Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

औरंगाबादला पाहण्या, करण्या आणि खाण्यासारख्या गोष्टी

आ
आकाश खोत
Wed, 02/17/2016 - 11:42
💬 118
औरंगाबादला कट्टा करण्याविषयी एक धागा उघडला गेलाय. मिपावर मी आल्यापासून पहिल्यांदाच औरंगाबादविषयी चर्चा पाहतोय. आनंद झाला. माझे लक्ष नसताना काही धागे झाले असतील, पण मी पाहिलेला पहिलाच. ह्या धाग्यावर मी हि खालचीच माहिती पुरवली होती. पण तिची लांबी पाहून ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा असावा असे वाटले. इथे नसलेली औरंगाबाद विषयी उपयुक्त माहिती मिपाकरांनी पुरवावी. मी औरंगाबादचा आहे पण सध्या तिथे राहत नाही. त्यामुळे यावेळी कट्ट्यात सहभागी नसेन. पण धागा पाहून उत्साह आला आहे, त्यामुळे औरंगाबादविषयी माहिती पुरवतोय. औरंगाबाद शहरात आणि जवळपास पाहण्यासारख्या गोष्टी : पाणचक्की, बिवी का मकबरा, औरंगाबाद लेणी (वेरूळइतक्या प्रसिद्ध किंवा छान नाहीत) गोगाबाबा टेकडी : हे काही टिपिकल प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतले ठिकाण नाही. पण शहराचा मकबऱ्यासकट छान व्ह्यू मिळतो. आणि शहराबाहेर छान हवेशीर जागा आहे. औरंगाबाद हे दरवाजांचे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते. जुने शहर तटबंदी आणि ५२ दरवाजे यांनी बंदिस्त होते. तुम्हाला शहरात फिरताना हे दरवाजे आणि तटबंदीचे काही अवशेष दिसू शकतात. कलेक्टर ऑफिसजवळ एक संग्रहालय आहे. अजिंठा वेरूळ सर्वांना माहित आहेच. वेरूळ येथे लेणी तर आहेतच. पण घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. गणपतीचे एक जुने मंदिर आहे. वेरूळ येथे शिवाजीराजे यांचे पूर्वज शहाजीराजे आणि मालोजीराजे यांचे वतन होते. त्यांचे स्मारक अशातच बांधण्यात आले आहे. खुलताबाद येथे निद्रिस्त मारुतीचे मंदिर आहे. औरंगजेबाची कबर आहे. म्हैसमाळ हे औरंगाबादचे हिल स्टेशन. तिथे छान बालाजी मंदिर आहे. बालाजीचे इतके शांत मंदिर दुसरे नाही. म्हैसमाळच्या रस्त्यावर एक लहान फाटा आहे. पटकन लक्षात येत नाही. तिथून गेल्यावर मार्लेश्वर हे गुहेतले शिव मंदिर आहे. खूप मोठे शिवलिंग पाहायला मिळेल. जटवाडा आणि कचनेर आणि येथे जैन मंदिरे आहेत. जटवाडा येथे भव्य मूर्ती आहेत. पैठणला जायकवाडी धरण आहे. बागेत संगीत कारंजी आहेत. आणि संत एकनाथ यांची समाधी आहे. औरंगाबादपासून लोणार सरोवरसुद्धा जवळ आहे. खरेदी औरंगाबादमध्ये पैठणी आणि हिमरूशाली छान मिळतात. बऱ्याच दुकानात मिळतात. पण पर्यटक औरंगाबाद वेरूळ रस्त्यावरच्या दुकानात जास्त जातात. सिडकोमध्ये लोकमत भवनच्या बाजूलासुद्धा एक छान दुकान आहे. पण ह्यावर महिलांनी जास्त माहिती द्यावी. गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, सराफा, सिटी चौक हे सर्व एकमेकांना लागून असलेले भाग खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत. कपडे, पुस्तके, दागिने, अत्तरे, पूजा साहित्य, इलेक्ट्रोनिक्स अशा सर्व गोष्टींची दुकाने ओळीने आहेत. खादाडगिरी गायत्री चाट भांडार : गुलमंडी आणि क्रांती चौक. कचोरी समोसा आणि मुंगभजी गरम आणि मस्त मिळतात. वर्षानुवर्षे पासून उत्कृष्ट चव. उत्तम, गुलमंडी : गरम गरम जिलेबी आणि इमरती, आणि बरेच काही. बाजूला एक छोटे दुकान आहे तिथे मसाला दुध छान मिळते. ओमकार पावभाजी क्रांती चौक लक्ष्मी सँडविच क्रांती चौक पूर्णानंद औरंगपुरा : हे माझ्या शाळेतल्या भागातले मुलांचे आवडते दुकान. इथली वडापाव, मसाला पाव, सामोसा, दाबेली यांची चव इतक्या वर्षात बदललेली नाही. औरंगाबादला गेलो आणि तिथे नाही गेलो तर चुकल्यासारखे वाटते. पाणीपुरी : पुणे आणि मुंबईला बहुत करून रगडावाली पाणीपुरी देतात. पण औरंगाबादला बटाटावाली जास्त मिळते. चांगले पाणीपुरी वाले : दयावान गारखेडा, पंकज कुमार एन ४, गुरुकृपा सिडको समोर मथुरावासी : भल्ला आणि गुजीया हि इथली खासियत. बाकी सर्व प्रकारची चाट मस्त मिळते. पाणीपुरी अगदी वेगळ्या प्रकारची. घट्ट आणि तिखट पाणी असते, आणि त्यात डाळिंब आणि अंगूरसुद्धा टाकतात. तिथून जवळच पैठण गेटला लक्की आणि पॅरिस हि ज्युसेसची मस्त सेन्टर्स आहेत. गुरुकृपा सूतगिरणी चौक जवळ : चाट आणि मिठाईचे चांगले दुकान. गोधुली दाबेली : कनॉट प्लेस. दाबेली सोबत भेलसुद्धा छान आहे. कनॉटच्याच कोपर्यात एक मस्त भेळवाला आहे. तारा पान सेंटर : पान खाण्याचे शौकीन असणार्यांना हे नाव माहित असतेच. इथल्या पानाची सर पुणे मुंबईला खाल्लेल्या एका हि पानाला नाही. अगदी पुणेकर जिथे गर्दी करतात त्या शौकीन, नाद वगैरेसारख्या ठिकाणीसुद्धा नाही. मी औरंगाबादला गेलो कि ऑफिसमध्ये लोक इथला पान आणण्याची वाट पाहतात. उत्साहाच्या भरात जे आठवेल ते लिहिले आहे. खादाडगिरीवर किती लिहिले आहे त्यावरून आणखी माहिती हवी असल्यास विचारावे. जाणकारांनी आणखी माहिती पुरवावी.

प्रतिक्रिया द्या
40516 वाचन

💬 प्रतिसाद (118)
ए
एस Wed, 02/17/2016 - 11:48 नवीन
छान लिहिलेय. कधी गेलोच औरंगाबादला तर ह्या धाग्याचा उपयोग होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 02/17/2016 - 11:49 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सुधांशुनूलकर Wed, 02/17/2016 - 12:47 नवीन
नुसतं म्हणताय काय? वेरूळ कट्टा आयोजित करा आता लवकरात लवकर.. मार्चमध्ये मुलांच्या परीक्षा संपताहेत. त्यानंतर कधीही.. kind attn. : मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 02/17/2016 - 12:49 नवीन
एप्रिलमध्ये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर
स
सुधांशुनूलकर Wed, 02/17/2016 - 13:33 नवीन
चालेल, एप्रिलमध्ये जमवायचा प्रयत्न करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
उ
उगा काहितरीच Wed, 02/17/2016 - 12:05 नवीन
तारा पान सेंटर चे नाव ऐकलेले आहे. पण आता ते म्हणे फ्रिजमधे ठेवलेले पान देतात. पहिल्यासारखे बनवून देत नाहीत.बाकी म्हैसमाळ खरंच सुंदर आहे. फक्त जाण्यायेण्याची चांगली सोय नाही आहे. स्वतःचे वाहन असेल तर उत्तम . वेरूळ अजिंठा मस्तच आहे. पण "उरकून घेण्यासाठी " नाहीये . जाणकाराच्या सोबत २-३ दिवसही लागतील . बिबी का मकबरा वगैरे ठीक आहे. देवगीरी (दौलताबाद) चा किल्ला पण छान आहे. शहरात खाण्याचे विशेष योग आले नाहीत त्यामुळे पास ! शहराच्या जवळपासचे ठिकाणे बघायचे तर आपले वाहन असलेले उत्तम कारण अतिशय वाईट सार्वजनिक व्यवस्था .
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Wed, 02/17/2016 - 12:29 नवीन
नाही. जे अगदी साधे मसाला पान आहे, सर्वाधिक खपाचे, तेच जास्त तयार करून ठेवलेले असते. पटकन देतात ते. निवांत वेळी गेलो तर ते हि समोर बनवून मिळते. बाकी बनारस, मीनाक्षी, फुलचंद असे पान तयारच करून देतात आपल्यासमोर. आपण आपल्या आवडीनुसार सुद्धा बनवून घेऊ शकतो. शहरात फिरायला सार्वजनिक व्यवस्था बेकार आहे हे खरेच. पण सोबत आपले मेंबर जास्त असतील तर इंडिका ते टेम्पो भाड्याने घेऊन फिरू शकतो. त्या ड्रायव्हर लोकांना औरंगाबाद दर्शन सांगितला तर कुठून कुठे कोणत्या क्रमाने न्यायचे ते सर्व माहित असते. बिविका मकबरा ताजमहाल समोर काहीच नाही. पण ज्यांना अजून तो ताज महाल प्रत्यक्ष पाहण्याचा योग आलेला नाही, ज्यात मी देखील आहे त्यांना तो आवडू शकतो. वेरूळ अजिंठा, देवगिरी ह्या सर्व जागा गाईड लावून फिरणे उत्तम. नाहीतर केवळ काही तुटलेली काही चांगली शिल्पे, अंधारातली चित्रे पाहून आपल्याला काहीच बोध होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ग
गणामास्तर Wed, 02/17/2016 - 12:11 नवीन
तारा पान सेंटर आवर्जून जाण्या इतके काही विशेष वाटले नाही. बाकी,पुण्यावरून औ.बादला जाताना गंगापूर फाट्याजवळ दत्त कि दिगंबर कायसा धाबा आहे तिथली शेव भाजी, पिठलं भाकरी आवडते. जालना रोड वर सिडको बस स्थानकाच्या अलीकडे डाव्या हाताला रामगिरी म्हणून हॉटेल आहे तिथली काळ्या मसाल्यातील शेवगा हंडी पण मस्त. नॉन वेज खायचे असेल तर बड्डी गल्ली मधले 'सागर' अप्रतिम आहे. तिथला 'नान खलिया' प्रकार जबरदस्त.
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Wed, 02/17/2016 - 12:34 नवीन
शेवगा हंडी केम्ब्रिजजवळ काळे बंधू हॉटेलमध्येसुद्धा प्रसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
ब
बाबा योगिराज Wed, 02/17/2016 - 14:34 नवीन
शेवगा हंडी केम्ब्रिजजवळ काळे बंधू हॉटेलमध्येसुद्धा प्रसिद्ध आहे. भावा नको आठवण काढूस. लवकरच एक भेट द्यावी लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश खोत
प
पिलीयन रायडर Wed, 02/17/2016 - 12:13 नवीन
तुम्ही खुप काही कव्हर केलय तरी माझे तिकडचे प्रतिसाद चोप्य पस्ते करते खरेदी :- अत्तरं - मला वाटतं गुलमंडीत मिळतात. तिथे एक गल्लीच आहे अत्तरांची.. (पण माझे ज्ञान यथातथाच आहे..!) औ.बाद मध्ये हिमरु शाली सुद्धा सुंदरच मिळतात. त्याचे चांगले दुकान मला आत्ता आठवत नाही. माहिती काढुन सांगु शकेन. क्रांती चौकातच गार्डन वरेलीचे ही दुकान आहे. चांगले ड्रेस मटेरियल मिळते. पैठण्याही मिळतात. धाग्यात सांगितलेल्या ठिकाणी मी एकदा गेले आहे. चांगली व्हरायटी होती. खादाडी पाणीपुरी आवडते मला फार औ.बादची.. क्रांती चौकात एक पापुवाला आहे, त्याची आवडते. बाकी खुप ठिकाणी मिळते. काहींना गुलमंडीतलीही आवडते. किंवा कॅनॉट प्लेसची. क्रांती चौकात गायत्रीचे दुकान आहे, तिथे पावभाजीचेही एक हॉटेल आहे. तिथे जा.. आणि त्या हॉटेलात नाही, त्याच्या समोरच्या खोपचीत गाड्यावर पाभा मिळते, ती खा. मला तर खुपच आवडली. बीड बायपास साईडच्या धाब्यांची सुद्धा माहिती देता येईल.. हवी असल्यास. भटकंती बघायला... बीबी का मकबरा, लेण्या, पाणचक्की वगैरे आहेच. प्रोझोन मॉल वगैरे पण आहे. जरा वेळ असेल तर बीबी का मकबरा वगैरे पेक्षाही मी म्हणेन की देवगिरी किल्ला, अजिंठा - वेरुळ पहा. मला ते जास्त आवडतं. शनिवारी रात्री असाल तिथे , तर जमल्यास भद्रा मारुतीला जाऊ शकता. लोक रात्री चालत जातात वर. औ.बाद ते पुणे रस्त्यावरः- औ.बादहुन पुण्याला परत येणार असाल तर पांढरी पुलाला भेळ खायला थांबा नक्की.. सरहदवाडीसुद्धा चांगला पर्याय आहे, पण मला पांढरीपुल जास्त आवडतो. एस.टीने येणार असाल तर गाडी लिलीयम पार्क (किंवा गांगासागर किंवा वडाळ्याचा फुडमॉल) नावाच्या भिकार हॉटलला थांबेल. नावावर जाऊ नकात. फार बेक्कार हॉटेल आहे. नगरला "जलाराम बेकरी" नावाची बेकरी ऑन द वे आहे. तिथे तोंडात टाकताच विरघळेल अशी खारी.. आणि टाळुला चिटकुन रसभंग करणार नाही अशा क्रिमचा क्रिमरोल मिळतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/17/2016 - 12:56 नवीन
काटाकीर मिसळपाव (क्याननॉट प्लेस), अन्नाचा वडा पाव,(बाबा पंप), पंचवटीची पाव भाजी (त्रिमूर्ती चौक), पाणीपूरी ( सावरकर चौक), सर्व प्रकारचे आइसक्रीम (झी कॉर्नर) मोबाइल (झी कॉर्नर), कपड़े (टिळकपथ), ज्यूस लक्की ( पैठण गेट), अजुन आठवेल तसं लिहितो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रचेतस Wed, 02/17/2016 - 13:01 नवीन
:( फक्त भोजलाच नेल्याबद्दल णिषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/17/2016 - 13:53 नवीन
माझं पहिलं प्रेम म्हणजे माझी एक मैत्रिण (जी सतत जीव घेत असते) आणि दुसरं प्रेम म्हणजे वल्ली, धन्या, प्रशांत (पुणे) (जे सतत जीव लावत असता) सालं तुम्हाला घेऊन एकूण एक ठिकाणी घेऊन जाईन. सुट्टीत या. सर्व फ़िरवेन आणि खाऊ घालेन. हाय काय अन नाय काय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 02/17/2016 - 15:55 नवीन
आमचंच चुकतं राव. आम्हास वेरुळ सोडून इतरत्र जाववतही नाही. पण ह्याखेपी नक्कीच आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/17/2016 - 12:21 नवीन
कमी पैशात भरपूर तर्रीबाज चिकन खायचं असेल तर गुलमंडीतील हॉटेल मराठा, मटन हंडी, चिकन हंडी खायची असेल आणि सोबत 'पार्सल' असेल तर हॉटेल 'लोकसेवा'. शेवगा कंटकी, शेवगा फ्राय, शेवग्याच्या शेंगाचे विविध प्रकार खायचे तर केंब्रिज शाळेपुढे गेल्यावर शेळकेचा ढाबा, बिड बायपास वरुन जात असाल तर 'राजदरबार' ढाबा. (पार्सल घेऊन यावं लागतं) फुलंब्री रोडच्या पुढे 'साई ढाबा' साडेतीनशे रूपये एका माणसाला, चिकन,मटन, मासे अन लिमिटेड आणून देतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Wed, 02/17/2016 - 12:29 नवीन
बिड बायपास वरुन जात असाल तर 'राजदरबार' ढाबा. सर हा ढाबा नेमका कुठे आहे ? त्याचं काये कि बजाज हॉस्पिटल बीड बायपास वर असल्याने तिथे जाणं होतचं हो नेहमी. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/17/2016 - 12:49 नवीन
बजाजच्या पुढे देवळाली चौक तिथून पुढे दोन किलोमीटर वर आहे हा ढाबा आहे मस्तय. माझं कॉलेज तिकडेच आहे आलात की कळवा. बसू ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
ब
बोका-ए-आझम Wed, 02/17/2016 - 16:44 नवीन
का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/17/2016 - 17:10 नवीन
:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
आ
आकाश खोत Wed, 02/17/2016 - 12:33 नवीन
औरंगाबादला असेपर्यंत तरी अभक्ष्य भक्षण करत नव्हतो. आता बाहेर येउन जरा करायला लागलो आहे. पण हौस कमीच. हि माहिती पुरवल्याबद्दल आभार सर. मलासुद्धा खाउन बघता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बाबा योगिराज Wed, 02/17/2016 - 14:54 नवीन
कमी पैशात भरपूर तर्रीबाज चिकन खायचं असेल तर गुलमंडीतील हॉटेल मराठा, मटन हंडी, चिकन हंडी खायची असेल आणि सोबत 'पार्सल' असेल तर हॉटेल 'लोकसेवा'. ह्या यादीत अजून थोडी भर. निराला बाजार वरून अंजली बिग सिनेमा कडे जातांना उतार सम्पून चढ लागला कि डाव्या हाताला लालाजीज. एकदम झणझणीत. अंजली बिग सिनेमा समोर नवीन झालेलं झलक (सम्पूर्ण मांसाहारी हॉटेल). मस्त जेवण सम्पूर्ण परिवारासोबत जाता येईल अशी जागा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विनायक प्रभू Wed, 02/17/2016 - 12:23 नवीन
खरेदी सोडुन आणखी काय काय करता येते?
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Wed, 02/17/2016 - 12:31 नवीन
स्थळदर्शन आणि खादाडगिरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/17/2016 - 12:44 नवीन
विद्यापीठ लेणीत प्रेयसीचा हात हातात घेऊन आणि गल्यात हात टाकुन बसता येतं. विद्यापिठात इतिहास विभागाचं संग्राहलय आहे ते पाहता येतं. गुलमंडित तरुण स्रिया निरखता येतात, खुप वेळ जाऊ शकतो इथे, प्रोझन मॉल मधे टाईमपास तर अप्रतिम होतो. स्पोर्ट्सचं दूकान ख़ास आहे, टेबल टेनिस, ब्याड़मिन्टन खेळता येतं. तिथेच एफ एम् रेडियो वाले काही ना काही करून आपली मुलाखत 'बजाते रहो' म्हणून घेत असतात. साहित्यिक परिसंवाद ऐकायचा असेल तर शनिवार, रविवार सहा वाजता मराठवाडा साहित्य परिषदेत नवा लेखक भेटत असतो. आपल्याला अपेक्षित काय आहे ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
प्रचेतस Wed, 02/17/2016 - 12:49 नवीन
=)) विद्यापीठामागची लेणी बघायला यायचंच आहे एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नाव आडनाव Wed, 02/17/2016 - 13:35 नवीन
प्रतिसादातला एक शब्द कोळीगितांमधे एकला होता, दुसर्‍यांदा आता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मदनबाण Wed, 02/17/2016 - 13:43 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
स
सतिश गावडे Wed, 02/17/2016 - 18:26 नवीन
कोळीगीतातील शब्द "गल्यान" असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
ग
गामा पैलवान Wed, 02/17/2016 - 19:54 नवीन
प्राडॉ, म्या त्ये गल्ल्यात म्हून वाचलं. म्हंटलं येव्हढा फुडारलेपना झाला हल्ली होय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/17/2016 - 13:02 नवीन
नोन्व्हेज खात असायचो तेव्हा सागर मधे जेवलोय प्रचंड गर्दी असते नान ख़ासच. पण मटनात सालं पिस खुप मोठे होते जेवण झालं आणि मित्र मला म्हणाला सर, हे पिस 'बड़े के' तर नसतील अशा शंकेने माझा तिथेच 'वकार युनुस' झाला. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर गुरुवार, 02/18/2016 - 11:40 नवीन
अरारारारा .. उगीचं सांगितलं तुम्ही हे आम्हाला. आता नान खलिया साठी 'सागर' ला पर्याय तुम्हीच सुचवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आकाश खोत Wed, 02/17/2016 - 13:06 नवीन
हे विसरलोच. बरकत चाय. रोक्सी सिनेमा जवळ. एका कपात समाधान होतच नाही. पुन्हा प्यावा वाटतो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/17/2016 - 13:06 नवीन
आकाशराव... लयं लयं धन्यवाद ! मस्त माहिती दिली हाय तुम्ही. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 02/26/2016 - 13:27 नवीन
आमच्या नातेवाइकांनी आमचा अगदी थाटबाट केला ! :) Image removed. अतिशय उत्तम जेवण आणि व्यवस्था होती. Image removed. चांदीच्या ताटात मेजवानी होती... ताटा पासुन वाटी पर्यंत आणि पेल्या पासुन चमच्या पर्यंत सगळं चांदीचे ! अश्या शाही जेवणाचा आनंद संभाजीनगरात घेतला. Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
आ
आकाश खोत Fri, 02/26/2016 - 13:41 नवीन
होय थाटबाट प्रसिद्ध आहे अशा चांदीच्या ताट वाटीतून शाही जेवणासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बाबा योगिराज Fri, 02/26/2016 - 13:47 नवीन
बघा बघा, बिरुटे सर, बघताय ना. तुम्ही लोक्स औरंगाबाद येणार, थाट-बाट ला भेट देणार, आन आमाला सादा संदेश पण नै देणार. मंग गाडीत झुरळ बदला नै घेणार तर काय होणार. उगाच आपलं आमच्या गाव च्या लेर्वे गाडीला नाव ठूतेत लोक्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 02/26/2016 - 15:02 नवीन
दौर्‍याचा कार्यक्रम अचानक बदलल्यामुळे यावेळी घाई झाली.बिरुटे सर आणि आपणास देखील भेटता आले असते. हाताशी वेळ कमी असल्याने यावेळी तिकडे येउन देखील कोणाची भेट घेता आली नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
ब
बाबा योगिराज Fri, 02/26/2016 - 15:58 नवीन
अहो, गंमत केली हो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
आ
आकाश खोत Fri, 02/26/2016 - 13:42 नवीन
वेलकम. तुम्ही पण द्या आता तुमच्या गावाची माहिती एका नव्या धाग्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मराठी कथालेखक Wed, 02/17/2016 - 13:22 नवीन
भटकंती हर्सुल तलाव पण चांगला आहे.. शांत. सलीम अली बाग विद्यापिठातले दोन्ही संग्रहालय (इतिहास विभाग व सोनेरी महल) चांगले आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिवाजी संग्रहालय. गारखेडा स्टेडियमला भेट देवू शकता खादाडी अपुर्वा थाळी , इंडियाना रेस्टॉरंट (दोन्ही उच्च न्यायालयाजवळ) बाकी नावात भोज असलेली हॉटेल्स चांगली आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/17/2016 - 13:43 नवीन
उस्मान भाई-भजे, (पदमपूरा) दिल्लीगेट वरचा फालूदा, सूतगिरणीजवळ हैदराबादी बिरयानी, असं बरंच काही. औरंगाबादचा धागा समृद्ध करून टाकू हाय काय अन नाय काय. पैठणी चांगली मीळते. संगीता धकाते या बनवतात, रामायण क्लचरल हॉल जवळ. आमच्याकड़े लेखक कवी खुप आहेत. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/18/2016 - 09:02 नवीन
मी औरंगाबादला फक्त ७-८ महिने होतो. पण तेवढ्या काळात जीवाचा औरंगाबाद केला :) कारपेक्षा बाईक बरी पडते शहरातून फिरताना. बाकी रिलायन्स मॉल पासून जवळ असलेल शर्विन बार-रेस्टॉरंट चांगल आहे, तिथे मोठा प्रोजेटर टीवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सप्तरंगी Mon, 02/22/2016 - 14:10 नवीन
आमच्याकड़े लेखक कवी खुप आहेत.***
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कंजूस Wed, 02/17/2016 - 17:16 नवीन
बालाजी : महिकर इथला?
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 02/17/2016 - 17:43 नवीन
सगळ्यांनीच छान लिहिलय. एक सहल झाली थोडक्यात! मी दोनदा आले होते. एकदा संपूर्ण सहा तासांसाठी. साखरपुडा अ‍ॅटेंड करून लगेच परत! नंतर लग्नाच्या रिसेप्शनला! दोन्ही वेळी अगत्य, फूड, तेथील घरे असे सगळे आवडले. फूड वेगळ्या चवीचे असते हे नक्की पण आवडले.
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग Wed, 02/17/2016 - 17:46 नवीन
मध्यंतरी टिव्ही वर औ. बाद येथील पानाविषयी वृत्तांत दाखविला होता. तेथे पान चार ते पाच हजार रुपये किमतीचे मिळते असे दाखवले होते. ते तारा पान सेंटरच आहे का? असल्यास. काय बरे टाकत असतील त्यात.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Wed, 02/17/2016 - 18:19 नवीन
सगळ्यात महागडं पान 5000 ₹ च आहे. ते पान मधुचंद्रा वाल्या लोकांसाठी असतंय. त्यातील माल मसाला तर नाही सांगितला त्यांनी. परंतु आधी सांगावं लागेल अस सांगण्यात आलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग
म
मदनबाण Wed, 02/17/2016 - 18:21 नवीन
ते पान मधुचंद्रा वाल्या लोकांसाठी असतंय. त्यातील माल मसाला तर नाही सांगितला त्यांनी. परंतु आधी सांगावं लागेल अस सांगण्यात आलंय. हॅहॅहॅ... "पलंगतोड" पान ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
क
कंजूस Wed, 02/17/2016 - 19:37 नवीन
रस्त्याकडच्या टपय्रांवर ठेवलेले लालभडक समोसे बघवत नाहीत.सकाळी सहालाच वेरूळ उघडते म्हणून बस स्टँडवर गेलो लवकर.बाहेर कुठेच हॅाटेल नाही.स्टँडच्या कँटिनवाल्याने सांगितले पोहे मिळतील सवासहाला. तिकडे फळकुटावर एका परातीत पोहे ओले करून ठेवलेले होते.एकाने भसकन त्यावर फोडणी ओतली आणि ते बशीत आणून दिले.गिळा.यस्टीने मात्र साडेसातला वेरूळला पोहोचवले आणि तिकडे एका गाइडला विचारले " वेळ थोडा आहे काय पाहू?" " १५,१६ आणि ३४." एक ते ३४ सर्व गुंफा बारापर्यंत पाहिल्या.नंतर घृष्णेश्वर पाहून हॅाटेल रूम सोडून अडीचची तपोवन मिळाली होती. लेणी पाहताना खालील संवाद ऐकले- "हिकडं पन मूरतीच हैत चला लवकर." "त्यां काइ नथी,आपरो अहियाँ छे ( ३०-३४ जैन लेणी)।" जैन लोक पर्यटकांच्या बसेस थेट तिकडेच पार्क करतात आणि तिकडूनच कटतात. लेण्यातले न कळणाय्रांनी आणि लहान मुलांना घेऊन अजिबात जाऊ नये.मंगळवारी बंद असतात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा