Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????

क
काकासाहेब केंजळे
गुरुवार, 02/11/2016 - 15:38
🗣 175 प्रतिसाद
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात? मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके? आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही

प्रतिक्रिया द्या
33938 वाचन

💬 प्रतिसाद (175)
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 15:46 नवीन
इथे तरी पॉपकॉर्न घेऊन बसायला परवानगी आहे का? च्यामारी लोक फार भूंकायलेत आजकाल.
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 02/11/2016 - 15:57 नवीन
डांगे साहेब,तुमी मर्यादा ओलांडताय अस वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 16:02 नवीन
चला म्हणजे मिसळपाव सोडायची वेळ झालीतर. धन्यवाद! येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 16:16 नवीन
म्हणजे आम्ही कुत्रे आहोत तर?? "स्वतःची चूक असून ती न मान्य करण्याचा तुमचा हट्टी स्वभाव" मला आधीच कळला होता.आणि त्यावर आत्ताच परत शिक्कामोर्तब झाले. आम्ही गेल्यालो परत आलो तुमचा प्रतिसाद पाहून भातावर जरा तूप घेवून खात चला,बुद्धी स्थिर होईल. आणि संमं वरचा प्रतिसाद राहू दे साहेबांचा.निदान त्यांच्या समर्थकांना तरी त्यांच्या बुरख्याच्या आतील चेहरा दिसू दे. काय म्हणता? बाकि दुसरा कोणता आयडी घेवून येणार ते आत्ताच सांगा. (आम्हीही आखाड्यातले पैलवान आहोत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 02/12/2016 - 03:24 नवीन
अनुमोदन. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मारवा Fri, 02/12/2016 - 06:05 नवीन
कुठलाही प्रतिसाद देतांना किमान पातळीचा संयम बाळगत चला. ही केवळ विनंतीच आहे उपदेश , सल्ला , आग्रह, मार्गदर्शन , शिकवणे इ. काहीच नाही याची खात्री बाळगा. पटल्यास घ्या अन्यथा सोडुन द्या हे मी तुमच्या विवेकावर सोपवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/11/2016 - 17:06 नवीन
>>>> च्यामारी लोक फार भूंकायलेत आजकाल. संदीप सेठ, पटलं नाही. बाकी चालु द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 17:57 नवीन
डांगे ब्वा ये बात कुछ हजम नहीं हुई भाई! माझ्यामते तुम्हाला वाद विवाद आवडतात, त्याचे सुद्धा नियम असतात, परवा तुम्हीच "ज्या धाग्यावरची धूणी तिथेच" हा नियम मांडला होता, वैच आज तुमने तोड़ डाला, अन ते ही साधारण भाषा सोडुन! गलत बात, पटले नाही मनापासून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ए
एस गुरुवार, 02/11/2016 - 15:55 नवीन
आधे इधर जाव, आधे उधर जाव, आउर बाकी पॉपकॉर्न खाव!
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 16:12 नवीन
यावेळी आम्ही पॉपकॉरन घेऊन सीट आरक्षित केली आहे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 02/11/2016 - 16:16 नवीन
मागाकाका, सरका तिकडे. कॅरॅमल पॉकॉ आहेत का तुमच्यापाशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 16:21 नवीन
आहेत ना, सोबत मक्याची भेळ पण आणतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
स्रुजा गुरुवार, 02/11/2016 - 16:27 नवीन
है शाब्बास.. माझ्याकडे असॉर्टेड आहेत बरं का.. मला पण येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 18:03 नवीन
मस्त आहेत, सोबत लोणची पण आली आहेत, कुणीतरी पोहे आणा बरं जरा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
स्रुजा गुरुवार, 02/11/2016 - 18:29 नवीन
आणि मिरगुंडं पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बाबा योगिराज गुरुवार, 02/11/2016 - 22:32 नवीन
आणि मिरगुंडं पण. कालच कोकणातून आणली आहेत. मला जरा जास्तच जागा लागेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
भ
भाते गुरुवार, 02/11/2016 - 16:15 नवीन
इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, गणित, विज्ञान. शाळेत असताना शिकलेल्या सगळ्या विषयांची एकत्र खिचडी केली आहे. आधी या सगळ्या महापुरुषांची तारखेप्रमाणे यादी करा बघु. मग आपण प्रत्येकाची सविस्तर चर्चा करूयात. यावेळी मी पॉकॉवाल्यांबरोबर आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/11/2016 - 16:15 नवीन
डोंट फ़ीड द ट्रोल्स.
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर गुरुवार, 02/11/2016 - 16:21 नवीन
फार गहन विचार करून काकासाहेंबाना अनुमोदन द्यावे का?असे किंचीत मनाला चाटून गेले.
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 02/11/2016 - 16:25 नवीन
या धाग्यावर पाॅपकाॅर्नसुध्दा खायला येऊ नये.उद्देश स्पष्ट दिसतोय धागाकर्त्याचा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 02/11/2016 - 16:29 नवीन
मी तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हो असं देऊन विषयच संपवून टाकणार होते. न रहेगा प्रश्न, ना रहेगा धागेका उद्देश! कै बोल्ती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
स्रुजा गुरुवार, 02/11/2016 - 16:30 नवीन
अगं उद्देश सगळीकडेच दिसतो त्यांचा. आपण झाडावर बसुन त्यांच्या उद्देशाची वाट लागताना बघायचं. अशा रटाळ, भिकार आणि मुख्य म्हणजे मठ्ठ लिखाणाचं तेवढंच एक भवितव्य असू शकतं. बाकी पुरुष किती ही हुशार असले तरी यांच्या धाग्यात यांची हुशारी दिसेना मला.. असो ,माझ्या हुशारी ची मर्यादा असावी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ग
गवि गुरुवार, 02/11/2016 - 16:29 नवीन
या उपरोक्त लिस्टमधल्या सर्व पुरुषपुंगवांना जगात आणण्याच्या कामाचं जरासं चतकोर क्रेडिट द्यावं का या पिछाडीवरच्या दुय्यम जिवांना? की उपरोक्त स्पेशल पुरुषविशेष ऑपॉप आले?
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच गुरुवार, 02/11/2016 - 16:50 नवीन
आता पुरूष येणार तावातावाने भांडायला ." महिला कशा श्रेष्ठ" याच्यावर अन् महिला मास्त चीज पॉपकॉर्न घेऊन बसणार मॕच बघत. अन् कोण म्हणतं महिला हुशार नाही म्हणून ? ;-)
  • Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे गुरुवार, 02/11/2016 - 16:51 नवीन
जर स्त्री पुरुष समान आहेत अशी बहुतेकांची धारणा असेल तर यावर चर्चा करण्यास काय हरकत आहे. जर स्त्रीकडे पुरुषाएवढीव बुद्धी व क्षमता आहेत किंवा होत्या तर सर्व क्षेत्रात त्या पिछाडीवर का आहेत ,हा सामाजिक विषय हाताळण्यास काय हरकत आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 17:09 नवीन
माईसाहेब मोड ऑन ह्यांच्या म्हणण्यानुसार काकासाहेबांची यादी फारतर दहा हजार वर्षे जुनी असेल हि मागची दहा हजार वर्षे स्त्रिया मागच्या दहा हजार वर्षापुर्वी त्या मागची मिलियन्स ऑफ वर्षात पुरुषांनी कोणते यश संपादन केले याचा शोध घेत होत्या आणि अजुनही तोच शोध घेण्यात व्यस्त आहेत कारण काही केल्या काही गवसतच नाही. माईसाहेब मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 16:52 नवीन
एवढ्याच गोष्टीत पुरूष आघाडीवर? काही राहिलय का? पळा पॉपकॉर्न खायला.....
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 16:57 नवीन
हुशार पुरूष मंडळींना येऊदेत पटापट.....
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 16:58 नवीन
कोण पुरुष....? धन्यवाद..!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/11/2016 - 16:59 नवीन
आवळ्याचं लोणचं केलंय. कोणाला पाककृती पाहिजे का?
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 17:04 नवीन
पै तै भोकरांच लोणचं रेडीमेड मिळतं का हो कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 02/11/2016 - 17:06 नवीन
मी मधे चंद्रराज कंपनीचं आणलं होतं. त्यांचं माईनमूळ, करवंद, लिंबाचं गोड लोणचं, कैरी छुंदा, मिरची लिंबू हिरवं लोणचं अशी खूप छान छान लोणची मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 17:13 नवीन
शोधावं लागेल बरीच वर्षे झालीत भोकराचे लोणचे खाऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्रुजा गुरुवार, 02/11/2016 - 17:15 नवीन
पण बाहेरच्या लोणच्यात भोकरं मऊ असतात फार. करकरीत हवीत भोकरं तर मजा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 17:27 नवीन
करकरीत हवीत भोकरं तर मजा!
+१०००१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
क
कंजूस गुरुवार, 02/11/2016 - 17:34 नवीन
भोकरं म्हणजे "गोंदण्या"चा मोठा भाऊ. कच्छी गृह उद्योगवाल्यांकडे मिळतात ही लोणची.गुजराथी लोकं करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 17:46 नवीन
हे माहित नव्हते. "गोंदण्या" काय असते ? माझ्या ऐकण्यात/पाहण्यात आलेले नव्हते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
भ
भुमन्यु Fri, 02/12/2016 - 07:12 नवीन
अवांतर: लिविंग फूडस वर पिकल नेशन कार्यक्रम बघितला का? मस्त कार्यक्रम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
इ
इशा१२३ Fri, 02/12/2016 - 08:45 नवीन
पुण्यात मिळतिल का हि लोणची? अर्थात मला चटणी वा ठेचा करायला जास्त आवडत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 17:01 नवीन
त्यापेक्षा वेगळा विदर्भ दे ना....
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/11/2016 - 17:07 नवीन
कोणासहित देऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 17:11 नवीन
अय्या...ऋतिक रोशन किंवा मिलिंद सोमण किंवा गेला बाजार रणवीर सिंग तरी...मिळतील का...?? इश्श्श्य्...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 02/11/2016 - 17:20 नवीन
त्यांच्या त्यांच्या गर्लफ्रेंडा असतील ना! तो एक प्रॉब्लेम. स्वतंत्र विदर्भासहित फक्त बबन मिळेल असे माईंचे हे म्हणाले आताच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
म
मदनबाण गुरुवार, 02/11/2016 - 17:02 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/11/2016 - 17:03 नवीन
स्त्रीया काय करत होत्या? स्त्रीया तेव्हा शेती करत होत्या, मुलांचं संगोपन करत होत्या, बाजरीच्या भाकरी करत होत्या, भजे, पुरणाच्या पोळया, साध्या पोळया करत होत्या, अन्न आणि संगोपन ही जवाबदारी पार पाडत होत्या असं वाटतं. त्यांनी का शोध लावले नाहित? धुनं,भांडी, जेवण, ऑफिस, दुपारचं महिला मंडळाच्या ऑफिस गप्पा आणि उरलेल्या वेळात काम, पुन्हा सासू सासरे नंदा यांची सेवा, नव-याला चहा पाणी, मुलांचा होम वर्क, इथं त्यांना स्वत:कड़े बघायला फुरसत नव्हती त्यामुळे त्यांनी शोध लावले नसावेत असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 17:07 नवीन
कृपया धाग्याशी संबंधित प्रतिसाद द्यावेत. असे प्रतिसाद आल्यास आयडी ख़ारिज करण्यात येईल....संम, हुकुमावरून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कपिलमुनी गुरुवार, 02/11/2016 - 17:04 नवीन
यंदा आंब्याचा मोहर कसा आलाय ? या वर्षी तरी भरपूर आंबे खायला मिळू दे रे देवा
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 02/11/2016 - 17:10 नवीन
यंदा आंबे कमी आहेत, अश्या धाग्यांच लोणच घालता येत का ते पहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/11/2016 - 17:16 नवीन
अशा कै-या तलवारीने कापल्या पाहिजेत. -दिलीप बिरुटे (तलवार म्यान करून विचारांनी कै-या कापू पाहणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी गुरुवार, 02/11/2016 - 17:21 नवीन
मला वाटत डब्बल बॅरल वापरुन उडवल्या पायजेत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा