Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..

न — निशांत_खाडे, Tue, 02/23/2016 - 21:12
हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले की स्मृतीतला गाव दिसू लागतो त्या गाव वेशी उभा मीच मजला पाहून अनोळखी हसू लागतो दशकान्तुनी उभ्या तिथल्या विक्राळ वटाच्या सावलीत जरासा बसू पाहतो स्मरणे ती जुनी अन बदलांच्या खुणा उद्विग्न नास्तिकासम तपासू पाहतो. पोपटी तृणांचा जुन्हा तो जिव्हाळा बदलाच्या भ्रांती फसू लागतो लोभस ते जग कधीचे संपले खरा भावनांचा उन्हाळा पुन्हा दिसू लागतो.. (कविता अपूर्णच आहे. अकरावीत असताना केव्हातरी लिहिली होती. बऱ्याच वेळा पूर्ण करण्याच्या प्रयत्न केला पण हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात तो इतका भव्य वाटणारा पण आशयाने जवळपास शुन्य होता कि ते कधीच जमले नाही. आणि हि कविता माझ्या हिशेबाप्रमाणे कडव्या-कडव्यात ट्युनिंग बदलत जाते त्यामुळे कदाचित या अशा कन्फ्युज्ड व बालिश आशयाला साजेशे स्पष्टीकरण करण्यासाठी माझ्या बुद्धीतले काव्यात्मक शब्द अपुरे पडत जातात. आलोय आता मिपावर असे जुने-नवे प्रयोग दाखवत जाइल! सर्व मंडळींना रामराम! मिपावर आज पहिलाच दिवस.. मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल)

प्रतिक्रिया द्या
4762 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
सनईचौघडा Wed, 02/24/2016 - 06:53 नवीन
कविता आवडली. मिपावर स्वागत. बाकी दशकान्तुनी शब्द पाहुन मोकलाया दाही दिशा आठवली.
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Wed, 02/24/2016 - 09:19 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
प
पैसा Wed, 02/24/2016 - 17:01 नवीन
११वीत लिहिलेली? शब्दांची निवड बघून वाटतंय खरं. शिवाय वृत्तात लिहावे का मुक्तछंदात यातही गोंधळ झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Wed, 02/24/2016 - 17:59 नवीन
बहुतेक त्यामुळेच पूर्ण करणे जमले नसावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विजय पुरोहित Wed, 02/24/2016 - 17:09 नवीन
सुंदर रे भावा... तुझा अगोदरचा पण लेख वाचलाय... अतिशय हुंदर भावविश्व आहे तुझं... माझ्यासारखंच आहे ते... मी पण पाऊस, कृष्णमेघ, गावचा पार, भुरभुर पाऊस पाहिला आहे गावचा... I just love it....
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Wed, 02/24/2016 - 18:00 नवीन
मिपावर हे असे स्वागत होईल असे वाटले नव्हते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
व
विजय पुरोहित Wed, 02/24/2016 - 17:10 नवीन
हुंदर = सुंदर असे वाचावे... मोबल्या लै त्रास देतो... :(
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/24/2016 - 18:09 नवीन
मला कवितेच्या बाबतीत कडव्या कडव्यात जे ट्यूनिंग बदलत जाते आणि तो आशयही जेव्हा अधिक आशयघन होत जातो ते मला खुप आवडतं. राग येऊ द्या हवं तर. आपण बोलायला घाबरत नाही. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Wed, 02/24/2016 - 19:05 नवीन
प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब, आपण एक चांगले समीक्षक आहात.. आपणाला माहित आहे? काय मोजक्या शब्दात समीक्षण करता राव प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब तुम्ही! बायदवे, पाऊस, मानवी मन, आणि भावना यांच्यात काहीच संबंध नसतो असे आपण समजता म्हणून मी आपला हा 'आशयाविशयीचा' प्रतिसाद तेवढासा सिरीयसली घेत नाहीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विजय पुरोहित Wed, 02/24/2016 - 18:20 नवीन
लिहित रहा नि.खा... कुणाला राग येऊचा तर येऊ दे... सुंदर अप्रतिम लिहीता... हे भावविश्व फार दुर्मिळ आहे... गावची आठवण देणारे भावविश्व... लिहित रहा....
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Wed, 02/24/2016 - 18:39 नवीन
धन्यवाद! नक्कीच लिहीन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा