२५१ रुपयात मोबाईल !!
Primary tabs
‘रिंगिंग बेल्स‘ या कंपनीनी ‘फ्रीडम 251‘ ह्या नावाने स्मार्टफोन आणण्याची घोषणा केली आहे. उद्या तारीख १८ फेब्रुवारी पासून सकाळी ६ पासून या मोबाईल चे registration सुरु होत आहे.. www.freedom251.com हि वेबसाईट चेक करा
.
फोन ची माहिती:
चार इंचाचा डिसप्ले असलेल्या स्मार्टफोनमध्ये 1.3 गीगाहर्टझचे क्वाडकोर प्रोसेसर आहे. तसेच एक जीबी रॅम, आठ जीबी इंटर्नल मेमरी, 3.2 मेगापिक्सेल कॅमेरा.
मी नेट वर वाचलेल्या काही रंजक प्रतिक्रिया.
१) फक्त २५० हा हा हा आकाश ट्याब चे काय झाले ?
२) छान.. आमचे भारतीय तिथे पण भाव कमी करतील.. "१ रुपया राहू द्या हो, देवून टाका न २५० ला, राउंड फिगर करून टाका.."
३) आं ? एवढी तर आमच्याकडे होळीची वर्गणी घेतात राव.
४) काय सांगताय काय ? अहो २५१ मध्ये तर सेम्संग आणि इतर बर्याच मोबाइल चे कव्हर पण येत नाहीत हो. याच कव्हर केवढ्याला आणि ?
५) २ डझन कसे देणार?
६) त्या सोबत चार्जर मिळल का?
७) काही एक्सचेंज ऑफर आहे का? माझा iphone द्यायचा आहे.
आपण पण आपल्या प्रतिक्रिया नोदवा.
माझ्या साठी तीन पाव (७५० ग्रॅम) बुक करा प्लिज.
जाम घोळ वाटतोय हा
यांनी अजून एक Smart 101 फोनची घोषणा केलेली पण काही लोकांच्या तक्रारी खालील दुव्या मध्ये पाहू शकता.
त्यामुळे सध्या वाट पाहणेच श्रेयस्कर! :)
दुवा
त्यामुळेच संशय येतोय. क्वालिटि कशी असेल काय माहीत? वापरताना स्पार्क वगैरे झाला तर?उगीच जिवाशी खेळ...
६५० सर्विस सेंटर आहेत म्हणतात. पण सर्विस सेंटर ला जायचा खर्चच २५० रु. होईल.
मागच्या निवडणुकांच्या काळात डेटाविंडचे आकाश १,२ टॅबलेट,आता हे एक नवीन.
सकाळ पासूनच सर्वर जाम आहे. पे नाऊ वर क्लिक केल्यावर पुढे ब्ल्यांक पेज ओपन होते. सर्व बनावट वाटते
+१ मी सगळ्या ब्राऊजर्स वापरून प्रयत्न केला पण 'पे नाऊ' च्या पुढे काही होत नाही!
आणि डिलिव्हरी चार्जेस ४०रू. असून डिलिव्हरी चार महिन्यांनी मिळेल असं दाखवत आहे!!
लगेच आलेली एक नेगेटिव न्यूज़ :(
डेटाविंड आणि आकाशच्या बाबतीतला अनुभव फार उरफाटा आहे त्या बाबतीत. वेट एंड वॉच बरं सद्धया
डेटाविंड आणि आकाश च्या मानाने किमत २५१रु असल्याने लोक जास्त तुटुन पड्लेत.
यातले काही नोटेबल मुद्दे:
१. कंपनी एकदम नवीन आहे आणि तिला या क्षेत्राचा काही अनुभव नाही. (= कंपनीचं अन्य क्षेत्रात रेप्युटेशन आहे आणि ते जपायचं आहे असं काही नाही.)
२. आधी पैसे भरायचे आणि जूनपर्यंत (चार महिन्यांत) डिलिव्हरी मिळेल असा दावा आहे.
३. २५१ ही अत्यंत कमी व्यक्तिगत जोखीम वाटणारे कोट्यवधी ग्राहक भारतात आहेत.
४. समजा मोबाईल वेळेत मिळाला नाही, किंवा अजिबातच मिळाला नाही तरी २५१ रुपयांसाठी लोक वैयक्तिक पातळीवर किंवा एकत्र येऊन कायदेशीर फॉलोअप, कोर्टकचेरी करतील असं वाटत नाही.
५. किंमत अत्यंत कमी असल्याने बुक करणार्यांची संख्या महाप्रचंड असेल. यामुळे कंपनीकडे जमा होणारी रक्कम अतिप्रचंड असेल.
६. हे सर्व "मेक इन इंडिया" या बॅनरच्या आधारे चाललं आहे. म्हणजे फ्लॉप झालं तर एकूण मेक इन इंडिया उपक्रमाच्या ब्रँडवर पहिलाच काळा डाग पडू शकतो.
७. इतर मोबाईल उत्पादकांच्या संघटनेने असं म्हटलं आहे की किमान खरेदी किंमत पाहता सरळ मार्गाने चार हजाराखाली हा मोबाईल विकणं शक्यच नाही.
क्वोटेड परिच्छेदः
.
दुवा:
http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Mobile-phone-for-Rs-2…?
या सर्व कारणांमुळे वेट अँड वॉच हे धोरणच बरं ठरावं.
तस्मात बेम्बट्या कुंभार हो, गाढवांची कमी नाही.
तुमचा म्हनन एक दम बरोबर आहे. तरी पण लोक पैसे गुंतवनारच. "२५१ रु याचा तर प्रश्न आहे ना, मग एकदा गुंतुवून बघूया पैसे.....आला तर चांगलीच गोष्ट आहे." असे विचार करणारे भरपूर लोक आहेत.
हे सर्व "मेक इन इंडिया" या बॅनरच्या आधारे चाललं आहे. म्हणजे फ्लॉप झालं तर एकूण मेक इन इंडिया उपक्रमाच्या ब्रँडवर पहिलाच काळा डाग पडू शकतो.
हेच मलापण वाटलं होतं. एव्हढ्या मोठ्या इवेंट्ची सुरुवात अशी (फ्लॉप होणेबल) का केली असेल? कंपनीने सांगितलेल्या फीचर्सपैकी २५१ रुपयांत काहीच येणं शक्य नाही. आणि सुरुवात म्हणून काही मोबाइल जरी विकले, तरी नॅनो सारखं नंतर किंमत वाढवली तर नवे लोक येणार नाहीत. कंपनीला काय मिळणार? (आणि २५१ रुपयांत लोकांना तरी काय मिळणार :) )
मेरे दिमागमे जरा एसा बल्ब पेट्या की, साईट बनानेको एक बीस पच्चीस हजार, कंपनी बनानेको एक पचास साठ. थोडे टेम्पररी एम्प्लोयी हाउर एक बँक अकाउंट.
आठ दिन मे दस लाख येडे भी तीनतीन्सौ दिये तो ३० करोड मिलते. मोबाइल तो जून तक आनेला है. तीन महिनेमे सब रफादफा करके कल्टी मरनेको अपनेको जमेंगा क्या? ;)
२५१ रुपयांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन संशयाच्या भोवऱ्यात
तर खालील बातमी नुसार,संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते याचे अनावरण केले जाणार होते.
त्वरा करा... स्मार्टफोन फक्त २५१ रुपयांत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
चार पाच प्रयत्न करून पेमेंट गेट वे पर्यंत पोहोचलो होतो. पे मेंट करायच्या आधीच सर्वर गचकले. एकंदरीत खालील प्रमाणे चित्र होते.
COD हा पर्याय नाहीतर . COD हा पर्याय असला असता तर संशयाला जागा कमी होती. पण तो नाही म्हटल्यावर संशय बळावतो. (मोटो ई या मोबाईलची पण अशीच हवा झाली होती. पण त्याची तेव्हाची किंमत रास्त होती . (६९९९) आणी COD हा पर्याय उपलब्ध होता त्यामुळे संशयाला तितकीसी जागा नव्हती. ) आणी साईट पण एवढी काही विशेष दिसत नाहीये .
भारताची लोकसंख्या सव्वाशे कोटी आहे. त्यापैकी संपुर्ण भारतातून अगदी किमान एक लाख लोकांनी २५१ रुपये भरले तरी त्याचे अडीच करोड रुपये होतात. कंपनीवाले मोबाईल जून अखेरीस देणार आहेत. हि रक्कम बचत खात्यात ठेवली तरी ३ महिन्याचे ३ टक्के दराने जवळपास दोन लाख (१,८८,२५०) रुपये होतात. जरी तीन महिन्यांनी घोटाळा उघडकीस आला आणि सरकारकडून दबाव आल्यावर कंपनीने सगळ्यांना त्यांचे पैसे परत केले तरी त्या कंपनीला तीन महिन्यात फुकटचे दोन लाख रुपये मिळाले ना! प्रत्यक्षात २५१ रुपये भरणाऱ्यांची संख्या, कंपनीकडे जमा होणारी रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज कितीतरी पटीत जास्त असू शकते.
अहो ते स्क्रैच कूपन ची किम्मत सांगताहेत ते।कूपन मधे जर मोबाइल असे नाव लिहिलेले असले तर 3051 रुपये लागतिल असे म्हटले आहे त्यांनी।☺☺☺
बीजेपी के सांसद किरीट सोमैय्या ने इस फोन की लॉन्चिंग को ‘बड़ा घोटाला’ करार दिया है.
एबीपी न्यूज से बात करते हुए सोमैय्या ने कहा कि;” मैं तो फाइनेंस का आदमी हूं, मुझे यह कोई घोटाला लगता है और ट्राइ चेयरमैन को मैंने पूरी बात से अवगत करा कर इसकी बुकिंग पर रोक लगाने की मांग की है.’
उन्होंने कहा ‘मैंने इस कंपनी का बैकग्राउंड चाक किया है, सिर्फ तीन महीने पहले कंपनी रजिस्टर्ड हुई है.
इसके निदेशक का कोई बैक ग्राउंड नहीं है.
ऐसा लगता है कि ये कंपनी सारे पैसे लेकर भागने वाली है.’
===================
ज्या कंपनीचे नाव (Adcom) घेऊन ते फोन विकणार होते, त्या कंपनीला काही न्युज चॅनल्सनी विचारले असता ते म्हणाले, "आम्हाला याबद्दल काहीही माहित नाही. त्यांनी आमचे नाव का घेतले याचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत."
काही ठिकाणी असेही वाचण्यात आले आहे की हे लोक Adcom Ikon 4 हा चार हजाराचा फोन रिब्रॅंड करणार होते/आहेत.
I will be really sad anyone of you fall for CHEAP smartphone gimmick.
THEIR PRICE is nowhere close to break even cost of cheapest smartphone.
Unless that company has Magic wand that produces components for free and Oompa Loompas are assembling the phones by hand for 1 coffee bean a year.
Ask yourself before throwing away MINOR AMOUNT!!
1. What is manufacturing infrastructure of the Company? Especially the one who doesn't even have a proper pre-order infrastructure
smile emoticon
!!
2. How many of you will go to Consumer forum for MINOR AMOUNT?
Hypothetically If you get the phone (IF)
What will be it's build quality?
What about digital data security?
FOOD FOR THOUGHT!!!
कंपनी ने पैसे घेतले नाही तरी लाखो लोंकाचा डेटा नंबर सकट मिळाला असेल. त्याचीही काहीतरी किंमत असेलच की.
+१
तरीही ३०,०००च्या आसपास बुकिंग्स झाल्या आहेत म्हणे ह्या फोनच्या..खरं खोटं तो कंपनीवालाच जाणे!
आणि हो जर संख्या ०.५ टाकली तर किमतीसकट सगळंच अर्ध्यावर आलेलं पण दिसून आलं आहे. म्हणजे किंमत १२५ आणि शिपिंग चार्जेस पण २०रू झालेले दिसले :D
लोल.
मिपाकरांनो फसु नका रे.