Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(बाटा रुते कुणाला)

स — स्वामी संकेतानंद, Wed, 02/17/2016 - 04:56
बाटा रुते कुणाला, आक्रसतात ऍक्शन रीबॉक मज रुतावे हा दैवयोग आहे सांगू कसे कुणाला कळ फाटक्या बुटांची शिवून आठ जागी मी चालतोच आहे डिस्काउंट येतो, टाकून 'अर्थ' देतो माझी निवड बुटांची घाईत होत आहे अस्सल असेल की चीनी माल आकळेना ब्रांडेड मागवोनी ही त्रस्त त्रस्त आहे -- स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
7694 वाचन

💬 प्रतिसाद (38)
प
प्राची अश्विनी Wed, 02/17/2016 - 05:05 नवीन
=))=))
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 02/17/2016 - 05:29 नवीन
एक लंबर! स्वामीजी जोरात!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 02/17/2016 - 05:35 नवीन
स्वामीजींनी काव्याची धुनी पेटवली आहे ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 02/17/2016 - 06:35 नवीन
अजून काही समीधा असतील शिल्लक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
पैसा Wed, 02/17/2016 - 06:23 नवीन
=)) =)) बूट कशाला? त्याची लेस बांधायचा त्रास. त्यापेक्षा कोल्हापुरी घ्या!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 02/17/2016 - 19:22 नवीन
मस्तच! त्यापेक्षा कोल्हापुरी घ्या! पै ताई "कोल्हापुरी चपला" मिपाजालावर वेगळ्या अर्थाने प्रसिध्द आहेत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 02/18/2016 - 18:49 नवीन
लोकांना आहेर द्यायच्या का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पगला गजोधर Wed, 02/17/2016 - 06:34 नवीन
Maayboli वरचे मानस६ ? की ब्लोग्वरचे Ganesh Bhagat की Charudatt Kulkarni
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 06:38 नवीन
मूळ माझी आहे, फेसबुकवर टाकली होती आणि एका व्हाट्सएप ग्रुपवर. तिथून कोणी उचलली असेल तर मला माहीत नाही. मी चोर्‍या करत नाही. माझ्या अनेक कविता आधीच ढापल्या गेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 02/17/2016 - 06:40 नवीन
नो प्रोब्लेम ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 06:43 नवीन
आधी तुम्ही थेट चोरीचा उल्लेख केल्याने मला वाटले की विडम्बन जसेच्या तसे तुम्हाला कोठेतरी सापडले असेल. पण तरीही लिंक पाहिल्या तर वेगळे दिसले. हुश्श, सुटलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
व
वेल्लाभट Wed, 02/17/2016 - 07:03 नवीन
नाही तसं नाही; पण नील जठार नावानेही २००९ ची ही मिळाली. http://orkut.google.com/c29814167-tb7ac6c96a00f10c6.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 07:25 नवीन
तुम्ही आणि पग नी दिलेल्या विडंबनाचा मूळ रचयिता कोण आहे माहीत नाही. जे सर्वात जुने दिसेल तोच रचयिता असावा. सगळे २००९ सालचेच आहेत. प्रत्येक पोस्टवरची तारीख पहावी लागेल. तेव्हा मी विडंबने लिहत नव्हतो. माझे हे विडंबन बरेच नवे, २०१५चे आहे, आणि स्वतंत्र्यरित्या सुचलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 06:42 नवीन
आयशप्पथ!!! आता तुम्ही दिलेल्या लिंका पाहिल्या! जुन्या आहेत बर्‍याच. २००९! त्या कविता वेगळ्या असल्या तरी हाच विषय धरून आहेत!! मी आधी कधीच वाचल्या नव्हती. मला स्वतंत्र सुचली होती. नवे शूज घेतले तेव्हा हे विडंबन सुचले होते. धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/17/2016 - 06:47 नवीन
विडंबन आवडले. अवांतर - सुवर्णतारा वापरून बघा :-) .
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 02/17/2016 - 06:55 नवीन
हाय्ला श्रीरंगा. हे पोलीस भरती स्पेशल शूज तुला म्हाइतेत व्हय. गोल्डस्टार मध्ये बंद झालेला..युनिस्टार नावाने आहे. सोल मज्बूत, लाईटवेट अन स्वस्त मुलखाचा. भारीच राव. माझ्याकडे आहे एक अजून. लिंन्क मधले मॉडेल नवीन दिसते. माझा नंबर नाही त्यात. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/17/2016 - 07:01 नवीन
क्रॉस कंट्री मॅरॉथॉन धावलोय गोल्डस्टार शुज घालून. मला नायकीसुद्धा फिके वाटतात यांच्यापुढे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 02/17/2016 - 07:03 नवीन
भाऊ तू फिर भी दिल है हिन्दुस्तानी हैस. लगे रहो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/17/2016 - 07:06 नवीन
दिलच काय, अख्खी बाडीच हिन्दुस्तानी हाय ;-) . तरी पन, भावनाओं को समझो, बाडी में क्या रख्खा है!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 07:27 नवीन
मला हे दोन्ही ब्राण्ड माहीत नाहीत!::(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/17/2016 - 07:29 नवीन
गरीबांचे ब्राण्ड हायेत ते :-). नेपाळची कुंपणी हाये ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 07:34 नवीन
मी शाळेत बाटाचे कॅनवास बूट घालायचो. नंतर कॉलेजची तीन वर्षे बिग बझारवाले डिजे आणि सी वापरून पाहिले, त्यानंतर थेट रिबॉक. हे विडंबन लिहीले त्या दिवशी लोटो चे विकत घेतले होते. फार प्रयोग केले नाहीत कधी. त्यामुळे अपना जुतों का नॉलेज बहुत कम है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/17/2016 - 07:41 नवीन
गोल्डस्टार खास करून विद्यापीठ स्तरीय शर्यतीत धावणारे वापरताना दिसत. शाळकरी मुलांच्या साइझचे बहुधा मिळतही नसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 07:43 नवीन
आपलं धावणं तब्येतीपुरतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/17/2016 - 07:45 नवीन
तुम्ही शब्दांना धाववता... आम्ही त्या बाबतीत अजुन पालथेही पडत नाही ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
सूड Wed, 02/17/2016 - 13:10 नवीन
एकदा 'काष्ठभूमि' वापरुन पहा. बूट वापरून कंटाळाल, पण बूटांना काही होणार नाही.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 02/17/2016 - 13:12 नवीन
सूडकेश कधीतरी चेंज म्हणून जेसीबी किंवा क्याट चा शू ट्राय कर. एकच लंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 13:23 नवीन
जेसिबि आणि क्याट? =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 02/17/2016 - 13:30 नवीन
हा हा तीच ती अर्थ्मुव्हर्स वाली कंपनी. शूज असतात एकदम रफटफ. Image removed. कॅट पण अर्थ्मुव्हर्स वालीच कंपनी. कॅटरपिलर. Image removed. अजून ह्याच टैपमध्यी गॅसोलीन पण मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 13:23 नवीन
ते पायाला जड वाटले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
वेल्लाभट Wed, 02/17/2016 - 13:27 नवीन
नैच्च. वेनब्रेनर आर फॉर रियल. काष्ठभूमी भंपक आहेत. शून्य पकड. नुसताच दिसायला गलेलठ्ठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 02/17/2016 - 13:30 नवीन
नुसताच दिसायला गलेलठ्ठ
शेवटी ज्याची त्याची आवड. आम्ही आमच्या अंगयष्टीला साजेसे घेतलेत, तुम्हाला सापडून गलेलठ्ठच सापडले असतील तर त्याला काय करणार. =)) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 02/18/2016 - 12:34 नवीन
अरे ते सोड. ग्रिप नसेल तर काय उपयोग? सोल इतका हार्ड असतो एक तर. ड्राय ग्रिप अ‍ॅव्हरेज, वेट ग्रिपचा आनंदच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
वेल्लाभट गुरुवार, 02/18/2016 - 12:36 नवीन
हे ट्रेकच्या दृष्टीने म्हणतोय. बाकी आजवर मनात भरलेले जनरल पर्पज शूज म्हणजे ऑस्टिनचे शूज. (याचं नाव काय हे नक्की माहित नाही पण कॉलेजमधे असताना बरीच मुलं घालायची. बाप दिसतात ते पायात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ग
गवि गुरुवार, 02/18/2016 - 12:39 नवीन
बाटाचं बाकी काही असो पण त्यांच्या हश पपीज या ब्रँडचे आपण चाहते आहोत. लेदर शूजमधे एक जोड जुना झाला की हश पपीजचा तस्साच्या तस्सा दुसरा घेऊन येतो. पायाला एकदम कुरवाळल्यागत फीलिंग. तीन वर्षं जातात. मला वाटतं बाटाची साधे ते भारी अशी प्रॉडक्टलाईन्सची रेंज आहे. बाकी विडंबन भारीच आहे.
  • Log in or register to post comments
श
शलभ गुरुवार, 02/18/2016 - 19:43 नवीन
हश पपीज
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/19/2016 - 04:50 नवीन
स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए! =)) काय कडक-जोडा मारलाय राव! =))
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 02/19/2016 - 11:32 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा