Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू आणि मी

प — प्रसाद_कुलकर्णी, गुरुवार, 02/18/2016 - 10:36
मित्रांनो, खूप दिवस झाले मनात काही तरी घोळत होते, पण सांगड बसत नव्हती... आणि अशातच 'व्हॅलेन्टाईन डे'ला कुठून तरी प्रेरणा मिळाली आणि गोष्टी आपोआप जुळत गेल्या... शब्द साधे आहेत, कुठे चुकलो तर समजून घ्या... तू डोळे, मी काजळ तू डोंगर, मी नदी तू ढग, मी वारा तू कमळ, मी चिखल... तू रस्ता मी दिशा तू श्वास, मी ध्यास तू पाऊस, मी छत्री तू ऊन, मी सावली... तू टेबल, मी खुर्ची तू अंगठी, मी बोट तू चंद्र, मी तारा तू मांजर, मी कुत्रा... तू फळा, मी खडू तू सवय, मी खोड तू सुई, मी दोरा तू चष्मा, मी नाक... तू ऍक्टिवा, मी डिस्कवर तू मायक्रोमॅक्स, मी मोटोरोला तू टेस्टर, मी डेव्हलपर तू कर्वेनगर, मी चंदन नगर... तू घड्याळ, मी टिक टिक तू चिमणी, मी काजळी तू माठ, मी तिवई तू माचीस, मी काडी... तू समुद्र, मी आभाळ तू थंडी, मी ऊब तू हृदय मी धड धड तू सूर, मी ताल... तू शब्द, मी अर्थ तू जांभई, मी झोप तू स्वप्न, मी भास तू पापणी, मी पाणी... तू शिंक, मी सर्दी तू कट्टा, मी गप्पा तू वाळू, मी खोपा तू लाट, मी किनारा... तू रुसवा, मी थट्टा तू अबोला, मी समजूत तू ओठ, मी थर-थर तू भेट, मी ओढ तू प्रतीक्षा... मी तळमळ... - प्रसाद पांडुरंग कुलकर्णी

प्रतिक्रिया द्या
3113 वाचन

💬 प्रतिसाद (19)
क
कविता१९७८ गुरुवार, 02/18/2016 - 10:39 नवीन
तू शिंक, मी सर्दी यक्क
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/18/2016 - 10:46 नवीन
"तू प्रसाद मी शिरा" करत आता लै जणं येणार भावा. तेरी तो चल पडी.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_कुलकर्णी गुरुवार, 02/18/2016 - 10:50 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/18/2016 - 11:28 नवीन
मी राधा तू पावा नव सदस्याला त्रास देऊ नको भावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रसाद_कुलकर्णी गुरुवार, 02/18/2016 - 11:34 नवीन
समजून घेतल्याबद्दल आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/18/2016 - 11:39 नवीन
तू रस्ता मी दिशा तू श्वास, मी ध्यास तू पाऊस, मी छत्री तू ऊन, मी सावली, आणि तू रुसवा, मी थट्टा तू अबोला, मी समजूत तू ओठ, मी थर-थर तू भेट, मी ओढ तू प्रतीक्षा... मी तळमळ... आवडलं. -दिलीप बिरुटे (प्रतिक्षा करून तळमळत असलेला)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/18/2016 - 12:10 नवीन
तू चिकन, मी मसाला तू मटार, मी उसळ तू मिसळ, मी पाव
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/18/2016 - 12:22 नवीन
तू धागा,मी अवांतर तू चिवट,मी समांतर तू भांडे,मी कल्हई तू थंडी,मी दुलई तू बंदा,मी चिल्लर तू गप्पा,मी थिल्लर तू कफनी,मी खडावा तू वड,मी बहावा तू खफ्,मी व्यनी तू बोका,मी मनी पुढे चालू........ जेप्या बॅटन घे हाती
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 02/21/2016 - 05:38 नवीन
तु कुलुप, मी चावी.. तु माजी,मी भावी, तु पुरी,मी भाजी, तु ह्लकट,मी पाजी, बास आज एवढच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
च
चांदणे संदीप गुरुवार, 02/18/2016 - 12:34 नवीन
तू चालू, मी बंद मी हुशार, तू मंद तू लोड, मी उशी मी मच्छर, तू माशी तू काल, मी आज मी बक्कल, तू काज या रे बाकीचे....
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_कुलकर्णी गुरुवार, 02/18/2016 - 12:52 नवीन
सभासदांची कल्पनाशक्ती वाखाणण्याजोगी आहे... :P मजा आली.
  • Log in or register to post comments
ए
एकप्रवासी Sat, 02/20/2016 - 11:55 नवीन
तू चंदन मी पाणी तू जीभ मी वाणी तू पाउस मी सरी तू पंख मी परी तू वीज मी प्रकाश तू क्षितीज मी आकाश ......
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_कुलकर्णी Mon, 02/22/2016 - 05:33 नवीन
क्या बात है !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकप्रवासी
च
चिनार Sat, 02/20/2016 - 12:21 नवीन
माझ्या वतीने नाना बोलेल कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिये तुम कौन हो.. https://www.youtube.com/watch?v=8XTP8r0UCAM
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 02/20/2016 - 12:25 नवीन
तू वादळ, मी किनारा तू घर, मी पसारा तू मोबाईल, मी चार्जर तू वडापाव, मी पार्सल तू किती? मी अती? अती तेथे माती...... बास, इथे आपला पास! Sandy
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 02/20/2016 - 18:14 नवीन
तू आयडी, मी डुआयडी तू ट्रोल, मी संपादक तू खरड, मी व्यनि तू वेलणकर, मी अभ्यंकर तू मनोगत, मी मिपा तू मिपा तर मी ऐसी तू कौल, मी खफ तू धागा, मी बाफ चल आता नको दवडू तोंडाची वाफ!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 02/22/2016 - 05:39 नवीन
मुंपुमुं २ चा प्रभाव का हा?
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 02/22/2016 - 07:08 नवीन
मुंपुमुं २ वर यांचाच प्रभाव (पक्षी प्रसाद) आहे आणि शिल्लक राहिलेल्याचे इथे वाटप चालू आहे. खुलासेदार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
र
रातराणी Mon, 02/22/2016 - 08:14 नवीन
तू राघू मी मैना तू दिवस मी रैना तू काम मी सुट्टी तू वेल मी बुट्टी तू झोप मी जाग तू पाणी मी आग तू कर्तव्य मी कर्म तू आयुष्य मी मर्म
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा