पाककृती

पात पिठलं /बेसन

Primary tabs

राम राम मिपाकर्स ,
नेहमीच्या पिठल्याला वेगळा ट्विस्ट देऊन हि पाक्रु केली न सगळ्याना आवडली पण, म्हणून शेअर करतेय बर्याच जनाना / जणीना माहिती ही असेल पण यु क्नोव बर्याच दिवसांनी पाकृ विभागात लुडबुड करायची संधी का सोडा म्ह्णून पिठलं आपल हे पाकृप्रपंच :)

साहित्य :
कांद्याची चिरलेली पात - १ वाटी.
बेसन - अर्धा वाटी.
मिरच्या - ५-६ (आवडीनुसार)
लसुन - १० -१२ पाकळ्या.
जीर - १ छोटा टीस्पून.
मोहरी - १ छोटा टीस्पून.
हिंग - १/२ छोटा टीस्पून.
तेल - ३ चमचे ( हो जास्तय थोड पण चालतय कधी मधी ) ;)
मीठ चवीनुसार.
हळद - १/२ छोटा टीस्पून.
कृती : प्रथम मिरची न लसुण एकत्र करून त्याचा जाडसर ठेचा करून घ्या .
बेसनात पाणी घालून गुठळ्या एकजीव होई पर्यंत फेटून घ्या.
कढईत तेल तापवून त्यात जीरं - मोहरी ,हिंग ह्याची खमंग फोडणी करून घ्या , मग त्यात मिरची - लसणीचा ठेचा छान परतून घ्या. मग त्यात कांद्याची चिरलेली पात घालून परतून घ्या आता चवीनुसार मीठ न थोडी हळद घाला , आता त्यात बेसनाच मिश्रण ओतून द्या , GAS बारीक करा न पळीने सतत फेट्त रहा गुठळ्या नको व्हायला, मग पिठ्ल्याचा "रटरट" असा आवाज येऊन त्याचे शिंतोडे तुमच्या हातावर खेळू लागले कि समजा पिठलं झाल ;) भाता बरोबर खायचं असेल तर थोड पातळ ठेवा , पोळी किंवा भाकरी बरोबर घट्ट छान लागत :)
काही जण यात ताकही घालतात पण अंड घालून कशी करतात आपल्या माहित नै म्हणुन अशे प्रश्न आधीच फ़ाउल आहेत ;)

* बाकी अशा अवघड अन्वट, किचकट पाक्रु बनवण्यात माझा हात कोनीही धरु शकत नै बर का ;) ;)=))
pith

जेपी

बरेच दिवसात खाल्ल नाही.करायला पायजे..
बाकी पाक्रुती चांगलीय..

भाते

करून बघायला पाहिजे.
आत्ताच पिठल भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी खाल्ली. तरीही फोटो बघुन पुन्हा भूक लागली.

आरोह

पिठलं भाकरी हा आवडता प्रकार गावाला गेलं कि हमखास घरी खायला मिळतो

अनन्न्या

दिलेल्या कृतीनुसार कोणताही प्रश्न न विचारता करून पाहण्यात येईल! लेखनशैली भारी आहे.

प्रचेतस

पिवशे पिवशे, रेवारी इडली, डोसे, वडे, पावभाजी करायचं सोडून पिठलं काय करायलीस. :)

पिंगू

पात घालून पिठलं.. ह्यात नवीन काय पियु. काहीतरी रच्याकन नवीन पाककृती दे ना.

अभ्या..

हे पिवशी प्रकरण म्हणजे कौतुकच आहे नुसते. कायतरी इनोव्हेतिव्ह कर माय. निदान मडक्यात शिजवलेय अस तरी सांग.

बादवे कांदा अस्ल्याने पास. ;)

पियुशा

@ वल्ली ,अभ्या डब्या,पिंगु ,भूमी काकू, मान्य हे मुझे रेसेपी बहुत बहूत सोप्पी हय पण मिपाकर्स मला नव्या आयडींच्या गर्दीत विसरून जाऊँ नयेत म्हणून आले बुवा घाई घाई धावत ;) आता पुढल्या वेळी कायतरी "झ्यानंटामॅटिक" इनोव्हेटिव्ह घेऊन नाही आले तर नाव नाही सांगणार पिवशी);) ;)

अभ्या..

आता नेक्ष्ट टाइम म्यागी ना? ;)
मग तुझे नाव बदलून आपण झ्यानंटामॅटिक पिशवी ठेवू.

पियुशा

तुला तेव्हढं आल तरी बास वहिनी खुश होईल माझी ;)

प्रचेतस

तुले मिपाकर इसरून जाऊ नये म्हणून बुवा का घाई घाई धावायले? =))

एस

कांदे छान कापले आहेत. :-)

भुमी

या सोबत भात किंवा भाकरीची पण क्रुती टाकायचीस ना!!!बाकी बशीतलं पिठलं छान दिसतंय.

चांगला जमतो की गं स्वयंपाक, अता हिला पुढच्या यत्तेत ढकलायला हरकत नाही =))

रच्याकने हा पदार्थ डाळीचं पीठं नं घालता करता येईल का?

जुइ

हा प्रकार करुन बघितला पाहिजे.

अजया

गुणाची गो माझी पिवडी :)
छान आहे पाकृ!

स्रुजा

वाह.. कामसू आहे हो आमची पिवशी .. दुशली ब मध्येच अडकली तरी काय झालं :प

कांदा पात आयड्या फार च आवडली आहे. आता करुन बघेन आणि तुला उचक्या लागल्या पाहिजेत इतकी आठवण काढुन खाईन ;)

रेवती

वाह, फोटू झकास आलाय. पाकृही आवडली.

पैसा

काय आहे न बघताच छान छान म्हणून मोकळी होते! फटु मस्त काढलास हो. आणि ते प्रेझेंटेशन बरं झालंय का याबद्दल स्पा यक्षपर्ट कॉमेंट्स देईलच.

इशा१२३

छान ग ! मस्त दिसतय पिठल. फोटु एकदम तोपासु !
मुलीला स्वयपांक येउ लागलाय तर....

सूड

* बाकी अशा अवघड अन्वट, किचकट पाक्रु बनवण्यात माझा हात कोनीही धरु शकत नै बर का

बयो, ह्यात अनवट आणि किचकट काय होतं?

पियुशा

@ सूड तू जुन्या सूड चा डू आय डी आहेस ? कि खरोखर इतका निरागस झाला आहेस ? उपहासाने लिहिलय ते मी :))

सूड

हल्ली मी भारीच निरागस झालोय.

स्पा

पिठले अजिबात आवडत नाही, फोटो पाहुन पण कसतरीच होते, पण तु आपल्या कंपू मधली म्हणून

आह, कडक पाक्रु, तोंडाला पाणीच सुटले, य विकांताला करुन पाहीन

आला ग बै आला ग.. बै आला ग.. आला आला आला आला
हो. .. आला आला आला आला ... पांडू एकदाचा आला .. नीट बग .. जिलबुचा पांडू आला!

मार अता त्याला पिठलं! =))

सूड

स्पा ला बघून बुवांना जे काही आनंदाचं भरतं येतं, त्याला तोड नाही. =))

अभ्या..

बुवांच्या वायरी स्पावड्याच्या हातात हैत सुडक्या.

बटन दाबले की भसभसा स्मायल्या पडत्यात. ;)

स्पा

पिठले अजिबात आवडत नाही, फोटो पाहुन पण कसतरीच होते, पण तु आपल्या कंपू मधली म्हणून

आह, कडक पाक्रु, तोंडाला पाणीच सुटले, य विकांताला करुन पाहीन

अभ्या..

हा हा. एकदम सहमत. पिवशी आपल्या कंपूतलीच हाय. मनापासून गोंधळ घालते बिचारी. :)

विवेकपटाईत

करूनच पहा, पिठले भात मला हि अत्यंत आवडतो. बाकी आमची आजी लहानपणी ए माई दे माई ची एक गोष्ट सांगायची आता विसरलो.

विजय पुरोहित

फोटो खतरा हाय पियूतै...
तेवढं फोडणीत आंबट ताक मस्त लागेल एवढीच सुधारणा सुचवेन...

संजय पाटिल

कांद्याचा सेंटरचा भाग जून दिसतोय, तेवढा काढून टाक.

दिपक.कुवेत

पिठलं हा प्रकार फारसा आवडत नाहि....अगदि पर्यायच नसेल तर!!! पण केवळ तु केलं आहेस म्हणुन वाह! मस्त!! तोंपासू!!!

सस्नेह

आणि मुलगी पास ! नवऱ्याचं मस्त पिठलं करील हो !
पण तुला पा(प)तीचा झुणका येतो का गं पिवशे ?

वपाडाव

आंब्याचा रस अन पातीचा झुनका येक लंबर...!

पिठलं खूप आवडतं. कांद्याची पात घालून केलेलं पिठलं प्रथमच पाहिलं.

मी-सौरभ

तुझ्या धाग्याला शतकी होण्यासाठी शुबेच्चा!!