जनेविची संभाव्य प्रश्नपत्रिका!
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या पोलिटिकल सायन्सच्या पेपरात यंदा काय प्रश्न असतील, याचा एक अंदाज!
(वि. सू. - हलके घ्यावे)
१. हुतात्मा इशरत जहां यांचे संक्षिप्त चरित्र २०० शब्दात लिहा.
२. फरक सांगा: अफजल गुरू यांचा न्यायिक खून आणि इशरत जहां यांचा अतिन्यायिक खून.
३. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या: "भारत हा एक तुरुंग आहे"
४. अजमल कसाब आणि याकूब मेनन यांच्या विचारधारांमधील साम्य दाखवा.
५. माओवाद, नक्षलवाद, जिहाद आणि निधर्मीवाद हे परस्परपूरक आहेत का? उदाहरणासह युक्तिवाद करा.
६. मुमताज कादरी हे कोण होते? त्यांची भगतसिंहांशी तुलना करा.
७. समान नागरी कायदा मागणे ही धर्मांधता असून धर्माधारित कायद्यांचे समर्थन करणे हा खरा सेक्युलरिझम आहे हे सिद्ध करा.
८. जहाल ते मवाळ अशी अनुक्रमे मांडणी करा: नरेंद्र मोदी, सुशील मोदी, ललित मोदी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, माणिकराव ठाकरे, वाजपेयी, अडवाणी, तोगडिया, मुतालिक, ओवेसी, येचुरी, राहुल गांधी, मेहबूबा मुफ्ती, लालू यादव.
💬 प्रतिसाद
(2)
स
संजय पाटिल
Wed, 03/02/2016 - 08:56
नवीन
उत्तरे लिहीताना प्रथम प्रश्नाचा अनुक्रमांक लिहीने आवश्यक...
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
Wed, 03/02/2016 - 09:18
नवीन
नुसत्या घोषणा लिहिल्यास गुण दिले जाणार नाहीत.
- Log in or register to post comments