कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते ..
चार दिवस पुरणारे अत्तर असते
प्रेम तसे मग बाकी खडतर असते
सुटकेचा आयास निरर्थक असतो
कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते
आपण अपुली सांभाळावी दुनिया
सूख जरासे दु:ख निरंतर असते
आकाशाला हातच पोचत नाही
नी स्वप्नांचे व्यस्त गुणोत्तर असते
प्रश्न तुला मी तोच कितीदा केला
तुझे आपले एकच उत्तर असते
कुठून कोठेतरी जायचे नुसते..
प्रेम शेवटी एक अधांतर असते
डॉ. सुनील अहिरराव
💬 प्रतिसाद
(6)
ग
गवि
Sun, 02/21/2016 - 05:39
नवीन
तुम्हाला "निरंतर" म्हणायचेय का?
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Sun, 02/21/2016 - 05:42
नवीन
दिगंतरच !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 02/21/2016 - 05:59
नवीन
नेहमी इतकी परिणाम-कारक नाही वाटली.
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Mon, 02/22/2016 - 11:01
नवीन
@गवि ,आत्मबंध
धन्यवाद !
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Mon, 02/22/2016 - 11:02
नवीन
@गवि ,आत्मबंध
धन्यवाद !
- Log in or register to post comments
स
संदीप-लेले
गुरुवार, 03/09/2017 - 12:47
नवीन
कुठून कोठेतरी जायचे नुसते..
प्रेम शेवटी एक अधांतर असते
छान !
- Log in or register to post comments