ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये
बाळाची वाटी,मांजर चाटी
मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने
वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते
एक पोळी करपली,दूधासंगे वरपली
दूध झाले कडू,बाळाला आले रडू
ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये
आम्हाला सरकारने सोई सवलती जाग्यावर आणुन द्याव्यात अजून्ही आम्ही बाळचं आहे . स्वतःच्या पायावर उभे राहीलो तर तुमची मदत घरपोच आणि विनासायास मिळणार नाही . त्या तमाम कायम बालक राहणार्या वर्गाचे प्रतीनिधत्व हे बाळ करते तर गाय ही शासनाची योजना+अंमलबजावणी या अर्थाने आहे
बाळाची वाटी,मांजर चाटी
अता सरकारी अधिकारी,नेता मंडळी आप्ली मलई थोडीच सोडतील त्या वर हे मार्मीक आणि परखड भाष्य
मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने
जरा प्रसारमाध्यमात बोंबाबोब झाल्याने ते "वाघोबाच्या" पोटात (पक्षी गोटात) गेले. खाल्ले म्हणजे गाणार्यांच्या मैफीलीत एखादा गवई दुसर्याला खाऊन टाकतो त्या अर्थाने . खरोखर खायला वाघोबा वेड्डा नाहीय.
वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते
कुणी अशी आठवण केली की वाघमामा गुर्गुरतात आणि आपली मराठी अभिमानाची नखे उगारतात , मिशा फेंदारून बहिष्कार टाकतात.
एक पोळी करपली,दूधासंगे वरपली
श्रेय लाटण्याच्या साठमारीत आणि एकेमेकांच्या तंगडी ओढ कारेक्रमात रेन्कोट थंडीत तर स्वेटर उन्हाळ्यात वाटप असे नेहमीच वाचतो आपण तसेच झाले दुर्लश्याले पोळी करपली. पण शासकीय नियमानुसार (गुरे सुद्धा न खाणारा) गहू रेशन्वर आहेच की.
दूध झाले कडू,बाळाला आले रडू
अता अशी कडू पोळी खाल्ल्यावर बाळ हसेलं का कधी तुम्हीच सांगा बाळ हसेल का क्धी !
आणि लगेचच विडंबन लिहिले होते....
या हो बाई वाड्या मधे.......
पण ते इकडे टिकेल की नाही याची शंका आली म्हणुन टाकाले नाही.
(पूर्वी चे मिपा राहिले नाही आता)
पैजारबुवा,
याचा एक ऑडीओ काय अप्पावर आला होता. शेवटी, ती बाई, "काय काम धाम नाही का? आलं काही की लागले ऐकायला? तुमचं वय काय ? तुम्ही ऐकता काय? असे काहीतरी म्हणून चीडवायची."
भावानुवाद
ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये आम्हाला सरकारने सोई सवलती जाग्यावर आणुन द्याव्यात अजून्ही आम्ही बाळचं आहे . स्वतःच्या पायावर उभे राहीलो तर तुमची मदत घरपोच आणि विनासायास मिळणार नाही . त्या तमाम कायम बालक राहणार्या वर्गाचे प्रतीनिधत्व हे बाळ करते तर गाय ही शासनाची योजना+अंमलबजावणी या अर्थाने आहे बाळाची वाटी,मांजर चाटी अता सरकारी अधिकारी,नेता मंडळी आप्ली मलई थोडीच सोडतील त्या वर हे मार्मीक आणि परखड भाष्य मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने जरा प्रसारमाध्यमात बोंबाबोब झाल्याने ते "वाघोबाच्या" पोटात (पक्षी गोटात) गेले. खाल्ले म्हणजे गाणार्यांच्या मैफीलीत एखादा गवई दुसर्याला खाऊन टाकतो त्या अर्थाने . खरोखर खायला वाघोबा वेड्डा नाहीय. वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते कुणी अशी आठवण केली की वाघमामा गुर्गुरतात आणि आपली मराठी अभिमानाची नखे उगारतात , मिशा फेंदारून बहिष्कार टाकतात. एक पोळी करपली,दूधासंगे वरपली श्रेय लाटण्याच्या साठमारीत आणि एकेमेकांच्या तंगडी ओढ कारेक्रमात रेन्कोट थंडीत तर स्वेटर उन्हाळ्यात वाटप असे नेहमीच वाचतो आपण तसेच झाले दुर्लश्याले पोळी करपली. पण शासकीय नियमानुसार (गुरे सुद्धा न खाणारा) गहू रेशन्वर आहेच की. दूध झाले कडू,बाळाला आले रडू अता अशी कडू पोळी खाल्ल्यावर बाळ हसेलं का कधी तुम्हीच सांगा बाळ हसेल का क्धी !