Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोसायटीबाबत तार्किक , कायदेशीर सल्ला हवा --

म
मन१
गुरुवार, 03/03/2016 - 17:40
🗣 90 प्रतिसाद
अपार्टमेण्ट मध्ये कुणी रहावं कुणी नाही ; ह्याबद्दल नेहमीच वाद होतात. जर काही निर्णय घ्यायचा असेल; तर मला वाटतं मीटिंग घेउन निर्णय घ्यायचा असतो. एका सोसायटित कालपर्यंत सगळच ठीक ठाक होतं. पण अचानक एक इमेल आलाय. "मॅनेजिंग कमिटीनं ठरवलय की आता बॅचलर भाडेकरुंनी रहायचं नाही" ह्या अर्थाचा. मॅनेजिम्ग कमिटी असा परस्पर निर्णय घेउ शकते ???? हा इ मेल :- (मला जरा इ मेलचा सूरही खटकला. पण तो अवांतर होइल मुद्दा.) Dear Members, There has been repeated incidents of very serious nature due to Bachelors/Singles/Spinsters occupying flats on rental basis in our society. As such, the managing committee have decided to restrict renting/subletting flats to only families(having max. 4 members) and not to bachelors/singles/spinsters. This is effective from 01April2016. Please follow the guidelines to rent a flat/shop given below; 1. Do not rent or sub-let flats to bachelors/spinsters 2. Flat owners must submit the required documents from tenants and request permission of managing committee before confirming to tenant to move and occupy your flat on rental basis 3. Tenants to carry police NOC, lease agreement & photo , vehicle registration certificate as applicable while moving to flat in Ozone Springs Society 4. Flat owners are responsible for any incident due to tenants not respecting society rules causing nuisance to society’s peaceful and happy living. Please note that: If any clarification or question, the members are requested to present it in Special General Body meeting on 5Mar2016 by permission of Chairperson. हे सगळं कायदेशीर आहे ? ह्याबाबत्तीत कायदा काय म्हणतो ? आणि ह्यात सरावलेले वकील कुणास ठाउक आहेत का ? किम्वा सोसायटीच्या बाय लॉज् चा नेमका कुनाचा अभ्यास/अनुभव आहे का ? . . नम्र विनंती १-- बॅचलर्सनी राहणे चूक्च आहे; ते गोंधळच घाल्तात ; किंवा अजिबात घलत नाहित; वगैरे मुद्दे सध्या इथे नकोत. तुमची जी काही मतं असतील; ती सगळी मान्य आहेत; त्यांचा आदरही आहे. ह्या धाग्याचा उद्देश कायदेशीर मार्ग , उपाय शोधणे हा आहे. बाकी सामाजिक मुद्दे नेहमीच डिबेटेबल असतात; आणि मिपासारख्या जिंदादिल स्थळावर शतकी धागेही निघत राहतात त्यावर. तर विनंती हीच की तो मुद्दा इथे नको. . . नम्र विनंती २-- ह्या प्रकाराचा थेट माझ्याशी संबंध नाहिये. मी सपत्नीक स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतो . मी भाडेकरुही नाही आणि अविवाहितही नाही. . . मला एक बातमी सापडली ह्यासंबंधित :- http://www.punemirror.in/pune/cover-story/Housing-societies-must-mingle-with-singles-Pune-police/articleshow/48457448.cms
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
23221 वाचन

💬 प्रतिसाद (90)
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 18:05 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे सोसायटीला भरपूर अधिकार असतात. पुण्यात मी सदस्य असलेल्या सोसायटीनेही काही नकारात्मक अनुभवांनंतर अविवाहित तरुणांना भाड्याने फ्लॅट्समध्ये राहू देण्यास प्रतिबंध केला आहे. केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेतलेल्या व परदेशात राहणार्‍या एक दोन सदस्यांनी कुरकुर करून पाहिली पण बहुमतापुढे त्यांचे काही चालले नाही. मी लहानपणापासून हाऊसिंग सोसायटीमध्ये राहिलो आहे. गुंतवणुक म्हणून फ्लॅट घेणार्‍यांमुळे बरेचदा कायमस्वरुपी त्या सोसायटीत राहणार्‍यांना बरेच त्रास होतात कारण भाडेकरू सोसायटीमधले नियम पाळणे व सौजन्यपूर्वक वागणे टाळतात. बाकी कायमस्वरुपी राहून त्रास देणारेदेखील काही सदस्य असतात. त्यांच्याबाबत असे काही करता येत नाही. सोसायटीचे शुल्क तीन वर्षे थकवल्याने पोलिसांना कल्पना देवून नळाची जोडणी कापल्याच्या घटनेचा मी साक्षीदार आहे.
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 03/03/2016 - 18:11 नवीन
असोसिएशन किंवा ऑफिस बेअरर्सने ठराव करून नियम केला ए जी एम मध्ये तर असा नियम करता येतो. केस पाहिली आहे आणि त्याविरोधात गदारोळ होऊनही, कायदेशीर रीत्या कोणी त्याला आव्हान देऊ शकले नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 03/03/2016 - 18:15 नवीन
खालच्या लिंक ची काही मदत होऊ शकते का पहा.. -- www.misalpav.com/node/31307
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच गुरुवार, 03/03/2016 - 18:42 नवीन
कायदेशीर तर माहित नाही, पण तार्किक दृष्ट्या चूक वाटते. नुकताच फ्लॅट शिफ्ट केलाय. (रेंटने) तेव्हा असे बरेचसे अनुभव आलेत. बॅचलर म्हटलं की नाहीच म्हणतात . अगदी ७०% ते ८०% नाही म्हणतात . फ्लॅटसाठी बायको कुठून आणावी ? अन् काय फॕमिलीवाले त्रास नाही का देऊ शकत ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 03/03/2016 - 18:49 नवीन
माझ्या उमेदवारीच्या काळात एका शहरात पगार पुरेसा असूनही घर भाड्याने मिळाले नाही तेव्हा काही महीने टिनाच्या खोलीत काढावे लागले- आणि खरोखर या कारणासाठी लग्न करण्याची निकड निर्माण झाली- याची आठवण आली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ब
ब़जरबट्टू Fri, 03/04/2016 - 05:18 नवीन
टिना कोण ? मज्जाच राव :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अभ्या.. Sat, 03/05/2016 - 14:09 नवीन
पुढची ओळ वाचून विचारताहात टीना कोण म्हणून. औघड आहे बाबा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
त
तर्राट जोकर Sat, 03/05/2016 - 14:15 नवीन
तसे वाचूनही तो घेतलेला अर्थ मजेदार होतोय की. माहितगारजी हलके घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 18:58 नवीन
अकरा वर्षांपूर्वी एजंटच्या मदतीशिवाय पुण्यात भाड्याचे घर मिळवताना ही अडचण आली नाही याबाबत मी व माझा धाकटा भाऊ नशिबवान म्हणायचो. काही अविवाहितांच्या वर्तनामुळे बहुतांश अविवाहितांना अशा अडवणुकीला सामोरे जावे लागते याचे वाईट वाटते :-( .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
य
यमगर्निकर Sat, 03/05/2016 - 08:04 नवीन
आम्हि पुण्यात बचलर म्हणून मित्र मित्र राहायचो त्यावेळि आम्हाला हा प्रोब्लेम कितितरि वेळा फेस करावा लागला, पण ज्यावेळि लिव्ह इन मध्ये रहायचो त्यावेळि सुद्धा ह्या सोसायटिवाल्यांच्या पोटात पोट्शुळ उटायचाच. पण विमाननगर, बाणेर, पाषाण ला राहताना हा त्रास झाला नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
न
नाखु Sat, 03/05/2016 - 09:47 नवीन
याच्याबाबत माहीती जरा. लाभारथी/इच्छुकांना काही टीपा तरी मिळतील. अवांतर आम्च्या विनंतीचं</a>मनावर घेतले नाहीत तुम्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर
म
माहितगार गुरुवार, 03/03/2016 - 18:43 नवीन
ह्या कायद्यांचे एक स्वतंत्र विश्व आहे ज्या बद्दल मला नेमकी माहिती नाही. चर्चेच्या सुरवातीस अपार्टमेंट आणि सोसायटी दोन्ही बहुधा वेगवेगळे प्रकार आहेत या दोन्हीत गल्लत करणे श्रेयस्कर नाही. माझ्या समजुतीनुसार अपार्टमेंट मध्ये फ्लॅटची मालकी फ्लॅट ओनर कडे असते त्यामुळे त्यास अधिक स्वातंत्र्य असावे. को.ऑप.सोसायटीच्या बाबतीत अधिकृत मालक सहसा सोसायटी असते तुम्ही केवळ मेंबर-शेअर होल्डर असता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भारतीय घटना, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यांच्या चौकटीत राहून सोसायट्यांना त्यांच्या नियमावली राबवण्याचे अधिक स्वातंत्र्य असावे. चुकभूल देणे घेणे
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 18:50 नवीन
माझ्या माहिती व अनुभवांनुसार नव्या अपार्टमेंट काँप्लेक्स मध्ये बहुतांश सदस्य राहायला आले की सोसायटी बनवली जाते. त्याशिवाय कारभार कसा चालणार? एकदा सोसायटी बनली की प्रत्येकाचा फ्लॅट सोडून इतर कॉमन जागांची मालकी सोसायटीकडे असते. याच कारणामुळे कार पार्कींगची जागा बिल्डरने विकणे हे बेकायदेशीर समजले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 03/03/2016 - 19:00 नवीन
अपार्टमेंट आणि सोसायटी हे दोन्ही उल्लेख आपण एक सारखे करत असलो तरी कायद्यासाठी आणि उपरोक्त धागालेख विषयासाठी महत्वपूर्णपणे भिन्न बाबी असाव्यात इतर जाणकारांनी यावर अधिक माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 19:05 नवीन
या ठिकाणी धागाकर्ता सोसायटीबाबतच बोलत आहे असे शीर्षकावरून वाटते. मजकुरात त्यांनी फ्लॅट या शब्दाऐवजी अमेरिकेत वापरला जाणारा अपार्टमेंट हा शब्द वापरला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 03/03/2016 - 19:08 नवीन
होय बहुधा सोसायटी बाबतच तरीही कायद्याची बाजू समजून घेताना होता होई तो टर्मीनॉलॉजीचे घोटाळे टाळणे श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 19:10 नवीन
तुमच्या या विचाराशी सहमत. बादवे फ्लॅटला मराठी प्रतिशब्द 'गाळा' असा आहे. बरेचदा काही सदस्यांमुळे संपूर्ण सोसायटीच गाळात जाण्याची वेळ येते ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 03/03/2016 - 19:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ख
खटपट्या गुरुवार, 03/03/2016 - 21:09 नवीन
रच्याकने, फ्लॅटला मराठीत सदनिका शब्द आहे असे ऐकले होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 21:16 नवीन
गाळा अन सदनिका हे दोन्ही शब्द फ्लॅट साठी वापरले जातात. सदनिका हा अधिक पुस्तकी शब्द आहे जो वर्तमानपत्रातल्या लेखांमध्ये अधिक वाचायला मिळतो. गाळा हा प्रत्यक्ष व्यवहारातला शब्द आहे. मी मराठीतून लिहिलेल्या खरेदीखतात गाळा शब्द वाचला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सतिश गावडे Fri, 03/04/2016 - 04:59 नवीन
मी गाळा हा शब्द इमारतीमधील व्यवसायाच्या हेतूने बनवलेल्या मोकळ्या जागेस वापरलेला ऐकला आहे. बर्‍याच इमारतींमध्ये तळमजल्यावर रस्त्याच्या दिशेला असणार्‍या बाजूस असे व्यावसायिकांचे "गाळे" असतात. सदनिका हा शब्द निवासी बांधकामासाठी वापरला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/04/2016 - 05:15 नवीन
दुकानांच्या जागांसाठीही गाळा शब्द वापरला जातो. फ्लॅट्ससाठी खरेदीखतात वापरला गेलेला मी पाहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कंजूस Sun, 03/06/2016 - 13:15 नवीन
रामभरोसे निवास appartment owners' association असं काही करार नोंदणी करून बँकेत खातं उघडता येतं.परंतू अमुक गोष्ट करण्यासाठी ,ठराव वगैरे लादता येत नाही. मेंबर्स - सोसायटी यांना हक्क आणि जबाबदाय्रा दोन्ही असतात हे अगदी थोडक्यात सांगितलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सतिश गावडे गुरुवार, 03/03/2016 - 18:53 नवीन
हे मागच्या पाच सहा वर्षातील खुळ आहे. बॅचलर भाडेकरूंचा त्रास होऊ शकतो. मात्र तसा त्रास प्रत्येक भाडेकरूमुळे होईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. खेडेगावांतून, छोटया शहरांतून शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात किंवा नोकरी करण्यासाठी मोठ्या शहरात आलेल्या मुला-मुलींनी राहायचे कुठे मग? प्रत्येकाने शिक्षण संपल्या संपल्या मोठया शहरात स्वतःचे घर घेण्यासाठी पैसे आणायचे कुठून? "अविवाहीत भाडेकरू ठेऊ नयेत" अशी काही कायदेशीर तरतुद असल्यास मग उपरोल्लिखित मुला-मुलींची सोय या व्यवस्थेने केली पाहिजे. याची दुसरी बाजू घरमालकाचीही आहे. एखाद्यास आपले घर भाडेकराराने द्यावयाचे असल्यास त्याला सक्तीने कुटुंब भाडेकरू पहावा लागेल. आणि हा सहकुटुंब राहणारा भाडेकरू त्रास सोसायटीस त्रास देणार नाही कशावरून.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/03/2016 - 19:36 नवीन
"अविवाहीत भाडेकरू ठेऊ नयेत" अशी काही कायदेशीर तरतुद असल्यास मग उपरोल्लिखित मुला-मुलींची सोय या व्यवस्थेने केली पाहिजे.
अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. अविवाहीताला जर कायदेशीरपणे सोसायटीत घर घेता येऊ शकते तर अविवाहीत भाडेकरूही कायदेशीरपणे सोसाययटीत राहू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/03/2016 - 23:14 नवीन
काही शहरांमधे बॅचलर मुला-मुलींसाठी खाजगी लोकांचे स्पेशल हॉस्टेल असतात. पण जेवढ्या प्रमाणात हवं तेव्हढं नाही. मुंबईत ही समस्या एवढी जाणवत नाही. मुंबैच्या केंद्रापासून कॉस्मोपॉलिटन राहणी जसजशी ओसरत जाते तसतसे नियम बदलत जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/03/2016 - 19:12 नवीन
कोणतीही सोसायटी जात्,धर्म,लिंग व वय (बॅचलर) बघून भाडेकरूला नाकारु शकत नाही. निवार्‍यासाठी भारतीय कायद्यानुसार बॅचलरसाठी वेगळा कायदा नाही, भाडेकराराचे रजिस्ट्रेशनकरून स्थानिक पोलिस स्टेशनला भाडेकरुची माहीती देऊनही जर सोसायटीच्या जनरल मिटिंगमध्ये बॅचरलविरोधी ठराव पास केला तर त्या ठरावाला आव्हान देता येते.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच गुरुवार, 03/03/2016 - 19:32 नवीन
ओक्के! असं आहे तर . धन्यवाद माहितीबद्दल. रच्याकने समजा माझ्या स्वतःच्या मालकिचा फ्लॅट आहे तर तिथे भाड्याने कुणाला ठेवायचे ती सर्वस्वी माझीच इच्छा असेल ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 19:35 नवीन
बरोबर आहे परंतु पटो न पटो काही सामाजिक अटी पाळाव्या लागतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
म
मार्मिक गोडसे Fri, 03/04/2016 - 13:23 नवीन
समजा माझ्या स्वतःच्या मालकिचा फ्लॅट आहे तर तिथे भाड्याने कुणाला ठेवायचे ती सर्वस्वी माझीच इच्छा असेल ना ?
अर्थात. फ्लॅटचे मालक सोसायटी नसून तुम्ही आहात, त्यामुळे तेथे कोणालाही कायदेशीर करार करून भाड्याने देण्याचा हक्क तुम्हालाच आहे, फक्त त्या जागेचा अनैतिक व व्यावसायीक वापर करता येणार नाही. सोसायटी फक्त फ्लॅट मालकाकडून सेवाशुल्काच्या १०% बिन भोगवटा शुल्क घेऊ शकते. भारतीय कायद्याने नागरीकाला भारतात कोठेही ( कायद्याने प्रतिबंधीत,संरक्षीत भाग सोडून ) निवार्‍याचा हक्क दिलेला आहे, एखाद्या सोसायटीच्या नियमामुळे जर त्याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्या सोसायटीवर भारतीय कायद्याचा भंग केल्याचा दावा करता येतो. भाडेकरूला निवार्‍याची गरज व घाई असते तर मालकाला पैशाची(भाड्याची). कायदेशीर प्रक्रियेत वेळ व पैसा दोन्हीही खर्च होत असल्यामुळे शक्यतो अशा भानगडीत कोणी पडत नाही. त्यामुळे सोसायटी असे नियम करायला धजावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
म
माहितगार गुरुवार, 03/03/2016 - 19:34 नवीन
@ मार्मिक १) कदाचित डिस्क्रीमिनेटरी ठराव पास करता येणार नाही, पण सोसायटीत एखाद्याला मेंबर म्हणून कोणतेही कारण न देता नाकारण्याचा सोसायटीला अधिकार असतो का ? २) निगेटीव्ह डिस्क्रीमिनेशन बहुधा करता येणार नाही पण अफर्मेटीव्ह डिस्क्रीमिनेशन करणे शक्य होऊ शकते का ? की त्या मिरर न्युज मध्ये म्हटल्या प्रमाणे एखादी सोसायटी -फ्लॅटची काळजी घेतली जावी आणि स्त्रीयांवर अन्याय होऊ नये अथवा विवाहीत कुतूंबातील लहान मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून - प्रत्येक फ्लॅटमध्ये एकतरी स्त्री आणि एकतरी मूल असले पाहीजे असा नियम बनवू शकते का ? ३) फ्लॅट अजिबात रेंटवरच न देण्यासंबंधी नियम पारीत करु शकते का ? ४) सोसायटी फ्लॅट रेंटवर द्यायचा असेल तर डिपॉझीटची मोठी अमाउंट मागून अमुक तमूक त्रास झाल्यास डिपॉझीट फोरफीट करु शकते का ? जसे की रात्री १० नंतर मोठा आवाज केला, सोसायटीच्या प्रांगणात धूम्रपान केले, गुटखा थुंकला इत्यादी तत्सम. ५) सोसायटी गेस्ट्सना कोणतेही कारण न देता प्रवेश नाकारु शकते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अभ्या.. गुरुवार, 03/03/2016 - 19:38 नवीन
बाब्बोउ. तरीच सोलापूरात बहुतांशी अपार्ट्मेंटस स्कीम कमर्शिअली चालत नाहीत. इतके सोपस्कार करण्यापेक्षा लोक सरळ प्लॉट घेतात अन स्वतः घर बांधून मोकळे होतात. थोड्या थोड्या आहेत अपार्टमेंट पण इतका काटेकोरपणा नाही जपला जात. बाकी घर भाड्याने देताना बॅचलरना प्रॉब्लेम इथे पण होतो. करतो कायतरी जुगाड ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 03/04/2016 - 02:53 नवीन
कायदेशीर दृष्ट्या अन एथिकली बरोबर आहे गोडसे सर, पण प्रॅक्टिकल वेगळेच चालते, उदा मुंबई मधल्या कट्टर प्योर वेज सोसाइटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
S
sagarpdy गुरुवार, 03/03/2016 - 19:34 नवीन
कायदेशीर बाबींची चर्चा चालू आहेच तर, अशा अविवाहीत भाडेकरुंमुळे सोसायटी मधील लोकांना त्रास होत असल्यास सोसायटी कशा प्रकारे कारवाई करू शकते?(अर्थात लेखात सांगितलेला ऊपाय न योजता) त्रासांची उदा. - साध्या तसेच सोलर द्वारे मिळणारऱ्या पाण्याचा अपव्यय/अतिरिक्त वापर - ओला / सुका कचरा व्यवस्थापनासंबंधी सूचनांचे पालन न करणे. - ध्वनीक्षेपकांचा आवाज तिव्र ठेवणे तसेच अन्य कारणांनी सोसायटी मध्ये गोंधळ करणे इ. थोडक्यात (बहुतेक तरी) फौजदारी गुन्हे नाहीत तर सोसायटी च्या नियमांचे पालन न करुन उपद्रव करणे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 03/04/2016 - 05:03 नवीन
- ध्वनीक्षेपकांचा आवाज तिव्र ठेवणे तसेच अन्य कारणांनी सोसायटी मध्ये गोंधळ करणे
याविरुद्ध पोलिसात तक्रार करता येते. मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. सण, उत्सव, धार्मिक पुजा यासाठी ध्वनीवर्धक ही अत्यावश्यक बाब झाली आहे. लोकांना कळणार कसे त्याशिवाय. शिवाय लोकांना वाढत्या आवाजाचीही नशा चढत असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/03/2016 - 19:50 नवीन
निवासी संस्था साधारणपणे दोन प्रकारच्या असतात : १. असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स : यामध्ये प्रत्येक युनिट (गाळा, फ्लॅट, जमिनीसह रो हाऊस, इ) ची मालकी ज्याच्या नावे खरेदीखत झाले आहे त्याची असते व तो त्या युनिटचा स्वतःच्या मताप्रमाणे कायदेशीर वापर (विक्री, भाड्याने देणे, इ) करू शकतो. सुरक्षा, शांतता, कायदा, युनिट्शी संलग्न देखभाल खर्च भरणे, इत्यादीचा भंग झाला नाही तर कोणतीही बंधने घालणारी कृती करण्याचा हक्क असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांना नसतो. २. कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी : यात सोसायटीच्या सर्व इमारती (युनिट + सार्वजनिक जागा) व जमीन यांची मालकी सोसायटीची असते आणि ज्यांच्या नावे युनिटचे खरेदीखत झाले आहे व सोसायटीने ज्याला त्या युनिटचे शेअर सर्टीफिकेट दिले आहे त्याला त्या आणि तेवढ्याच जागेचा "वापर" करण्याचा अधिकार असतो... हे अधिकार साधारणपणे सोसायटीचा शुन्य भाडे भरणार्‍या भाडेकरूइतकेच असतात. सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना राज्य सरकारचे मान्यताप्राप्त "MODEL BYE–LAWS OF COOPERATIVE HOUSING SOCIETY" आपल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आणि त्या बायलॉजमधे फरक झाल्यास नंतर दरवेळेस त्यापुढच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मान्य करून घेणे बंधनकारक आहे. या मॉडेल बायलॉजच्या परिघात सर्वसाधारण सभेत बहुमताच्या म़ंजूरीने अधिक नियम करता येतात आणि ते सर्व सभासदांवर बंधनकारक असतात. हे पाहिले असता : लेखातला मुद्दा क्र १ : सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत (जनरल बॉडी मिटिंग) जर हा नियम बहुमताने मान्य झाला असेल तर तो सर्व सभासदांवर लागू होतो. लेखातले इतर मुद्दे (क्र २ ते ४) : हे सर्व सद्य कायद्याप्रमाणे आवश्यक आहेत. म्हणून, ते सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मान्य करून घेणे हा उपचार असतो... नाही केले तरी ते लागू असतातच.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/03/2016 - 19:51 नवीन
@ माहीतगार, १,२,३,५ चे ठराव जन.मिटींगमध्ये पास करू शकते, सोसायटी बाय लॉज मध्ये सुधारणा करू शकते फक्त हे सुधारीत बाय लॉज रजिस्टारकडून नियमीत करून घ्यावे लागतात. ४ च्या बाबतीत सोसायटी मेंटेनंसच्या १० % पेक्षा अधीक चार्ज करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/03/2016 - 21:41 नवीन
विचित्र आहे राव. ब्याचलरांनी काय तंबू ठोकून रस्त्यावर कॅम्पफायर करावं काय? असो. सोसायटीच्या बहुमतापुढे काहीच कायदेशीर मार्ग नाही. बॅचलर ठेवणे बेकायदेशीर नसलं तरी सोसायटीने नियम केला तर त्याला आव्हान नाही. सोसायटी कोणतीही कारणे न देता असे नियम बनवू व राबवू शकते. मेजॉरिटी विन्स. फक्त कितीही थकबाकी असली तरी सोसायटी पाण्याचं कनेक्शन तोडु शकत नाही असे ऐकले आहे. जोशीसाहेब म्हणतायत ते काहीतरी खास केस असावी. समांतर किस्सा: मी बॅचलर असतांना एकदा भाड्याने खोली द्यायची आहे असे ऐकुन गेलो तर एका सरकारी क्वार्टर मिळालेल्या कर्मचार्‍याच्या घरी. म्हणे दोघांची राहण्याची सोय आहे. कुठे? तर वन बीएचकेच्या त्या छोटेखानी सरकारी फ्लॅटातल्या बेडरूममधे, इतर कुटुंबीय हॉल आणी किचनचा वापर करणार. प्रसाधनगृहांचा वापर एकत्रच. हॉलमधे एक १७-१८ वर्षांची सुंदर कन्या केशभूषा करत होती. तीची माता आम्हा २१-२२ वर्षांच्या तरुणांना बेलाशक घर दाखवत सुविधा सांगत होती. मी म्हणलो मित्रा, लवकर चल बाबा इथून आधी. कशाला विषाची परिक्षा. काही कमी जास्त झालं तर पहिला आपला जीव जाईल. चवकशी नंतर होईल. मुलगी तर टांगती तलवार आहेच पण हे असे राहणे बेकायदेशीर आणि भयंकर आहे. कधी आईवडील आपल्याला भेटायला आले तर झालेच शुभमंगल (वेगळ्या संदर्भात)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 22:30 नवीन
काही शहरात पाणीपुरवठा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असतो. त्याचे शुल्क ते घरावर आकारल्या जाणार्‍या करातून वसूल करतात. उदा. पुणे. काही शहरात पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे केला जातो. तिथे वीजेच्या मीटरसारखेच पाण्याचे मीटर असते. जेवढे पाणी वापरले जाईल त्याप्रमाणात बील येते. उदा. अमरावती. मी वर लिहिलेले उदाहरण अमरावतीचे होते. सोसायटीचा मुख्य खर्च पाण्याचे कॉमन बील व ते पम्पिंग हाउसचे वीजेचे बील यात जात असे. बर्‍याच सदस्यांनी सोसायटीचे शुल्क थकवले असल्याने सोसायटीचेच पाण्याचे कनेक्शन म. जी. प्र. ने तोडले होते. बीलाच्या मुळ रकमेत दंड व व्याजाची रक्कम मोठ्या प्रमाणात जोडली गेली होती. ज्या सदस्याने लेखी व तोंडी विनंत्यांना केराची टोपली अडीच वर्षाहून अधिक काळ दाखवली त्याचे पाण्याचे कनेक्शन सोसायटीने नोटीस देऊन व पोलिसांना आगाऊ सूचना देऊन तोडले. त्यानंतर त्या सदस्याने त्याच दिवशी तीन वर्षांचे शुल्क व दंडाची रक्कम सोसायटीकडे भरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/03/2016 - 22:47 नवीन
ओके. आमच्या सोसायटीत (ठाणे) आमच्या विंगमधे चार लोकांनी गेले चार वर्षे मेन्टेनन्स दिलाच नाहीये. जवळपास लाखाच्या घरात आहे प्रत्येकाचं आउटस्टँडींग. त्यांचं पाणी तोडावं असं काही सदस्यांचं मत होतं, पण असं करता येत नाही असे काही लोक म्हणाले. सहा विंगच्या सोसायटीत आमच्याच विंगमधे असे महान लोक एकत्र गोळा झालेत. कधी पाणी नस्तं, कधी लिफ्ट खराब करुन ठेवतात. बाजुच्याच विंगला चोविस तास पाणी,आम्हाला अर्धा तास. लई वैताग राव. बिल्डर लोक मोळी बांधुन देतेत. आपल्याला इथं कोन शेजारी कसा असनार त्याचा चॉइस नसतो. त्याचा राग बिचार्‍या बॅचलरवर काढतात की काय देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 23:00 नवीन
तुमची समस्या चांगलीच समजू शकतो कारण अपवाद सोडता जिथेही राहिलो आहे तिथे या प्रकारच्या समस्या कमी अधिक प्रमाणात पाहिल्या आहेत. बॅचलर्सला भाड्याने फ्लॅट देण्याबाबत सोसायटीकडून प्रतिबंध करणे याबाबत मी दोन्ही बाजू समजू शकतो कारण मी दोन्ही प्रकारे सोसायट्यांमध्ये राहिलो आहे. माझ्या सध्याच्या सोसायटीने अनेक वाईट अनुभवांतून गेल्यावरच बॅचलर्सना प्रतिबंधाचा हा नियम बनवला. कारण एकदा सुट दिली की कोण कशा प्रकारच्या लोकांना आणून ठेवेल त्याची शाश्वती नसते. अनेक लोकांचे दोन-तीन फ्लॅट्स असतात अन स्वतः ते परदेशात राहत असतात. जास्तीत जास्त भाडे व त्यायोगे कमिशन मिळवण्यासाठी एजंट कुणालाही भाडेकरू म्हणून आणतात. इतर कुटूंबाना काय त्रास होत असेल याबाबत मालकांना काही घेणे देणे नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/04/2016 - 06:03 नवीन
मेंटेनन्स चार्जेस न भरणार्‍या सदनिकाधारकचे पाणी तोडता येते. ते कायदेशीरपणे करण्यासाठी प्रोसिजर जरा लांबडे आहे... १. सर्वसाधारण सभेत किती कालावधीसाठी चार्जेस दिले नाहीत म्हणजे कारवाईस योग्य डिफॉल्ट होईल त्यासंबंधी नियम पास करून घ्या. (उदा. आमच्या सोसायटीत चार तिमाह्यांचे चार्जेस दिलेल्या मुदतीत न भरल्यास डिफॉल्ट होईल असा नियम आहे.) डिफॉल्टरचे पाणी तोडण्याची कारवाई करण्याचे हक्क मॅनेजिंग कमिटीला आहेत असा उल्लेख त्या नियमात स्पष्टपणे हवा. २. चुकार सभासदाला निवडलेल्या व्यवस्थापनाकरवी (इलेक्टेड सोसायटी मॅनेजिंग कमिटी) दर महिन्याला एक अश्या तीन नोटीसा पाठवा. ३. न मानल्यास अजून एक नोटीस वकिलातर्फे पाठवा व त्याची प्रत सर्व परिस्थिती वर्णन केलेल्या कव्हर लेटरसह तुमच्या विभागाच्या "कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कमिशनरला" पाठवा व पावती घ्या. असे एक महिन्याच्या अंतराने तीनदा करा. त्यानंतर कमीशनर पाणी तोडण्याची परवानगी देईल अथवा ते प्रकरण सक्षम त्याच्या विभागातील अधिकार्‍याकडे वर्ग करेल व तो पाणी तोडण्याची कारवाई करेल. वरचे प्रोसिजर पाळल्यास कायदा सोसायटी आणि व्यवस्थापनाच्या बाजूने असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 03/04/2016 - 10:28 नवीन
माहितीसाठी धन्यवाद. प्रोसेस वेळखाऊ असल्याने बहुतेक सेक्रेटरी टाळाटाळ करत असावा. आता रिनोवेशन आणि अपग्रेडेशनचं चाललंय. आता ज्या मीटींगा होतील त्यात सोक्षमोक्षच लावून टाकता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/04/2016 - 10:44 नवीन
मुख्य म्हणजे पाणी तोडण्याअगोदर (किंवा नोटीस देण्याअगोदर) त्या सभासदाच्या सदनिकेच्या पाणी पुरवठा करणार्‍या नळाला स्वतंत्र व्हॉल्व्ह आहे याची खात्री करून घ्या आणि नसल्यास तो बसवा. नाहीतर एका तिरक्या सभासदाचे पाणी तोडताना अनेक चांगल्या सभासदांची गैरसोय होईल ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 03/04/2016 - 10:48 नवीन
हो ना ;-) तसं शक्य नाही कारण सेपरेट वोल्व नाहीत. काहीतरी दुसरं नाक दाबावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/06/2016 - 14:29 नवीन
दुसरा एक उपाय म्हणजे वरचेच प्रोसिजर वापरून सभासदाचे सदनिकेमधून इव्हिक्शन करण्याची नोटीस कमिशनरकडून आणणे. ते प्रकरण जरा गंभीर असल्याने पहिल्या पायरीपासून कोऑप सोसा च्या कामात अनुभव असलेलया वकिलाचा सल्ला घेणे योग्य होईल. सभासद सोसायटीचा सदस्य म्हणून सदनिका वापरत असत असतो, सदनिकेचा पूर्ण मालक नसतो. हे पाऊल सहसा उचलले जात नाही, पण कायद्याप्रमाणे, प्रत्येक सदस्य (एका अर्थाने) सोसायटीचा टेनंट असल्याने, चुकार सदस्यांबाबत ही कारवाई शक्य आहे. असोशिएशन ऑफ अपार्टमेंत ओनर्समधे सदस्य त्याच्या सदनिकेचा/रो हाऊसचा मालक असतो, त्यामुळे हा पर्याय उपलब्ध नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/06/2016 - 20:34 नवीन
असोशिएशन ऑफ ओनर्स आणि कोऑप सोसायटी हे दोन मूलभूत फरक सांगितल्याबद्दल शतशः धन्यवाद. मार्मिकसरांचा विचार वेगळा त्यामुळेच वाटत होता. ते बहुधा असो ऑफ ओनर्स दृष्टीकोनातुन मांडत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे Mon, 03/07/2016 - 06:42 नवीन
मार्मिकसरांचा विचार वेगळा त्यामुळेच वाटत होता. ते बहुधा असो ऑफ ओनर्स दृष्टीकोनातुन मांडत होते.
को.ऑ.सोसायटी सदनीका मालकाला बॅचलर भाडेकरू ठेवण्यास मज्जाव करू शकते का? हे कायदेशीर आहे का?असे धागालेखकाने विचारले. प्रश्न को.ऑ.सो. संदर्भात असल्यामुळे मी ही त्याच संदर्भाने माहीती दिली. असो. ऑफ ओनर्स मध्ये हा प्रश्नच उपस्थीत झाला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 17:44 नवीन
अहो तुमच्या माहिती बद्दल काही वाद नाही. मलाच हे दोन प्रकार आज कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
क
कंजूस Fri, 03/04/2016 - 02:21 नवीन
समजा असे बॅचलर सापडले तर त्यांवर काय कारवाई करार? हाताला धरून तर बाहेर काढता येणार नाही.मग स्टे ओर्डरयेईल त्याची .किंवा केस टाकावी लागेल सोसायटी कोर्टात .थांबा २५ वर्षं.मध्ये वकील श्रीमंत होणार.पोलीस केस करता येत नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा