Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वृद्ध आईसाठी ठाण्यात देखभालीसाठी माहिती हवी आहे

म
मधु_टी
गुरुवार, 02/25/2016 - 02:03
🗣 11 प्रतिसाद
नमस्कार, मी मि. पा. वर नवीन आहे. मला माझ्या एका वयक्तिक समस्येवर आपणां सर्वांकडून मदत / माहिती हवी आहे. मी गेली काही वर्षे अमेरिकेत स्थायिक असून, माझी आई ठाण्याला मोठ्या बहिणीकडे राहते. आईचे वय ७८ वर्षे तर बहिण ५४ वर्षे. आत्तापर्यंत आईची सर्व काळजी, बहिणीने घेतली - आजारपण, रुग्णालयात भरती, वगैरे सर्व काही. सध्या, आई जवळपास अंथरुणावर आहे. गुढघे झिजल्यामुळे, पाऊल नीट पडत नाही व बरेच वर्ष औषधांवर असल्यामुळे, पोटाचा त्रास, बेचैनी असते. डॉक्टर knee replacement करायला सांगत आहेत, पण या वयात इतर तब्बेत बघता झेपेल की नाही हि शंकाच आहे. वयोमानामुळे, कधीकधी कोणासमोर काय बोलेल तेही सांगता येत नाही, त्यामुळे घरच्या-घरी दुसऱ्या कोणाकडून (नर्स, आया, इत्यादी) शुश्रुषा करवून घेणे कठीणच आहे. बहिणीला ही काही तब्येतीच्या तक्रारी आहेत, त्यामुळे तीलाही आईची सेवा पूर्णपणे झेपत नाही वा कोणतेही बाहेरचे काम करता येत नाही. पण सर्व जबाबदारी बहिणीवरच आहे. पूर्वी जेव्हा तब्येत बरी होती तेव्हा आई २-३ वेळा माझ्याकडे काही महिने राहून गेली, पण आता तब्येतीमुळे तेही शक्य वाटत नाही. नोकरी व प्रापंचिक जबाबदार्यांमुळे मला भारतात कायमचे किंवा दीर्घ मुदतीसाठी येणे शक्य नाही. आम्ही एखादी अशी एक संस्था शोधत आहे, जिथे आईची आपलेपणाने पूर्ण देखभाल केली जाईल, राहण्या खाण्याची सोय आणि २४ तास डॉक्टर उपलब्ध असतील. ठाणे शहर किंवा जवळपास अशी काही सोय तुम्हाला कोणाला माहितीत असलयास, कृपया मला सांगाल का? आभारी आहे. - मधु
वर्गीकरण
देखभाल
शुश्रुषा

प्रतिक्रिया द्या
3917 वाचन

💬 प्रतिसाद (11)
न
नक्शत्त्रा गुरुवार, 02/25/2016 - 03:54 नवीन
Medical science is much more advance and are no absolute age or weight restrictions for total knee replacement surgery. You would have taken this decision very early but still u can do it now. Let her be at her own instead of someone. Give some time to ur parents..they did it when we were small. I know life is busy n more difficult when ur not nearby. But I feel she deserve best care n love from you.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/25/2016 - 09:00 नवीन
वृद्धाश्रम पाहिजेत का? मिपावर बरेच ठाणेकर आहेत. माहिती मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
ब
बाहुली गुरुवार, 02/25/2016 - 10:48 नवीन
There are palliative care unit in Pune , Warje or also in Thane. You can search on internet. I am not sure whether they take old ill people or only terminally ill people. But worth a try.
  • Log in or register to post comments
म
मन१ गुरुवार, 02/25/2016 - 11:08 नवीन
http://mayacare.com/ हे उपयोगी येइल का ? . . काहीकाळापूर्वी आयटी हापिसांत हे लोक येत. मला स्वतःला ह्याचा काही अनुभव नाहिये. आणि माझ्या जवळच्या दोस्तांपैकीही कुणी अनुभव घेतलेला नैय्ये.पण तुमचं वर्तुळ पुरेसं मोठं असेल तर आय टी वाल्यांमध्ये ह्यांचा अनुभव घेतलेलं कुणीतरी सापडेल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 02/25/2016 - 15:56 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
ब
बहुगुणी गुरुवार, 02/25/2016 - 12:55 नवीन
व्यक्तिगत निरोप पाठवला आहे.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 02/25/2016 - 14:18 नवीन
पुणे येथे अथश्री हि सोसायटी ऐकिवात आहे . चौकशी करा .
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 02/26/2016 - 15:59 नवीन
मधू_टी, मी तुम्हाला व्यनित लिहिल्याप्रमाणे काही चौकशी केली होती, त्यानुसार माझ्या एका सन्मित्राने माहिती पुरवली आहे. तुमचं काम झालं आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला अजूनही माहितीची गरज असावी असं गृहीत धरून खालील माहिती देतो आहे (तुम्हाला नाही तर अशाच परिस्थितीतील इतर कुणाला अशा माहितीचा उपयोग होऊ शकेल म्हणून इथे धाग्यातच माहिती देतो आहे.) Companion Healthcare Foundation या NGO संस्थेचा हा उपक्रम आहे. व्यावसायिकच असावा, पण माझ्या स्नेह्याच्या आतेभावाला त्याच्या आईसंदर्भात चांगला अनुभव आलेला आहे असं असं कळलं. त्यांचं ऑफिस ठाण्यात आहे तर संस्था खारेगाव येथे आहे. Regd Office - C/o - Dr. S.A. Lambate, 10,Shreedeep apartment ,gate no - 3, Manisha nagar, Kalwa (W) Thane, Thane 400605 संस्था: B101/102, सुभाष टॉवर, मैत्री वाटिका काँप्लेक्स समोर, खारेगाव, ठाणे, ४००६०५ विरोपाचा पत्ता: companionhealthcarefoundation@yahoo.in फोनः शमा, +९१-९८१९१६३६८३
  • Log in or register to post comments
म
मधु_टी Sat, 02/27/2016 - 16:23 नवीन
धन्यवाद बहुगुणी. मी तुम्हाला व्यनी आज पाठवला आणि मग धागा पहिला. मी नक्की फोन करते आणि विचारपूस करून घेते. इतर सर्वांना ही धन्यवाद. mayacare आणि palliative care unit ची महिती पाहत आहे. knee replacement surgery चा विचार अजून होल्ड वर ठेवलाय. डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत. -मधु.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 02/28/2016 - 00:14 नवीन
कळव्यात पारसिकनगर ला अशा वुद्धांची उत्तम सोय होते. अधिक माहीतीसाठी खालील पत्त्यावर जाउन चौकशी करु शकता व स्वतः जाउन व्यवस्था पाहू शकता... सुभाष टॉवर, पहीला माळा, पारसिक नगर, कळवा, ठाणे.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत हेबारे Mon, 03/07/2016 - 12:53 नवीन
मला पण माहिती पाहिजे पण पुणे साठी. तसेच गावाकडे मिरज ला पण पाहिजे आहे जर कुणी caretaker मिळतो का. कारण माझा जोब फिरती असल्याने हा आता problem येत आहे. तसेच मिरज मध्ये पण माझ्या एका relative ला घरगुती caretaker पाहिजे आहे. जर माहिती असेल तर कृपया करून कळवणे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा