Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदत/सल्ला हवा आहे- नवीन फरशी/लाद्या बसवणे आणि रंगकाम

स
साधा मुलगा
Sun, 02/14/2016 - 08:26
🗣 23 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, सध्या घरातल्या hall आणि बेडरूम अशा दोन खोल्यांसाठी नवीन लादी/फरशी घालणे आणि रंग काढणे असे काम करायचे आहे. त्याच्यासाठी Contractor ला contract देऊनच करून घेणार आहोत, तरीही या संबंधी आपल्याला संपूर्ण माहिती असावी या दृष्टीने हा धागा काढत आहे. नेहमीप्रमाणे मिपाकर मंडळी योग्य मार्गदर्शन करतील याची खात्री आहे. याआधी या विषयावर चर्चा झाली असल्यास त्या धाग्याचा दुवा द्यावा. काही प्रश्न : १) सध्या घरात साध्या फारश्या आहेत, त्याजागी मार्बल टाकायचा विचार आहे, जे खर्चिक आहे, या मार्बल ची जाडी किती असावी, कारण दिसायला आणि पुसायला चांगल्या असल्या तरी त्या पुरेश्या मजबूत असतात का? आदळआपट झाली तरी टिकतील का? २) जुन्या फर्श्यांवर त्या न काढता नवीन लादी टाकणे व्यवहार्य आहे का? यामध्ये खोलीमध्ये उघडणारे दरवाजे कापणे असे धंदे करावे लागतात , हे लक्षात घेऊन बोलत आहे. ३) भारतीय मार्बल , इटालिअन मार्बल मध्ये काय फरक आहे? ४) सध्या मुंबईत फ्लोरिंगचा आणि रंगकामाचा चौ. फुटाचा काय भाव आहे? ५) आधी रंगकाम करावे कि आधी लाद्या बसवाव्या? ६) रंग कुठल्या कंपनीचे चांगले? इतर काही सल्ले, अनुभव आणि सूचनांचे स्वागत आहे.
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
18985 वाचन

💬 प्रतिसाद (23)
_
_मनश्री_ Sun, 02/14/2016 - 09:05 नवीन
जुन्या फरश्या न काढता नवीन बसवा तेच जास्त फायदेशीर आहे फक्त दरवाजे काढून कापावे लागतील पण जुन्या फरशा काढून बसवण्यापेक्षा दरवाजे कापण श्रेयस्कर आधी फरश्या बसवा मग रंगकाम करा आधी रंगकाम केलत तर फरश्या बसवताना नवीन रंग खराब होईल माझ्या मते एशियन चे रंग चांगले आहेत
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sun, 02/14/2016 - 09:44 नवीन
घर स्वतंत्र आहे आहे की सोसायटीत आहे? कितव्या मजल्यावर आहे? घराचे़ क्षेत्रफळ किती आहे? मार्बल फक्त फ्लोअरिंगला वापरणार आहात की जिना(असल्यास),खिडक्या.दरवाजे(बाथरूम),किचन ओट्यालाही वापरणार आहात.? काम मटेरिअलसकट की मटेरिअलशिवाय देणार आहात? फ्लोअरिंगसाठी मार्बल उत्तम. आदळापटीने नुकसान होत नाही. परंतू, देखभाल खर्चिक असते. हळदी कुंकवाने मार्बलचा रंग बदलू शकतो. जुन्या फरश्या न काढता मार्बल बसवला तर फ्लोअरची जाडी वाढू शकते व स्लॅबवर अनावश्यक वजन वाढू शकते (ग्राउंड फ्लोअर असेल तर हरकत नाही). परंतू जुन्या फरशा कमकुवत किंवा सैल झाल्या असतील तर मार्बलला काही वर्षांनी तडे जाऊ शकतात. त्यापेक्षा पीव्हीसीची लाकडासारखी दिसणारी फ्लोअरिंग सर्वात उत्तम. झटपट लावून होते,फ्लोअरिंगची जाडीही जास्त वाढत नाही, वजनाने हलकी त्यामुळे स्लॅबवर जास्त भार येत नाही, किमतीने स्वस्त,देखभाल खर्च कमी,साफसफाईला सोपी व पुढेमागे बदलायलाही सोपी.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 02/14/2016 - 09:53 नवीन
मार्बल महाग, तुलनात्मक दृष्ट्या कमी मजबुत आहे. पण स्पर्श आल्हाददायक असतो. बसविण्यासाठी राजस्थानी कारागीर चांगले . आदळआपट झाल्यास कदाचित नाही टिकणार. मोठे मार्बल (२*२ किंवा ४*४ वगैरे ) चे तुकडे बसविले तर दिसायला चांगले दिसते. पण तुटफूट झाल्यास खर्चपण जास्त लागतो . ३-४ दुकानदाराकडे जा. खर्च काढा व जे योग्य वाटते त्यांना कॉन्ट्रॕक्ट द्या. अजून एक महत्त्वाचे दुकानात जे मार्बल सिलेक्ट केले तेच घरी आले का हे चेक करा, एकाच प्रकारच्या मार्बल मधेही वेगवेगळी प्रत असते. शक्यतो ज्या दुकानदाराकडून मार्बल घेणार त्याचेच कारागीर असतील तर चांगलं (नाहीतर तुटफूट झाली तर फरशीच खराब होती असे म्हणतात.)
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 02/14/2016 - 10:01 नवीन
मार्बल बसवल्यानंतर आमच्या ओळखीतले बरेच पस्तावले आहेत, मार्बल फार थंड पडते आणि घरांत स्लीपर्स वापरल्या नाहीत तर काही जणांना सर्दीचा त्रास वाढल्याच्या तक्रारी आहेत. मार्बल बसवायचाच झाला तर आधीच्या फरशा काढाव्या, नाहीतर मार्बलला तडे जातात. आधी रंग केल्यास मार्बल बसवताना खालच्या बाजूचा रंग खराब होतो. लेटेस्ट सिरॅमिक्सच्या, किरकोळ आघाताने न फुटणार्‍या फरशा मिळतात. त्यातल्या ब्रॅण्डेड कंपनीच्या बसवाव्या. सर्वात शेवटी, सिरॅमिक्सच्या फरशा बसवणारे कारागीर चांगले पाहिजेत, नाहीतर त्या वजन पडल्यावर किंचित हलून आवाज येतो.
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Sun, 02/14/2016 - 12:29 नवीन
मनश्री, मार्मिक गोडसे, उगा काहीतरीच, तिमा या सर्वांना उपयुक्त प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. @मार्मिक, घर तळमजल्यावर आहे, मार्बल फक्त फ्लोरिंगला वापरणार आहोत, काम मटेरीअल शिवाय द्यायचा विचार आहे, फरशीच्या वर वरच्या कपच्या उडाल्या आहेत, पण सैल झालेल्या नाहीत. तरीही पिव्हीसी फ्लोरिंग विचारात घेण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 02/14/2016 - 13:32 नवीन
मूळ फरशा काढूनच नव्या बसवा . मार्बल हे देवघरासाठी ठीक . ज्यावरून वावर होतो अशा साठी अगदी अयोग्य. मार्बल वसवलेच तर इटालियन मार्बल बसवा .ते काम अर्थातच फार खर्चिक आहे. सर्वात मस्त कोटा हा दगड .पण तो अगदी फिक्या रंगात मिळतच नाही. १०० टक्के व्हिट्रीफाईट टाईल लावा .त्या दिसायलाही चांगल्या. थंडीत मात्र गार पडतात. त्यावेळी पायात मोजे वापरावे लागतील. रंगात रंग द्युको चा वेलवेट टच हा रंग. बासुंदी सारखा ! मुलायम ! पण एशियन चा प्लास्टिक पेंट ही उत्तम १० वर्षे ताप नाही. वॉशेबल आहे. पाणी हा सॉल्वन्ट असल्याने नाकाला दर्प नाही. लस्टर पेण्ट लावू नकाच .त्याची साल सुटते. प्रथम फरशा मग रंग हा क्रम. रंगात प्रथम सीलिंग मग भिन्ती हा क्रम. एका खोलीत एक दुसरीत दुसरा असे रंग देउन नका. तर एका कलर स्कीम मधील ३ शेडस निवडून ती स्कीम फ्लॅट मधे फिरवा. अन्धार्या भितीवर गडद रंग टाळा.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 02/14/2016 - 13:45 नवीन
२ : जुन्या फरशा काढूनच नवीन बसवा नैतर आगीतून फुफाट्यात पडाल. ५. आधी फरशा बदला. साईडपट्टी मुळे कलर नंतरच करून घेणे सोयीस्कर असेल.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 02/17/2016 - 13:26 नवीन
फक्त रंगाबाबत काही प्रश्न आहेत १. घराला रंग द्यायचा आहे, तर लोकल व्हेंडर कडून द्यावा की एशियन पेंट्स वगैरे कडुन? २. दोन्ही पर्यायांमध्ये कोटेशन घेतले तर फार फरक नाही. म्हणजे प्रश्न फक्त कामाच्या दर्जाचा उरतो. कुणाला एशियन पेंट्सचा अनुभव आहे का? ३. रंगाचा कोणता प्रकार सध्या लोकप्रिय आहे? मागे लस्टर होता. पण सध्या तो लावु नका म्हणुन सांगतात. रॉयल इमल्शन वगैरेचा कुणाला अनुभव आहे का? ४. कलर कार्ड वर छोट्या चौकोनातला रंग मोठ्या भिंतीवर कसा दिसेल हे पटकन समजत नाही. ह्याबद्दल कुणी जाणकार माहिती देऊ शकतील का? ५. रंगसंगती बद्दल काही माहिती मिळेल का? गुगल केले असता एक लक्षात आले की ह्या रुम्स नेहमीच प्रशस्त, कलात्मक, हवेशीर, भरपुर प्रकाश असणारे वगैरे वगैरे असते. आपल्या घरात असं काही नसतं. तेव्हा रंग कसे निवडावेत? एखादी शेड आवडलीच, तरी चित्रातली शेड बरोब्बर भिंतीवर कशी आणावी?
  • Log in or register to post comments
स
सूक्ष्मजीव गुरुवार, 02/18/2016 - 10:01 नवीन
आम्ही आमच्या बिल्डींगचे रंगकाम एशियन पेंटला दिले होते. सुरुवातीला त्यांचे इंजिनीअर आले सर्व सर्व्हे करून कोटेशन दिले. साधारण १२,००० चौ फूट काम त्यांना दिले. त्यांनी आधी सांगितल्या प्रमाणे कंपनीचे कामगार येणार होते पण जे लोक कामावर आले ते आजीबात स्किल्ड नव्हते. संपूर्ण काम दोन ते तीन लोकांनी केले. खूप त्रास झाला. भिंती न घासात्तच रंगवत होते.एक माणूस त्यांच्या मागे लावावा लागला. तरीही काम अत्यंत सुमार झाले. कोपरे खिडक्या घाण करून टाकल्या. नंतर व्यवस्थित साफ केल्या नाहीत. थोडक्यात काय - सुमार सर्विस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/18/2016 - 10:12 नवीन
अरेरे!!!! फेरविचार करायला हवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूक्ष्मजीव
न
नाखु गुरुवार, 02/18/2016 - 10:15 नवीन
तोडफोड करीत नाही आणि सेवा चांगली (न कुर्कुर करता दुरुस्ती करतो) पण मोठ्या बिल्डरकडे काम करणारी मंडळी (अंमळ) माजोरडी आणि चालढकल करणारी असतात असे राहते घर २ दा आणि फ्लॅट ३ दा रंगकाम करून घेताना अनुभव आला आहे. रंगात रंगून रंगावेगळा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/18/2016 - 10:18 नवीन
हो.. हे एशियन वाले पैसे पण आधीच घेतात बहुतेक. नंतर चुका झाल्यातर कसे वागतात तेच माहिती नव्हते. तेव्हा लोकल माणुस शोधावा.. त्याचं कामही पहाता येईल १-२ घरं पाहुन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु गुरुवार, 02/18/2016 - 11:02 नवीन
हवा असल्यास (आधी पाहिला नसेल तर) व्यनी करावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
स्वच्छंदी_मनोज गुरुवार, 02/18/2016 - 14:09 नवीन
मला स्वतःला एशीयन पेंट चा अत्यंत चांगला अनुभव आलाय. उत्तम सर्विस आणी रिझनेबल बजेट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/18/2016 - 15:02 नवीन
माझा एशियन पेंट्स आणि ड्यूलक्स असा दोन्हीचा अनुभव आहे. एशियन पेण्टस चा अनुभव जास्त चांगला आहे. फक्त एकच खोली रंगवली होती पण तो रंग पाच-सहा वर्षांनीही ताजा दिसतोय. ड्युलक्स ही वाईट नाही पण थोडे मागे पळावे लागले. ड्युलक्स अशियन पेक्षा स्वस्त असल्याने घेतले होते. रंगछटा गडद घ्या असच म्हणेन काही वर्षांनी पण रंग ताजा वाटेल, फिकट रंगछटानी प्रकाश चांगला परावर्तित होतो वगैरे खरे असले तरी रंग निस्तेज वाटतात, जिवंत वाटत नाही. आणि आजकाल एलेडी बल्ब मुळे वगैरे कमी बिलात जास्त उजेडाची सोय होते आहे, शिवाय फॉल्स सिलिंग करुन अनेक छोट्या लाईट्स बसवणे वगैरे केल्याससुद्धा गडद रंगच चांगले दिसतील. तरुणाई आणि आकर्षकता (ग्लॅमर) यांचे मिश्रण वाटेल.. अगदी हलका , पांढरा रंग ई मोठ्या बंगल्या , राजवाड्याला चांगला (क्लासिक टच वगैरे) पण मध्यमवर्गीयाच्या छोट्या /मध्यम फ्लॅटला गडद रंगानेच मजा येते. एका भिंतीला टेक्स्चर चा विचार पण करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सर्वसाक्षी Wed, 02/17/2016 - 15:16 नवीन
टाकला आहे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/17/2016 - 19:48 नवीन
राजस्थानी कारागिरांचे काम बघा.कामातला फरक लगेच कळेल.दोन लाख खर्च येईल.स
  • Log in or register to post comments
अ
अदि गुरुवार, 02/18/2016 - 12:17 नवीन
कडिये लादीच्या कामात बेस्ट!!मजुरी थोडी जास्त असते, पण काम झकास.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र गुरुवार, 02/18/2016 - 12:41 नवीन
मी दोन लाख खर्च करुन जुनी मोझॅक टाईल्स न काढता त्यावर दोन फुट बाय दोन फुट साईझची स्पार्टेक्स टाईल्स लावल्या. याच बरोबर ग्रॅनाईट ओटा, कीचन ट्रॉली आणि रंगकाम व पडदे बदलणे इ. कामे दोन लाख त्रुपयात पुर्ण झाली. संडासचे भांडे तसेच बाथरुम संडासमधल्या बिल्डरने लावलेल्या पांढर्या टाइल्स ऐवजी रंगीत लाउन घेतल्या. स्पार्टेक्स टाईल्स मोझॅकवर लावल्याने जमीनीची उंची वाढते आणि दरवाजे उघडेनासे होतात यावर तो राजस्थानी कारागीर लाकुड कापणारी इलेट्रीकची करवत दरवाजा न खोलता कापुन दरवाज्याची उंची कमी करुन देतो. हे थोडेसे कौशल्याचे काम आहे. स्पार्टेक्स टाईल्स मधे अ दर्जाच्या टाईल्स निवडणे स्वतः करावे. कारण टाईल्स विकणारा दुकानदार अ दर्जाच्या टाईल्सचे पैसे घेऊन जास्त वार्पेज असलेल्या ब दर्जाच्या टाईल्स गळ्यात मारु शकतो. राजस्थानी कलाकार जसे कामात हुशार तसेच फसवेगीरी करुन दुकानदाराच्या संगनमताने ब दर्जाच्या टाईल्स गळ्यात मारु शकतात. टाईल्स चे उत्पादन होताना काही टाईल्स सपाट होण्या ऐवजी थोड्याश्या वाकड्या होतात. हुशार सेल्समन त्या दुकानदारांना विकण्याची ट्रीक शिकवतात. मग तो राजस्थानी कलाकार " साहब जहा जोड आता है वहा उन्नीस- बीस का फर्क तो रहता है " अस म्हणुन दुकानदाराने खपवलेल्या ब दर्जाच्या टाईल्स पचवतात. यावर आपण उपाय सुचवल्यास जुन्या मोझॅक टाइल्स काढा असे तो सांगतो. याला वेळ आणि खर्चही जास्त येतो. आपण दुकानदाराला स्वतः भेटुन मी प्र्त्येक टाईल्स स्वतः तपासुन घेईन असे सांगावे. जर ब दर्जाच्या टाईल्स आल्यास पैसे मिळणार नाहीत असे राज ठाकरे स्टाईलने ठणकाऊन जमल्यास धमकाऊन साम्गीतल्यास दुनिया झुकती है. आता तपासणी कशी करावी या विषयी तीन फुट लांबीचा स्टील रुल जो मार्किंग साठी इंजिनीयरीग इंडस्टीमधे वापरतात तो विकत आणावा. प्र्त्येक टाईल्स वर तो आडवा करुन ( स्टील रुल आडवा पण त्याचा उंचीचा भाग उभा धरुन ) चिकटवुन खालुन कागदाचा तुकडा पास होतो का ते पहावे. अ दर्जाच्या टाईल्स मधे वार्पेज असते पण ते ५-१० - मायक्रॉन ( १ मिलीमिटरचा हजारावा भाग म्हणजे एक मायक्रॉन ) इतके असते. इथे कागदाचा तुकडा स्टील रुल खालुन जात नाही. पण ब दर्जाच्या टाईल्स मधे हेच प्रमाण ५०- १०० माय क्रॉन इतके वाढते. सबब टाईल्स बसवल्यावर त्यावर बोट फिरवले असता उंचीतला फरक जाणवतो. घर पहावे रिन्युएट करुन ह्या न्यायाने प्रत्येक कामात गडबड असते. आपण ज्यांनी अशी कामे करुन घेतली आहेत त्यांच्याकडुन याच्या ट्रीक्स जाणुन घ्याव्यात सोबत बाजारभाव सुध्दा माहित करुन घ्यावेत. टाईल्स व टाईल्स चिकटवायचे सिमेंट याच्या प्रिंटेड किमतीवर ५० % पर्येत कमीशन दुकानदार घेत असतो. पैकी घासा घीस करुन १०-२० टक्के किंमत कमी होऊ शकते.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 02/18/2016 - 18:04 नवीन
आता तपासणी कशी करावी या विषयी तीन फुट लांबीचा स्टील रुल जो मार्किंग साठी इंजिनीयरीग इंडस्टीमधे वापरतात तो विकत आणावा. प्र्त्येक टाईल्स वर तो आडवा करुन ( स्टील रुल आडवा पण त्याचा उंचीचा भाग उभा धरुन ) चिकटवुन खालुन कागदाचा तुकडा पास होतो का ते पहावे. अ दर्जाच्या टाईल्स मधे वार्पेज असते पण ते ५-१० - मायक्रॉन ( १ मिलीमिटरचा हजारावा भाग म्हणजे एक मायक्रॉन ) इतके असते. इथे कागदाचा तुकडा स्टील रुल खालुन जात नाही. पण ब दर्जाच्या टाईल्स मधे हेच प्रमाण ५०- १०० माय क्रॉन इतके वाढते. सबब टाईल्स बसवल्यावर त्यावर बोट फिरवले असता उंचीतला फरक जाणवतो.
माफ करा पण ही माहिती चुकीची आहे. टाईल्सची वक्रता मिमि मध्ये मोजली जाते, सूक्ष्म थराची/ पापुद्र्यांची जाडी मायक्रॉनमध्ये मोजतात आय एस ओ १३००६ या आंतरराष्ट्रिय मानकानुसार सिरॅमिक टाइल्समध्ये ०.५% पर्यंत पृष्ठिय वक्रता मान्य आहे आणि तो दोष धरला जात नाही. अर्थात इतकी वक्रता कुणी ठेवत नाही कारण ते बरे दिसणार नाही. सर्व उत्पादक ०.२% वक्रतेच्या आत राहतात आणि उत्पादन करताना पातळी संवेदक ०.१% वर कार्यरत केले जातात. (दोन फूटी टाईल्समध्ये ६०० मिमि गुणीले ओ.१% म्हणजे ०.६ मिमि वक्रता) भारत सोडा जगातली कुठलीही सिरॅमिक र्टाइल उत्पादक कंपनी मोठ्यात मोठ्या ग्राहकाला देखील शुन्य वक्रतेच्या टाइल देत नाही आणि प्रत्येक टाइल उत्पादकाच्या उत्पादन माहिती पत्रकात हे स्पष्टपणे नमूद केलेले असते. उत्पादन प्रक्रिया आणि कच्चा माल लक्षात घेता ते शक्य नसते आणि म्हणुनच प्रयत्न करुनही सर्व टाईल्स शुन्य वक्रतेच्या मिळत नाहीत. उत्तम प्रकारे लावल्यास वक्रता दिसत नाही. टाइल्स लावताना दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या १) टाइल्सच्या मागच्या बाजुला (जमिनीवर बसवायच्या टाइल्स) बाण असतात. एका रांगेतल्या सर्व टाईल्सचे बाण एका दिशेत वा परस्पर विरुध्द दिशेने असतील अशा पद्धतीने टाइल्स बसवाव्यात. बाण एकेमेकाना लंब रेषेत येतील अशा पद्धतीने लावल्यास बाक दिसू शकतो. बाणाची खूण म्हणजे उत्पादन प्रक्रियेतल्या टाइलच्या प्रवाहाची दिशा असते. साच्यातून टाईल निघाल्यावर टाइल्स भट्टीत जातात व ११२५ ते १२५० अंश तापमानावर भाजल्या जातात. या भट्टीत प्रवास करताना टाइल्स ज्यादिशेने असतात ती दिशा बाण दाखवितात व म्हणुनच बाणाचा नियम पाळल्यास उत्तम परिणाम मिळतो २) स्पेसर च्या सहाय्याने दोन टाईल्समध्ये ३ ते ५ मिमि अंतर राखावे, टाईल्स अगदी चिकटुन लावु नयेत. टाईल्स बसवुन ४८ तास झाल्यानंतर सिमेंटिशिअस ग्राउट्स वापरुन हे सांधे भरावेत. (स्वयंपाक घर, उपाहार गृहे, रुग्णालये यात इपॉक्सी ग्राऊट वापरावेत). यामुळे भुपृष्ठाचे सूक्ष्म आकुंचन - प्रसरण सामावुन घेतले जाते. शिवाय टाइल्स बसविताना सांधे न सोडल्यास कालांतराने लाद्यांच्या रांगा दुभंगु शकतात कारण खाली बसवायला वापरलेल्या सिमेंट मिश्रणातले काही वायु आपला मार्ग शोधून बाहेर पडतात. शिवाय असे सांधे राखल्याना गुळगुळीत टाईल्सवर चालताना पावलाला पकड चांगली मिळते. अनेकदा एखादी टाइल काही कारणास्तव बदलावी लागली तर सांधा ठेवल्यामुळे टाइल आजुबाजुच्या टाइल्सना धक्का न लावता काढता येतात. पाश्चिमात्य देशात हे अपरिहार्य असते याउलट भारतात मुख्य कडीया टाईल्स बसवुन जातो व मग त्याचा सहायक उरलेल्या फटींमध्ये पाण्यात कालवलेले पांढरे सिमेंट भरतो जे अल्पावधीत निघुन येते व फटी मोकळ्या होतात ज्यातून गळती होऊ शकते आणि घाणही साचू शकते. मात्र काम वाढते म्हणुन कडीये स्पेसराधारीत लावणी व ग्राउटींग करायला उत्सुक नसतात. अनेकांना हे तंत्र अवगत नसते. टाईल्स जर टाईल्स बसविण्याच्या अ‍ॅडहेसिवने लावल्या तर उत्तम, खाली पोकळी राहण्याची सूतराम शक्यता नाही. मात्र हे प्रशिक्षीत कारागिराकडुनच करुन घ्यावे, वाळू सिमेंट वापरुन काम करणार्‍या कारागिराला ते करायला सांगू नये.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 02/18/2016 - 18:11 नवीन
टाईल्सवर उत्पादन शुल्क छापील किंमतीवर आधारीत आकारले जाते त्यामुळे भरमसाठ किंमती छापणे शक्य नसते. जर एखादा दुकानदार ५०% सूट देत असेल तर त्या टाईल्स कधीही घेउ नयेत, त्या आड माल म्ह्णुन घेतलेल्या/ पडीक असू शकतात. २०% सवलत सुद्धा किरकोळ ग्राहकासाठी शक्य नसते. अनेकदा खरेदी किंमत व छापिल किंमत यात फार मोठी तफावत नसल्याने विक्रेते नाखूष असतात. 'ब' प्रतिच्या टाईल्स विकताना चांगल्या कंपन्या खोक्याचा रंग वेगळा ठेवतात तसेच त्यावर 'कमर्शिअल; वा 'द्वितिय श्रेणी' असे स्पष्ट नमूद करतात.
  • Log in or register to post comments
श
शलभ गुरुवार, 02/18/2016 - 19:56 नवीन
खूपच छान माहिती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
साधा मुलगा Sun, 03/06/2016 - 05:42 नवीन
खूप उपयुक्त माहिती प्रतिसाद दिलेले आहेत, बर्याच दिवसांनी हा धागा पहिला. आणखी एक राहिलेला प्रश्न: पहिल्या मजल्यावर ‘कोबा’ आहे, वजनाच्या दृष्टीने ‘कोटा’ tiles टाकणे सुयोग्य आहे का?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा