकुलीच असते. अगदी त्या बाहुलीच्या हाताची बोटे खरवडलेली असली तरीही! तुम्ही चिमुरडीला कधी तरी विचारा, की दिसायला कोणासारखी आहे? तर ती एकच उत्तर देईल.... परीसारखी! ती चिमुरडी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही, की माझी बाहुली ख्रिश्चन दिसावी, मुस्लिम दिसावी, हिंदू दिसावी.... वगैरे वगैरे... निरागस मनांना धर्म नसतो. असते तो निखळ आनंद, ज्याची तुलना तुम्ही कशाशीही करू शकणार नाही. असो... सांगायचा मुद्दा हा, की बार्बीने तब्बल ५७ वर्षांनंतर आपलं रूपडं बदललं असलं तरी ती नायजेरियाच्या हनीफा आदम नावाच्या बाईंना ‘आपलीशी’ वाटत नव्हती. म्हणूनच त्यांनी बार्बीला हिजाबी बार्बी तयार करण्याचं ठरवलंय. हिजाबी म्हणजे बुरखा घातलेली... हिजाबी लूकमधल्या बार्बीला नावही दिलंय ‘हिजार्बी!’ ही बाहुली सुरुवातीला अमेरिकेत उपलब्ध होईल आणि त्यानंतर ब्रिटनमध्ये मार्चच्या सुमारास येईल... असो.. हनीफाबाईंना शुभेच्छा. पण त्यांनी या ‘हिजार्बी’मागची वेगळीच भावना बोलून दाखवली. म्हणे, या बाहुलीमुळे मुस्लिम समाजातील मुलींमध्ये आत्मविश्वासाची जाणीव रुजेल...! पण ही भावना नेमकी कशी रुजेल ते काही कळलं नाही. आता तुम्हाला आठवतंच असेल, की पाच वर्षांपूर्वी बॉलीवूडची ‘बार्बी डॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कतरिना कैफला असंच काहीसं बार्बीचं रूप दिलं होतं. मेटल टॉइज कंपनीने ही कतरिना बार्बी तयार केली होती. ऐश्वर्याने नकार दिल्यानंतर कतरिनाला बार्बीच्या रूपाचं ‘ऐश्वर्य’ लाभलं हा मुद्दा इथे गौण आहे. आता कतरिनाबाईंना बार्बीचं रूप मिळाल्यानंतर तिचा आत्मविश्वास किती तरी पटीने वाढायला हवा! हिंदी सिनेमात काम करते म्हणून हिंदी बोलण्याचा आत्मविश्वास किंवा नाही काही तरी किमान थोडा फार अभिनयाचा आत्मविश्वास तरी... बार्बी डॉल आपलीशी नक्कीच वाटायला हवी. मात्र, ठराविक धर्मातील मुलींनाच ती आवडावी म्हणून तुचं रूपडं बदलणं आणि त्यातून आत्मविश्वास वाढणं वगैरे वगैरे काही पटलेलं नाही. हनीफाबाई, तुमची ‘हिजार्बी’ सर्वांनाच आवडेल. कारण माहितीय, ती निरागस असेल! तिचा ‘लूक’ तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विशिष्ट धर्मातील चिमुरड्यांनाच नाही, तर इतर धर्मातील चिमुरड्यांनाही ‘आपलीशी’ वाटेल. कारण पेहरावापेक्षाही त्या निरागस मनाचं नातं अधिक घट्ट असतं... तिथे धर्म कधीही आडवा येत नाही.
वर्गीकरण
आता बुरख्यातलीही बार्बी येणार

प्रतिक्रिया द्या
2158 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
पी महेश००७ Tue, 02/09/2016 - 12:22 नवीन
टंकताना काही चुका झाल्या आहेत... त्याबद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Tue, 02/09/2016 - 12:30 नवीन
त्यांनी बार्बीला हिजाबी बार्बी तयार करण्याचं ठरवलंय. हिजाबी म्हणजे बुरखा घातलेली... ह्यावरुन आठवलः- चिखलदर्‍याला एक मौलाना** आपल्या दोन बेगम आणि तिन मुलिंचा फोटो काढत होता समस्त वनिता वर्गाने बुरखा परिधान केलेला होता ** त्याचा ड्रायव्हर त्याला ह्याच नावाने संबोधत होता.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 02/09/2016 - 14:47 नवीन
बाहुली ही नेहमी गोरी, नीळे डोळे असणारी असते. त्यामुळे मुलांच्या मनात लहानपणापासून नकळत का होईना गोरी, नीळे- पिन्गट डोळे म्हणजे सुंदर असे समीकरण तयार होतं. मग मी गोरी नाही म्हणजे मी सुंदर नाही असा त्यांना न्यूनगंड येऊ शकतो. त्यापेक्षा बाहुली रंग-रूपाने स्थानीक लोकांच्या वर्ण, चेहरापट्टी आणि वेशभूषा याच्या जवळ जाणारी असेल तर मुलांना ती आपलीशी वाटते. तिच्याशी ते जास्ती रेलेट करतात. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होतो असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ Wed, 02/10/2016 - 11:53 नवीन
तुम्ही मुलीला एका दुकानात घेऊन जा आणि सांगा तुला कोणती बाहुली हवीय... ती सुंदर, गोरीपान, देखणी बाहुली घेईल. ती साधारण, अॅव्हरेज बाहुली कधीच घेणार नाही. दुकानात १०० रुपयांपासून बाहुल्या असतात. छान बाहुल्यांची किंमत जास्तच असते. ती जेव्हा निवडते तेव्हा ती महाग असते. पण त्या चिमुरडीला कुठे माहीत असतं, त्या बाहुलीची किंमत. म्हणजेच काही तरी आकर्षक त्या बाहुलीत असेल तरच ती बाहुली घेईल. लहानग्या मुलींचा निरागसपणा हाच आहे, की त्या स्वतःला त्यात पाहत नाहीत. एखाद्या वस्तूशी त्या स्वतःशी कधीच तुलना करीत नाहीत. तशी भावना त्यांच्यात नसते. (तुलना करणं ही खोड मोठ्यांची) हो, पण बाहुलीव्यतिरिक्त इतर खेळणी स्वतःशी रिलेट करणारी मुलांना आवडते. उदाहरणार्थ बैलगाडी, जी त्यांनी पाहिलेली असते आणि ती खेळणीच्या स्वरूपात पाहायला मिळते. गाडी, कार, घोडा इत्यादी. मुलांना आता डोरेमॉन आवडतो, जो छान छान वस्तूंचे गॅझेट देत असतो किंवा निंजा हातोडी आवडतो आणि अस्सल भारतीय छोटा भीमही आवडतो. लहान मुलांच्या आवडीनिवडी या संपूर्ण निखळ आनंदावर आधारित असतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो वगैरे मताशी मी अजिबात सहमत नाही. मात्र, त्यांची आवड पाहून वस्तू घेतली तर त्यांना नक्कीच आत्मविश्वास मिळतो, की माझी निवड योग्य आहे... त्यामुळे मी गोरी नाही, मी सुंदर नाही असलं काही त्यांच्या डोक्यात येत नाही हे इथे आवर्जून नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
स
संदीप डांगे Wed, 02/10/2016 - 12:08 नवीन
बाजार आहे, बाजाराप्रमाणेच असणार. कशाचाही बाजार करणे बाजारासाठी आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
श
शैलेश भोसले Wed, 02/10/2016 - 12:57 नवीन
ह्या कंपन्याना काय पडलिय धार्मिकता, लहान मुलांची निरागसता वैगरे.... ह्याना फक्त आर्थिकतेशी कारण ... ति बाहुली हिजार्बी असो वा अन्य कोणी लोक विकत घेतील ना ह्याच्याशी कारण ...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/10/2016 - 13:11 नवीन
या बाहुलीमुळे मुस्लिम समाजातील मुलींमध्ये आत्मविश्वासाची जाणीव रुजेल...! असं काही नसतं... ते विपणनभाषेतले (मर्केटिंग लँग्वेज) वाक्य आहे. साध्या मराठीत त्याचा अर्थ... "अश्या बाहुलीमुळे खप वाढेल व जास्त फायदा होईल" असा आहे.
  • Log in or register to post comments
P
palambar Sun, 02/14/2016 - 20:03 नवीन
सरळ आहे जर त्या मुलिंना मुलगी बुरख्या शिवाय पहायचि सवय नाहि तर बाहुलि तरि बुरख्याशिवाय कशि चालेल. बाकि काहि नाहि ,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा