रेकी, ऑरा रिडिंग चक्र हिलिंग ह्याबद्दल माहिती हवी आहे
रेकी, ऑरा रिडिंग, चक्र हिलिंग हिप्नोथेरपी ह्या ऑल्टरनेट थेरपीबद्दल माहिती हवी आहे
💬 प्रतिसाद
(56)
प
प्रचेतस
Mon, 02/15/2016 - 07:38
नवीन
थोतांड आहे ओ.
- Log in or register to post comments
व
वेल
Mon, 02/15/2016 - 07:46
नवीन
थोतांड आहे ह्याच्या विरुद्ध बाजूसुद्धा ऐकायची आहे.
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Fri, 02/19/2016 - 15:58
नवीन
+१०७....
खरच वेल....
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 02/20/2016 - 02:19
नवीन
@थोतांड आहे ओ >> बर्बर! फकस्त प्लासिबो थोतांड हाय.. अशे म्हना!
रेकी'चा प्राथमिक कोर्स केलेला:- आत्मरेकर! ;)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/21/2016 - 03:59
नवीन
थोतांड आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
पर्ण
गुरुवार, 02/18/2016 - 13:55
नवीन
http://niraamay.com/
साम मराठी वाहिनीवर दर रविवारी दुपारी १:३० वाजता व सोमवारी दुपारी ३:३० वाजता या निरामय स्वयंपूर्ण उपचाराबद्दल डॉ. अमृता चांदोरकर आणि डॉ. योगेश चांदोरकर फार छान माहिती देतात.
- Log in or register to post comments
व
वेल
गुरुवार, 02/18/2016 - 16:52
नवीन
धन्यवाद. पाहते.
- Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग
गुरुवार, 02/18/2016 - 17:48
नवीन
मी केलाय कोर्स रेकीचा काही कामाचे नाही
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
गुरुवार, 02/18/2016 - 17:51
नवीन
रेकी, ऑरा रिडिंग, चक्र हिलिंग हिप्नोथेरपी ही काय भानगड आहे?
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Fri, 02/19/2016 - 16:17
नवीन
हनुमन्ताप्पा कोमात होते तेव्हा एक मैत्रीण म्हणाली मी ईथुन रेकी पाठवलीये, बरे होउदे म्हणुन , मला तर काही कळालेच नाही.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 02/20/2016 - 05:06
नवीन
जर ती उपचार पद्धती असेल तर अतिरेकी प्रसिद्ध ठिकाणावर उपचार का करतात?
-भाबडा पैलवान
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 02/20/2016 - 08:40
नवीन
अति'रेकी'
reconnaissance
rɪˈkɒnɪs(ə)ns/Submit
noun
military observation of a region to locate an enemy or ascertain strategic features.
उपचार रेकी
reiki
ˈreɪki/
noun
a healing technique based on the principle that the therapist can channel energy into the patient by means of touch, to activate the natural healing processes of the patient's body and restore physical and emotional well-being.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 02/20/2016 - 09:04
नवीन
ओक्के!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 02/20/2016 - 14:19
नवीन
ती "रेकी" पाकिटात घालून पोस्टाने सुद्धा पाठवता येते असे ऐकले/ वाचले आहे. मग स्पर्श कसा कामाला येतो ते कळत नाही.
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 16:35
नवीन
अनेक प्रतिसाद विरोधी आहेत. पण माझ्या अनुभवानुसार सांगतो...
Reiki works...
मी अगदी दोन तीन महिन्यांपूर्वीच या विद्येच्या संपर्कात आलो. मी अगदी निष्ठेने, श्रद्धेने हे प्रॅक्टिस फाॅलो करत आहे...
माझा अनुभव सांगतो... काही तरी वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण आहे या विद्येत...
मी विज्ञानाला, प्रचलित अॅलोपॅथीला मुळीच कमी मानत नाही...आणि माझ्या गुरूंनी पण मला तसे सांगितले नाही...
रेकी एक पूरक उपचार पद्धती आहे आणि ती तशीच असावी...
पण माझेच काही अनुभव सांगतात की इथे काहीतरी वेगळं आहे...
निश्चित आहे...
कुणाचे काहीही मत असो, मला तरी Reiki Healing ची प्रचिती आली आहे...
तुम्ही प्रचलित अॅलोपॅथिक उपचार, मेडिकल उपचार घ्याच, पण रेकी तुम्हाला मदत करु शकते...
अनुभवाचे बोल आहेत...
कुणी काही म्हणो, चेष्टा करो...
I have found that it works...
श्रद्धा, विश्वास असू देत फक्त...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 16:43
नवीन
फार काही पूर्वावश्यकता लागत नाहीत. माझ्याकडे पण ही श्रद्धा नव्हती. पण मला काही deep अनुभव येत गेले...
कुठलेही एक्स्ट्रीम टोक मी टाळतो...इथेही तेच सांगेन...
मनापासून प्रयत्न केलेत तर रेकीची प्रचीति येईलच...
एक्स्ट्रीम दाव्यांकडे दुर्लक्ष करा...
दोन्ही बाजूंच्या... ;) ;) ;)
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 16:46
नवीन
ऑरा रीडींग मला माहीत नाही...
पण रेकी आणि चक्रा हीलींग हे परस्परावलंबीच आहेत...
रेकी शिकलात तर चक्रा हीलिंग आपोआप होते...
वेगळे काही करण्याची गरज नाही...
आणि हो...
कुचेष्टा फार सोपी आहे...
अनुभव घेणे फार मेहनतीचे आहे...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 16:51
नवीन
कविताताईंनी वेगळेच उदाहरण दिले आहे...
त्याबाबत एवढेच सांगतो की नियतीची इच्छा सर्वश्रेष्ठ आहे...
त्यापुढे आपण नथींग आहोत...
प्रयत्न करणे हेच आपल्या हातात...
बाकी नियतीला जे मंजूर त्यापुढे विज्ञान सुद्धा हात टेकते हा काॅमन अनुभव...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 02/20/2016 - 18:24
नवीन
विजयभाऊ जरा सविस्तर लिहा ना. रेकी म्हणजे काय? ती करतात/घेतात/वापरतात?
जर तुम्ही विज्ञानाला, प्रचलित अॅलोपॅथीला कमी मानत नाही तर रेकीची गरज का पडते?
रेकी जर पुरक उपचार पद्धती असेल तर ती कशा अर्थाने पुरक आहे?
प्रचलित अॅलोपॅथिक उपचार, मेडिकल उपचार घेतल्यानंतर रे़की कशा प्रकारे मदत करू शकते?
तुमचा याबाबतीतला काय अनुभव आहे?
आम्ही चेष्टा करणार नाही मात्र रेकी काम करते हे तुमच्या कसे लक्षात आले?
तुम्ही व्यवस्थित समजावलेत तर आम्हीही श्रद्धा, विश्वास ठेवू.
तुम्हाला कसे deepअनुभव आले?
फारच वैयक्तिक स्वरुपाचे अनुभव नसतील तर त्यांवर इथे लिहू शकाल का?
नेमके काय प्रयत्न करायचे? प्रचीति येते म्हणजे नेमके काय होते?
चक्रा हिलिंग काय आहे?
रेकी केले की चक्रा हीलींग आपोआप कसे होते?
कुचेष्टा करणार्यांकडे दुर्लक्ष करा. मात्र आपण जेव्हा एखादया गोष्टीबद्दल मुक्त व्यासपिठावर लिहितो तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे ही आपली जबाबदारी असते. अशावेळी प्रश्नांपासून पळ काढणे योग्य नाही.
नियतीबद्दल काही बोलायचे नाही. ती तुमची व्यक्तिगत श्रद्धा आहे.
मात्र विज्ञान नियतीपुढे हात टेकते याच्याशी असहमत. विज्ञान म्हणजे कुणी सर्वशक्तीमान व्यक्ती नव्हे किंवा जादुगार नव्हे. निसर्गातील काही गोष्टी कशा घडतात याबाबतचे ते ज्ञान आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/21/2016 - 04:02
नवीन
सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
त
तिता
Mon, 02/22/2016 - 14:48
नवीन
+ १
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 18:34
नवीन
विजयभाऊ जरा सविस्तर लिहा ना. रेकी म्हणजे काय? ती करतात/घेतात/वापरतात?
सगाभाऊ नेटवर माहिती उपलब्ध आहे. पुन्हा टंकणे गरजेचे नाही...
जर तुम्ही विज्ञानाला, प्रचलित अॅलोपॅथीला कमी मानत नाही तर रेकीची गरज का पडते?
अॅलोपॅथीचे साईड इफेक्ट्स वगैरेवर नेटवर वाचन करा... अजूनही अनेक आजार अॅलोपॅथीच्या आवाक्यात नाहीत...
रेकी जर पुरक उपचार पद्धती असेल तर ती कशा अर्थाने पुरक आहे? याचे उत्तर मी अन्य प्रतिसादात दिलेच आहे. दोन्ही उपचार पद्धतींचा एकसोबत अनुभव घ्या.
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 18:35
नवीन
तुम्हाला कसे deepअनुभव आले?
फारच वैयक्तिक स्वरुपाचे अनुभव नसतील तर त्यांवर इथे लिहू शकाल का?
माझे वै. अनुभव आहेत. इथे शेयर करू शकत नाही...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 18:37
नवीन
नेमके काय प्रयत्न करायचे?
श्रद्धेने प्रॅक्टीस फाॅलो करणे एवढेच...
प्रचीति येते म्हणजे नेमके काय होते?
श्रद्धेने प्रॅक्टीस फाॅलो केल्यावर येते ती अनुभूती...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 18:38
नवीन
चक्रा हिलिंग काय आहे?
रेकी केले की चक्रा हीलींग आपोआप कसे होते?
आंजावर भरपूर माहिती आहे. वाचन करा...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 18:39
नवीन
कुचेष्टा करणार्यांकडे दुर्लक्ष करा. मात्र आपण जेव्हा एखादया गोष्टीबद्दल मुक्त व्यासपिठावर लिहितो तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे ही आपली जबाबदारी असते. अशावेळी प्रश्नांपासून पळ काढणे योग्य नाही.
वर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 18:41
नवीन
विज्ञान नियतीपुढे हात टेकते याच्याशी असहमत. याच्या विरोधी उदा. आंजावर वैद्यकिय क्षेत्रात भरपूर आहेत वाचा.
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 18:43
नवीन
असो. माझे प्रतिसाद केवळ धागाकर्त्रीला माहिती म्हणून दिलेले आहेत.
बाकी कुणाला एंटरटेन करण्यात काही स्वारस्य नाही... :)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 02/20/2016 - 18:43
नवीन
एकाही प्रश्नाचे उत्तर नाही. सगळी गोल फिरणारी एक दोन वाक्ये. असो. :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/21/2016 - 04:18
नवीन
गोल गोलशी सहमत आहे. या धाग्यावर जिथे जिथे धन्या प्रतिसाद लिहील तिथे तिथे माझा प्लस वन चा प्रतिसाद आहेच. धन्या अवघड झालं पब्लिकचं. आपले अनुभव जर वैयक्तिक आहेत, ते सांगायचे नै तर चर्चा कशाला करायची नै का ?
माझा एक अन्भव सांगतो. माझ्या शहरातील एका मोठ्या महाविद्यालयात आम्ही परिक्षेच्या निमित्ताने एकत्र आलो तेव्हा साठीच्या जवळ आलेल्या एका जेष्ठ प्राध्यापिके बरोबर ओळख झाली, गप्पा, जेवण सोबत असायचं एक दिवस मी माझं डोकं दुखतय लवकर घरी जातो असं म्हटलं त्या मला थांबा म्हणाल्या. रेकी उपचार करून आराम पडेल म्हणाल्या. त्यांनी कपाळासमोर आडवा हात केला पुन्हा उभा केला माझं लक्ष नाकाच्या शेंड्यावर न्यायला सांगितलं असं बराच वेळ झाला मग मला म्हणाल्या कसं वाटतं ? त्यांचा स्वभाव चांगला होता, मला त्यांना नाराज करायचं नव्हतं मी आता बरं वाटतंय म्हणालो माझा रेकी शी पहिला परिचय असा झाला.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 18:52
नवीन
मी पुन्हा सांगतो आंतरजालीय वादांचा उपयोग शून्य...
कुणीच स्वतःचा मेंटल सेटप बदलत नाही...
धागाकर्त्रीने काही माहिती मागितली आणि ती मी माझ्या अनुभवांनुसार दिली...
माहिती देताना असले वाद विवाद होणार याचा अंदाज होताच...
पण त्यात रस नाही...
माझा अनुभव, माझी विद्या, माझे फायदे माझ्यापाशी...
तुम्हाला किंवा इव्हन धागाकर्त्रीला त्याचा उपयोग वाटत नसेल तर मी तरी काय करू?
बाकी गोलगोल म्हणाल तर तुमचे प्रश्न किती जेन्युईन होते याचा अदमास घेऊनच उत्तरे दिली आहेत...
पुन्हा सांगतो... मला या वादविवादात स्वारस्य नाही...
जर कुणाला माझ्या अनुभव विश्वातील मदत पाहिजे असेल तर मी ती देईन नक्कीच...
पण एकंदरीत अनुभवांवरून मौनं सर्वार्थ साधनं एवढेच म्हणतो...
बाकी चालु द्या बिनधास्त...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 02/20/2016 - 19:09
नवीन
विजयभाऊ, हे मुक्त व्यासपीठ आहे. आपण काही लिहिले की लोक त्यावर प्रश्न विचारणार, चर्चा करणार. वेळप्रसंगी वादही घालणार.
एखादया चर्चेने मनोभुमिका बदलत नाही याची जाणिव मलाही आहे. किंबहूना अशा चर्चांमधून ते अपेक्षितही नसते.
जेव्हा एखादी माहिती मुक्त व्यासपीठावर लिहिली की ती फक्त देणारा आणि घेणारा यांच्यापुरती मर्यादित राहत नाही. मिपावरील कोणताही आयडी त्यावर मत मांडू शकतो, प्रश्न विचारू शकतो.
असे दिसत नाही. एकापाठोपाठ एक असे चार प्रतिसाद तुम्ही या धाग्यावर दिलेत. :)
तुम्ही सविस्तर माहिती दिल्याशिवाय उपयुक्तता कशी ठरवणार? तुम्ही श्रद्धा, अनुभव, प्रचीति हेच शब्द गोल गोल फिरवत आहात. जे लिहायला हवे त्याबद्दल एक अक्षर नाही.
तुम्हाला माणसाचे मन ओळखता येते का?
तुम्ही आधी पुडया सोडता आणि मग कुणी जरा खोलात जाऊन विचारू लागला की हे "माझे वैयक्तिक अनुभव आहेत, मला वादात पडायचे नाही" असे म्हणून पळ काढता. :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/21/2016 - 04:22
नवीन
लिहा ना रेकीबद्दल माहिती आहे तर पळ कशाला काढायचा. मला पटलं तर मी सेवा निवृत्त झाल्यावर या धंद्यात पड़ेन म्हणतो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sun, 02/21/2016 - 03:08
नवीन
असे दिसत नाही. एकापाठोपाठ एक असे चार प्रतिसाद तुम्ही या धाग्यावर दिलेत. :)
मोबाईल वापरत असल्याने सलग व सविस्तर लिहिणे शक्य नव्हते.
तुम्ही सविस्तर माहिती दिल्याशिवाय उपयुक्तता कशी ठरवणार? तुम्ही श्रद्धा, अनुभव, प्रचीति हेच शब्द गोल गोल फिरवत आहात. जे लिहायला हवे त्याबद्दल एक अक्षर नाही.
या गोष्टी श्रद्धेनेच अनुभवायच्या आहेत. त्यासाठी कोणतीही लिटमस टेस्ट नाही.
तुम्ही आधी पुडया सोडता आणि मग कुणी जरा खोलात जाऊन विचारू लागला की हे "माझे वैयक्तिक अनुभव आहेत, मला वादात पडायचे नाही" असे म्हणून पळ काढता. :)
भाषा नीट वापरा एवढेच सांगेन. तुमच्या प्रत्येक प्रतिसादात पळ काढणे हा शब्द का वापरलाय तुम्ही? तुमच्याशी इव्हन कुणाशीच माझी वाद घालायची माझी इच्छा नसेल तर अपमानकारक भाषा का वापरता?
अवांतर: दुसर्याला पळ काढतो म्हणणारे संदीप डांगें सारख्या दिग्गजासमोर मालक मालक म्हणत पळ काढतात तेव्हा या दुटप्पी वृत्तीचे हसू येते...
मला धागाकर्त्रीला जेवढी माहिती द्यायची होती ती मी दिली. अन्य कुणाशीच वाद करायची माझी इच्छा नाही. केवळ तुमचा परिचय आहे म्हणून तुम्ही अपमानकारक भाषा वापरून ही तुमच्याशी संवाद साधत राहिलो. यापुढे काहीही तुमच्याशी बोलायची मुळीच इच्छा नाही.
हा शेवटचा प्रतिसाद.
__/\__
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/21/2016 - 04:26
नवीन
धन्याची भाषा कुठे चुकली असेल तर धन्याच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करतो, धन्या चुकत नाही, व्यक्तिगत होत नाही आणि दुटप्पीही नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे.
वादाच्या ऐवजी संवाद असं समजुन सांगा की अनुभव त्यात काय इतकं ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 02/21/2016 - 04:41
नवीन
सहमत.
पुड्या सोडतो इतकं अल्पसं सोडलं इतरत्र काहीही वावगं दिसलं नाही.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 02/21/2016 - 07:48
नवीन
अगदी सहमत
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 05:26
नवीन
तुम्हाला माझ्या प्रतिसादातील भाषा अवमानकारक वाटली असल्यास मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
कदाचित मी "पुडया सोडणे" आणि "पळ काढणे" हे शब्द वापरल्यामुळे तुम्हाला तसे वाटले असेल. हे शब्द वापरतानाही मी आपला व्यनी आणि खरडवही यातील परिचय विचारात घेऊन लिहिले होते. तुम्हाला ते अवमानकारक वाटले याबद्द्ल क्षमस्व.
इतके सारे प्रतिसाद तुम्ही मोबाईलवरून देत आहात तर मुख्य विषयावरही लिहू शकला असतात.
श्रद्धा. अनुभव आणि प्रचिती हे शब्द प्रथम तुम्हीच वापरले. त्यामुळे मी पुढच्या प्रतिसादांमध्ये उल्लेख केला. तुम्ही म्हणताय तसे हा "रेकी" प्रकार श्रद्धेनं अनुभवायचा असेलही. तुम्ही त्यावर सविस्तर लिहा हे माझ्या पहील्या प्रतिसादापासून सांगतोय. तुम्ही या मुख्य विषयावर लिहित नाही.
माझी भाषा तुम्हाला अवमानकारक वाटली त्याबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.
तुम्ही ज्याला पळ काढला म्हणताय तो संदर्भ देता का?
समोरच्याने माझे म्हणणे खोडून काढले किंवा माझ्या युक्तीवादातील चुका लक्षात आणून दिल्या तर मी त्या मान्य करतो. इथेही तेच झाले असावे. राहिली गोष्ट मी त्यांना "मालक मालक" म्हणण्याची. मी असे म्हटलेलं संदिप डांगे हे पहिले मिपाकर नाहीत. माझ्या आठ वर्षांच्या मिपा वावरात मी अनेक जणांना "मालक" म्हटलेलं आहे. :)
तुम्ही मात्र बरेच वेळा एखादा विषय अतिशय त्रोटक लिहिता आणि कुणी सविस्तर माहिती सांगा म्हटलं की "मी मोबाईल वापरत असल्याने सविस्तर लिहू शकत नाही", "मी बाहेरगावी आलोय, सोमवारी सविस्तर लिहिन", "मी माझ्या वैयक्तिक अनुभवांवर लिहू ईच्छित नाही", "मला वाद घालायचा नाही" असे म्हणून माहिती देणे टाळता.
विजयभाऊ, मी याआधीच्या प्रतिसादात लिहिलंय. आताही लिहितो. मिपा हे मुक्त व्यासपीठ आहे. आपण एखाद्या धाग्यावर काही लिहिले की लोक त्यावर प्रश्न विचारणार, चर्चा करणार. वेळप्रसंगी वादही घालणार. त्यामुळे आपण घेतलेली ही भुमिका मला चुकीची वाटते.
माझ्या प्रतिसादांना व्यक्तिगत स्वरुप देऊन तुम्ही मुळ मुद्दयाला व्यवस्थित बगल दिली आहे. :)
हरकत नाही.
मात्र तुम्ही इतर भारंभार प्रतिसाद देत असताना मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात रेकीबद्दल जी माहिती विचारली होती ती तुम्ही शेवटपर्यंत दिलीच नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 02/23/2016 - 09:17
नवीन
अहो श्रद्धेचा मामला आहे मग "का?" "कसे?" वगैरे प्रश्न आपोआपच गैरलागू होतात. :-)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 02/21/2016 - 05:01
नवीन
स्वयंसूचना आणि स्वसम्मोहन या दोन मानसशास्त्रीय गोष्टींचा मिलाफ म्हणजे रेकी.. त्यात सांगितलेला वैश्विकऊर्जा, हा भाग प्लासिबो निर्माण करणारा .. कपोल कल्पित , अर्थात थोतांड आहे. त्यात मानवी देहा वरील चक्र, हे सपोर्टीव्ह महाथोतांड आहे..
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 02/21/2016 - 05:01
नवीन
रेकी विषयी माहिती नाही.
चक्रा हिलिंग हि खरी गोष्ट आहे हे स्वानुभवाने सांगु शकेन. कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही माझ्याकडे. इंज्युरी कॉन्सन्ट्रेटेड हिलिंङ आणि अत्यंत सकारात्मक विचारसरणीला शरिर अतिशय सकारात्मक प्रतिसाद देतं.
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sun, 02/21/2016 - 05:22
नवीन
धन्यवाद कप्तानराव...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 05:31
नवीन
कॅप्टन, वैज्ञानिक पुरावा हा मुद्दा बाजूला ठेवूया. तुम्हाला चक्रा हिलींगबद्दल जे माहिती आहे ते लिहू शकाल का?
हे चक्रा हिलींग "कुंडलिनी" च्या संदर्भात उल्लेख केल्या जाणार्या षटचक्रांशी सबंधीत आहे का?
हा प्रकार स्व-संमोहनाशी संबंधित असावा असे वाटते. जाणकारांनी याबद्दल लिहायला हवे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 02/21/2016 - 05:37
नवीन
माझं उदाहरण वैयक्तिक आहे पण तुला व्यनि करतो.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 05:44
नवीन
चालेल. धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/21/2016 - 07:13
नवीन
:(
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 11:10
नवीन
त्यांनी अनुभव व्यक्तिगत स्वरुपाचा असून अप्रत्यक्षपणे त्यांनी ते लिहिण्यातला संकोच सुचित केल्यानंतर त्यांच्या त्या अपेक्षेचा मी आदर केला. :)
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sun, 02/21/2016 - 05:41
नवीन
रेकी, ऑरा रिडिंग, चक्र हिलिंग हिप्नोथेरपी आनी आता मिड ब्रेन अॅक्टीवेशन याव्र माझा विश्वास नाही..
(knee brain acativted)जेपी
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 02/21/2016 - 05:55
नवीन
रेकी, प्राणिक हिलिंग, ऑरा रिडिंग, चक्र हिलिंग, हिप्नोथेरपी
यापैकी कोणत्याही उपचार पद्धतीमुळे जे स्पष्ट दिसू शकतील(objective ) असे आजार बरे झालेले कधीही दिसत नाहीत. उदा. मोठा मुतखडा( १ सेमी पेक्षा मोठा जो मूत्रमार्गातून स्वतः जाऊ शकणार नाही) किंवा किडनी ट्युमर ( कर्करोग नव्हे), फायब्रोईड इत्यादी. गेली अनेक वर्षे असे कित्येक आजार सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन वर मी निदान करत आलो आहे त्यासाठी शल्यक्रिया नको म्हणून लोक इतर उपचार पद्धतींचा वापर करून पाहत असतात आणि काही काळाने (६ महिने ,१ वर्ष) परत जेंव्हा आजची स्थिती काय ते पाहण्यासाठी येतात तेंव्हा आजतागायत एकही रुग्ण बरा झालेला मी काही पाहिलेला नाही.
कर्करोगाबद्दल तर मी बोलतच नाही
बर्यच वेळेस जे आजार स्वतः हून काही काळाने बरे होतात उदा. सिम्पल ओव्हेरियन सिस्ट असे आजार मोठे करून दाखविले जातात ( तुम्हाला कर्करोग आहे आणि आम्ही तो १००% बरा करून देतो असे दावे करून ) आणि मग ते "आम्ही बरे केले" असे अनेक इतर उपचार वाले (यात आयुर्वेदिक आणि होमियोपथी सुद्धा येतात.)दाखवताना मी गेले कित्येक वर्षे बघत आलो आहे. या रुग्णांची अगोदरची सोनोग्राफी पाहिली असता हि चलाखी स्पष्टपणे लक्षात येते.
या इतर उपचार पद्धतींचा मानसिक आजारावर उपयोग होतो हे दिसून येते.
उदा. कित्येक वेळेस बायकाना -- नवरा विचारत नसेल, सासू त्रास देत असेल, घरात काम जास्त पडत असेल ---तर डोके दुखी, कंबर दुखी, पोटदुखी, शक्तिपात असे अनेक आजार होताना आढळतात. अशा वेळेस या इतर उपचार पद्धती मुळे ती स्त्री "आजारी" आहे आणि तिला "सहानुभूती आणि विश्रांतीची" गरज आहे हे "सिद्ध" केल्यासारखे होते . काही काळाने जेंव्हा त्या स्त्री ची ब्याटरी चार्ज झाली कि असे हे मानसिक आजार "बरे" होतात. आता एखाद्या स्त्रीला फार दिवसांची पोट दुखी असेल आणि तिला सांगितले कि तुम्हाला पोटाचा कर्करोग आहे आणि हा काही दिवसांनी बरा झाला तर तिच्या संपूर्ण कुटुंबाचा यावर पटकन विश्वास बसतो. अशा असंख्य केसेस मी पाहत आलो आहे.
तरीही जर कोणी objective अशा केसेस बर्या करू दाखवणार असेल तर मी त्यात सहभागी व्हायला किंवा विश्वास ठेवायला तयार आहे.
बाकी "मला अनुभव आला" किंवा "चमत्कार झाला" अशा सुरस आणि चमत्कारिक कथा तर सर्व बाबा,बापू, महाराज, स्वामीं, माताजींच्या कडे भरपूर ऐकायला मिळतील.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 02/21/2016 - 06:03
नवीन
अतिशय योग्य विश्लेषण.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »