तंत्रजगत

मोबाइलसाठी तरी चाला...!

Primary tabs

मोबाइलसाठी तरी चाला...!
तुम्ही चालले की मोबाइल चालेल... काय भन्नाट आयडिया आहे ना? आजच एक बातमी वाचली.
‘अवनि’ नव्हे अवनिमो या मूलभूत गरजांमधील एक म्हणजे मोबाइल. अवनिमो म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाइल. तर हा मोबाइल रिचार्ज करण्यासाठी जवळ पॉवर बँक बाळगणारे अनेक असतील. पण आता या पॉवर बँकला छान पर्याय निघालाय. तो म्हणजे तुम्ही चाला, म्हणजे मोबाइलही चार्ज होईल. अर्थात, त्यासाठी विशिष्ट बूट तयार करण्यात आले आहेत. ‘एनर्जी हॉर्वेस्टिंग अँड स्टोअरेज टेक्नॉलॉजी’ची संकल्पना यात वापरली आहे. तुम्ही जितके चालाल तेवढा मोबाइल चार्ज होईल. चार्जेबल जेवढ्या वस्तू तुमच्याकडे असतील तेवढ्या सगळ्यांवर हा जनरेटिंग बूट रामबाण इलाज असेल. अमेरिकेतील व्हिसकन्सिन मॅडिसन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावलाय. या शास्त्रज्ञांचं कौतुक करायला हवं. एका पायातील बुटामुळे १० वॅट, तर दोन्ही पायांतील बुटांमुळे २० वॅट ऊर्जा निर्माण होते. आता हे साधारण चालण्यावरून काढलेलं गणित आहे. आता तुम्ही ठरवायचं किती चालायचं ते.
आजकाल स्वतःसाठी कोणी चालतच नाही. या उपकरणामुळे किमान मोबाइलसाठी तरी चालणं होईल. जेवढे चालाल तेवढी बॅटरी चार्ज. आता एवढं करूनही तुम्ही जर पॉवर बँकच वापरण्याचा पर्याय निवडाल तर त्याला कोण काय करू शकणार?

विजय पुरोहित

व्वाव्व... कुठे मिळेल हे अॅप?

जव्हेरगंज

-वार्ताहर दै. संध्यानंद

असं काहितरी लिहायचं राहिलयं बघा खाली ;-)