Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सार्वजनिक स्वच्छता. ट्रेनमधला प्रयोग.

व
वडापाव
Sat, 03/05/2016 - 11:01
🗣 57 प्रतिसाद
दोन आठवडे एक प्रयोग करून पाहिला. जो अजूनही चालू राहणार आहे. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या जो कोणी कचरा बाहेर टाकताना दिसेल, त्याला तो टाकायच्या आधीच अडवतो. 'बाहर मत डालो. बॅग में रखो' म्हटलं की लोक शिस्तीत ऐकतात. एखादं कोणी क्यों न डालो विचारलं तरी शांत आवाजात समजावल्यावर ऐकतात. तरीही कोणी माज केला तर सरळ रेल्वे अधिनियम कलम 198 नुसार हा गुन्हा असल्याचं सांगण्याची तयारी ठेवलेली आहे. पण ती वेळच येत नाही. लोक शरमून जाऊन किंवा कटकट नको म्हणून तरी ऐकतात. कचरा टाकणा-या लोकांना न संकोचता अडवा. थुंकणा-याच्या वाटेला अजून मी गेलो नाहीये. तो संकोच आहे अजूनही. कारण त्यांच्यात कितीसा विवेक शिल्लक असेल जागवायला असा प्रश्न पडतो. असो. जमेल तेही एकदा.

प्रतिक्रिया द्या
8456 वाचन

💬 प्रतिसाद (57)
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/10/2016 - 17:35 नवीन
वडापाव व राही यांचे उपक्रम स्पृहणीय आहेत. कळायला लागल्यापासून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी अनावधानानेही कचरा टाकला जाणार नाही याची काळजी घेतो. एखादेवेळेस इतरांनी टाकलेला कचराही उचलून कचराकुंडीत टाकतो पण ते नेहमी शक्य होत नाही. सिग्नलवर थांबलो असताना मागून न थांबता हॉर्न वाजवणार्‍यांना हात जोडून विनंती केली काहींनी ऐकले काही अक्षरशः अंगावर यायचे त्यामुळे तसे करणे थांबवले. हेल्मेट घालून दुचाकी चालवत असल्याने हॉर्नच्या कर्कश आवाजांची तीव्रता अंशतः का होईना कमी होते.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 03/10/2016 - 18:30 नवीन
वडापाव, राही, वेल्लाभट, मुटके आणि इतर सर्वजणांचे अभिनंदन! आमच्या घरचे कोणी दुसर्‍याच्या सवयी बदलायला जात नाही पण स्वतः कुठे कचरा करणार नाही याबाबत जागरूक असतो.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 03/16/2016 - 13:01 नवीन
नुकताच ट्रेन ने मोठा प्रवास झाला. दोन वेळी धाग्याच्या विषयाबद्दलची समाजसेवा केली. एकदा मीच समोरच्याने टाकलेली चॉकलेटची चांदी उचलून टाकू लागलो. तर लगेच तो द्या द्या मीच टाकतो सॉरी म्हणाला (हा आमच्याच सोबत प्रवास करत होता. थेट ओळख नसली तरी ग्रूपमधे असल्याने नावापुरता परिचय होता. त्यामुळे अख्ख्या ग्रूपलाच संदेश पोचला) दुस-या वेळी सीटखाली पडलेला (कुणी टाकला हे कळायला मार्ग नसलेला) कचरा उचलून टाकायला लागलो आणि जाणून बुजून मोठ्या आवाजात 'काय करणार लोकांना अक्कल नसते, मग आपणच करावं त्यांचं काम' असा काहीसा डॉयलॉग मारला. मुद्दाम यासाठी मारला कारण बाजूला बसलेली दोन जणं 'नमकीन' चा आस्वाद घेत होती आणि एकंदरित गप्पा ऐकून, आविर्भाव बघून ते कचरा कच-याच्या डब्यात टाकतील असं वाटलं नाही. माझ्या डॉयलॉगमुळे असेल किंवा नसेलही, पण पुढे त्यांनी कचरा खाली टाकला नाही.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 03/16/2016 - 13:57 नवीन
व्रत नेमाने पाळता आहात त्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वडापाव Wed, 04/06/2016 - 16:17 नवीन
सार्वजनिक ठिकाणी आपण सांगायची वेळ न येताच गेल्या काही दिवसांत कागदाची किंवा प्लॅस्टिक रॅपरची घडी घालून ती बॅगेत ठेवणारी मंडळी जास्त दिसायला लागली आहेत. ती तशी घडी घालेपर्यंत त्यांना कचरा टाकण्यापासून अडवायची मानसिक तयारी चालू ठेवलेली असते. पण त्यांनी तो कचरा आपल्याकडेच ठेवून घेतला की एकदम हायसं वाटतं.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 04/06/2016 - 18:12 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
ल
लई भारी गुरुवार, 04/07/2016 - 11:17 नवीन
आपल्याइतका नाही पण खारीचा वाटा उचलतो!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा