रेकी, ऑरा रिडिंग चक्र हिलिंग ह्याबद्दल माहिती हवी आहे
रेकी, ऑरा रिडिंग, चक्र हिलिंग हिप्नोथेरपी ह्या ऑल्टरनेट थेरपीबद्दल माहिती हवी आहे
💬 प्रतिसाद
(56)
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 02/21/2016 - 07:48
नवीन
आता माझे दोन शब्द लिहितो... (सदर अनुभव माझी त्यावेळची मनःस्थिती आणि वैचारिकता आठवून्..मुद्दाम जसाच्या तसा लिहित आहे..जेणे करून - एखादी गोष्ट खोटी/कपोलकल्पित/थोताण्ड असूनही,फळ कशी देते? याचा उलगडा पडेल..आनि फळ देते..म्हणजे नक्की कश्यामुळे आणि काय देते? हेही कळण्यास मदत होइल.
मी २००२ साली प्रथम या रेकीची ३ दिवसाची १ पहिली सेमिनार केलेली होती.. तेव्हा प्रथम मी याचा अनुभव घेतला. झाले ते असे, की मी तेंव्हा माझ्या एका मित्राकडे सहज गेलेलो होतो.. मला सायनसच्या त्रासामुळे डोके दुखत होते. तो म्हणाला, "माझि आई रेकी देते..त्यानी तुला लगेच थोडा आराम मिळू शकेल." मी तात्काळ "हो." असे म्हणालो.. मग त्यांनी माझ्या डोक्यावर मध्यभागी हात थेवला . मी बर्यापैकी थकलेला असल्यामुळे मला हायसे वाटू लागले. (त्या बाई अत्यंत प्रामाणिक आणि चांगल्या आहेत.- हे मुद्दाम व विशेषत्वानी नमूद करतो. रेकीसारखे उपचार माझ्यासारख्या रुग्णाला लागू होण्यात उपचारकर्त्याच्या मला भावणार्या व्यक्तित्वाचाही वाटा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो..हे कबुल करायलाच हवे.) त्यांनी डोक्यावर ठेवलेला हात आणि माझी खरोखर आस्थेनी केलेली चौकशी ..जसे की - "सायनस किती जुना आहे? कधीपासून हा त्रास होतो? या आधी कोणते उपचार घेतले? घरी तुझ्याकडे बघणारे कोण असते? " इत्यादी. मला अश्या पद्धतिनी आस्थेनी विचारणारं त्या काळात खरच कोणिहि नव्हतं.. (याला माझी रहाणीमान व घरची एकाकी परिस्थिती जबाबदार होती..) मी सर्व काही त्यांना सांगितलं. पाच मिनिटानी माझ्या लक्षात असं आलं की मला आता बराच आराम पडलेला आहे. डोकं दुखायचं जवळपास बंद झालेलं आहे..
माझ्यासाठी ही आनंदाची आणि आश्चर्याचा सुखद धक्का देणारी गोष्ट होती. घडत काय व कसं होतं? हे मी विचारात घेणं त्यावेळी शक्यही नव्हतं. कारण माझ्या या सायनस'डोकेदुखिवर अॅलोपॅथी,आयुर्वेद इत्यादी सर्व गोष्टींनी हात टेकलेले होते. औषधे घेतल्यानंतर काही दिवसांचा आराम आणि परत भजन चालू..असाच माझा अनुभव रहात आलेला होता.त्यामुळे मी या रेकीउपचारांवर फिदा झालो. तो दिवस तिथेच त्यांच्याकडून अजुन एकदा रेकी घेण्यात गेला..आनि मी संध्याकाळी तिथून आनंदानी बागडत घरी गेलो. (माझा तो मित्र व त्या बाई हे दोघेही रेकीसाठी प्रचार/प्रसार करणारे ..थोडक्यात ग्राहक गळाला लावणायृआतले नाहीत.. हे पुन्हा एकदा नमुद करतो.) त्यानंतर काही दिवसांनी मी माझ्या डोकेदुखिसह त्या काळात येणार्या सगळ्याच अडचणी त्या बाईंकडे शेअर केल्या याचे कारण, मला त्यात अत्यंतिक विश्वास वाटत होता. दुसरं म्हणजे माझं आजपर्यंत सर्व काही अश्या तहृएनी कोणी काही ऐकूनही घेतलेलं नव्हतं..पुढे मग मी रितसर त्यांच्याकडे तीन दिवसाचं रेकी शिकणयाचं प्राथमिक शिबिर केलं..( बाई स्वतः रेकीमास्टर आहेत) त्यातल्या प्रथमेचं एक सर्टीफिकिटही आम्हा सहा सात विद्यार्थांना तेंव्हा देण्यात आलं.
या तीन दिवसात मिळालेली शांतता ..एका वेगळ्या प्रकाराचा अनुभव हे सर्वच काही माझ्या मनाला सुखावणारं आणि नविन होतं. फक्त एकाच जागी मला शंका आलेली होती.. शरीराच्या एखाद्या अनावश्यक अथवा चुकिच्या भागावर रेकी दिली गेली..तर ती काढून कशी टाकावी? हे त्या दाखवत होत्या..त्या क्रीयेनी माझ्या मनात शंका निर्माण केली.. कपड्याला मध्यभागी पडलेल्या चौकोनी भोकावर केलेले रफू जसे आपण सुईचा वापर करून उलट उसवून टाकू तसे त्यांनी हताच्या बोटांनी त्वचेवर करायला सांगितले.. सदर क्रिया करताना मला ते अत्यंत ख्युळचटपणाचे वाटून मनात हसू येत होते.. पण अश्यावेळी आपण मौन पाळतो..तेच मी तिथे केले..
पुढे काही वर्षांनी मी याच विषयाची विज्ञाननिष्ठ चिकित्सा करणारी पुस्तके वाचली..आणि मग सारेच काही कळून आले..
मग मला समजले की एखादी गोष्ट खोटी असली तरी त्याच्या आणि आपल्या मधे वापरात येणारे क्रियाकल्प हे मानसिक(ऐहिक) असतात..मनोकायिक आजारांवर फळ देणारे खरे घटक हेच असतात ..फक्त त्याला वापरलेली लेबलं(उच्च शक्ति,ऑरा पॉवर,वैश्विक उर्र्जा) ही आपल्याला खरी वाटणारी ,आभासी असतात. हा एक भाग आणि माझ्यासारख्या आळशी, अज्ञानात सूख मानून खर्या ज्ञानाची प्राप्ती,- तशी वेळ आल्यावरच मिळवू पहाणार्या माणासाचं व्यक्तिमत्व हे असल्या आभासी उपचारातून फलप्राप्ती करवून घेण्याच्याच लायकीचं असतं..हा दुसरा आणि अत्यंत प्रबळ महत्वाचा भाग.
निसर्गतः निर्व्यसनी माणासाला तंबाखू चघळून भोवळ येते..आणि तिचा तिरस्कार वाटतो..आणि माझ्या सारख्या तितक्याच नैसर्गिक व्यसनी माणासाला त्याच तंबाखूनी अत्यंतिक मज्जा वाटते.. हा जो फरक आहे..तो मूलतः ऐहिक आणि मूलतः धार्मिक मेंदू मिळालेल्या माणासातला फरक आहे. तो समजून आला,तर हे झटकन कळेल की रेकीमधे शक्ति नसून माझ्यामधे दुर्बलता आहे.. हा व्यत्यास त्या खोट्यातून फलप्राप्ती देणार्या घटीताचा गाभा घटक आहे.
आज मला रेकी खोटारडी आहे हे माहित आहे... पण त्याही पेक्षा मी ऐहिक दृषिनी नियम पाळून जगणारा नाही..म्हणजेच जास्त खरा नाहीये हे उमगलेलं आहे.
सध्या थांबतो..धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 02/21/2016 - 08:31
नवीन
इंटरेस्टिंग
परवा पुण्यात सुनंदा टिकार यांच्या रेकीवर असलेल्या व्याखानाला गेलो होतो. मला त्यातील अनेक उदाहरण ही भाबडी परंतु प्रामाणिक व मनोरंजक वाटली.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 11:08
नवीन
अतिशय प्रामाणिक आणि वस्तूनिष्ठ अनुभव कथन आवडले. आपण मांडलेला मनोकायिक आजारांचा मुद्दा पटण्यासारखा आहे.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 02/22/2016 - 13:02
नवीन
काय लिहिता राव गुर्जी तुम्ही.... जबरदस्त! आमचे मानसशास्त्राचे सर पण असेच काहीतरी बोलायचे....आणि आम्ही त्यांना 'येडाचये' असं म्हणायचो! ;)
'मनाचे खेळ' यावर काहीतरी लिहायला घ्या गुर्जी...प्रेमळ विनंती!
Sandy
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 02/22/2016 - 14:42
नवीन
सुंदर..
- Log in or register to post comments
स
समी
गुरुवार, 02/25/2016 - 10:44
नवीन
आत्मबंध..... तुमचे विचार पटले. माझा अनुभवहि असाच आहे ....
माझ्या ओळखितल्या एक बाई रेकि, ऑरा हिलींग वैगरे करतात. काहि वर्षांपुर्वी मला लो बीपी चा त्रास होत होता. त्याने खुपदा गरगरायचे आणि सतत थकवा जाणवायचा. खुप डिप्रेस पण वाटायच. त्यांनी सांगितले की मी काहि दिवस रेकि आणि हिलींग देते त्याने बीपी लेवल ला येईल आणि चक्कर कमी होईल. तुमच्यातली निगेटीव्हिटि कमी झाली कि सगळ निट होईल. मी महिनाभर रेकि आणि हिलींग घेऊन काहिहि फरक पडला नाहि. तर त्यावर त्यांच म्हणण होत की घराची पण रेकि आणि हिलींग करायला हवे. घरात निगेटीव्हिटि आहे म्हणून त्रास होतोय. मग मात्र मी त्यांना रामराम केला....
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2