पांढरा दिवस
बशीतून चहा पिताना फार बरे वाटते
हातात घेतलेल्या कपाला मग बाजूला ठेवावे लागते
नाष्ट्याला पोहे असल्यास तोंडाला पाणी सुटते
चटणीवर दही घेऊन मग लोणचं खाऊ वाटते
बुट घालून झाल्यावर गाडीला किक बसते
कितीही हॉर्न वाजवला तरी एखादी कार मध्येच घुसते
दिवस डोक्यावर येतो सुर्यनारायणाची भट्टी तापते
वेगळ्या अँगल मधून पाहिल्यास दुपारची काशी होते
घरी आल्यावर मला माझी कविता म्हणते
मालक बशी फुटली, तसं कपातून चहा पितानाही फार बरे वाटते
💬 प्रतिसाद
(5)
य
यशोधरा
Mon, 02/22/2016 - 16:33
नवीन
अगदीच बाडिस!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 02/22/2016 - 16:53
नवीन
http://www.misalpav.com/node/21650 ह्या सुप्रसिद्ध कवितेशी खूपच साम्य वाटलं.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Tue, 02/23/2016 - 07:08
नवीन
:)
सकाळी आयता चहा पिताना फार बरे वाटते
चहाच्या चवीवर नवरोबाचे दिवसाचे भविष्य ठरते
=))
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Tue, 02/23/2016 - 07:21
नवीन
फुटलो! =))
कविता कशी सुचली असेल याचा एक प्राथमिक अंदाज आला! :)
Sandy
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 02/23/2016 - 08:09
नवीन
हीहीहीहीही,
मला तर कविता कशी आली असेल याचा माध्यमिक अंदाज आला. ;)
- Log in or register to post comments