Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवोदित कवी

ह — हरिदास, Fri, 03/04/2016 - 07:37
नकोत मजला टाळ्या चुटक्या वाहवाही अन मान बढाई कोऱ्या पाट्या तुमच्या आमच्या रसिक आपुली बाप नि आई कुणी कल्पतो आकाशगंगा कुणी वर्णीतो प्रीत पतंगा नाद कुणासी विठू रायाचा रंगून जातो भलत्या रंगा अलंकारे सजवी कुणी कविता कुणाची वाहे दुःख सरिता भलत्या भलत्या कल्पना स्फुर्ती शब्द निराळे भाव पेरिता नवकवी मीही धडपड करतो फाटके तुटके शेले विणतो तुमच्या दारी हात जोडुनी कृपाप्रसादा निशिदिनी झुरतो रांगत्या मुलासी उचलुनी घ्यावे अनुभव अंजन नयनी दयावे तुम्हीच दावा चूक आमुची दिशा दावूनी मार्गस्थ करावे शब्दास शब्दांनी न्याय मिळावा नवजात प्रवाहे सहज रुळावा कल्पवृक्ष हा बहरत राहो नव्या कळ्यांनी सदा फ़ुलावा :हरिदास पाटील

प्रतिक्रिया द्या
3280 वाचन

💬 प्रतिसाद (21)
अ
अभ्या.. Fri, 03/04/2016 - 07:42 नवीन
वाहवा वाहवा, सुरेख स्वागत पाटीलबाबा.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 03/04/2016 - 07:42 नवीन
कविता जितकी मनस्वी, तितकी ती उत्स्फूर्त असते. मग अशा कवितेला टाळ्याचुटक्यांची वाहवा मिळाली नाही तरी ती आपल्या वाटेने बहरत राहते. तुम्हांला तुमची कविता लवकरच सापडो ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Fri, 03/04/2016 - 07:43 नवीन
क्या बात है मस्तच
  • Log in or register to post comments
ह
हरिदास Fri, 03/04/2016 - 08:22 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
ए
एक एकटा एकटाच Fri, 03/04/2016 - 08:16 नवीन
वाह वाह खरच मस्त आणि मनस्वी लिहिलय
  • Log in or register to post comments
ह
हरिदास Fri, 03/04/2016 - 08:23 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 03/04/2016 - 08:37 नवीन
शब्दास शब्दांनी न्याय मिळावा
हे आवडले! Sandy
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Fri, 03/04/2016 - 08:42 नवीन
छानच आहे की नवकविता :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/04/2016 - 09:10 नवीन
झ्याक भट्टी जमलिया!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 03/04/2016 - 16:59 नवीन
मस्त! कविता आवडली!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 03/04/2016 - 17:28 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 03/04/2016 - 17:31 नवीन
सहजसुंदर कविता.
  • Log in or register to post comments
ह
हरिदास Sat, 03/05/2016 - 06:08 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Sat, 03/05/2016 - 06:15 नवीन
झकास सुरुवात! कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 03/05/2016 - 11:28 नवीन
क्लास कविता ! वाचनखुण साठवली आहे. कुणी कल्पतो आकाशगंगा कुणी वर्णीतो प्रीत पतंगा नाद कुणासी विठू रायाचा रंगून जातो भलत्या रंगा क्या बात .. पुन्हा पुन्हा वाचावी अशी कविता
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 03/05/2016 - 14:35 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 15:24 नवीन
सुंदर कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव Sat, 03/05/2016 - 18:46 नवीन
हरिदास, काय सुरेख काव्य आहे हे. काव्य या सदराच्या नावाला अगदी शोभणारं! फार पूर्वी, फार वर्षांपूर्वी (म्हणजे "म्हाराजांच्या टायमाला.." पुलनी लिहिलंय ना त्या प्रमाणे!!) ईथे पुष्कराज अशा सुंदर कविता लिहायचा त्याची आठवण करून दिलिस. "गणपत वाणी बिडी पिताना.."च्या नादात (बरचसं) बसतंय. थोडेफार शब्द खटकताहेत म्हणून जरा पुढे-मागे करून/कींचित बद्लून घेतलेत - मुळातली तुझी अशी छान रचना, अर्थाला धक्का न लावता, म्हणायला जराशी सफाईदार करायचा प्रयत्न ईतकंच. आता नादात म्हणताना मधे मधे गचके बसत नाहीत. ;-) ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ नकोत मजला टाळ्या चुटक्या वाहवाही अन मान बढाई कोऱ्या पाट्या तुमच्या आमच्या रसिक आपुली बाप नि आई कुणी कल्पितो नभात गंगा कुणी वर्णीतो प्रीत पतंगा नाद कुणासी विठू रायाचा रंगून जातो भलत्या रंगा अलंकारे कुणी सजवी कविता कुणाची वाहे दुःख सरिता भलभलत्या कल्पना स्फुर्ती त्या शब्द निराळे भाव पेरिता नवकवी मीही धडपड करतो विटके तुटके शेले विणतो तुमच्या दारी हात जोडुनी कृपाप्रसादा निशिदिनी झुरतो मुला रांगत्या उचलुनी घ्यावे अनुभव अंजन नयनी भरावे तुम्हीच दावा चूक आमुची दिशा दावूनी मार्गी करावे शब्दानीच मज न्याय मिळावा प्रवाही नवथर सहज रुळावा कल्पवृक्ष हा बहरत राहो नव्या कळ्यांनी सदा फ़ुलावा - हरिदास
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव Sat, 03/05/2016 - 18:50 नवीन
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
च
चांदणे संदीप Mon, 03/07/2016 - 06:22 नवीन
क्या बात है! चपखल शब्दप्रयोगांनी चार चांद लावलेत तुम्ही कवितेला! नभात गंगा भलभलत्या विटके मुला रांगत्या मार्गी शब्दानीच मज प्रवाही नवथर अर्थात मूळ कविताही चार चांद लावण्याजोगीच आहे! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
ह
हरिदास Mon, 03/07/2016 - 08:19 नवीन
वाह वाह सर....अगदीच सुरेख....धन्यवाद असेच सर्वांच मार्गदर्शन लाभुदे...आपल्या मराठी भाषेचा गौरव करावा तितका थोडा आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा