Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(अशी कबुतरे येती)

स — स्वामी संकेतानंद, गुरुवार, 02/18/2016 - 17:23
अशी कबुतरे येती; आणिक घाण ठेवुनी जाती दोन घरांची पुण्यकमाई दहा घरांच्या खाती कपोत आला, पहिला वहिला खिड़कीमागे उभा राहिला तया मागे, येई साजणी गूटर्गूच्या साथी... दुरून येती थवे देखिले मी ग्याल्रीचे दार लोटिले धड़क मारती तरी निरंतर गंधित झाल्या भिंती पंख दोन ते हळु फ़डफ़डले खोलीभर मायेने फिरले हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि लागेना मज हाती 'पुण्यवान' तो येता गाठी शिव्या पाच मोहरल्या ओठी त्या तुटल्या दातांची गाथा क्रूर कबुतरे गाती -- स्वामी कपोतगावकर

प्रतिक्रिया द्या
1986 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/18/2016 - 17:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/18/2016 - 17:29 नवीन
लोलवा
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 02/18/2016 - 18:10 नवीन
हाहाहा!! बाडिस!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/18/2016 - 18:36 नवीन
=)) आमच्या रत्नागिरीच्या घराच्या दोन खिडक्या म्हणजे कबुतरांचे संडास झालेत. गेले की दर वेळी त्यांना आणि त्यांना खायला दाणे घालणार्‍यांना शिव्या देत साफ करते. खिडक्या एरवी बंद असतात म्हणून आत येऊन घाण करत नाहीत इतकेच. कबुतरे राहतात तिथून चिमण्या नाहीशा होतात असे मधे कुठेतरी वाचले त्यानंतर कबुतरांचा जास्तच तिरस्कार वाटायला लागला.
  • Log in or register to post comments
ट
टिवटिव गुरुवार, 02/18/2016 - 19:28 नवीन
लोल...
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर गुरुवार, 02/18/2016 - 19:30 नवीन
अतिशय घाणेरडी असतात कबुतरे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/19/2016 - 04:46 नवीन
स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए! =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा