Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????

क
काकासाहेब केंजळे
गुरुवार, 02/11/2016 - 15:38
🗣 175 प्रतिसाद
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात? मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके? आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही

प्रतिक्रिया द्या
33938 वाचन

💬 प्रतिसाद (175)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/11/2016 - 17:33 नवीन
शस्त्र हातात घेणार नाही, सांगेन गोष्टी चार युक्तीच्या या दिलेल्या शब्दामुळे हात बांधले गेले आहेत. -दिलीप बिरुटे (डबल ब्यारल गुंडाळुन ठेवलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 17:21 नवीन
पैसाताई पाकृमध्ये पण आपण पिछाडीवरच! आवळयाचं लोणचं तरी तुला जमलय का?
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/11/2016 - 17:53 नवीन
उद्या येताना घेऊन येऊ का तुला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 17:56 नवीन
तेवढीच आंब्याची तहान आवळ्यावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 17:24 नवीन
का तो आहे आधीच, मेलं आम्हाला काय बातम्या कळत नाहीत
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 17:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
य
यशोधरा गुरुवार, 02/11/2016 - 17:32 नवीन
तुला कळ्ळं तर मला कळव गं. लग्गेच येईन मी आपल्या स्वतंत्र कोकणात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
प
पिलीयन रायडर Fri, 02/12/2016 - 07:54 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
व
विशाखा राऊत Fri, 02/12/2016 - 11:16 नवीन
कधी झाला कोकण स्वतंत्र... बोलली नाहीस मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
क
काकासाहेब केंजळे गुरुवार, 02/11/2016 - 17:30 नवीन
मिपावरच्या स्त्रीया एवढ्या बाळबोध ,चिडक्या , आणि पळकाढू असतील असे वाटले न्हवते. स्त्री पुरुष समान आहेत ना! मग चर्चा करा ना , फालतूगिरी करुन धागा का खराब करत आहात. मिपा एक चांगले संस्थळ आहे ,परंतू फालतूगिरी करणे ,वनलायनर टाकणे अश्या प्रकाराने संस्थाळाची रया जात आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/11/2016 - 17:53 नवीन
माईसाहेब मोड ऑन काकासाहेब तुम्हाला स्वतः शिवाय इतर पुरुषांनी काय काय यश संपादन केले हे शोधण्यासाठी एक पाव नोबेल, स्त्रियांनी काय केले नाही हे शोधण्यासाठी एक पाव नोबेल, उरलेल आर्ध नोबेल तुम्हाला पूर्ण नोबेल मिळाल्यानंतर. माईसाहेब मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/11/2016 - 19:04 नवीन
माई मोड वेगळा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
स्रुजा गुरुवार, 02/11/2016 - 17:53 नवीन
साई SSSSSSSSSSSSSSSSS सुट्ट्यो SSSSSSSSS आँ ! गल्ली चुकले वाटतं. ... पळायचं च होतं मला पण पोरखेळ बघुन थांबले.. या की गं खेळायला.. हुर्र र्र र्र र्र्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
प
पैसा गुरुवार, 02/11/2016 - 17:57 नवीन
कोणावर राज्य आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
य
यशोधरा गुरुवार, 02/11/2016 - 18:17 नवीन
पळायला मेडल देणार तरच मी येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
स्रुजा गुरुवार, 02/11/2016 - 18:26 नवीन
पण मेडल हुशार लोकांनाच मिळतं.. मिपा बायका ढ आहेत.. राज्य काकासाहेबांवर आहे पै ताई..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 17:58 नवीन
मी पळकाढु नाय्ये ब्वॉ...मी चालतेय..!! नवे नवे शोध लावले असते पण मेले हे गुढगे फार दुखतात हल्ली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 18:01 नवीन
पळत जाऊन उगाच कुणी पिछाडीवर नको रहायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
च
चौकटराजा Sat, 02/13/2016 - 08:18 नवीन
मिपाकरात बरेचसे टाईम्पास वाले आहेत हे कटु सत्य आहे.सायन्स वरच्या धाग्यास किती प्रतिसाद मिळतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 17:36 नवीन
बाळबोध, चिडक्या,पळकाढू यात स्त्रिया आघाडीवर आहेत,हा शोध कोणी लावला बॉ?
  • Log in or register to post comments
इ
इनू गुरुवार, 02/11/2016 - 17:36 नवीन
माशांचं लोणचं कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/11/2016 - 17:40 नवीन
गोव्यात आलात की घेऊन जावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनू
इ
इनू गुरुवार, 02/11/2016 - 17:45 नवीन
ठीक आहे. महाराष्ट्रात नाही मिळत का कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 17:37 नवीन
नक्की!
  • Log in or register to post comments
इ
इनू गुरुवार, 02/11/2016 - 17:42 नवीन
समुद्रातले किंवा नदीतले कोणतेही चालतील
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/11/2016 - 17:51 नवीन
आणि २-४ ओळी खरडतो... स्त्री आणि पुरुष यांची तुलना होवू शकत नाही. बर्‍याचशा प्रजातीत बाळंतपाणाची जबाबदारी फक्त मादीकडेच दिलेली असते. बाळंत व्हायला जो धीर,चिकाटी आणि बळ लागते, ते पुरुषांकडे अजिबात नसते. स्त्रीयांना समानतेचा हक्क गेल्या २००-२५० वर्षात मिळाला (आणि तो पण झगडून) आणि सध्या तरी बर्‍याचशा क्षेत्रांत (गुप्तहेर खाते आणि संरक्षण दलातील अवघड कामगिरी सकट) स्त्रिया पुरुषां इतक्याच कधी-कधी काकणभर सरसच कामगिरी करतात. आणि ही फक्त गेल्या २००-२५० वर्षातीलच स्त्रियांची प्रगती आहे. स्वगत : उद्या जर स्त्रियांनी पुरुषांना फक्त डोनर टाइपच वापरले तरी नवल वाटायला नको.अद्याप तरी त्यांची मनापासून प्रेम करायचे आणि कुटुंबवत्सल असणारे जीन्स शाबूत आहेत म्हणून बरे.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा गुरुवार, 02/11/2016 - 17:54 नवीन
धाग्याकर्त्याने विचार-पुर्वक धागा काढला आहे असे समजतो...
ठ्ठो !! काय मुविकाका जोक मारताय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 18:02 नवीन
स्त्री आणी पियूष यांची तुलना होऊ शकते...दोन्हीही खूप गो SSSS ड असतात...इति: प्यारे काका
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 18:04 नवीन
आणि हा 100....टाळ्या!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 18:08 नवीन
101
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 02/11/2016 - 18:10 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या गुरुवार, 02/11/2016 - 18:13 नवीन
आकडे मोजायला चुकले काय? परत मोजुया, पहिल्यापासून!123457856 नाही परत चुकले, जाऊदे बै झोप येतेय
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 19:14 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 19:15 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 19:16 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 19:17 नवीन
अग शून्य मोजलाच नाहीस की तू...म्हणून चुकतय!! पुरुषानिच शोधून ठेवलाय म्हणे..!! पण कुठे ठेवलाय देव जाणे... आमचे हे ना एक वस्तु जाग्यावर ठेवत नाहीत...कंटाळले बाई...जळळ्ळा मेला बायकांचा जन्म..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 19:18 नवीन
एकदा सांगून कळत असेल तर त्या बायका कसल्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/11/2016 - 18:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मयुरMK गुरुवार, 02/11/2016 - 18:56 नवीन
मी पन हेच करतो ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Fri, 02/12/2016 - 02:38 नवीन
प्रतिसादाचा कारण काही नाही पण पंप्र आलेत तर हजेरी लावली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/11/2016 - 19:04 नवीन
ब्ल्याक होल थेरी आणि स्ट्रिंग थेरी मधे सद्ध्या काय थेरं चाल्लीयेत? https://en.wikipedia.org/wiki/String_theory
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/11/2016 - 19:17 नवीन
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं ऐकून आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 02/12/2016 - 09:13 नवीन
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं ऐकून आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणी तो यशस्वी झाला की त्या यशस्वी करणार्‍या स्री मागे दोन पुरुश असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नीलमोहर गुरुवार, 02/11/2016 - 19:18 नवीन
एवढ्या गहन विषयावर का कू सुरुये आणि मला पत्ताच नाही, काय करत होते मी ? अं ?? तर मी हापिसातून आले, हातपाय धुवून फ्रेश झाले, देवाजवळ दिवा लावला, देव्हार्यावर मातोश्रीनी रुमालात तांदूळ गुंडाळून ठेवले होते ते सगळे सांडले ते गोळा केले, देवघर स्वच्छ पुसून घेतलं, २ मिनिटे शांत बसून प्रार्थना केली. मग सकाळचा मटा पेपर वाचला,पेढा वेफर्स खाल्ले, मग डाळ तांदूळ भिजत ठेवले, फ्रिजमधील कणीक, मसाला, दूध इ. बाहेर काढले, दाणे भाजून ठेवले होते ते सोलले, ह.डाळ खराब व्हायला लागली होती ती चाळून निवडली, कुकर लावला, तोवर जरा फोन बिन केले, त्यात वेळ गेला. पटकन उठले शेवया ओव्हन मध्ये भाजायला ठेवल्या त्या जळाल्या, परत कमी वेळ ठेवल्या तरी जळाल्या, मग तशाच उकळत्या पाण्यात शिजवून दूध घालून छान खीर केली. एकीकडे तवा तापलाच होता पोळ्या केल्या, कुकर मधली डाळ शिजलीच नव्हती परत कुकर लावला. आज गणेश जयंती निमित्त बाप्पाला हार फुले वाहिली आरतीची तयारी केली, मग 10 मिनिट कमला पाहिलं. आता डाळ थोडी शिजली होती, मग वरण केलं, डाळ मेथी केली. बाप्पाला नैवेद्य दाखवला आरती केली अथर्वशीर्ष म्हटलं.मग जेवले, पसारा आवरला आणि हुश्श करून जरा बसले आणि मिपा उघडलं तर हे.. अर्रर्रर ते दूध तापायला ठेवलंय उतू जायचं, बाकी सविस्तर प्रतिसाद निवांत लिहीते हां..
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 02/12/2016 - 04:46 नवीन
हे काय असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
र
रिम झिम Fri, 02/12/2016 - 08:52 नवीन
एवढा लिहायचा पण कंटाळा केला असता मी. कामाच्या नावाने तर ... असो. दंडवत घ्या एक __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
म
मराठी कथालेखक Fri, 02/12/2016 - 09:14 नवीन
बाकी सविस्तर प्रतिसाद निवांत लिहीते हां..
प्रतिसाद ? आता विडंबनाची वेळ झाली की हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 02/12/2016 - 12:53 नवीन
विडंबनाला आता टाईमप्लीज, इतरांनाही स्कोप पाहिजे ना, लोक कंटाळतील आता. @ रिमझिम, -एवढं काम तर झालंच, शिवाय हे सगळं मोबाईलवर टंकलं.. रात्री ११ नंतर.. झोपेचे बलिदान देऊन.. कॅन यु इमॅजिन ;) वरील लिस्टीत कपडे धुणे, भांडी घासणे पण अ‍ॅड झालं असतं, पण ४-५ दिवस सुट्टीवर असलेल्या बाईंनी सरप्राईज व्हिजीट देऊन ही कामं आधीच केली होती म्हणून तेवढं राहिलं :) नाईलाज हो, असे धागे पाहिले की हात शिवशिवतात, बोटे आपोआप टाईप करू लागतात, तरी आपण हुशार नाही, नाहीतर अजून काय काय केलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
सुचिकांत गुरुवार, 02/11/2016 - 19:19 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांशी सहमत. आज ऑफिसमध्ये याच विषयावर जेवणाच्या सुटीत चर्चा झाली. स्त्रियांच्या कडे मल्टी टास्कीन्ग हा महत्त्वपूर्ण गुण असतो जो पुरुषांच्याकडे अभावानेच सापडतो, असं आम्हा सर्वांच मत पडलं .. शिवाय पुरुष जरा आळशी असतात स्त्रियांच्या पेक्षा, हे दुसरे निरीक्षण... घरी-दारी दोन्हीकडे एवढ्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडणे सोपे काम नाही. म्हणूनच तर यशस्वी लोक, आपल्या यशाचं श्रेय, नेहमीच आपल्या आईला /बायकोला देतात.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/11/2016 - 19:30 नवीन
जळळ् मल्टीटास्किंग...वर वाचा 6 पैकी 5 टास्क चुकवलेत.... घरचा पुरुष कधी जेवणार आणि कधी यशस्वी होणार...??? नीमो, मला वाटतं या सगळ्याचं मूळ त्या मटात आहे..उद्यापासून सकाळ वाचत जा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिकांत
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा