Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

योद्धा

च — चाणक्य, Sat, 02/20/2016 - 08:34
एक योद्धा होता तो शून्यातून सगळं विश्व निर्माण करणारा योद्धा जो हात तो धरायचा त्या मनगटांमधे जोर यायचा जो माणूस तो जोडायचा तो पोलादी होऊन जायचा हजार हत्तींचं बळ दिलं होतं त्याने एका मरगळलेल्या पिढीला ईतकं की पुढे दोनेक पिढ्या पेटत राहिले होते ते निखारे त्याच्या स्वतःच्या आतलं वादळ त्याने भिनवून टाकलं होतं हजारो-लाखो नसांमधे त्याने कधी कुणापुढे हात नाही पसरले उलट जे हात पसरत होते त्यांच्या धमन्यांमधे असं काही रक्त खेळवलं की न भूतो असा पराक्रम घडवला त्या हातांनीही त्याने दाखवून दिलं जगाला.....कसं 'लढायचं' असतं त्याने दाखवून दिलं जगाला.....राष्ट्रनिर्माण म्हणजे काय असतं आणि त्याची माणसं ? काय कमी पराक्रमी होती ती ? त्याच्या एका शब्दावर वाटेल तिथे झोकून देत होती स्वतःला एकएक माणूस म्हणजे आख्खं सैन्यच जणू अहर्निश कष्ट करून त्याने घडवली होती ती कणखर मने फार नाही, तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वीच केली होती त्याने ही मशागत तो असा काही भरून राहिलाय ईथल्या द-याखो-यात, दगडामातीत की त्याच्या नुसत्या आठवणीने बाहू फुरफुरतात आमचे आमचा आहे तो...सांगताना छाती फुगते अभिमानाने आमची . . . . . . काल आम्ही म्हणे शिवनेरीवर त्याची जयंती साजरी केली काल आम्ही म्हणे त्याच्या मावळ्यांना आरक्षण देऊ केलं

प्रतिक्रिया द्या
4083 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ट
टवाळ कार्टा Sat, 02/20/2016 - 10:14 नवीन
आमचा आहे तो...सांगताना छाती फुगते गर्वाने आमची
गर्वाने??? मराठी येते का? या एका शब्दामुळे नाही आवडली कवीता
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 02/20/2016 - 10:43 नवीन
कळलं नाही टका काय चुकलं ते. समजवून सांगतोस का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रचेतस Sat, 02/20/2016 - 13:09 नवीन
इथे गर्वाच्या ऐवजी अभिमान असा शब्द हवा होता. मराठी गर्व = घमेंड, हिंदी गर्व = अभिमान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
च
चाणक्य Sat, 02/20/2016 - 13:29 नवीन
धन्यवाद सांगितल्याबद्दल. सासं, या कवितेत 'गर्वाने' च्या ठिकाणी 'अभिमानाने' असा बदल कराल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Sat, 02/20/2016 - 13:56 नवीन
हायला...इतक्यात बदलायला पण सांगितले? कस्ले मिपाकर हो तुम्ही....छ्या...पुर्वीचे मिपा राहिले नाही अता ;) कवीता दणदणीत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
प
प्रचेतस Sat, 02/20/2016 - 14:04 नवीन
तुम्ही पण संपादकांकडून 'वी' चा 'वि' करून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
च
चाणक्य Sat, 02/20/2016 - 15:16 नवीन
आता चूक आहे म्हणल्यावर दुरूस्ती करणे आले. बाकी स्नेहांकिता ताईंना ईथेच धन्यवाद देतो. नाहीतर माझेच प्रतिसाद जास्त व्हायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पीके Sat, 03/05/2016 - 08:05 नवीन
गर्व? आमच्याकडे "गर्वच नाही तर माज आहे..." असं म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रचेतस Sat, 02/20/2016 - 13:07 नवीन
खूपच सुरेख.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 02/20/2016 - 14:26 नवीन
चाणक्य इज बॅक
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 02/20/2016 - 14:32 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 02/20/2016 - 14:44 नवीन
खासच ! अखेरच्या दोन ओळी विशेष भिडल्या. 'अभिमान' असा बदल केला आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 02/20/2016 - 16:11 नवीन
सुंदर कविता ! मोठ्या विश्रामानंतर केलेल्या पुनरागमनाचे स्वागत ! :)
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 03/04/2016 - 17:30 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 03/05/2016 - 06:10 नवीन
चांगली आहे आवडली
  • Log in or register to post comments
ह
हरिदास Sat, 03/05/2016 - 06:37 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 03/05/2016 - 07:46 नवीन
शेवटच्या ओळीवरून धाग्यात संसद्+विधानसभा होऊ नये हीच अपेक्षा...
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 03/05/2016 - 08:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
च
चिगो Mon, 03/07/2016 - 08:50 नवीन
चाणक्य साहेब, कविता आवडली.. जबरा आवडली..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/07/2016 - 09:15 नवीन
सणसणीत आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा