राष्ट्रपाव
उ.ठाक्रे: माध्यमं कधी शिवसेनेची चांगली कामे दाखवत नाही.
खरे बोलले. शिवसेनेने किती चांगली कामे केली आहेत. मरगळलेल्या मराठी माणसाला बलशाली बनवलं. उद्द्यमशील बनवता बनवता उत्सवशील बनवलं. त्या उत्सवास सहृदयतेने निरपेक्ष मदत न करणार्यास योग्य ती मायेची समज देण्याइतकं कनवाळू बनवलं. आपल्या हक्कांसाठी जागरुक राहायला शिकवलं.
माध्यमं: शंभर वडापाव फुकट दिले नाहीत म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याने वडापाववाल्याला बांबूने मारहाण केली.
मला काथ्याकूट करायची हुक्की आली, उचकी आली. कारण का तर हा प्रश्न दारूच्या ग्लासात बर्फाच्या जागी पडला होता.
ही माध्यमं बेणी नेअमी चुकीच्या बातम्या का ब्रे देतात?
मंडली, हाय काय उत्तर?
(धागा राजकिय नाही. गैरसमज करुन घेऊ नये. भावना दुखावल्यास शिवसेनास्टाईल उत्तर दिले जाईल)
- (कुठलाही जोक न मारणारा) तर्राट जोकर
💬 प्रतिसाद
(135)
ज
जेपी
Wed, 03/02/2016 - 10:41
नवीन
मला एक वडापाव आणा..
(पॉकॉला कंटाळलेला)जेपी
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 03/17/2016 - 04:38
नवीन
वड़ापाव काय पिज़्ज़ा पण खायला मिळेल जन्तेला!
छया लइच वंगाळ केलान सेनेने, इटालियन सरकार चांगले होते. हां आव्वाज कोणाचा? कोणचाच नाय बाबा, तेरी भी चुप आणि मेरी भी चुप!
आपण सगले भाऊ भाऊ, सगले मिलून 2जी चा प्रसाद खाऊ, आणि वर कोळश्याने तोंड काळे पण करून घेऊ.
- Log in or register to post comments
न
नितीन पाठक
Wed, 03/02/2016 - 10:43
नवीन
फक्त वडापावासाठी मारहाण ..................
लईच devaluation
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 03/02/2016 - 10:52
नवीन
काय राजा वडया चि भाजि बनवताना आलु चे छिलटे त काढत जा ;)
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Wed, 03/02/2016 - 11:12
नवीन
सांबार म्हणा की कोथिंबीरीला.
-(अर्धा वैदर्भी) उका!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 03/02/2016 - 11:16
नवीन
मि ""ते हिरवि चटणि नका लाउ पावा ले निरा सांबारच असते त्यात"" असेच लिहिणार होतो...पण इथे समजले नसते कोणाला :)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 03/02/2016 - 14:19
नवीन
अरे वा तुमच्या कडे चटणीत सांबार देतात का? आमच्याकडे सांबार वेग़ळं मागावं लागतं.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 03/02/2016 - 14:47
नवीन
मेळघाटात, ताडोबा आणि पेंच मध्ये सुद्धा ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 03/02/2016 - 11:32
नवीन
१०० वडापाव विकत घ्यायला पैसे नाहीत? इतके गरीब कशामुळे झाले ते?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 03/02/2016 - 14:12
नवीन
गरीब नाहीत ते. दुसर्यांना दानाचं पुण्य मिळवून देण्यात पुढाकार घेतात.
महिन्याला लाखो वडापाव विकणार्याने दिले असते शंभर फुकट तर काय बिघडलं असतं?
शंभर वडापावसाठी लाखो शिवसैनिकांची मानहानी करुन टाकली. :(
कुणी ह्या शिवसैनिकांच्या शिवकालीन युटोपियाबद्दल का बोलत नाही?
- Log in or register to post comments
R
Ram ram
Wed, 03/02/2016 - 15:53
नवीन
हेच थे निष्पाप रमेश किणीला संपवणारे मेंदू। जाे एकच चारित्र्यवान शिवराय हाेऊन गेला त्याच्या जिवावर यांचं दुकान सुरू आहे ।
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 03/02/2016 - 15:57
नवीन
काय मंग मांजरि चे जंत झाले का बरे..म्हणजे मांजर जंता पासुन झालि का मुक्त ?
- Log in or register to post comments
क
किचेन
गुरुवार, 03/03/2016 - 02:39
नवीन
चिकन सूप प्या.हेल्दि असतं.ते तेलकट वडापाव काय खाताय.
- Log in or register to post comments
क
किचेन
गुरुवार, 03/03/2016 - 02:41
नवीन
हे ४ वेळा का दिसतय? मदत करा
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/03/2016 - 07:23
नवीन
@ >>
तू खूप दिवसांनी आलीस ना किच्चु ताई, म्हणून तुला बोनस मिळाला असेल! 
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/03/2016 - 03:23
नवीन
त्यांना चिकन सूप चारदा प्यायची आवश्यकता आहे म्हणून देव प्रसन्न होऊन चारदा कंमेन्ट पब्लिश करीत आहे।
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 05:00
नवीन
कोणता देव?
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/03/2016 - 06:00
नवीन
त्यांच्या लेखी असुरांवर अन्याय करणारा सुरांचा देव।
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 06:07
नवीन
असुर शब्दावरून आठवले, असुरांना(अहुरांना) इराणी(पर्शियन) लोक पुजतात. "हिंदू" हा शब्दही त्यांचीच देणगी आहे असे म्हणतात. त्यांच्या दृष्टीने सिंधू(हिंदू) नदीच्या पलिकडले ते हिंदू.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 03/03/2016 - 06:29
नवीन
कुठल्या देवाला तळलेल्या वड्याऐवजी चिकनसुप प्रेफर केले होते सांग बघू?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 06:32
नवीन
बडव्यांनी कोंडाळे केलेला विठ्ठल.
- Log in or register to post comments
A
Anand More
गुरुवार, 03/03/2016 - 07:38
नवीन
अहुर माझ्दा असा काहीतरी त्यांचा देव आणि त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे अहिरमन असे वाचल्याचे आठवते.
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
गुरुवार, 03/03/2016 - 05:27
नवीन
गोड चटणी मध्ये साखर असते का हो?
कारण ती तिखट कधीच लागत नाही, मग तिला चटणी का म्हणतात?
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 03/03/2016 - 05:35
नवीन
चटणी तिखटच असली पाहिजे असे काही नाही. दाक्षिणात्य उपाहारागृहात खोबर्याची पांढरी चटणी देतात, ती तिखट नसते.
असो, मला वडापाव हा लसणाची सुकी चटणी आणि तळलेल्या मिरच्यांसोबतच आवडतो.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/03/2016 - 06:37
नवीन
+ १
कोलंबी घातलेला वडा+सुकटाची चटणी+तळलेला जवळा+लसणाची चटणी+तळलेल्या मिरच्या+कांदा ====> ताटात स्वर्ग
आमच्या स्वर्गाच्या कल्पना ताटातूनच येतात.
बटाटेवड्या बरोबर खजूराची किंवा चिंचेची चटणी खाणारे, श्रीखंडाचे पाणी पण पियूष म्हणून पितात.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 03/03/2016 - 07:34
नवीन
सहमत !
या यादीत भाजलेल्या सुक्या बोंबलची चटणी, तळलेल्या सुक्या बोंबलची चटणी, या पण सामील करा !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/03/2016 - 07:47
नवीन
पण चूलीत भाजलेल्या बोंबलाची चव कश्शा कश्शाला येत नाही.
फ्लॅट मध्ये रहात असल्याने, ह्या अशा साधारण आणि म्हणूनच अमुल्य गोष्टींना पारखे झालो.
मस्त पऊस कोसलत असावा, वातावरणात मातीचा (आणि जोडीला गोठ्यातील गुरांचा) सुगंध दरवळत असावा.एखादी दार बुलंद नमक कलाकारी नुकतीच संपवत आलेली असावी आणि चुलीत बोंबलाला सारले गेले असावे.
ताटात काळ्या वाटाण्यांची उसळ्+भाताचा ढिगारा आणि जोडीला चूलीत भाजलेला बोंबील.
आमच्या मित्राच्या घरी गेलो की, हे हमखास जेवायला मिळायचे. (ह्या एका कारणासाठीच शालेय कैद परत भोगीन.)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 03/30/2016 - 20:55
नवीन
चाटून खायचा पदार्थ अशा अर्थी चटणी हे नाव पडले असावेसे वाटते. चटणी ओली असो वा सुक्की, फार चावून खाणे अपेक्षित नसते. बंगालातही 'चाटनि' (च चहाचा) नामक गोड चटणी असते.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 03/03/2016 - 06:03
नवीन
बाळासाहेब ठाकर्यांनी केलेली उपयुक्त एक-दोन कामे कोणी सांगेल का? की ज्यानी महाराष्ट्राचा फायदा झाला? आणि शरद पवारांची देखील.
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 03/03/2016 - 06:42
नवीन
बाळासाहेब आणि पवारसाहेब यांनी आपापसात अनुक्रमे 'हिंदूह्रिदयसम्राट' व 'जाणता राजा' ह्या उपाधी वाटून घ्रेतल्या.
याहून मोठे असे कोणते विधायक कार्य आपल्याला अपेक्षित आहे ?
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 03/10/2016 - 05:45
नवीन
ओ, आमची पिशिएम्शि येउन बगा एकदा. साहेबांची कृपादृष्टी म्हणून यवड चकाचक शहर बनलय.
साहेब! __/\__
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
गुरुवार, 03/03/2016 - 06:22
नवीन
मला मात्र तळलेल्या मिरच्या अजिबात आवडत नाहीत.
खोबर्याची चटणी मात्र आवडते.
कोणाकडे आहे का खोबर्याच्या चटणीची रेसिपी.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 06:25
नवीन
इथे आहे रेसिपी.
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
गुरुवार, 03/03/2016 - 06:29
नवीन
धन्यवाद साहेब.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 03/03/2016 - 07:04
नवीन
अजुन एक बातमी या अगोदर २ दिवसांपुर्वी घडलेली.
ठाण्याच्या मुंबई आग्रा हमरस्त्याला सिग्नल सुटूनही सेना माजी शाखाप्रमुख गाडी थांबवून बोलत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. - म्हणुन महिला वाहतुक पोलीस हवालदार बाईंनी हटकले तर तिलाच मारहाण केली त्या महिला पोलीसाच्या नाकातुन रक्त आले.
झी बातम्यांमध्ये सतत ती चित्रफीत दाखवत होते. सदर इसम हा शिवसेना माजी शाखाप्रमुख होता. आणि अजुनही काही गुन्हे त्याच्या नावावर आहेत. पण सेनेने आपला हात वर केला. त्याचा आणि आमचा आता काही संबंध नाहीये म्हणे.
मुळ बातमी.
- Log in or register to post comments
भ
भाते
Mon, 03/07/2016 - 18:46
नवीन
टाईम्स नाऊवर त्या महिला वाहतुक पोलीस बाईची बाजू ऐकली.
पत्रकार तिला हिंदीत प्रश्न विचारत असला तरी ती स्पष्टपणे मराठीत ऊत्तर देत होती हे ऐकुन छान वाटले.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Fri, 03/04/2016 - 15:40
नवीन
भाजपाचे समर्थक गालात गुलुगुलु हसत असतील
मुंबई महानगर पालिका निवडणूक बहुदा एकट्याने लढून मग प्रमुख पक्ष बनून सेनेच्या मदतीने वेळ पडल्यास
सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा सफल होईल
त्यांनी शाई फेकून जे साध्य केले नाही ते कनैह्या बोंबा मारून भाजपला साध्य करून देत आहे
रोहित ते उमर ते इशारत चे प्रकरण पाहता हिंदुच्या मताचे दृविकरण भाजपसाठी त्यांचे विरोधक आयते करून देत आहेत
व त्यात सेना सुशिक्षित मराठी आपले मतदार भाजपच्या ओंजळीत स्वहस्ते देत आहे.
उरलेले काम मुब्र्यांचा इशारत चा भाईजान करत आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Fri, 03/04/2016 - 15:40
नवीन
भाजपाचे समर्थक गालात गुलुगुलु हसत असतील
मुंबई महानगर पालिका निवडणूक बहुदा एकट्याने लढून मग प्रमुख पक्ष बनून सेनेच्या मदतीने वेळ पडल्यास
सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा सफल होईल
त्यांनी शाई फेकून जे साध्य केले नाही ते कनैह्या बोंबा मारून भाजपला साध्य करून देत आहे
रोहित ते उमर ते इशारत चे प्रकरण पाहता हिंदुच्या मताचे दृविकरण भाजपसाठी त्यांचे विरोधक आयते करून देत आहेत
व त्यात सेना सुशिक्षित मराठी आपले मतदार भाजपच्या ओंजळीत स्वहस्ते देत आहे.
उरलेले काम मुब्र्यांचा इशारत चा भाईजान करत आहे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 08:59
नवीन
काही धाग्यांवर जाऊन लिहावेसे वाटते, पण लोक अवांतर केल्याचा ठणाणा करतात. त्यावर काय क्रवे ब्रे असा विचार आला. म्हटले आपल्याच धाग्यावर करु अवांतर. वाचायचं तर वाचा, नै तो इग्नोरास्त्र अॅक्टीवेट करा.
धागा: क्रिकेट
>> प्रतिसादः तिकडे जवान सीमेवर लढतायत, रक्त वाहतायत आणि इकडे हे क्रिकेटवर चर्चा करतायत.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 09:12
नवीन
धागा: #PledgeForParity शपथ समतेची (धागालेखिकेची क्षमा मागून)
>> प्रतिसाद: मोहनरावांसाठी भारतमाताकीजय असे शिकवणे हे स्त्री-पुरुष समता शिकवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही भारतमाता चा सन्मान करायला पोकळ बांबूंचे फटके देऊन शिकवू पण आमच्या संघटनेत महिलांचा प्रवेश निषिद्ध ठरवू.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 03/07/2016 - 11:30
नवीन
पोकळ बांबू आणि भरीव बांबू याचा कोणीतरी तूलनात्मक अभ्यास लिहावा ही विनंती.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 12:47
नवीन
धागा: मराठीची गळचेपी किंवा मराठीची हत्या, आपणच करत आहोत का?
प्रतिसादः कॉस्मोपोलीटन शहरात राहणार्या जनतेला एवढ्या मोठ्या काळज्या का पडतात? चार लोक दुसर्या भाषेचे आजूबाजूला असले की कोंदटल्यासारखं वाटतं म्हणून असे प्रश्न पडतात काय? चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरा कार्पोरेटातून बाहेर पडून. कोणाचीच कसली गळचेपी, हत्या होत नाही आहे. देशभरातले अठरापगड लोक येऊन खिचडी झालेल्या मुंबईत मराठीच मुख्य भाषा असावी हा फक्त कल्पनाविलास आहे. मुंबईच्या बाहेर खूप मोठा महाराष्ट्र आहे. अजून तो ४२ च्या काय बोलींमधे मराठी रक्तात खेळवून आहे. मारवाड्यापासून पंजाबी, मुसलमान, बिहारी सगळे अमराठी इतकी सहज मराठी बोलतात जितकी मुंबईत जन्म घालवलेल्या मराठी माणसाला येणार नाही.
उगा काळजी करु र्हायले.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 03/09/2016 - 05:12
नवीन
धागा: सेल्फी - एक विकार???
>>
१. सिलेक्टीव मोरल पोलिसिन्गचा आगावूपणा करणार्यांची तक्रार कुठे बरे करावी?
२. जब लोक आपके खिलाफ बोलने लगे तो आप तरक्की कर रहे हो असे मोदींबद्दल अभिमानाने म्हटले इथे.
च्यामारी लोक आता माझ्या खिलाफही बोलू लागलेत, मी पण तरक्की करु र्हायलो का? 
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 03/09/2016 - 19:46
नवीन
काय मग राष्ट्रपाव? ऐकलं का? एखाद्याला डुक्कर म्हणणे पातळी सोडून असते पण कचरा म्हणणे नाही, बरं का? लक्षात असू दे नाहीतर पोर्क पोटात घालून कचर्यात फेकला जाशील.
- Log in or register to post comments
N
nandan
गुरुवार, 03/10/2016 - 05:51
नवीन
अहो हल्ली सात्विक आंदोलन पण करतात ...काय ते " वरण भात " मोर्चा नेला होता म्हणे ...
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 03/10/2016 - 05:58
नवीन
होय होय! आणि तामस पण - मंदिरांसमोर चिकन पण केले होते.
राजस केले होते का ते आठवत नाही, पुढच्या वेळी बासुंदी आंदोलन बहुतेक.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 03/16/2016 - 20:03
नवीन
ह्याला मणतात जबरदस्त गेम .
तुम्ही भारत माता की जय म्हटलं नै तर तुम्ही देशद्रोही.
तुम्ही म्हटलं तरी पंचायत, नै म्हटलं तरी पंचायत. म्हणणार नाही बोलले तरी पंचायत.
पण असं म्हणण्यावर देशभक्ती ठरवणारे तुम्ही कोण हे मात्र तुम्ही विचारलं नाय पायजे. फाउल होतो.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 03/16/2016 - 21:34
नवीन
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 03/17/2016 - 10:35
नवीन
मला ओवेसीने विचारलेले प्रश्न आवडले. म्हणजे विचारण्याची पद्धत आवडली.
मी ओवेसीची वक्तव्ये फक्त पेपरात वाचली आहेत. कधी त्याचा व्हिडिओ पाहिला नव्हता. आज पहिल्यांदाच त्याला बोलताना ऐकले. केवळ आणि केवळ ह्याच क्लिपवरुन माझे मत थोडेसे बदलले आहे.
१. प्रश्न सुस्पष्ट आहेत. उत्तरे नक्की काय आहेत ते माहित नाहीत. पण नुसताच आवेश पण मुद्दा काही नाहीच. किंवा नुसतीच डायलॉगबाजी.. ह्याच प्रकारात आजकाल क्लिप्स पहायला मिळतात. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की मोदी सुद्धा फार महान भाषण करत नाहीत. थोडा ड्रामा जास्त असतो. म्हणुनच मला इराणी बाईंचे भाषणही नाट्यमय करायची गरज नव्हती असे वाटले होते. बीजेपी सोयीस्कर तेच दाखवतो.. त्याच क्लिप्स बरोब्बर व्हायरल होतात. मी मुख्यतः फेसबुकवर अशा राजकीय गोष्टी पहाते. माझ्या मित्रयादीतले लोक शक्यतो भाजप आणि संघवाले असल्याने माझ्यावरही त्याच पोस्टचा मारा होतो. भाजपच्या सोयीचेच मला वाचायला मिळते. इतर कुणाचे काही ऐकायला मिळत नाही. मी सुद्धा त्यासाठी काही विशेष प्रयत्न करत नाही.
अशा वेळेस, ओवेसी बद्दल केवळ वाईटच ऐकलेले असताना, त्याने फापटपसारा न मांडता धडाधड जे प्रश्न विचारलेत ते आवडले. उगाच शाब्दिक जंजाळ नसल्याने ऐकायला बरे वाटले. मागे चक्क काही गोंधळ नसल्याने ऐकु आलेही.
२. तो भाषणाच्या शेवटी "जय हिंद" म्हणाला. "भारतमाता की जय" चा फंडा काय आहे त्याचा माहित नाही. मुसलमान लोक देशाला आई मानत नाहीत म्हणुन वंदे मातरमही म्हणणार नाही असे मध्ये वाचले होते. त्याचेच हे पुढचे पाऊल वाटले. पण शब्द काही का असेनात, तो जय हिंद म्हणतोय ना, मग का वाद होतोय अशी शंका आली. मग ज्या प्रमाणे मला भाजपाच्ला सोयीस्कर मजकुरच कळतो, त्याच प्रमाणे ही बातमी सुद्धा अर्धवट संदर्भाशिवाय कळाली असेल का असेही वाटले.
* माझा कोणत्याच राजकीय पक्षावर फारसा विश्वास नाही. त्यातल्या त्यात भाजप बराय एवढेच माझे मत आहे. सरसकट मुसलमान वाईट आहेत असेही मला वाटत नाही. पण मुसलमान धर्मिय डोईजड आहेत आणि भलेही त्यांच्यातले मुठभर उपद्रवी असले तरी ते जगाला पुरुन उरणार असे मला वाटते.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 03/17/2016 - 10:36
नवीन
* नुसताच आवेश, मुद्दा काही नाहीच. किंवा नुसतीच डायलॉगबाजी.. ह्याच प्रकारात आजकाल क्लिप्स पहायला मिळतात.. ओवेसीची क्लिप त्याप्रकारातली वाटली नाही.
असे वाचावे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »