Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठीची गळचेपी किंवा मराठीची हत्या, आपणच करत आहोत का?

म
मुक्त विहारि
Sun, 02/28/2016 - 06:06
🗣 54 प्रतिसाद
विचारमथनाचा स्त्रोत : http://www.misalpav.com/node/35035 गेली ५ दशके मी या ना त्या रुपात भाषेचा वापर करतो.गुजरात, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यांव्यतिरिक्त थोडे दिवस गल्फमध्ये पण पाट्या टाकत होतो.(पैसे मिळवायला जे काम करतो ते पाट्या टाकणे आणि मनाला समाधान करणारे काम करणे, म्हणजे कार्य करणे.ह्या विचारमंथनाचा काथ्याकूट परत कधी तरी....) इकडे-तिकडे भटकतांना आलेले काही अनुभव. सन १९७५ मी आणि किराणामाल वाला.दुकानदार मारवाडी आहे.दुकान नेहमीसारखेच अस्ताव्यस्त. मी : दादा, २ किलो साखर आणि एक नारळ पाहिजे. दुकानदार : खात्यावर टाकू की पैसे देणार? मी : आईने पैसे दिले आहेत. दुकानदार त्याच्या नोकराला मराठीत सांगतो आणि मला बिलाचे पैसे पण मराठीतच सांगतो. ============================== सन २०१५, तेच दुकान आणि तोच दुकानदार.दुकान टापटीप.अगदी ६-सिग्माच्या प्रमाणे. मी : १ किलो शेंगदाणे. दुकानदार, शेंगदाण्याची १ किलोची पिशवी हातात ठेवतो आणि म्हणतो, "साब,ये देखो नया चावल आया है.सालभर भरनेका है तो बोलो.पैसा बाद में दो." मी तांदूळाच्या गोणीची मागणी नोंदवतो. दुकानदार नोकराला मारवाडी भाषेत, माझा पत्ता आणि किती वाजता घेवून जायचे.इत्यादी माहिती देतो. १९७५ ते २०१५ पर्यंत ग्राहक आणि दुकानदार ह्यांच्यात काय फरक पडला ते सुज्ञांना सांगायला नकोच. ================================================== १९७५ मी भाजी-बाजारात, आई बरोबर. आई भाजीवाल्यांकडून भाजी घेतांना मराठीत बोलत होती. ------ सन २०१५ त्याच भाजी बाजारात , बायको बरोबर. बायको भाजी वाल्याकडून हिंदीत बोलत होती.भाजीवाले बदलले. ================================================= १९७५ ते २०१५ ह्या कालावधीत, रोजचा व्यवहार हिंदी भाषेत जास्त होतो आणि तो पण महाराष्ट्राच्या राजधानीत.मग तो बस प्रवास असो, किंवा रिक्षावाले, किंवा रेल्वे प्रवास. तीच गत अन्न आणि औषधे पुरवणार्‍या दुकानांबाबतीत. ====================================== गुजरात, तामिळनाडू इथे मात्र अद्यापही रोजचे व्यवहार त्यांच्याच बोलीभाषेत होतात. गल्फमधील प्रत्येक सेवा देणार्‍या लोकांना अरबी येत असतेच.अरबी लिहिता-वाचता येत नसले तरी. माझे निरिक्षण : मराठीचा असो किंवा इतर कुठल्याही भाषेचा सार्वजनिक वापर, सेवा पुरवणार्‍या लोकांकडून जास्त होतो.आपण जर मराठीतच बोललो तर दुकानदार पण मराठीतच उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. असो, बरेच दिवस ह्या विषयी मिपाकरांशी बोलायचे होते, म्हणून बोललो.मनांतले शल्य आपल्याच माणसांबरोबर बोलले की, मन पण जरा हलके होते. वरील लेख वैयक्तिक वाटल्यास किंवा इतर भाषांचा अनादर करणारा वाटला, तर मी क्षमा मागतो.
वर्गीकरण
मराठीची गळचेपी किंवा मराठीची हत्या आपणच करत आहोत का?

प्रतिक्रिया द्या
7332 वाचन

💬 प्रतिसाद (54)
स
सुनील Mon, 03/07/2016 - 11:29 नवीन
ळ आणि ण बोलू शकतात हे छानच. परंतु ल/ळ आणि न/ण हे दोन्ही विकल्प प्रमाण/बोली भाषेत असतातच. मराठी उत्तम बोलता येण्याची खरी खूण म्हणजे, 'च' आणि 'ज' चे दोन्ही उच्चार करता येणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 03/07/2016 - 11:51 नवीन
ज चे दोन्ही उच्चार करता येणे तुलनेने सोपे आहे. च बद्दल बोलायचे तर खुद्द रशियन भाषेत चमचावाला च हा उच्चार आहे, सबब त्यांना तेही येते. आणि विकल्प असूद्यात. प्रमाण भाषेपुरतं बोलतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सूड Mon, 03/07/2016 - 10:13 नवीन
मराठी लोकच एकमेकांशी मराठीत बोलायला कचरतात हे निरीक्षण आहे. काही बिगरमराठी पण त्यातल्या त्यात हुच्च लोक, मी मराठी शिकलो/ली आहे. पण बोलता येत नाही असं सविनय सांगतात. मग या चालीवर हल्ली मी, मी हिंदी शिकलो आहे पण नीट बोलता येत नाही असं सांगायला सुरु केलं आहे, कारण तीन वर्ष हिंदी मग संस्कृत शिकलो वैगरे वैगरे. मग इंग्रजी किंवा मराठी हे दोनच ऑप्शन शिल्लक उरतात. त्रागा करण्यात अर्थ नाही. तुम्हाला जसं शिकूनही मराठी बोलता येत नाही तसं मला शिकूनही हिंदी न बोलता येणं अत्यंत साहजिक आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 03/07/2016 - 14:03 नवीन
कॉलेज संपल्यावर हुच्च हॉटेलमधे जायचा प्रसंग आला तेव्हा मित्रांची भाषा बदललेली दिसली. ओल्या कट्ट्याला बर्फ आण सांगितल्यावर ३/४ चड्डीवाला पेठीय म्हणाला , अरे आईस म्हणायचा . मी सांगितला , कुठेही हॉटेल मधे गेलात तर मराठी मधे बोला , कारण मराठी माणसे अशा हुच्च ठिकाणी येतात असे त्यांना कळेल. लोका हुच्च ठिकाणी आपोआप हिंदी, ईंग्रजी बोलु लागतात , कसला न्युनगंड आहे कळत नाही . सर्व सेल्समन , कॉल सेंटर, महाराष्ट्रातील सार्वजनिक सेवा यांच्याशी मराठीतच बोलावे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा