Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विषय

क — कवि मनाचा, Wed, 03/02/2016 - 10:37
इतिहासाच्या तासाने आम्हाला फारच छळले, पानिपतच्या लढाईत कोण जिंकले,कोण हरले, हे शिकून तरी काय कळले, आयुष्याच्या इतिहासात खरे तेच यशस्वी ठरले, ज्यांनी आपल्या शत्रूचेही मन जिंकले. भूगोलाच्या तासाला नाही कळले चंद्र व सूर्यग्रहण, विधात्याने निर्मिले 'मानव' हे क्षुद्र उपकरण, ऊन-सावलीच्या खेळाने करतो तो स्वतःचे मनोरंजन, त्याच्या अचाट क्षमतेने झालो थक्क नि गेलो भांबाबून. विज्ञानाच्या तासाला,न्यूटनचे नियम सतत रटत गेलो, प्रत्येकाच्या क्रियेला,सडेतोड प्रतिक्रिया आयुष्यभर देत गेलो, शब्दांच्या जाळ्यात स्वतःला खोल फसवत गेलो, विचारु कुणाल, दुरावस्थेला माझ्या मीच जबाबदार बनत गेलो. मग न्यूटनच म्हणाला नियम माझे गतीचे पदार्थांनाच फक्त लावायचे मार्कांपुरतेच रटायचे नियम हे आयुष्याचे स्वानुभवानेच बनवायचे प्रसंग कसे हाताळायचे विवेकानेच ठरवायचे काम तुझ्याच मतीचे. मराठीच्या तासाला का शिकवतात असे व्याकरण, बरोबर विरुद्ध चूक, आयुष्यात तर आपापल्या जागी, असतो दोघेही बरोबर, किंवा ब-याच अंशी, असतो दोघेही चूक !!! कवितेतले विषय जाऊ द्या आशय मनाला भिडू द्या तुमच्यातलाही कवी जागा होईल देवाशप्पथ, नाव माझे लिहून घ्या

प्रतिक्रिया द्या
873 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
प्रचेतस Wed, 03/02/2016 - 10:53 नवीन
नवकवींनो, सावध व्हा भो. मिपा विडंबन स्पर्धा सुरु होतेय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा