Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

औरंगाबादला पाहण्या, करण्या आणि खाण्यासारख्या गोष्टी

आ
आकाश खोत
Wed, 02/17/2016 - 11:42
💬 118
औरंगाबादला कट्टा करण्याविषयी एक धागा उघडला गेलाय. मिपावर मी आल्यापासून पहिल्यांदाच औरंगाबादविषयी चर्चा पाहतोय. आनंद झाला. माझे लक्ष नसताना काही धागे झाले असतील, पण मी पाहिलेला पहिलाच. ह्या धाग्यावर मी हि खालचीच माहिती पुरवली होती. पण तिची लांबी पाहून ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा असावा असे वाटले. इथे नसलेली औरंगाबाद विषयी उपयुक्त माहिती मिपाकरांनी पुरवावी. मी औरंगाबादचा आहे पण सध्या तिथे राहत नाही. त्यामुळे यावेळी कट्ट्यात सहभागी नसेन. पण धागा पाहून उत्साह आला आहे, त्यामुळे औरंगाबादविषयी माहिती पुरवतोय. औरंगाबाद शहरात आणि जवळपास पाहण्यासारख्या गोष्टी : पाणचक्की, बिवी का मकबरा, औरंगाबाद लेणी (वेरूळइतक्या प्रसिद्ध किंवा छान नाहीत) गोगाबाबा टेकडी : हे काही टिपिकल प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतले ठिकाण नाही. पण शहराचा मकबऱ्यासकट छान व्ह्यू मिळतो. आणि शहराबाहेर छान हवेशीर जागा आहे. औरंगाबाद हे दरवाजांचे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते. जुने शहर तटबंदी आणि ५२ दरवाजे यांनी बंदिस्त होते. तुम्हाला शहरात फिरताना हे दरवाजे आणि तटबंदीचे काही अवशेष दिसू शकतात. कलेक्टर ऑफिसजवळ एक संग्रहालय आहे. अजिंठा वेरूळ सर्वांना माहित आहेच. वेरूळ येथे लेणी तर आहेतच. पण घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. गणपतीचे एक जुने मंदिर आहे. वेरूळ येथे शिवाजीराजे यांचे पूर्वज शहाजीराजे आणि मालोजीराजे यांचे वतन होते. त्यांचे स्मारक अशातच बांधण्यात आले आहे. खुलताबाद येथे निद्रिस्त मारुतीचे मंदिर आहे. औरंगजेबाची कबर आहे. म्हैसमाळ हे औरंगाबादचे हिल स्टेशन. तिथे छान बालाजी मंदिर आहे. बालाजीचे इतके शांत मंदिर दुसरे नाही. म्हैसमाळच्या रस्त्यावर एक लहान फाटा आहे. पटकन लक्षात येत नाही. तिथून गेल्यावर मार्लेश्वर हे गुहेतले शिव मंदिर आहे. खूप मोठे शिवलिंग पाहायला मिळेल. जटवाडा आणि कचनेर आणि येथे जैन मंदिरे आहेत. जटवाडा येथे भव्य मूर्ती आहेत. पैठणला जायकवाडी धरण आहे. बागेत संगीत कारंजी आहेत. आणि संत एकनाथ यांची समाधी आहे. औरंगाबादपासून लोणार सरोवरसुद्धा जवळ आहे. खरेदी औरंगाबादमध्ये पैठणी आणि हिमरूशाली छान मिळतात. बऱ्याच दुकानात मिळतात. पण पर्यटक औरंगाबाद वेरूळ रस्त्यावरच्या दुकानात जास्त जातात. सिडकोमध्ये लोकमत भवनच्या बाजूलासुद्धा एक छान दुकान आहे. पण ह्यावर महिलांनी जास्त माहिती द्यावी. गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, सराफा, सिटी चौक हे सर्व एकमेकांना लागून असलेले भाग खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत. कपडे, पुस्तके, दागिने, अत्तरे, पूजा साहित्य, इलेक्ट्रोनिक्स अशा सर्व गोष्टींची दुकाने ओळीने आहेत. खादाडगिरी गायत्री चाट भांडार : गुलमंडी आणि क्रांती चौक. कचोरी समोसा आणि मुंगभजी गरम आणि मस्त मिळतात. वर्षानुवर्षे पासून उत्कृष्ट चव. उत्तम, गुलमंडी : गरम गरम जिलेबी आणि इमरती, आणि बरेच काही. बाजूला एक छोटे दुकान आहे तिथे मसाला दुध छान मिळते. ओमकार पावभाजी क्रांती चौक लक्ष्मी सँडविच क्रांती चौक पूर्णानंद औरंगपुरा : हे माझ्या शाळेतल्या भागातले मुलांचे आवडते दुकान. इथली वडापाव, मसाला पाव, सामोसा, दाबेली यांची चव इतक्या वर्षात बदललेली नाही. औरंगाबादला गेलो आणि तिथे नाही गेलो तर चुकल्यासारखे वाटते. पाणीपुरी : पुणे आणि मुंबईला बहुत करून रगडावाली पाणीपुरी देतात. पण औरंगाबादला बटाटावाली जास्त मिळते. चांगले पाणीपुरी वाले : दयावान गारखेडा, पंकज कुमार एन ४, गुरुकृपा सिडको समोर मथुरावासी : भल्ला आणि गुजीया हि इथली खासियत. बाकी सर्व प्रकारची चाट मस्त मिळते. पाणीपुरी अगदी वेगळ्या प्रकारची. घट्ट आणि तिखट पाणी असते, आणि त्यात डाळिंब आणि अंगूरसुद्धा टाकतात. तिथून जवळच पैठण गेटला लक्की आणि पॅरिस हि ज्युसेसची मस्त सेन्टर्स आहेत. गुरुकृपा सूतगिरणी चौक जवळ : चाट आणि मिठाईचे चांगले दुकान. गोधुली दाबेली : कनॉट प्लेस. दाबेली सोबत भेलसुद्धा छान आहे. कनॉटच्याच कोपर्यात एक मस्त भेळवाला आहे. तारा पान सेंटर : पान खाण्याचे शौकीन असणार्यांना हे नाव माहित असतेच. इथल्या पानाची सर पुणे मुंबईला खाल्लेल्या एका हि पानाला नाही. अगदी पुणेकर जिथे गर्दी करतात त्या शौकीन, नाद वगैरेसारख्या ठिकाणीसुद्धा नाही. मी औरंगाबादला गेलो कि ऑफिसमध्ये लोक इथला पान आणण्याची वाट पाहतात. उत्साहाच्या भरात जे आठवेल ते लिहिले आहे. खादाडगिरीवर किती लिहिले आहे त्यावरून आणखी माहिती हवी असल्यास विचारावे. जाणकारांनी आणखी माहिती पुरवावी.

प्रतिक्रिया द्या
40516 वाचन

💬 प्रतिसाद (118)
र
रेवती Wed, 02/17/2016 - 20:24 नवीन
हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
य
यशोधरा Wed, 02/17/2016 - 23:10 नवीन
अरारा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रचेतस गुरुवार, 02/18/2016 - 02:26 नवीन
१ ते ३४ गुंफा फ़क्त ४:३० तासात???? बहुत नाईसान्फ़ी हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस गुरुवार, 02/18/2016 - 05:20 नवीन
होय. पहिल्या एक ते नऊ विहारात डोकावलो.दहा ते पंधरापैकी दोन नीट पाहिल्या.कैलाश (१६),खोटा/छोटा कैलास,१७ ते२९ पैकी दोन तीन आणि ३० ते ३४ पुर्ण हे सर्व बायको आणि लहान मुलीला घेऊन शक्य झाले कारण मी अगोदर सकाळी सहा ते दुपारी एक पुर्ण पिंजून काढले होते.कुठे काय आहे ते माहित होते.कॅम्रा नव्हता त्यामुळे त्या नादात वेळ वाया गेला नाही.OUDL LIBRARY एक चांगलं पिडिएफ पुस्तक वाचू शकता कोणास फारच उत्साह असेल तर. फुटलेल्या मुर्ती पाहिल्या की नाराजी येते आणि लोक आवरतं घेतात.त्यापेक्षा बदामि छान आहे.हॅाटेल्सही दोन किमीरात भरपूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
P
palambar Mon, 02/22/2016 - 14:56 नवीन
आम्हि ही गेलो होतो तेव्हा शाळेची सहल आली होती , ईतका गोंधळ , मलाही वाटते की अश्या ठिकाणी सर्वांना प्रवेश देऊ नये , मुलांना काही कळत नाही आणि अश्या जागतिक ठेव्याचे नुकसान टाळता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
आ
आकाश खोत Wed, 02/17/2016 - 23:49 नवीन
अंबा अप्सरा टाकीज समोर साबुदाणा वडा सुद्धा बेस्ट.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 02/18/2016 - 05:23 नवीन
नकारात्मक प्रतिसादाबद्दल माफ करा.मी फक्त माझं निरीक्षण दिलं.
  • Log in or register to post comments
P
Parag Purandare गुरुवार, 02/18/2016 - 06:57 नवीन
औरंगाबाद-बिड रस्त्यावर औरंगाबादपासून फक्त ४० कि.मी. अंतरावर अंबड तालुक्यात जामखेड नावाचे छोटेसे गांव आहे. हे जामखेड रामायणातील जांबुवंताचे गांव म्हणून प्रसिध्द आहे. या गावांजवळ एका डोंगरावर एक गुहा असुन ती जांबुवंताची गुहा समजली जाते. याच गुहेत जांबुवंताचे मंदिरही बनवलेले आहे. मात्र जामखेडचे वैशिष्ट्य म्हणजे एक फारसे कुणाला माहिती नसलेले उत्तर चालुक्यकालीन (१२ वे शतक) शंकराचे खडकेश्वर मंदिर या गावांत आहे. गावक-यांनी बांधकाम करुन मंदिराची बाहेरुन वाट लावली आहे पण आपल्या सुदैवाने मंदिराचा आतील भाग सुस्थितीत असुन प्रेक्षणिय आहे. मंदिराची रंगशिळा अष्टकोनी असुन या रंगशीळेच्या आठही कोनांवर उभ्या असलेल्या खांबांवर उत्क्रुष्ट कोरीव काम आहे. औरंगाबादला जाणा-या कुणीही हे ठिकाण चुकवु नये असेच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/18/2016 - 09:02 नवीन
अवांतर : पपु, मला आठवतं त्यानुसार जांबुवंत महाभारतातील एक पात्र आहे. त्याची कन्या जांबवती श्रीकृष्णाची एक पत्नी आहे. असो. मंदिराचा परिचय आवडला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Parag Purandare
अ
अभ्या.. गुरुवार, 02/18/2016 - 09:07 नवीन
रामायणात पण कोणतरी असतय हो अस्वलासारखे जांबवंत. नल, नील, जांबवंत. अंगद ही ग्यांग पाहिल्याचे आठवते. भौतेक सेतूची असाइनमेंट त्यानीच घेतली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/18/2016 - 11:35 नवीन
जांबवंत रामायण आणि महाभारत दोन्हीकडे आहे. मार्कंडेय ऋषी, परशुराम, हनुमान, बिभीषण हे देखील दोन्हीकडे हजेरी लावतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/18/2016 - 14:03 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद! :-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रचेतस गुरुवार, 02/18/2016 - 14:14 नवीन
आचार्य अत्रे ह्यांची पण एक प्रसिद्ध कथा आहे. 'जांबुवंत दंतमंजन' फारच विनोदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सनईचौघडा गुरुवार, 02/18/2016 - 07:15 नवीन
मस्त माहिती. वाखु साठवली आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस.योगी गुरुवार, 02/18/2016 - 11:10 नवीन
१९९६ ते २००२ औरंगाबाद मध्ये होतो. खादाडी भरपूर झाली. सर्व सदस्यांनी माहिती दिलीच आहे. परंतु काही ठिकाणे अपेक्षित होती. ती पुढीलप्रमाणे गुलमंडी - 'मिलन मिठाई' - मलई पेढा गुलमंडी - 'उत्तम मिठाई' - इमारती + भजी चोम्बिनतिओन गुलमंडी - 'बसय्ये बंधू' - खारे शेंगदाणे जम्बो साईझ सिडको बस स्थानक - 'चारमिनार' - बिर्याणी साठी प्रसिद्ध चेलीपुरा - 'गुलशन टी हाउस' - अप्रतिम चहा दिवाण देवडी - 'भोलेशंकर (आप्पा) चाट भांडार' - झणझणीत भेल, दही बटाटा पुरी अफलातून हर्सूल - 'प्रिया धाबा' - मटन भारी आहे. टीवी सेंटर कॉर्नर - 'अनिल भाऊ' ची अंडा भुर्जी नोंद :- १. मी औरंगाबाद २००२ मध्ये सोडलं. तो पर्यंत हि ठिकाणे हयात होती. आता नवीन झालेली ठाऊक नाहीत. २. काही बंद पडलेली ठिकाणे - गोविंदा डायनिंग हॉल, खडकेश्वर - व्हेज थाळी क्रांती चौकात चायनीजची गाडी होती - 'Prowns hakka rice' (३ वर्ष वेड्यासारखा खाल्ला.) सिटी चौकात 'गरीब नवाझ' हॉटेल होता. 'सागर' च्या तोडीचा होता लेकाचा. रेट पण शुल्लक. कधी बंद झालाय माहित नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Mon, 02/22/2016 - 15:49 नवीन
गोविंदा सुरु आहे दादा. घरासमोरच आहे. या भेट घडवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस.योगी
ए
एस.योगी गुरुवार, 02/18/2016 - 11:11 नवीन
चोम्बिनतिओन* = कोम्बिनेशन
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/18/2016 - 13:32 नवीन
रोफ्ल @ चोम्बिनतिओन आणि त्याचं एक्ष्प्लनतिओन =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस.योगी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/18/2016 - 11:47 नवीन
म. गांधी चौकात म्हणजे शहागंज मधे लाखेच्या सुंदर बांगडया मिळतात. ऑर्डर प्रमाणे छान डिझाइनच्या बांगडया करून मिळतात. एकदा या विषयावर स्वतंत्र धागा काढायचा आहे. -दिलीप बिरुटे (चूड़ीवाला बाबा) :)
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 02/18/2016 - 12:01 नवीन
ही खरी कामाची माहिती! आता वाखु साठवते :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/18/2016 - 13:31 नवीन
एक नंबर माहिती!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
स
सप्तरंगी Mon, 02/22/2016 - 14:08 नवीन
बरीच माहिती आहे तुम्हाला माझ्या औरंगाबादची:), पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ? गायत्री चाट भांडार आणि तारा पान मस्तच. मध्ये मी काळे बंधूंच्या जेवणाबद्दल आणि कुठल्यातरी शेवगाच्या शेंगांच्या मसाला भाजी बद्दल पण ऐकले, छान आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Mon, 02/22/2016 - 15:47 नवीन
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ? बाब्बो. भावा कुठल्या साळचा रे तू. ये तुला काकूंच्या हातचा(पूर्णानंद) गरमा गरम सोमोसा खाऊ घालतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
ब
बाबा योगिराज Mon, 02/22/2016 - 15:47 नवीन
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ? बाब्बो. भावा कुठल्या साळचा रे तू. ये तुला काकूंच्या हातचा(पूर्णानंद) गरमा गरम सोमोसा खाऊ घालतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
आ
आकाश खोत गुरुवार, 02/25/2016 - 16:18 नवीन
आ कृ वाघमारे प्रशाला. :) तुम्ही कुठले बाबा योगीराज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
ब
बाबा योगिराज गुरुवार, 02/25/2016 - 20:30 नवीन
आजूनबी लांडगे सर हायेत, पवार सर हायेत, कुलकर्णी सर हायेत, वादें म्याडम हाये का सोडून गेल्यात, अरे त्ये जाऔ दे. दहावी कंची रे तुही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश खोत
आ
आकाश खोत Fri, 02/26/2016 - 09:24 नवीन
२००४. तुम्ही कोणत्या वर्षी झाले एस एस सी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
ब
बाबा योगिराज Fri, 02/26/2016 - 13:35 नवीन
1998
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश खोत
आ
आकाश खोत Fri, 02/26/2016 - 13:39 नवीन
सिनियर म्हणजे तुम्ही आमचे. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
ब
बाबा योगिराज Fri, 02/26/2016 - 13:49 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश खोत
स
सप्तरंगी Fri, 02/26/2016 - 16:25 नवीन
१९९८ ला ssc आणि नाव काय तर बाबा योगीराज :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
ब
बाबा योगिराज Fri, 02/26/2016 - 16:49 नवीन
नै आजोबा योगीराज "नीट" वाटलं नसत ना. म्हणून बाबा योगीराज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
स
सप्तरंगी गुरुवार, 02/25/2016 - 17:12 नवीन
seriously? sb मध्ये असताना आम्ही नेहमी जायचो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
ब
बाबा योगिराज गुरुवार, 02/25/2016 - 20:32 नवीन
मायला किती लोक्स हायेत इत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
आ
आकाश खोत गुरुवार, 02/25/2016 - 16:17 नवीन
सुरु आहे. आणि तीच चव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
स
सुमीत भातखंडे Mon, 02/22/2016 - 15:14 नवीन
छान माहिती. वेगळा धागा केला ते बरं झालं. प्रतिसादांमधूनही बरीच भर पडतेय.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 02/22/2016 - 16:40 नवीन
हे सगळे वाचून एकदा औरंगाबादला भेट द्यावीशी वाटत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 02/23/2016 - 00:38 नवीन
एक सुचवावसं वाटलं: या धाग्याच्या निमित्ताने देशभरातल्या शहरांविषयीही (महाराष्ट्राच्या तरी नक्कीच, पण निदान जिथे जिथे मराठी-भाषिक पोहोचले आहेत अशा इंदूर, ग्वाल्हेर, दिल्ली, वगैरे शहरांविषयीही) असेच संकलित धागे यावेत. या प्रकारे मिपावर गावगप्पा नावाचं एक उत्तम आणि आगळंच (unique / differentiating अशा अर्थी) सदर सुरू करता येईल. हल्ली कामामुळे म्हणा वा मौजेसाठी देशांतर्गत प्रवास करणं वाढलं आहे. या सदरातून बर्‍याच उपयोगी माहितीचं आदान-प्रदान होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 02/23/2016 - 04:33 नवीन
अनुमोदन ! रच्याकने या निमीत्ताने का होईना . नदीपलीकडेही जग असते हे कळेल एका दोन अक्षरी नाव असलेल्या शहरातील लोकांना .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
प
प्रचेतस Tue, 02/23/2016 - 04:34 नवीन
प्रतिसाद हीन वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
य
यशोधरा Tue, 02/23/2016 - 04:42 नवीन
आठवले का काही? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/23/2016 - 05:01 नवीन
:) काही लोकांना उगाच तेच ते विषय चघळून वर आणायची सवयच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 02/23/2016 - 05:02 नवीन
दोन अक्षरी नावाचं शहर आहेच तसं. भुलाये ना बने!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/23/2016 - 05:03 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
उ
उगा काहितरीच Tue, 02/23/2016 - 10:12 नवीन
सॉरी भौ , हघ्या हे टाकायचे राहिले होते .! :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कंजूस Wed, 02/24/2016 - 03:22 नवीन
नदीपलीकडच्या लोकांनी सूड काढला तर काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ख
खटपट्या Tue, 02/23/2016 - 23:20 नवीन
औरंगाबाद पदमपुरा अग्निशमन दलात माझा चुलत भाउ आहे. गेल्या १५ वर्षात आम्ही भेटलो नाही. कधी गेलो तर ही माहीती उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/24/2016 - 03:23 नवीन
आता एक नकाशाही टाका.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 02/24/2016 - 23:49 नवीन
[वरील उजव्या कोपर्‍यातील download हा दुवा वापरा म्हणजे नकाशा पूर्ण स्वरुपात उघडेल.] या दुव्यावर View --> Search असं जाऊन खालील ठिकाणे शोधू शकाल. attar galli तारा पान सेंटर क्रांती चौक सावरकर चौक झी कॉर्नर पूर्णानंद औरंगपुरा गुलमंडी उत्तम, गुलमंडी कॅनॉट प्लेस गोधुली दाबेली काळे बंधू हॉटेल प्रोझोन मॉल बाकी ठिकाणे मला वेळ मिळेल तशी अ‍ॅड करीन, ज्यांना मदत करायची इच्छा असेल त्यांनी जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा! या लेखात लिहिलेल्या सूचनांनुसार Addition-->Add Marker (Simple) या मार्गाने मदत करावी. [या निमित्ताने २५ वर्षांनंतर औरंगाबादला स्वस्थपणे भेट द्यावीशी वाटायला लागलेलं आहे!]
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Fri, 02/26/2016 - 09:12 नवीन
चांगली कल्पना आहे. वेळ मिळेल तसा प्रयत्न करतो यात ठिकाणे टाकण्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा