Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

च
चेक आणि मेट
गुरुवार, 02/11/2016 - 06:31
🗣 331 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
वर्गीकरण
राष्ट्रीय राजकारण

प्रतिक्रिया द्या
59550 वाचन

💬 प्रतिसाद (331)
ए
एस गुरुवार, 02/11/2016 - 06:38 नवीन
त्या ढोंगी लोकांना सेक्युलर मुद्दाम म्हटले जाते, खर्‍या व देशभक्त सेक्युलरांना दाबायला.
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे Fri, 02/12/2016 - 16:56 नवीन
हेडलीचा प्रकरण आताच उकरून काढण्यामागे मोदींचा डाव आहे. त्यांच्या इतक्या अमेरिका दौर्‍याचा मागे हेच षडयंत्र होता. इतके दिवस साक्ष द्यायला नकार देणारी अमेरिका अचानक हेडलीच्या साक्षीला तयार होते. आणी ठरवून तेच प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे पढवलेली आहेत. यावरून हेच सिद्ध होते की हा सरळ सरळ एक कट आहे. या डबल एजंटची साक्ष कोर्ट ग्राह्य धरणार आहे का ? आणि ती कितपत विश्वासार्ह आहे ? पण देशांर्तगत पुरावे सापडले नाहीत म्हणून हा फार्स उभा केलेला आहे. देशामधल्या (वेमुलासारख्या)अंर्तगत समस्यांवरून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मी-सौरभ Sun, 02/14/2016 - 15:13 नवीन
शक्यता नाकारता येत नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे
व
वेल्लाभट गुरुवार, 02/11/2016 - 06:41 नवीन
दम नाही हो आपल्या देशात. त्यामुळे जे जे होईल ते ते पहावे....
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 02/11/2016 - 17:11 नवीन
अगदी, देशात राहायची भीती वाटते म्हणणार्‍यांना एव्हाना, "बाबा रे, कोणत्या देशात जायचंय सांग" असं विचारुन पार्श्वभागावर रट्टा मारुन हाकलून द्यायला हवं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/12/2016 - 02:14 नवीन
हल्ली माझा जेन्युइन आणि सारकास्टिक प्रतिसादांमधे गोंधळ उडायला लागलेला आहे. डोकं तपासुन घ्यायला हवं :(!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मी-सौरभ Fri, 02/12/2016 - 13:59 नवीन
चिंतेचा विषय आहे हा चिमणराव.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अनुप ढेरे Fri, 02/12/2016 - 16:01 नवीन
हेच्च बोल्तो. काल एका धाग्यावर मृत्युंजयरावांनी डांगे सायबांना दिलेल्या एका प्रतिसादाबद्दल शंका उत्पन्न झाली म्हणून तसं विचारलं. खाली धुळवड दिसल्यावर कळाल काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
य
याॅर्कर गुरुवार, 02/11/2016 - 07:02 नवीन
सेक्युलरखाजाड्या
ह्यो शब्द काळजाला भिडला बर का!
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/11/2016 - 07:05 नवीन
JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. अतिशय अस्वस्थ करणारं आहे हे...
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 07:05 नवीन
पॉपकॉर्न प्लीज. (मेगाबायटीप्रतिसादसन्यस्त खडग)
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 07:12 नवीन
ओ साहेब, मुद्दे गंभीर आहेत,पाॅपकाॅर्न काय मागताय?? मी काय या जिल्ब्या टाकलेल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 07:39 नवीन
मुद्दे गंभीर आहेतच. नाही कुणी म्हटलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चांदणे संदीप गुरुवार, 02/11/2016 - 07:43 नवीन
अशातच पाॅपकाॅर्न खायला मज्जा येते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 07:49 नवीन
मग तुमचे अनमोल मत मांडा कि राव! नेमकं या आशयाच्या विरूद्ध धागा असता!तर बेंबीच्या देठापासून, आतडी पिळवटून, पोटतिडकिने मुद्दे मांडले असते तुम्ही!काय म्हणता?? (तुमचे मत केव्हा कुठे मांडायचे याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 07:58 नवीन
माफ़ करा मला, खरेतर हा मुद्दा तुमच्या अन डांगे साहेबांच्या मधला आहे त्यामुळे मी बोलणे उचीत ठरणार नाही तरीही एक निरिक्षण आगाऊपणे नोंदवतो, ते म्हणजे तुम्ही डांगे ह्यांना स्टीरियोटाइप केलेले दिसते आहे! त्यांचा प्रतिसाद काय असेल अन कसा असेल असे आडाखे जर तुमच्या मनात पक्के असतील तर डांगे काहीही बोलो तुम्हाला वाकडेच लागेल! तस्मात् ते बोलत नाहियेत तेच बरे असे मत पड़ते आहे नथिंग पर्सनल जस्ट एन ऑब्जरवेशन हे वरील ठळक वाक्यांतुन जाणवले नेमकं या आशयाच्या विरूद्ध धागा असता!तर बेंबीच्या देठापासून, आतडी पिळवटून, पोटतिडकिने मुद्दे मांडले असते तुम्ही!काय म्हणता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 08:00 नवीन
नेमकं या आशयाच्या विरूद्ध धागा असता!तर बेंबीच्या देठापासून, आतडी पिळवटून, पोटतिडकिने मुद्दे मांडले असते तुम्ही!काय म्हणता?? केव्हाचं काय म्हाइत नै पण आता तरी एवढंच म्हणतो की चड्डीत र्‍हा ना भाऊ. भाषा जपून वापरा माझ्याबद्दल, माझ्यासोबत. ही पहिली आणि शेवटची सूचना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 08:10 नवीन
डांगेसाहेब, ओघाच्या भरात थोडं जास्तीच बोल्लो,त्याबद्दल क्षमस्व. . . पण हा पाॅपकाॅर्न चघळत बसण्याचा धागा आहे का?? हे कृपया सांगावे. तुम्ही पाॅपकाॅर्न हा शब्द वापरल्यामुळे राग आला. बाकि आम्ही चड्डी एका विशिष्ट वेळेलाच काढतो.एरवी चड्डीतच असतो. बोलणं लागलं असेल तर परत एकदा I AM SORRY.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 08:23 नवीन
इट्स ओके नाऊ. राग बाजुला ठेवा. त्याचा इथे मिसळपाववर काहीही उपयोग नाही. त्यापेक्षा तर्क, विचार आणि मुद्दा ह्यातून प्रतिपक्षाला बेजार करण्यात प्राविण्य मिळवा. राग प्रतिपक्षाला यायला हवा, तुम्हाला नाही. राहिला पॉपकॉर्नचा प्रश्न तर असं आहे की तुमचा धागा विस्तृतपणे काहीही सांगत नाही. म्हणजे प्रतिसादांमधूनच घटना, पार्श्वभूमी, कारणे, परिणाम उलगडत जाणार. त्यासोबत लोकांचे बायस उघडे पडत जातील आता ते वाचायचे म्हणजे पॉपकॉर्न लागतीलच. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 08:26 नवीन
तुम्ही लिहा ना विस्तृतपणे. बर्‍याचदा धाग्यांपेक्षा तुमचे प्रतिसाद अजुन विस्तृत असतात. बर्‍याच गोष्टी कळत जातात त्यामुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अनुप ढेरे गुरुवार, 02/11/2016 - 08:51 नवीन
तारिफ अधिक टोमणा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सूड गुरुवार, 02/11/2016 - 17:14 नवीन
तसं वाटलं तरी. खखो देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे गुरुवार, 02/11/2016 - 17:35 नवीन
हॅहॅहॅ... खालची हाणामारी वाचायच्या आधी हे वाचलेलं. म्हणून संभ्रम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 13:42 नवीन
राहिला पॉपकॉर्नचा प्रश्न तर असं आहे की तुमचा धागा विस्तृतपणे काहीही सांगत नाही. म्हणजे प्रतिसादांमधूनच घटना, पार्श्वभूमी, कारणे, परिणाम उलगडत जाणार. त्यासोबत लोकांचे बायस उघडे पडत जातील आता ते वाचायचे म्हणजे पॉपकॉर्न लागतीलच. काय म्हणता?
मी धाग्यातच लिहलयं,कि पहिल्यांदा लिहतोय म्हणून. घटना,पार्श्वभूमी,कारणे इ सर्व सांगत बसणे म्हणजे मिपाकरांच्या ज्ञानावर संशय घेण्यासारखे आहे. आणि राहिला मुद्दा पाॅपकाॅर्नचा,जे लिहले आहे ते थोडके आणि वास्तव आहे,नेहमी फाफटपसारा करून लिहूनसुद्धा त्यातून काही साध्य होत नसतं कैकवेळा. तुम्हाला पाॅपकाॅर्न लागणार असतील,तर याहून अधिक ते काय बोलणे,काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 07:08 नवीन
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??) +१०००००००००००० म्हणतो मी सहसा टोकाच्या भूमिका घेणे टाळतो पण माझ्यामते जे एन यु आपल्या स्थापनेमागे असलेला एकही विचार साध्य करत नाहिये! ही यूनिवर्सिटी बंद करुन टाकायला हवी आहे !!!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 08:20 नवीन
नेहरुंच्या नावाची युनिव्हर्सिटी बंद करण्याची या देशात कुणाची टाप लागुन राहिली आहे? सोन्याबापू यु टु ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 08:26 नवीन
ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी साक्षात् नेहरूंच्याच् "वोकेशन बेस्ड एजुकेशन" ला सुरुंग लावते आहे मृत्युंजय भाऊ!! मागे एकदा डोक्यात हिस्ट्री मधे पीएचडी करायचे खुळ घुसले होते तेव्हा जेएनयु जवळून पाहिली आहे! कम्युनिस्ट यूटोपिया ची अशक्य स्वप्ने पाहात अन दाखवत ही यूनिवर्सिटी राख झाली आहे! च्यु** लोकं आहेत नुसती, धनुष अन सोनम कपूर च्या रांझणा चित्रपटात जी गत दाखवली आहे जेएनयुची ती शतप्रतिशत बरोबर आहे!! अन त्याच्यामुळे त्यांचा ताबा सुटला आहे!! मरू दे!! भिकार** साले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 08:27 नवीन
कंट्रोल बापू कंट्रोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 08:31 नवीन
हुश्श्!!! आज ज़रा बरे वाटते आहे! कधी नव्हे ते मनातले भडाभडा बोललो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/11/2016 - 13:12 नवीन
DU आहे ना. DU चं Department of History तर जबरदस्त आहे. JNU चा International Relations Course चांगला आहे. बस - JNU च्या फक्त या कोर्सबद्दल जरा चार चांगले शब्द ऐकलेले आहेत. बाकी तो since inception कम्युनिस्टोंका अड्डा था और अभीभी है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 13:24 नवीन
हो डीयु उत्तम आहे म्हणून तर जेएनयु चा नाद सोडला (सुदैव माझे) पण मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा इतकी कल्पना नव्हती, त्याकाळी होता डोक्यात कीड़ा! आता पुर्ण बिस्किट मुरले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बॅटमॅन Fri, 02/12/2016 - 08:14 नवीन
जे एन यू वाले एक नंबर भिकारचोट आणि तितकेच येडझवे आहेत. त्यांना लाथाच घातल्या पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 08:44 नवीन
मी सहसा टोकाच्या भूमिका घेणे टाळतो पण माझ्यामते जे एन यु आपल्या स्थापनेमागे असलेला एकही विचार साध्य करत नाहिये! ही यूनिवर्सिटी बंद करुन टाकायला हवी आहे !!!
मला वाटते घटनात्मकदृष्ट्या शिक्षण हा संघराज्य (संघराज्य=केवळ युनियन गव्हर्नमेंट अर्थाने -हे आजकाल स्पष्ट करणं गरजेच झालय ;) ) आणि राज्यसरकार यांच्या जॉईंट लिस्ट मधला विषय असला तरीही संघराज्य (केंद्रसरकारची) भूमिका सहसा युजीसी पर्यंत मर्यादीत असावयास हवी, सर्वसाधारणपणे राज्यस्तरावरील विद्यापिठे जे करू शकतात त्यासाठी केंद्रीय विद्यापिठांची आणि संघराज्याच्या सरळ भूमिकेची गरज आहे का ? आणि खासकरून राष्ट्रीय एकात्मतेचे तत्वज्ञान रुजवता येत नसेल तर राष्ट्रीय विद्यापिठास काय भूमिका आहे ? ज्या बादात जे एन युचे आले आहे त्या वादात बहुधा काश्मिर विद्यापिठाचेही नाव आले नसेल. आणि आलेतरी बातमीत येण्याची शक्यता कमी, जे एन युत असे उद्योग करण्याचा उद्देश जागतीक स्तरावरील बातम्यात विषय आणून भारताची बदनामी साधण्याचा असू शकेल का अशी साशंकता वाटते
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??).
सहमत आहे, ढोंगी सेक्यलरपणामुळे खर्‍या सेक्युलॅरीझमचे आणि खर्‍या उदारमतवादाचे खूपमोठे नुकसान होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनुप ढेरे गुरुवार, 02/11/2016 - 07:12 नवीन
व्रिंदा करात यांनी उद्घाटन केलेलं याचं २०११मध्ये. Image removed.

आणि हा कालच्या प्रोटेस्टचा व्हीडो. शब्द हे आहेत. कश्मीर की आजादीतक जंग रहेगी, जंग रहेगी भारतकी बरबादीतक जंग रहेगी, जंग रहेगी
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 07:18 नवीन
हा कार्यक्रम (क्लिप) जेएनयुचा आहे का हे डिस्प्यूटेड आहे जेएनयु चा कार्यक्रम दिवसाउजेडी झाला होता अन ह्यपेक्षा कट्टर भाषा होती असे खुद्द तिथल्या ओपन लर्निंग सेण्टर मधे शिकणाऱ्या ऐकाने मला सांगितले होते, तसेच ही क्लिप कश्मीर मधली आहे असे एक जम्मू कश्मीर पोलिस मधील मित्राने सांगितले होते खखोदेजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ए
एक सामान्य मानव Fri, 02/12/2016 - 04:21 नवीन
शेवटच्या भागात जे एन यु व लाल सलाम इ. शब्द ऐकू येतात..त्यावरुन ही क्लिप जे एन यु मधीलच असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 02/12/2016 - 04:59 नवीन
कदाचित जेएनयु मधील अगोदर झालेल्या कार्यक्रमाची असावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
अ
अद्द्या Sat, 02/13/2016 - 07:51 नवीन
बापू क्लिप त्या दिवसाची नसेल हि . किंवा आणखी कुठलीही असेल . पण त्याने काही फरक पडतो का ? मुद्दा हाच कि त्या लोकांनी देश विरोधी घोषणा दिल्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 02/13/2016 - 08:28 नवीन
जेएनयु चा कार्यक्रम दिवसाउजेडी झाला होता अन ह्यपेक्षा कट्टर भाषा होती हा मुद्दा आहे माझा मेन, म्हणजे जितके वाटते त्यापेक्षा इंटेंस अन राष्ट्रद्रोही प्रकरण आहे हे (सिस्टेमेटिक राष्ट्रद्रोह) असे म्हणायचे आहे मला. जेएनयु तसेही बर्बाद आहे राजे. थोडक्यात तुम्ही म्हणता आहात तेच मी पण म्हणतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 07:21 नवीन
▶इशरत मेल्यावर तिचा फोटो लष्करच्या वेबसाईटवरही शहीद म्हणून झळकला होता.यातच सगळं आलं. पण इशरतची बहीण ती निर्दोष होती असे म्हणते. याकुब मेमन बाबतही हेच चाललं होतं,तो निर्दोष होता म्हणे?मग न्यायालयाने फाशीची शिक्षा का दिली? काय टिवल्याबावल्याचा खेळ चालू आहे??
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 07:33 नवीन
एक इशरत जहां अन दूसरी बेस्ट बेकरी वाली ज़हिरा शेख का कोण होती त्या दोघींनी लैच वैताग आणला होता, ज़हिरा ने तर इतके स्टेटमेंट्स बदलले की शेवटी बहुतेक न्यायालयानेच तिला दंड ठोठावला अन तिची साक्ष अग्राह्य ठरवली होती असे वाचल्याचे स्मरते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
म
मदनबाण गुरुवार, 02/11/2016 - 07:31 नवीन
हेडली रॉ चा माणुस आहे ! इती :- हरामी कांगावाखोर पाकडे ! इशरत जहां अतिरेकी होती असं सिद्ध झाल्याचे कुठेतरी वाचल्याचे स्मरते, तसे असेल तर तिच्या नावाने शिमगा करणारे तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ? देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्‍या आणि त्यांच्या अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्‍यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ? २६/११ च्या आधी १ वर्ष देखील असाच प्लान आखण्यात आला होता त्याची माहिती आपल्याला होती का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction

  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 07:40 नवीन
इशरत जहां अतिरेकी होती असं सिद्ध झाल्याचे कुठेतरी वाचल्याचे स्मरते, तसे असेल तर तिच्या नावाने शिमगा करणारे तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ? तांत्रिक (कायदेशीर दृष्ट्या) माहीती नाही पण भावनिक दृष्ट्या होय ते सगळे अव्वल देशद्रोही आहेत असे म्हणावे वाटते देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्‍या आणि अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्‍यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ? पोटा टाडा मकोका सारखे कायदे पुनर्जीवित करून अधिक बलशाली करणे, अध्यादेश काढून एनसीटीसी त्वरीत स्थापन करणे हे एकदम लकाकलेले दोन मुद्दे आहेत डोक्यात. २६/११ च्या आधी १ वर्ष देखील असाच प्लान आखण्यात आला होता त्याची माहिती आपल्याला होती का ? इंटेलिजेंस चं मॅटर आहे मला कल्पना नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 07:44 नवीन
ही पाकिस्तानची कायमची बोंब आहे,काही झालं कि RAW ला मध्ये आणायचं. काही बाबतीत RAW कूटनितीचे डाव टाकत असते,पण हे असलं नीच काम करेल का??
तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ? देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्‍या आणि त्यांच्या अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्‍यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ?
यांना सामुहिक समुपदेशनाची गरज आहे. वठणीवर येत नसतील तर नाईलाज आहे,मग एक जहाल पर्याय आहे तो सर्वस्वी निंदनीय ठरेल. →क्या सोच रहे हो पार्थ,उठाओ धनुष्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 07:52 नवीन
महासत्तेचे लोभस अन हवेहवेसे स्वप्न पाहताना एकदम जाणवते की "सामूहिकरीत्या धनुष्य उचलणे" हे परवडण्यासारखे नाहिये!! समुपदेशन अन घेटो तोडणे हे काही अंशी ठीक आहे पण जे ऑलरेडी डोकी फिरून वाया गेले आहेत त्यांचे समुपदेशन म्हणजे "गाढ़वापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता" प्रकार ठरेल! एकंदरित अवघड जागचे दुखणे आहे!!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 07:59 नवीन
बघुया आता सरकार हे सगळं कसं हँडल करतयं. या अशा केसेस मुळे रोहित वेमुलाबाबत असणारी सहानुभूती किंचित कमी झाली राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
V
viraj thale गुरुवार, 02/11/2016 - 07:34 नवीन
tya awhad la Facebook var jaam shivya padat ahet.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/11/2016 - 07:50 नवीन
tya awhad la Facebook var jaam shivya padat ahet. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘तोयबा’ची अतिरेकी इशरत जहां ही ‘साध्वी’ वाटते व तिच्यासाठी ते ढसाढसा रडतात, पण तेच आव्हाड शिवशाहीर पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यास महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात, हे शरद पवारांना कसे चालते? संदर्भ :- रोखठोक : महाराष्ट्र कोण बुडवत आहे?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: viraj thale
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2016 - 10:04 नवीन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘तोयबा’ची अतिरेकी इशरत जहां ही ‘साध्वी’ वाटते व तिच्यासाठी ते ढसाढसा रडतात, पण तेच आव्हाड शिवशाहीर पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यास महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात, हे शरद पवारांना कसे चालते?
हे असलेच पवारांना चालते. दस्तुरखुद्द पवारांनीच इशरत जहाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते व तिची भलामण केली होती. आव्हाडच्या आधी राष्ट्रवादीच्याच वसंत डावखरेंनी सुरवातीला तिच्या कुटुंबियांना १ लाखाची मदत दिली होती. ती मुलगी मध्यरात्री मुंब्र्यापासून खूप दूर गुजरातमध्ये एका कारमध्ये आपला धर्मांतरीत नवरा व इतर दोन पाकिस्तानी तरूण यांच्याबरोबर नक्की काय करत होती हा प्रश्न ना तिच्या घरच्यांना पडला ना या अतिरेक्यांना पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादीच्या नालायकांना? एनकाऊंटरमध्ये ते चौघे मारले गेल्यावर त्या दोन पाकड्यांची प्रेते न्यायला सुद्धा कोणीही फिरकले नव्हते. या असल्या मुलीकरता हे राष्ट्रवादीचे नालायक सुतक पाळतात. http://www.ndtv.com/india-news/ishrat-jahan-innocent-muslims-cant-be-blamed-for-reacting-to-atrocities-sharad-pawar-531223 बादवे, आता वागळेही अपेक्षेप्रमाणे हेडलीवर विश्वास कसा ठेवायचा असे ट्विट करून अजूनही इशरत जहा निर्दोष असल्याच्या भूमिकेला चिकटून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 02/11/2016 - 10:16 नवीन
आता सगळेच मोंदींना चर्चेत / किंवा इतर ठिकाणी खेचुन टिआरपी खेचत आहेत, तर मी देखील एक प्रयत्न करुन बघतो ! ;) दस्तुरखुद्द पवारांनीच इशरत जहाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते व तिची भलामण केली होती.या असल्या मुलीकरता हे राष्ट्रवादीचे नालायक सुतक पाळतात. मोदी साहेब तर म्हणतात की पवार साहेब त्यांचे चांगले मित्र आहेत, ते अधुन मधुन त्यांचा सल्ला घेत असतात. यालाच राजकारण म्हणतात काय ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा