मॅरेथॉन ट्रेक - राजगड ते तोरणा
यावेळचा ट्रेक म्हणजे मॅरेथॉन ट्रेक होता. राजगड ते तोरणा तब्बल १४ किमी अंतर ते ही डोंगर सोंडेवरून.
राजगड म्हणजे सकाळी जावून संध्याकाळी परत अशातला किल्ला नक्कीच नव्हे. राजगड म्हणजे तीन बाजूस तीन संरक्षक माच्या आणि मध्ये बालेकिल्ला! आणि तो पाहायचा असेल तर निवांत मुक्काम ठोकूनच पाहावा लागतो. संपुर्ण गड बारकाईने पाहायला किमान दोन संपुर्ण दिवस तरी हाताशी लागतात. साक्षात किसनदेवांनी राजगडावर आधीच लेख लिहिला असल्यामुळे मी बापुडा काय लिहणार म्हणून फक्त राजगड ते तोरणा या वाटेवर आलेले अनुभव लिहतोय.
तर २२ जानेवारीला रात्री लक्झरी बसने राजगडसाठी रवाना झालो, पहाटे ५ वाजता गुंजवणे गावात पोचलो. राजाराम रसाळ यांनी पहाटे ५.३० वाजताच चहा आणि दुपारचे जेवण तयार ठेवलं होत. मग दुकानात फक्कड चहा पिउन, फ्रेश होऊन ६ वाजता गड चढायला सुरुवात केली. आमचे गाईड असलेले मामा हे ६५ वर्षाचे होते आणि महिन्यातून ३ ते ४ वेळा राजगड ते तोरणा हा ट्रेक गाईड करतात. मनातल्या मनात त्यांना सलाम केला.
दूरवर दिसणारा राजगड
इतक्या सकाळीच गड चढण्याची हि पहिलीच वेळ असल्यामुळे मजा येत होती. पण खड्या चढणीमुळे लगेच दमायला होत होत. चोर दरवाज्याने ८ वाजता गडावर पोचलो. चोर दरवाज्याच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे डाव्या पायाचा गुढघा पायरीवर आपटला. म्हटलं चल श्रीगणेशा झालाय आता ट्रेक चांगला होणार .
चोर दरवाजा
वरून दिसणारा नजारा
पद्मावती माचीवर फडकणारा भगवा ध्वज
चालून आलेली वाट
सकाळचे ८ वाजले तरी बोचऱ्या वाऱ्यामुळे थंडी वाजत होती. पद्मावती माचीवर बसून घरून आणलेली शिदोरी उघडली आणि हर हर महादेव म्हणून फस्त केली.
पद्मावती तलाव
तिथे ओळख परेड झाली. कोल्हापूर वरून मुंबईला एका सभारंभासाठी म्हणून आलेले एका कुटुंबातील ३ जण तो सभारंभ सोडून ट्रेकला आले होते, २ बहिणी आणि १ भाऊ.
ओळख परेड
एक ६८ वर्षाचे तरुण काका आपल्या ३५ वर्षाच्या मुलासोबत ट्रेकला आले होते. त्यांना तरुण म्हटलं कारण पूर्ण ट्रेक त्यांनी सहज पुरा केला, त्यांनी ६५ वा वाढदिवस कैलाश मानसरोवरात साजरा केला, त्यांचे जवळ जवळ शंभर एक ट्रेक झालेत. त्यांचा स्वतासोबत फोटो काढायची इच्छा त्यांना सांगितल्यावर ट्रेक पूर्ण झाल्यावर छान फोटो काढू अस आश्वासन दिल. पद्मावती देवीच दर्शन घेऊन चालायला लागलो. ठिकठिकाणी वेगवेगळ काम चालू होत. सदरेच बांधकाम चालू होत त्यात आतमध्ये जाऊन उभे केलेले लाकडाचे खांब बघितले.
तुटलेली तोफ
फोटो साभार - प्रथमेश
महादेव मंदिर
सदर
लाकडी खांबावरील नक्षी
बालेकिल्ला
अवशेष
वास्तूंचे चौथरे
संजीवनी माचीला वळसा घालून राजगडातून उतरू लागलो.
तटबंदी
तटबंदी
नजरेत न सामावणारी तटबंदी
उतरणारी वाट बऱ्यापैकी घसरट होती त्यामुळे बरेच जण चालत कमी पडत जास्त होते.
तर समोरून गावात राहणाऱ्या एक ताई डोक्यावर हंडा, हातात खाऊ सामानाची थैली घेऊन चालत येताना दिसल्या. त्या सहज रीतीने तो चढ चढून राजगडावर गेल्या. आयला म्हटलं काय राव हे, इतके ट्रेक करून पण आपण धड चालायला शिकलो नाही आणि त्या ताई इतक ओझ घेऊन पण सहज चढून गेल्या.
सुवेळा माची
मागे राहिला राजगड
कारवीची फळे - त्यांच्यावर चिकट द्रव होता आणि वास पण खूप घाण होता
आता फक्त दूरवर दिसणाऱ्या तोरणा गडापर्यंत चालायचं होत.
दूरवर दिसणारा तोरणा
दूरवर दिसणारा तोरणा
हे एकच घर त्या वाटेवर होते
कधी दाट झाडीतून तर कधी बोडक्या वाटेवरून उतरत आम्ही पाल खिंडीत डांबरी रस्त्यावर पोचलो. आराम करत असतानाच एक गावकरी भाऊ ताक आणि लिंबू सरबत विकायला आले मग काय सर्वजण तुटून पडले. त्यांचा चांगला धंदा करून परत चढणीला लागलो. वाटेला लागायच्या आधी संस्थेतर्फे पाल खिंडीत दिशादर्शक पाटी लावली जेणेकरून कोणीही ट्रेकर रस्ता चुकू नये. कारण एकाच ठिकाणावरून ३ वाट निघतात.
गर्द झाडीतून चालताना छान वाटत होते. पूर्ण रस्ता कारवीची झाडे सोबत होती, दुसरी कुठची झाडेच त्या डोंगरसोंडेवर नव्हती.
तासाभराने आम्ही खोपडेवाडीत जेवण्यास थांबलो. तिथल्या माणसांना पाणी लांबवरून आणावे लागते पण तरीही पाण्याचा ते धंदा करत नाहीत. ट्रेकर्स स्वतःहून पाण्याचे पैसे देतील तेव्हढे घेतात. तिथे आम्ही दुपारचे जेवण उरकून घेतले. १५ मिनिटे विश्रांती घेऊन परत तोरणाकडे कूच केले. तोरणा किल्ला जस जसा जवळ येत होता तशी चढण तीव्र होत होती. डोक्यावर उन मी म्हणत होते. आता सावरत चालावे लागत होते. सर्वांचा वेग मंदावला होता.
एका ठिकाणी थेट ४५ अंशाची चढण होती ती चढून बुधला माचीच्या तटाला भिडलो. स्वराज्याची पहिलं तोरण, स्वराज्याचा पहिला किल्लाच तो त्याचा तट सुद्धा १ नंबर कठीण होता.
तटाला असलेली शिडी
चाललेली डोंगररांग
दूर दिसणारा राजगड
तटबंदीचे बांधकाम
तटबंदी नंतर वाटल पोचलो पण कसच काय अजून दिल्ली खूप दूर आहे अस गाईड काकांनी सांगून हवा काढून टाकली. आता पाय बर्यापैकी बोलू लागले होते. एनर्जी संपत आली होती.
एका ठिकाणी चढायला कठीण होत, घसरल्यावर डायरेक्ट दरी. त्या पोइंट ला आम्ही नामकरण केल स्पायडर पोइंट कारण तिथे दोन्ही हात आणि दोन्ही पाय लावून कोळ्यासारख चढाव लागल.
स्पायडर पोइंट
तीन चार अजून कसोटीच्या जागा पार करूनच आम्ही किल्ल्यात प्रवेश केला आणि सुटकेचा निश्वास सोडला. पुन्हा लिंबू सरबताची पार्टी करून आम्ही मेंगजाई मंदिराच्या दिशेने चढू लागलो. अखेर १२ तासाच्या पायपिटी नंतर आम्ही मुक्कामी आलो.
मेंगजाई मंदिराबाहेर सर्वांनी पाठीवरचा बोजा उतरवला. एक जबरदस्त ट्रेक पूर्ण केल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतेच पण सहभागी सदस्यांनी मोहीम निर्धोक पणे पार पडली म्हणून आयोजक सुद्धा खुशीत होते. ट्रेक चालू असताना मजा मस्करी चालू होतीच पण आता त्याला उधाण आले होते. सर्वांच पाणी संपल होत म्हणून मी, सचिन आणि प्रथमेश पाणी आणायला गेलो."फक्त झऱ्यातून पाणी भरा रे" असा खालच्या गावातून गडावर जेवण करायला आलेल्या मावशींचा सल्ला ऐकून त्या चौकोनी विहिरीकडे गेलो. आमच्याकडे बॉटल्स होत्या त्या भरून घेतल्या, तेव्हड्यात ग्रुप मधली स्वीटी आली. तिला बाजूलाच वाड्यात राहणाऱ्या मजुरांकडून बादली द्यायला मस्का लावायला पाठवलं आणि चाल यशस्वी ठरली. त्यांनी दोन प्लास्टिकचे मोठे जार दिले.
विहिरीतील पाणी जणू काही बर्फाच पाणी असाव इतक थंड होत. सचिन खाली विहिरीत उतरला होता. त्याच्याकडे ते जार दिले आणि ते भरून वरती घेऊन आलो. खालच्या गावातली काही मंडळी गडावर ताक, दही, चहा विकण्यासाठी गडावरच वास्तव्याला असतात. त्यांच्या मदतीने आम्ही चहासाठी तीन दगडांची चूल पेटवली. ७.३० वाजता जेऊन झोपायची तयारी करत असतानाच नितीन आणि प्रथमेश आले, त्यांनी ओढत नेउन अंताक्षरी खेळायला लावली. मैफल मस्त रंगली. दोन्ही टीम मधील गायक किल्ला लढवत होतेच पण स्मिता देसाई हिला आम्ही गाना डॉट कॉम नाव ठेवलं. कुठल्याही अक्षराचे गाणे तिच्या तोंडावरच. हे म्हणजे पीएचडी केलेल्या प्राध्यापका समोर केजी ची मुल असा सामना चालू होता. ११ वाजता आम्ही आवरते घेऊन दिवेकरांचे भूत बघण्यासाठी गेलो.
दिवेकर पूर्वी तोरणाचे किल्लेदार होते आजही त्यांचा वावर गडावर आहे अशी वंदता आहे. ग्याझेट मध्ये तशी नोंद आहे अस प्रथमेशने सांगितलं. अनेक किस्से प्रसिद्ध आहेत त्यांचे. पण आम्हाला मात्र त्यांनी काही दर्शन दिले नाही. भुताचे दर्शन होण्या इतपत आम्ही पुण्यवान नसू असे समजून आम्ही दोन चार भुतांच्या गोष्टी एकमेकाला ऐकवून झोपलो.
थंडी असली तरी घोंगावणारा वर नव्हता म्हणून खुल्या आसमंतात आम्ही झोपू शकलो. ६ वाजता एक एक जण उठून तयार होत होता. सकाळच्या चहा सोबत होते पतंजली नुडल्स. आदल्या दिवशी तयार जेवणाच्या पाकीटा सोबत वाटलेले नुडल्सचे पाकीट सर्वांकडून घेऊन एकत्र बनवायला घेतले. ग्रुप मेंबर ३५ असताना देखील फक्त ३३ पाकीट आली त्यामुळे अजून कोणी दिल नाही याची विचारपूस चालू असताना थोड्या वेळाने माझ्या बायकोने पाकीट आणून दिल. मग काय माकडाच्या हातात कोलीत भेटल्यावर काय होणार तेच झाल. माझी आणि माझ्या बायकोची यथेच्छ खेचाखेच चालू झाली.
चहा नाश्ता आटपून मेंगजाई देवीची आरती केली.शार्दुलने नेहमीप्रमाणे ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र बोलून झाल्यावर नितीनने देवीला मालवणी भाषेत गाऱ्हाण घातले.
मेंगजाई देवी
ग्रुप फोटो
पुन्हा एकदा पाठीवर दप्तर घेऊन सर्व विद्यार्थी सह्याद्रीच्या शाळेतून घरी जाण्यास तयार झाले. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजायला लावण्या सारखी आहे. तिला फोटोत सामावून बिनीच्या दरवाज्याने वेल्हे गावात उतरलो.
बिनीचा दरवाजा
बरीच मंडळी गड चढायला सुरुवात करत होती. एक आरामशीर कुटुंब कार मधून आले होते, त्यांनी विचारलं किती वेळ लागेल वर चढायला. वरती चढायला लागणारा वेळ ऐकून त्यांनी गाडी यु टर्न मारून परत फिरवली. त्या कुटुंबात ९० किलोच्या आसपास वजन असणाऱ्या २ काकू, १ मेक अप थापलेली २५/२६ वर्षाची मुलगी आणि २ त्याच वयाची मुल होती. मनात म्हटलं चांगला निर्णय घेतलात नाहीतर गड चढेपर्यंत काही खर नव्हत. लोहगडा सारखच इथेही थोडस चढाव लागेल या अपेक्षेने बहुतेक ते आले होते. गावातल्या शाळेत हात पाय धुवून तिथल्याच हॉटेलात भरपेट जेवण करून ट्रेकची सांगता केली.
एकूण १८ किमी चालण झाल होत, राजगड संपूर्ण पहायचा राहिला होता. सुवेळा माची, बालेकिल्ला अशी कितीतरी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे बघायची राहून गेली. ह्या ट्रेकच्या सुरुवातीलाच अमित दादाने सांगितलं होत की "राजांची राजधानी राजगड ते आपल्या स्वराज्याच तोरण बांधल तो तोरणा" असा आपला ट्रेक असणार आहे. राजगड पूर्ण बघायला नाही भेटणार. पण आता त्या राजधानीची ओढ इतकी लागली आहे की गुगल वर तेच सर्च होतंय आता लवकरच जायला हव.
एकदाचा हा मॅरेथॉन ट्रेक संपला. एकूण १८ किमी चालण झाल होत, जवळ जवळ १७ टेकड्या पार केल्या होत्या. राजगड संपूर्ण पहायचा राहिला होता. सुवेळा माची, बालेकिल्ला अशी कितीतरी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे बघायची राहून गेली. ह्या ट्रेकच्या सुरुवातीलाच अमित दादाने सांगितलं होत की "राजांची राजधानी राजगड ते आपल्या स्वराज्याच तोरण बांधल तो तोरणा" असा आपला ट्रेक असणार आहे. राजगड पूर्ण बघायला नाही भेटणार. पण आता त्या राजधानीची ओढ इतकी लागली आहे की गुगल वर माझ्याकडून तेच सर्च होतंय, राजगडाच्या सुवेळा माचीचे फोटो, बालेकिल्ल्याचे फोटो पाहून राहवत नाहीये. आता लवकरच जायला हव.
दोन महारथी - काका आणि आमचे गाईड
जेवायला बसलेल्या हॉटेलातील राजांचे पोस्टर

💬 प्रतिसाद
(11)
श
शान्तिप्रिय
Wed, 02/17/2016 - 14:25
नवीन
व्वा अप्रतिम प्रकाशचित्रे आणि वर्णन.
जगप्रवासीजी , या ट्रेकचा व्रुत्तांत सादर केल्याबद्दल आभार.
जय भवानी जय शिवाजी!
- Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज
Wed, 02/17/2016 - 15:24
नवीन
जगप्रवासी,
मस्तच ट्रेक वर्णन आणी फोटो.
ह्या निमीत्ताने आमच्या ह्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही काही वर्षांपुर्वी हा ट्रेक केला होता, असाच एक दिवसाचा पण तोरणा ते राजगड असा.
खुप दिवसात राजगड आणी तोरण्याला गेलो नाही पण बराच बदल जाणवतोय. कोकणदरवाजा चांगला बांधून काढलाय आणी बुधला माचीच्या पॅचला पण शिड्या लावल्यात. पण शिड्या लावल्याने सोपे झाले असले तरी राजगड-तोरण्याच्या ट्रेकचा थरार मात्र कमी झालाय कारण हा पॅचच एक थरार होता (हेमावैम).
अवांतर - ह्यावेळेला राजगडला चोरदरवाज्याने गेलात आता पुढच्या वेळी वेगळ्या वाटेने जा. राजगडला जायला प्रचलीत दोन वाटा असल्यातरी अजून आणखीन ४ वाटांनी राजगड चढता येतो. तोरण्याचेही तसेच आहे.
पुट्रेशु.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 02/17/2016 - 15:37
नवीन
मस्त झालेला दिसतो आहे ट्रेक.. फोटोही छान!
स्वाती
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 02/17/2016 - 15:41
नवीन
मेंगाईचं मेंगजाई कधीपासून झालं?
- Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज
Wed, 02/17/2016 - 15:44
नवीन
अगदी हेच मनात आले होते.
- Log in or register to post comments
ज
जगप्रवासी
Fri, 02/19/2016 - 06:26
नवीन
माफ करा, ते मेंगाई देवीचं मंदिर आहे चुकून मेंगजाई लिहील गेल आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
स्वच्छंदी_मनोज - पुढच्या वेळेने नक्कीच वेगळ्या वाटेने जाईन कारण राजगड बघितलाच नाहीये.
- Log in or register to post comments
त
तिमा
Fri, 02/19/2016 - 06:38
नवीन
राजगडचा बालेकिल्ला अवश्य पहाण्यासारखा आहे. तुमचा ट्रेक आवडला.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 02/19/2016 - 07:06
नवीन
राजगड हे वेड आहे.
तुमचा वृत्तांत आवडलाच. फोटोही सुंदर आणि भरपूर
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Fri, 02/19/2016 - 10:30
नवीन
मस्त ट्रेक ,फोटो आणि व्रुत्तांत!! पुलेशु.
- Log in or register to post comments
S
sagarshinde
Mon, 02/22/2016 - 06:41
नवीन
वृत्तांत खूप मस्त आहे मला खूप आवडला.
राजगड तोरणा ट्रेक मी अजून केला नाही, कालच मी K2S ट्रेक (कात्रज ते सिंहगड ट्रेक) मुनलाईट ट्रेक केला. ट्रेक खूप मस्त झाला, आता राजगड तोरणा ट्रेकच्या तय्यारीला लागणार आहे. तुमच्या प्रवासवर्णनाच मला नक्कीच खूप फायदा होईल.
- Log in or register to post comments
स
समी
Wed, 02/24/2016 - 09:29
नवीन
मस्तच ट्रेक वर्णन आणी फोटो.
काही वर्षांपुर्वी हा ट्रेक केलेला. पण ३ दिवसांचा. पहिल्या दिवशी सकाळी ६ ला राजगड चढायला सुरवात केली. साधारण १२ ला पोहचललो. जेऊन थोडा आराम करून तोरण्याला जायल सुरवात केली रात्री १२ ला पोहचलो.... पण तेव्हा शिडी नव्हती... सकाळी तोरण्याहुन रायगडला जायला निघालो... सिंगणापूरच्या वाटेने ... २ र्या दिवशी रात्री ८ च्या सुमारास पोहचलो... तुमच्या ट्रेकने आमच्या ह्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद....
आणि एक महत्वाचे राजगड कितीहि वेळा केला तरी मन भरतच नाहि..... कारण तो राजांचा गड आहे... गडांचा राजा...
तुमच्या पुढच्या ट्रेकसाठी शुभेच्छा
- Log in or register to post comments