पाककृती

कणिक-नाचणी केक

Primary tabs

cake
साहित्यः
गव्हाचे पिठ : १ १/२ कप
नाचणी पिठ : १/२ कप
साखर : १ कप
दुध : १ कप
दहि : १ कप
तुप : १/४ कप
बेकिंग पावडर : १/२ चमचा
केळ : २
व्हॅनिला इसेन्स : १/२ चमचा
ट्रुटिफ्रुटि,सुकामेवा : २ चमचे
sahity

कृती : प्रथम गव्हाचे पीठ आणि नाचणी पीठ थोडे भाजुन घ्यावे.साखर दुधात विरघळुन घ्यावे.एका भांड्यात गहु पीठ,नाचणी पीठ,बेकिंग पावडर एकत्र करावे.त्यात तुप,दुध साखरेचे मिश्रण घालावे.हे सगळे साहित्य नीट एकत्र करून छान फेटुन घेणे.यात केळ बारिक कुस्करून नीट एकत्र करावे.
p

या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स व सुकामेवा मिसळुन छान एकत्र करावे.आता हे मिश्रण कपकेकच्या साच्यात वा तुप लावलेल्या केक भांड्यात ओतुन १८० डिग्री वर प्रिहिट केलेल्या ओवन मधे ३५ मि. ठेवावे.
cup

सुई केकमधे टोचुन पहावी.स्वच्छ सुई बाहेर आल्यास केक तयार!मस्त सुवास घरभर पसरलेला असेल.
c
आता हे कप केप खायला तयार.हवे असल्यास त्यावर क्रिम,चोकोचिप्स ई.लावुन सजवावे.मुलांना अतिशय आवडतात.
cc
* या केकमधे मैदा नाहि.कणिक,नाचणी अशी पौष्टिक पीठ असल्याने मनसोक्त खायला हरकत नाहि.
*अंडे नाहि.त्यामुळे शाकाहारी लोक खावु शकतात.
*दहि,दुध,तुप,केळ असे घरी सहजी उपलब्ध असणारे पौष्टीक पदार्थ वापरलेत.
*सुकामेवा हवा तो वापरू शकता.
न्याहारीसाठीहि असे गरमागरम कपकेक्स नक्किच आवडतात.

Maharani

Aha....sahaj soppi kruti.....aakarshak photo.....paushtik ekadum....

अ हा हा!!!!! भेटशील तेव्हा करुन आणशीलच.. वेगळं सांगायची गरज नसेलच!

विजय पुरोहित

मस्तच दिसताहेत केक्स...

चला, मैद्याशिवायच्या केक ची पाकृ मिळाली, शिवाय नाचणीपीठ सुद्धा, सगळं हेल्दी. विकांताला करतेच.

अनन्न्या

अंदे नसल्याने लगेच करून पाहीन. फोटोही सुरेख!

भुमी

पहिल्या फोटोनेच गारद केलं. तुझ्या हातची रेसेपी चविष्ट असणारच,यात शंकाच नाही. मस्त!

अन्नू

काय गोग्गोड रेशीपींचा पाऊसच पडलाय कि काय मिपावर?
आता माणसानं किती ते जळायचं नुसतंच असं बघून? :(

सुचेता

मस्तच... सोप्पी आहे पाककृती. नक्की करून बघेण आत्ता

रुपी

मस्त.. सुंदर सजावट केली आहे.

ही पाकृ केळी न घालता कशी करावी? ;)
बाकी, कपकेकला ३५ मिनिटे फार जास्त नाही होत का?

इशा१२३

साधारण कपकेकला २५-३० मि.लागतात.पण यात कणिक असल्याने मी ५ मि.जास्त ठेवते.आणि छान होतात.(साधारण २५ मि. नी चेक करावे.आणि त्यानुसार ठरवावे.)केळ नसेल बापरायचे तर सुकामेवा जास्त घालुन करता येइल.वॅनिला इसेन्स आहेच.केळाची चव मात्र छान लागते.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

शर्वरी

नक्कि करुन पहिन, बिना मैद्या च्या केक पाकक्रुती साथि धन्यवाद!

आता हे मिश्रण कपकेकच्या साच्यात वा तुप लावलेल्या केक भांड्यात ओतुन १८० डिग्री वर प्रिहिट केलेल्या ओवन मधे ३५ मि. ठेवावे.

ओव्हन किती वेळ प्री हीट करायचा असा प्रश्ण गृहमंत्रालयाकडुन विचारण्यात आलेला आहे.

दिपक.कुवेत

हे मी नक्किच करणार. मफिन्स मोल्ड नाहियेत पण नुसता केक करीन....फोटो फारच तोंपासू आले आहेत.