सक्ती ….
हेल्मेट वापरणं योग्य आहे, पण त्यासाठी सक्ती नको,
हेल्मेट सक्तीवरून वाद सुरू असतानाच आता दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आहेत.
हेल्मेट सक्तीमागे नागरिकांची काळजी आहे का हेल्मेट उत्पादकांची ?


ह्याच बरोबर ह्या सर्व किमतीच्या दुचाकी वापरण्याची अघोषित सक्ती जी उद्योजक-राजकिय नेत्यांच्या संगनमताने झाली त्याबद्दल कुणी चकार शब्द बोलत नाही.हे किंवा सतत खराब होणारे आणि पहिल्या पावसात विरघळणारे रस्ते बनविणे (याचे तर आपल्या देशाकडे पेटंट आहे), इत्यादी, इत्यादी, इत्यादी, ... ही सगळी कामे ज्या चलाख टेक्नॉलॉजीअंतर्गत केली जातात तिला आम्ही "वेल मॅनेज्ड मिस्मॅनेजमेंट" असे नाव दिले आहे ! ;) :) :(