फक्त २५१ रुपयांत स्मार्टफोन!
Primary tabs
मिपाकर हो, गेले आठवडाभर आंतरजालावर एक बातमी फिरत आहे कि १८ फेब्रुवारी ला एक स्मार्टफोन लौंच होतोय तोही केवळ २५१ रुपयात .रिंगिंग बेल ही भारतीय कंपनी गुरुवारी आतापर्यंतचा सर्वात कमी किंमतीचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. ‘फ्रिडम २५१’ या स्मार्टफोनची किंमत अवघी २५१ रुपये इतकी असणार आहे. ‘फ्रिडम २५१’ स्मार्टफोनला ४ इंचाची स्क्रिन असणार असून, १.४ Ghz क्वाडकोअर प्रोसेसर असणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनला १ जीबीची रॅम व ८ जीबी इतकी इंटरनल मेमरी असेल. मोबाईलला ३.२ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, तर ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. १४५० mAH क्षमतेची बॅटरी या मोबाईलमध्ये असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’,’डिजीटल इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ या योजनांच्या लक्षात घेऊन देशातील प्रत्येक नागरिकला सक्षम करण्याच्या दृष्टीने हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे. ‘फ्रिडम २५१’ या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनसाठीची नोंदणी गुरूवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार असून, २१ फेब्रुवारीला म्हणजेच येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी सुरू राहील.मिपाकरांना याविषयी काय वाटते हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. ![]()
गणेशभाऊ, कालच यावर धागा आला आहे. :)
संपादक मंडळाने धागा काढला तरी चालेल जर आधीच्या धाग्यावर चर्चा सुरु आहे tar
काहितर्री फेक वाटते, जिथे ४०० रुपयात २जी यथातथा मिळतो तिथे विथ कैमेरा फ़ोन.
हां फोन जर सहा महिन्यापेक्षा जास्त चालला तर इतर फोनचे भाव कोसळतील
२५१ तरी मागताहेत.पंधरा हजारचे ट्यॅब पुण्यातल्या एका पक्षाने फुकट वाटले होते "गरीबांना."
रजीस्ट्रेशन करतो. येऊ द्या असे स्वस्तातील मोबाईल. बाजारात्व मोबाइल ह्यांडसेट च्या अव्वा च्या सव्वा कीमती वाढलेल्या आहेत त्या मोबाईलच्या कीमती कमी होतील. दुसरं असं की अशाने ती आपली गरज होऊन जाईल या पद्धतीने सर्व मोबाइल वापरतील, टॉक टाइम च्या वाव्हचरच्या कीमतीही अशाच स्वस्त व्हाव्यात तंत्रज्ञानाचा फ़ायदा जितका होईल तितके नुकसानही अपेक्षितच आहे.
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
Pay Now ला क्लिक केल्यावर पुढेच सरकत नाहीये... फक्त Blank Screen येतेय..
आज सकाळी 6 वाजता पासून प्रयत्न करतोय. Pay Now ला क्लिक केल्यावर पुढेच सरकत नाहीये... फक्त Blank Screen येतेय..