~*~*~*~ साप ~*~*~*~
मित्रांनो,
मी ज्या सोसायटीत राहतो तिथली एक समस्या आहे. त्यावर काही उपाय माहित असतील तर सुचवा.
तर समस्या अशी आहे की आमच्या सोसायटीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात / ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साप दिसायला लागले. लोक घाबरले कारण लहान मुलं खेळत असतात. साप लहान मुलांना चावण्याची भिती होती. मी कमिटीत असल्यामुळे मी या समस्येवर उपाय शोधायला पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत होतं. एका जणाने सांगितलं की उपाय नाही पण रिपेलंट म्हणून कंपाउंड भिंतीच्या बाजूला थायमेट टाकून बघा. तसं केल्यानंतर साप गेले - म्हणजे नंतर दिसले नाहीत. पण "कावळा बसायला आणि फांदी तुटायला" असा उपाय झाला काय ही एक शंका आहे. जर पुढच्या वर्षी परत साप आले तर? तयारी असावी म्हणून हा धागा काढत आहे. येऊंद्या उपाय .....
💬 प्रतिसाद
(64)
प
प्रचेतस
Sun, 03/06/2016 - 05:11
नवीन
ज्याक डनियल्सला तुमच्या सोसायटीत राहायला बोलवा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 03/06/2016 - 05:47
नवीन
तुम्ही रंगवली नाय राव कथा. ती बाई, तीचे तुम्हाला साप का कुच करो म्हणणे, इत्यादी. जरा डीट्टेल टाका. खफवर टाकला होता तसा.
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Sun, 03/06/2016 - 07:12
नवीन
:)
सोसायटीत सापांची चर्चा सुरू होऊन दोन-तीन दिवस झाले होते. एक दिवस हापिसातून घरी येतांना एक लै लै मोठ्या साहेबांच्या आईंनी (ललमोसाआ) मला थांबवलं. त्यांचं आणि माझं संभाषण -
ललमोसाआ - "बहुत साप हो गये है. प्रसांतभैया कुछ करो".
मी - (एकतर मी भैया नाही. मराठी माणूस आहे. आणि साप काय मी पाळून सोसायटीत सोडतो काय. कुछ करो म्हणजे?) आंटी बाजूवाले प्लॉट का काम चालू है. वो लोग खुदाई करते है तो अपने सोसायटीमे साप आते है.
ललमोसाआ - बेटा (लक्षात घ्या - आधी भैया होतो) प्लॉट के मालिक को जाके कह दो बना ले अपना बिल्डिंग जल्दी से.
मी - (बाजूचा प्लॉट ३/४ एकरचा आहे. किंमत कमीत कमी ४०-५० करोड असणार. माझ्यासारख्या दळभद्री माणसाने प्लॉट मालकाला असे सल्ले दिले तर तो नक्की मला घडी करून परत पाठवणार). आंटी ऐसा नही कर सकते. साप वो प्लॉटसे निकलके कंपाऊंड वॉल मे कुछ बिल है, उन बिलोमे छिप जाते है.
ललमोसाआ - साप बिलोंसे ऐसेही बाहर नही निकलते. उसके लिए बीन बजानी पडती है.
मी - (मी माझी अॅक्टिव्हा घेऊन गारूडी शोधत फिरतोय असं इमॅजिन केलं. आणि एखादा गारूडी नाही मिळाला / तो यायला तयार नसला तर मीच त्याची पुंगी दीड दोन तासाच्या भाड्याने आणून कंपाऊंड वॉलच्या बाजूला बिळं शोधून वाजवत बसलोय असं इमॅजिन केलं) :)
सापांना काही उपाय नसतो हे माहित होतं. माझ्या गावाकडे साप दिसला तर लोक तो घरापासून लांब असला तर / घरा जवळ असेल आणि निघून जात असेल तर काहीच करत नाहीत. घरात घुसला तर मारावा लागतो. त्यात सप्टेंबर / ऑक्टोबर हा सापांचा मेटिंग पिरिएड असल्यामुळे पण ते बिळांतून बाहेर आले अशी एक शक्यता होती. पण लोकांना काय सांगणार. कोणीही भेटलं की तोच विषय असायचा. पार वैताग आणला होता पब्लिकने. इमेल मधे तोच विषय. मी कायप्पा वर नाही, पण कायप्पा वर पण तेच. शेवटी एकाने सांगितलं की रिपेलंट म्हणून थायमेट टाकून बघू. तसं केलं आणि नंतर सापाने काही दर्शन दिले नाही. सुटलो एकदाचा :)
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Sun, 03/06/2016 - 07:32
नवीन
:-D लोल.
एक उपाय: (खरे खोटे देव जाणे) तुळशीचे रोपं लावा सगळीकडे . तुळशीच्या झाडामुळे साप येत नाही असे म्हणतात . जसे बाड, मेहंदीचे कुंपण करतात तसे कुंपण करावे लागेल मात्र . (फायदा झाला तर ठीक नाहीतर फुकट अॉक्सिजन तरी मिळेल)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/10/2016 - 14:13
नवीन
हांगाशी =)) हे धाग्यात अॅडवून घ्या.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sun, 03/06/2016 - 05:51
नवीन
मुंगुस पाळा.दुहेरी फायदा होईल.
१) सापांपासुन सुटका..
२) मुंगुसाचे तोंड सकाळी पाहणे लाभदायक असते, असे समजतात,त्यासाठी शुल्क आकारा,मुंगसाच्या खाण्यापिण्याचा खर्च निघेल.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 08:00
नवीन
मुंगुस ??
त्या पेक्षा बेयर ग्रिल ला पाळा . तो कच्चे खातो साप ! =))
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 08:03
नवीन
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 03/11/2016 - 08:04
नवीन
मग मुंगूस काय तंदूरी साप खातं ??
:-)
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 03/06/2016 - 07:37
नवीन
आजकाल संस्थळांना डुआयडींनी जसे छळलेय तसे तुमच्या सोसायटीला सापांनी छळलेय असे दिसते. एक काम करा, 'ही आमची श्रीदेवी, हिच्यावर आमचा भारी जीव!' असे कॅप्शन असलेली 'नगीना', 'निगाहें' इ. चित्रपटातली पोष्टरे तुमच्या सोसायटीच्या कंपाउंड वॉलच्या बाहेरून चिकटवा. सगळे सर्पपुरूष तिथे डुलत बसतील आणि सगळ्या सर्पिणबाया त्यांच्या नावाने धूसफूस करतील. तुमची सोसायटी मोकळी!
- Log in or register to post comments
अ
अन्नू
Sun, 03/06/2016 - 08:08
नवीन
मल्लीकाला विसरलात का? ;)
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 03/06/2016 - 08:34
नवीन
आम्हांला रीना रॉय नाहीतर श्रीदेवी आठवतात हो. कोण ही मल्लिका?
- Log in or register to post comments
अ
अन्नू
Sun, 03/06/2016 - 08:46
नवीन
कोण ही मल्लिका?.>>>
तुंम्ही जलेबीबाईला ओळखत नाही? ;)

- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 03/07/2016 - 15:36
नवीन
छे! ही होय! ओंगळवाणी दिसलीये त्यात.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 03/06/2016 - 08:09
नवीन
हे एकदभ सुसाट !!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sun, 03/06/2016 - 09:25
नवीन
सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड लावा "सापांना सोसायटी मध्ये येण्यास सक्त मनाई आहे. बेकायदेशीर घुसखोरी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल."
तरी देखील साप आले तर सुशिक्षीत सापांना नोटीसा बजावा व अशिक्षीत सापां करता एका प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करा.
सापांची नसबंदी करुन घ्या त्यामुळे सापांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल व भविष्यातला त्रास कमी होण्यास मदत होईल.
सापांच्या बिळात ए.सी, आणि झी च्या कनेक्क्ष्न सकट टीव्ही बसवुन द्या म्हणजे सर्पिणी बाहेर पडायच्या कमी होतील. सापांसाठि एखादा स्मोकिंग झोन तयार करुन द्या म्हणजे ते इकडे तिकडे फिरत बसणार नाहीत.
सोसायटी मध्ये एक तक्षकयाग करुन घ्या. व त्याला सर्व सापांना बोलवा.
साप दिसला कि त्याच्या मागे "सापड्या सापड्या" असे चिडवत फिरा. म्हणजे ते चिडुन येईनासे होतील. नाग असेल तर काय चिडवायचे ते तुम्ही ठरवा.
नाग पंचमिला सर्पिणिंसाठि हळदी कुंकु व सापांसाठि कोकटेल पार्टीचे आयोजन करा.
सापांच्या मुलांना जे एन यु मध्ये दाखला मिळवुन द्या.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 03/06/2016 - 09:46
नवीन
पैजारमाउली काहीतरी 'शेष' ठेवा इतरांसाठी. ;)
.
लास्टचा नागकिडस साठी जेएनयु म्हणजे जेनुइन नाग युनिवर्सिटी का? चांगलेय चांगलेय.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 03/06/2016 - 12:31
नवीन
लै भारी
- Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज
Mon, 03/07/2016 - 04:21
नवीन
पैजारबुआ,
साष्टांग दंडवत स्वीकारा.
____/\____
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/07/2016 - 04:26
नवीन
=))
सापड्या सापड्या अन नाग दिसला तर मेलो.. =))
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 03/07/2016 - 14:18
नवीन
बिळाबाहेर पडताना हेल्मेट घालून बाहेर पडायची सक्ती करा. त्यातही सर्पिणींचा हेल्मेट सोन्याचाच असला पाहीजे असं म्हणा. म्हणजे एकमेकींचे हेल्मेट बघून जळफळाट होऊन बिळाबाहेर पडायच्या नाहीत.
- Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर
Fri, 03/11/2016 - 07:20
नवीन
नाग असेल तर काय चिडवायचे ते तुम्ही ठरवा. :-)) :-))
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 18:36
नवीन
का नागांसारखे सरपटता आजकाल?
- Log in or register to post comments
न
नन्द्या
Sun, 03/06/2016 - 12:59
नवीन
तुळस नि मुंगूस आणण्यात अडचणी बर्याच!
तुळशीला पाणी कोण घालणार? त्याचा खर्च कोण देणार?
मुंगुसाचा तीच अडचण. समजा साप गेले, तर नंतर काय करायचे त्या मुंगुसाचे? त्याच्याकडे कोण बघणार, त्याचा खर्च कोण करणार?
सोसायटीत मराठी बोलणारी माणसे रहातात म्हंटले! त्यातून मिपा वर लिहिणारे - वाद घालून शिव्या दिल्याशिवाय सोडणार नाही हां, सांगून ठेवतोय!
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Sun, 03/06/2016 - 16:50
नवीन
- अंघोळीच्या पाण्याच्या टाकीत नियमितपणे थायमेट टाकत चला, मुले या पाण्याने आंघोळ करतील व साप त्यांच्याजवळ येणार नाहीत.
- मुलांसाठी सकाळ-संध्याकाळ नवनाग स्तोत्राचे पाठ आयोजित करा. सर्पविषाच्या धोक्यापासून मुक्ती मिळवा.
- शिड्यांची तसेच फाशांची व्यवस्था करा. साप आले कि सापशिडी स्पर्धा आयोजित करा.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Sun, 03/06/2016 - 16:55
नवीन
- सोसायटी स्वच्छ ठेवत चला.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/07/2016 - 04:35
नवीन
नागस्त्रोत्र नावाचं एक अष्टक आहे. सदरील अष्टक सकाळ संध्याकाळ पाठांतर करुन म्हटल्यास कोणत्याही सापाची आपल्या सोसायटीत यायची हिंमत होणार नाही. तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी सोसायटीच्या मैदानात लहान थोरांनी येऊन खालील स्त्रोत्र मोठ्या आवाजात म्हणावे, म्हणजे सोसायटीत साप येणार नाहीत. (स्त्रोत्र म्हणुनही साप आपल्या सोसायटीत आल्यास मला जवाबदार धरु नये)
''अनंतं वासुकि शेष पद्मनाभं च कम्बलम् ।
शड्खपाल धार्तराष्ट्र तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः ।।
तस्मे विषभयं नास्ति सर्वत्र विजयीं भवेत् ।''
(माहिती सौजन्य : विकिपीडिया)
-दिलीप बिरुटे
(गारुडी)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 03/07/2016 - 14:02
नवीन
प्रा डॉ. हा श्लोक संस्कृत मधे आहे. संस्कृत न समजणार्या सापांसाठी काय करायचे? सापांच्या नावाखाली तुम्ही संस्कृत ची छुपी सक्ती अशी चालवून घेणार नाही.
अवांतरः मुंबईत सध्या टॅक्सी परमीट साठी मराठीचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी त्या उमेदवाराला मराठीत प्रश्न विचारतात उदा डावा हात म्हणजे कोणता. वडिलांचे नाव काय वगैरे. शिवसेनेतुन बाहेर पडलेले व काँग्रेसचे खंदे नेते संजय निरुपम यानी या मराठीच्या सक्ती विरुद्ध कडक्क आंदोलन छेडू असे सांगितले आहे.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 03/07/2016 - 21:12
नवीन
बॅटमन गुर्जींचा क्लास लावायला सांगा.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 03/08/2016 - 07:28
नवीन
महाभारत काळापासून सापांना संस्कृत समजत असल्याचे पुरावे आहेत त्यामुळे ही अडचण येऊ नये.
- Log in or register to post comments
क
किचेन
Mon, 03/07/2016 - 15:23
नवीन
ह्याने पूर्ण सोसायटीला फायदा होइल कि फक्त स्वतच्या फ्लॅटला?
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 03/07/2016 - 04:44
नवीन
www. sap. com
इथे काही "सोल्युशन" मिळतंय का बघा.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Mon, 03/07/2016 - 05:32
नवीन
सापांना दूर ठेवण्यासाठी खरोखर उपयोगी असते. पण त्याचा वास लई बेक्कार असतो.
मागच्या अनुभवावरून जर तो वास सहन होत असेल (कुंपण इमारतीपासून/खेळण्याच्या जागेपासून दूर असेल तर कमी त्रास होईल) तर वापरा. शेतकरी सापांना जनावरांपासून दूर ठेवण्यासाठी गोठ्याच्या आजूबाजूला वापरतात. फक्त थायमेट पाण्याच्या प्रवाहात मिसळणार नाही वा कोणाच्या पोटात जाणार नाही याची काळजी घ्या.
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 03/07/2016 - 05:35
नवीन
गारूडी बनायचे प्रशिक्षण घ्या.
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Mon, 03/07/2016 - 13:56
नवीन
इतके वेगवेगळे उपाय सुचवण्यासाठी धन्यवाद मित्रांनो :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 03/07/2016 - 15:05
नवीन
हाण्ण्ण्ण तेजायला. लेख अन प्रतिसाद दोन्ही कहर =)) =)) =))
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 03/07/2016 - 20:25
नवीन
लेख अन प्रतिसाद दोन्ही कहर!!
- Log in or register to post comments
व
वाचक्नवी
गुरुवार, 03/10/2016 - 10:53
नवीन
सापांना दूर ठेवण्यासाठीचा परंपरागत उपाय म्हण्जॅ वेखंडाची पूड. वेखंडाचा वास बेक्कार नसतो, तर वेखंड सुगंधी असते. लहान मुलांच्या अंथरुणाभोवती वेखंडाच्या पावडरची रांगोळी काढण्याची पूर्वापार प्रथा आहे. .
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
गुरुवार, 03/10/2016 - 18:36
नवीन
हेच सांगायला आले होते.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
गुरुवार, 03/10/2016 - 11:10
नवीन
गाणं लावा - "तु मेरी दुश्मन , दुश्मन मै तेरा... तु नागिन मै सपैरा.... तु नागिन मै सपैरा..........." निदान नागिणी यायच्या बंद होतील. मग नागिणींच्या धाकाने नागही बाहेर पडणार नाहीत.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 03/10/2016 - 11:40
नवीन
सोसायटीतल्या लोकांनी 'बिलानशी नागीन निंगाली, नागोबा डुलाया लागला' गाण्यावर समुहनृत्य करा.
- Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर
Fri, 03/11/2016 - 07:24
नवीन
हे गाणं लावलं तर नागिणी पाहायला अख्ख्या गावातले नाग सोसायटीत येतील.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 03/10/2016 - 11:45
नवीन
http://www.misalpav.com/node/17219
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
गुरुवार, 03/10/2016 - 18:18
नवीन
हसुन हसुन वाट लागली.
- Log in or register to post comments
प
पियुशा
Fri, 03/11/2016 - 06:10
नवीन
अर्रे काय हे --/\--
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/11/2016 - 07:16
नवीन
http://www.snake-removal.com/repellent.html
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 03/11/2016 - 07:25
नवीन
वाढलेले तण काढून टाका
काही काळ हिरवळ पण साफ केलीत तर बरे
अंधार्या जागा राहू देवू नका, सगळीकडे प्रकाशाची व्यवस्था करा
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 03/11/2016 - 07:35
नवीन
जॅक डॅनिएलशी मैत्री करा. तो सर्पमित्र आहे. मग मित्राचा मित्र अशी ओळख सापाला सांगा. मग एकदा साप ओळखीचा झाला की मग काय घाबरायचं.. एखादं बीळ खणून घ्या आवारात मग सोसायटीला सिक्युरीटीचीपण गरज नाही :-)
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 03/11/2016 - 07:50
नवीन
सापाची जनरल चालः ~~~~~~
माणसाची जनरल चालः ------
पुरेश्या जॅक डॅनियलनंतर माणसाची चाल: ~~~~~~
पुरेश्या जॅक डॅनियलनंतर सापाची चाल: ??
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 03/11/2016 - 08:07
नवीन
जॅक डॅनिएल फक्त माणसाला द्यायची.. सापाला नाही.. मग दोघांची चाल सारखी होइल.. मग मैत्री होइलच की चालताचालता..
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »