Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

ग — गणेश उमाजी पाजवे, Tue, 02/16/2016 - 14:30
गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविताशेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं ..................................... जगाच्या पोशिंद्याचं दुःख आभाळाला खेटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं उद्योगपतीच्या समोर तुम्ही नाचवता बायका शेतकऱ्याला द्यायला नाही म्हणता पैका शेतकरी झालं उध्वस्त ते आयुष्यातून उठलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं उद्योगपतींना खुशाल देता मोठमोठ्या संधी कांद्याचे जरा भाव वाढले की निर्यातीवर बंदी असं दुटप्पी वागणं कसं तुम्हालाच पटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं मेक इन इंडियाचा केवढा मोठा बोलबाला तिकडे शेतकरी मात्र नुसते कष्ट करून मेला उद्योगपतीची वाढते ढेरी अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं नफेखोर उद्योगपतीसाठी केवढा तुमचा आटापिटा जगाला जगविणारा मात्र मुदलामध्ये सोसतो तोटा किती मांडू हिशेब सारा मन पार विटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं - शामसुंदर महाराज सोन्नर

प्रतिक्रिया द्या
15109 वाचन

💬 प्रतिसाद (81)
व
वेल गुरुवार, 02/18/2016 - 07:52 नवीन
एकच बाजू मांडायची असेल तर छान आहे ही कविता. पण ह्या कवितेचा अर्थ असा निघतो की बाकी जग मजा मारतय आणि शेतकरी एकटाच जळतोय. शेतकरी जळतो आहे ही गोष्ट कधीच कोणालाच अमान्य नव्हती आणि नसेलही. पण जळतोय तो फक्त एकटा शेतकरी नाही अनेक व्यावसायिक जळत आहेत. कोणाचं काय चुकतय हेही पाहायला हवं ना. गेली अनेक वर्ष रासायनिक खते आणी किटकनाशके वापरली ऊस, कापूस, सोयाबिन अशी पाणी जास्त लागणारी पिके सतत घेऊन जमिनीचा कस कमी झाला, जमिनीमधलं पाणी कमी झालं. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असलेली त़ई, तलाव, विहिरी अनेक ठिकाणी बुजवले गेले किम्वा त्यातला गाळ काढला गेला नाही. ज्वारी, बाजरी अशी पारंपारिक धान्ये, भाज्या ह्यांची लागवड कमी झाली. ह्यात शेतकर्‍यांना भूल घालणार्‍या कंपन्यांचाही दोष आहे. त्यांना इतक्या वर्षात सरकारने अडवलं नाही हा सरकारचा दोष, जल नियोजन केलं नाही हा सरकारचा दोष, पण फक्त आजच्या सरकारचा दोष नाही हा. ह्या गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेल्या चुका आहेत. आणि ह्या निस्तरल्या गेल्या नाहीत तर पुढच्या काही वर्षात अजून वाईट परिस्थिती निर्माण होणार. मला वाटतं आक्षेप ह्याला आहे की शेतकरी आत्महत्या करत आहे तेव्हा इतके पैसे खर्च करुन इतका मोठा कार्यक्रम केला, जळजळ आहे कोणाची कसली ते माहित नाही मला. पण का करायचा नाही असा कार्यक्रम? असा कितीसा खर्च झाला की जो वाचला असता तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकर्‍यांना अगदी सोन्याचे सोडा पण स्टीलचे आणि लाकडाचे दिवस तरी पाहायला मिळाले असते असा समज आहे का? मग ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की जेव्हा एखाद्या गावात एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा त्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी त्या गावात कोणतेच सण समारंभ होत नाहीत का? लग्न, बारशी, अजून काय नी अजून काय? की त्या गावातले शेतकरी आणि इतर व्यावसायिक बंधूजत्रा, तमाशे, चित्रपट असे काहीच बघायला जात नाहीत का वर्षभर? काही चुकत असेल तर हे की ह्या लोकांचं प्रबोधन होत नाही आहे. पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचा मेळ कसा घालायचा हे त्यांना कोणी शिकवत नाही आहे. आणि शिकवत असलेच तर असेही अनेक शहाणे आहेत की जे तु कोण मला शिकवणार असं म्हणतात. मुलींच्या लग्नात भारंभार खर्च करु नका, हुंदा घेऊ देऊ नका हे सांगितलं तर ऐकतात का हो हे? मुलगा हवा ह्यासाठी गावापासून लांब लांब वर जाऊन गर्भ चिकित्सा करणं मुलगा व्हावा ह्यासाठी उपचार करणं ह्यात क्वॅक्स कडून चुकीचे वैद्यकिय उपचार करुन घेण्यापासून गंडे दोरे बांधणार्‍यांकडे जाण्ं हे सगळं आलं. हे सगळे खर्च कमी केले का? मुलगा आहे असे सोनोग्राफीमध्ये कळल्यावर तो गर्भ पाडायला लावणं ह्यात आईच्या जीवाची हेळसांड आणि मग तिच्या आरोग्यावर खर्च (जो जनरली माहेरचेच करतात, कारण त्याम्ना मुलगी जिवंत हवी असते) मग ह्या अशा खर्चासाठी उधार उसनवार कर्ज... इत्यादी इत्यादी... हे सगळं शहरातल्या लोकांनी आणि सरकारने कसं बदलायचं. बरं महालक्ष्मी सरस सारख्या प्रदर्शनांमध्ये किती शेतकरी माल घेऊन जातात? किती तरी वेळा एखाद्या स्टॉलधारकाचा माल संपला की तो स्टॉल रिकामा असतो त्यावेळी ते स्टॉल धारक शेतकरी, बचत गट आपल्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या गावामधल्या इतर लोकांचा माल घेउन तो स्टॉल शेवटच्या दिवसापर्यंत का नाही चालू ठेवत? (अर्थात अशी प्रदर्शने शहरो शहरी भरली पाहिजेत) मला मान्य आहे की मॅन्युफॅक्चररला स्वतः जेव्हा विक्री किंवा विपणन करावम लागतं तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग कडे दुर्लक्ष होतं त्यामुळे दलाल अडते ह्यांचे पाय धरावेच लागतात. पण प्रत्येक गावातून अशी एखादी टीम उभी राहू शकत नाही का जी फक्त विक्री आनि विपणन बघेल? आणि दलालांचा मक्ता मोडून काढेल. इथे दलालांना देशोधडीलाच लावायचे ही भावना नाही पण दलालांनीही कमी कष्टात अधिक पैसा अजून आणि अजून पैसा आणि शेतकर्‍याला नफा न मिळता मलाच मिळावा ही मानसिकता बाजूला ठेवून काम करणे अपेक्षित आहे आणि तसे होत नसेल तर गावाने स्वतःची सपोर्ट सिस्टीम उभी करावी आणि अशा फसवणूक करणार्‍या दलालांचा मक्ता मोडून काढावा. चौपाटीवर झालेला आगीचा उद्रेक ही अत्यंत गंभीर आणि शरमेची बाब होती. पण तो कार्यक्रम होणं ही महत्वाची बाब होती. ह्याचा शेतकर्‍यांच्या त्रासाशी कुठलाही संबंध लावणे आणि ते त्रासात असताना तुन्म्ही उधळपट्टी करताय म्हणून हे असे झाले अशी मानसिकता ठेवणे पूर्णपणे चूक आहे. धान्य पिकले नाही तर शहरी माणूस कसा सर्वाईव्ह होणार हा प्रश्न आहेच. पण शहरी माणसाकडून शेतकर्‍यांच्या अपेक्षा काय हेही शेतकर्‍यांनी स्पष्ट करावे. शहरी माणूस आपल्या अन्नदात्या शेतकर्‍यासाठी नव्हे तर स्वतःला अन्न मिळावे म्हणून काहीही करायला तयार आहे. पण अपेक्षा काय आहेत ते न सांगता फक्त बोंबाबोंब करणे चूक आहे. हे कोणताही शेतकरी एकटा करत नाही तर शेतकरी संघटना आणि राजकीय हेतूने प्रेरित असे पुढारी आणि मिडीयावाले करतात असं माझं मत आहे. कोणालाच प्रश्न सोडवायचा नाही कारण सोडवला तर पुढार्‍यांचं महत्त्व आणि मिडियाला टीआरपी वाल्या बातम्या कशा मिळणार?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/18/2016 - 07:59 नवीन
अतिशय मुद्देसुद प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
इ
इरसाल गुरुवार, 02/18/2016 - 08:21 नवीन
"वेल" सेड !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
प
पैसा गुरुवार, 02/18/2016 - 09:12 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
च
चांदणे संदीप गुरुवार, 02/18/2016 - 08:40 नवीन
वेल, जबरदस्त लिहिलेय! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
र
रंगासेठ गुरुवार, 02/18/2016 - 12:01 नवीन
मस्त प्रतिसाद दिलाय. विचार करण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/18/2016 - 12:05 नवीन
वेल व्हेरी वेल. मस्त प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/18/2016 - 13:23 नवीन
वेल डन, एकच नंबर!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
स
सुमीत भातखंडे Fri, 02/19/2016 - 10:41 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/19/2016 - 16:30 नवीन
मुद्देसुद लेखन ! मुख्य म्हणजे मांडलेले मुद्दे खरे आहेत आणि ते समतोलपणे मांडलेले आहेत. आजकालच्या एकांगी वादविवादांच्या वादळांच्या जमान्यात अशी सुखद झुळुक फार कमी वेळेस अनुभवायला मिळते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
स
सुहास झेले Fri, 02/19/2016 - 17:04 नवीन
प्रचंड सहमत... प्रतिसाद आवडला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
व
विजय पुरोहित Fri, 02/19/2016 - 17:06 नवीन
+11111 प्रतिसाद आवडला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
य
यशोधरा Fri, 02/19/2016 - 17:13 नवीन
उत्तम प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
व
वेल गुरुवार, 02/18/2016 - 07:55 नवीन
ही कविता लिहिणार्‍या ज्येष्ठ पत्रकाराने कविता लिहिण्यापलिकडे शेतमालाला पैसा नाही शेतमालाची उचल नाही म्हणून जळणार्‍या शेतकर्‍यांसाठी काय केले आहे ते जरा कळेल का? की उगाच उचलली लेखणी लावली कागदाला?
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 02/18/2016 - 08:13 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना' फायर ब्रिगेड मंगवाले तु" गाण्याची सिडी देऊन करण्यात येत आहे. -*खिलाडी 786
  • Log in or register to post comments
_
_मनश्री_ गुरुवार, 02/18/2016 - 09:54 नवीन
आम्ही गावी शेतीच करतो , गावी आमच १६ माणसांच कुटुंब आहे ,मी सुद्धा बारावीपर्यंत गावीच होते ,त्यामुळे सगळ जवळून पाहिलंय आमच्या कडे रासायनिक खत अजिबात वापरली जात नाहीत , आम्ही फक्त गायी म्हशी यांच्या शेणापासून आणि गोमुत्र वापरून बनवलेलं खत वापरतो आणि मी हे स्वानुभवातून सांगते कि योग्य नियोजन असेल तर शेतीसारखा भारी दुसरा उद्योग नाही ,
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/18/2016 - 10:05 नवीन
कृपया.. आपल्या सवडीने का होईना या शेतीतील प्रयोगांवर लिहाच ही आर्जवी विनंती. शेती बाबत मिपावरची बोलघेवड्यांची कोल्हे कुई पाहता तुमची आणि आनंदीता माहीती-अनुभवांची फार निकड आहे. शेतीत चांगले काम करणार्या पथदर्शी लोकांबाबत मला कायम आदर आहे आणि राहिलच ! जय जवान! जय किसान ! अकृषक पांढरपेशा चाकरमानी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
_
_मनश्री_ गुरुवार, 02/18/2016 - 10:16 नवीन
धन्यवाद , १५ दिवसांनी यात्रेसाठी गावी जाणार आहे तेव्हा भावाकडून सगळी माहिती घेते आणि मग इथे लिहीन .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मोदक Wed, 07/27/2016 - 09:36 नवीन
नमस्कार, लेखमालेच्या प्रतिक्षेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
क
कपिलमुनी गुरुवार, 02/18/2016 - 10:06 नवीन
मागच्या ४९ दिवसात १२५ मूर्खांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्यात. करो बिचारे ! मस्त बँकेचा कर्ज बुडवायचा , तसा ही १.१४ लाख कोटी बुडीत होउ देणार्‍या बँकांना काय फरक पडला असता
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 02/18/2016 - 10:09 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रसाद_कुलकर्णी गुरुवार, 02/18/2016 - 10:25 नवीन
अप्रतिम कविता आहे. मी फेसबुक वर शेर केली होती, पण कवी माहित नव्हते. माहितीसाठी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 02/18/2016 - 11:12 नवीन
कविता म्हणून जमलीय कविता.. पण त्यातल्या भावाशी आणि आशयाशी सहमत नाहीये.. उगाच शेतकर्‍यांचा कैवार घेणे हे सोशलमिडीयावर 'अपमार्केट' आहे म्हणून लिहील्यासारखी वाटतेय.. बाकी साला ह्या 'लहानपण, गुरुजनांची/आईवडीलांची थोरवी/ गरिबीच कशी ग्रेट/ गावाकडची माती/शेतकरी' वाल्या व्हॉट्सॅपी/फेसबुकी उमाळ्यांनी उबग आणलाय आता..
  • Log in or register to post comments
ध
धनावडे गुरुवार, 02/18/2016 - 13:03 नवीन
ते वीर मराठे, शिवाजी महाराज,अच्छे दिन राहिले की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो गुरुवार, 02/18/2016 - 13:20 नवीन
यादी बरीच लांबलचक आहे हो.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 02/19/2016 - 12:14 नवीन
मागच्या सरकारच्या कार्यकाळात बुलढाण्याचे कॉंग्रेस चे आमदार दिलीप सानंदा ह्यांच्यावर अवैध सावकारी मध्ये शेतकऱ्यांच्या जमीनी ताब्यात घेण्याचा आरोप झाला होता।विलासराव मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला नकार दिल होता।हायकोर्टाने दटया दिल्यावर कार्यवाही झाली होती ,वर 2लाख दंडहि ठोठावला होता।तेव्हा कोणत्याही वामपंथी खान्ग्रेसी राष्ट्रवादी सेक्युलर कविने अशी कविता लिहिली नव्हती
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 02/19/2016 - 12:18 नवीन
तेव्हां तर अगदी "राम राज्य " होते हो ! लोक्सत्तावरची (ई आवृत्तीतली)बातमीच गायब केली गेली आहे जाणत्या राजाचे विखारी विचार "महाराष्ट्राला ब्राम्हण मुख्यमंत्री होणे परवडणारे /योग्य नाही" म्हणून. बरेच दिवस शोधतोय कुणाला मिळाला तर देणे दुवा(=संदर्भ) मी त्याला दुवा(=धन्यवाद) देईन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ह
होबासराव Fri, 02/19/2016 - 12:31 नवीन
बास नाम हि काफि है ! असा कुठला काळा धंदा आहे जो हे महाशय करत नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ब
बोका-ए-आझम Fri, 02/19/2016 - 13:17 नवीन
संपूर्ण गिरणगाव उध्वस्त झालं. लोकांच्या नोक-या गेल्या, लोक अक्षरशः रस्त्यावर आले. एक आख्खी पिढी बरबाद झाली. पण त्यामध्ये पोळलेल्या कुणीही आत्महत्या केल्याचं ऐकिवात नाही आणि केल्या असतील तर त्याचं कुणीही उदात्तीकरणही केलं नाही.असो. हे सगळं सुरु झालं पी. साईनाथ यांच्यामुळे. साईनाथ स्वतः एक उत्कृष्ट पत्रकार आणि लेखक. डाव्या विचारांचे असले तरी ज्यांच्या लेखनाविषयी सर्वांना आदर आहे अशा काही मोजक्या लोकांपैकी एक. २००१-०२ मध्ये त्यांनी या आत्महत्यांबद्दल - विशेषतः आंध्र, तामिळनाडू, ओरिसा आणि महाराष्ट्रातील विदर्भ - लिहायला सुरूवात केली आणि त्यावर लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण केली. तेव्हा भाजपचं सरकार होतं हा योगायोग नजरेआड करता येण्यासारखा नाहीये. नंतर २००४ ते २०१४ - साईनाथांनी लिखाण केलं पण त्यात २००१-०२ सारखा अावेश नव्हता. आता २०१४ नंतर परत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय पुढे येतोय. जणू मधल्या काळात सगळं आलबेल होतं. हा bias अत्यंत धोकादायक आहे कारण त्यामुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता तर कमी झाली आहेच आणि शिवाय सारख्या अशा बातम्यांचा भडिमार होत असल्याने समाज मानसिकदृष्ट्या बधिर होण्याच्या मार्गावर चाललेला आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 18:12 नवीन
कवी जो कोणी आहे. पागल झालेला आहे. राजकिय मानसिकता आहे. कुठल्या चिंधी कुठे आनुन पेटवतो आहे. १५ लख कोटींचे व्यवहार झालेत, पुढे या फायदा घ्या. मेक इन इंडिय म्हणजे काय फक्त कारखानदारीच आहे, असे काही नाही. शेतकार्‍यांचे किती पार्टीशिपेशन आहे ते बोला ह्यात. उगा फासाला लटकत मुर्खासारखे आत्महत्या कर्णार. व्यवसाय करणार्‍आंअन बोल लावण्याआढी एक पानटपरी चालवून दाखवावी हरामखोरांनी. सरकारच्या जीवावर शेती करायला काय सरकार आमंत्रण देत नाय.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 03/18/2016 - 15:07 नवीन
हे म्हणजे ''रणगाडे चालवा हरामखोरांवर" का असलाच तुमचा प्रतिसाद होता नाहि का डांगे साहेब.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा