Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

~*~*~*~ साप ~*~*~*~

न
नाव आडनाव
Sun, 03/06/2016 - 05:08
🗣 64 प्रतिसाद
मित्रांनो, मी ज्या सोसायटीत राहतो तिथली एक समस्या आहे. त्यावर काही उपाय माहित असतील तर सुचवा. तर समस्या अशी आहे की आमच्या सोसायटीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात / ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साप दिसायला लागले. लोक घाबरले कारण लहान मुलं खेळत असतात. साप लहान मुलांना चावण्याची भिती होती. मी कमिटीत असल्यामुळे मी या समस्येवर उपाय शोधायला पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत होतं. एका जणाने सांगितलं की उपाय नाही पण रिपेलंट म्हणून कंपाउंड भिंतीच्या बाजूला थायमेट टाकून बघा. तसं केल्यानंतर साप गेले - म्हणजे नंतर दिसले नाहीत. पण "कावळा बसायला आणि फांदी तुटायला" असा उपाय झाला काय ही एक शंका आहे. जर पुढच्या वर्षी परत साप आले तर? तयारी असावी म्हणून हा धागा काढत आहे. येऊंद्या उपाय .....
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
11347 वाचन

💬 प्रतिसाद (64)
स
सस्नेह Fri, 03/11/2016 - 08:29 नवीन
पुरेश्या जॅक डॅनियलनंतर सापाची चाल: ??
/\/\/\^^\/\/$$^^/\/\^^\/\/\/ ******** (इथे साप गटारात पडला आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
नीलमोहर Fri, 03/11/2016 - 12:30 नवीन
म्हणजे सापांमध्येही गटारी अशीच साजरी होते तर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ब
बॅटमॅन Fri, 03/11/2016 - 08:13 नवीन
साप आला तर नागिन डान्स करायचा ही फेमस युक्ती वापरा ओ. ते नागिन म्हटल्यावर एकच एक पेटंट म्युझिक नसतं का, त्यापैकीच हा प्रकार.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/11/2016 - 08:14 नवीन
तुम्ही सापांमध्ये लव्ह जिहाद ला समर्थन देताय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 03/11/2016 - 13:38 नवीन
आँ? हे कुठून आलं मधेच? मी म्हणतोय की तो डान्स करावा फकस्त. बाकी कै नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/11/2016 - 13:52 नवीन
पण सापांना नागिन डान्स करुन मोहित करुन नागांच्या प्रेमपाशात अडकवण्याचे कुटील कारस्थान रचले जात आहे त्याचे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/11/2016 - 12:24 नवीन
त्यापेक्षा सरळ सापाला न आल्यास अर्धे राज्य बक्षिस द्यायची घोषणा करा.मग साप गपगुमान जातो की नाही बघा.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Fri, 03/11/2016 - 12:46 नवीन
सापाला पप्पुचे भाषण एेकवा.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Fri, 03/11/2016 - 12:55 नवीन
अरे येऊ द्या की त्या सापाला, तुम्ही त्याची नैसर्गिक वसतीची स्थाने तोडून स्वतः साठी घरे बांधता ना? मग त्यांना घरात घ्या खाऊ पिऊ घाला.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 03/11/2016 - 18:34 नवीन
कलयुग(जुना) - यात अनंत नाग आहे. विश्वात्मा - यात अमरीश पुरीचं सर्पिल खानदान आहे. तो अजगर, त्याचा भाऊ राजनाग, त्याचा मुलगा नागदंश वगैरे. पा - यात अरुंधती नाग आहे. बुनियाद (सीरियल) - यात विनोद नागपाल आहे. एवढं बघून नाग/साप कंटाळतील आणि परत तुमच्या सोसायटीत येणार नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 03/12/2016 - 04:38 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अन्नू Fri, 03/11/2016 - 19:53 नवीन
हे सगळं राहू द्या तुंम्ही सरळ आपलं सिमरला बोलवून घ्या, अशा बर्‍याच केसेस तिने आपल्या ससुरालमध्ये हाताळलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 03/12/2016 - 05:45 नवीन
घराभोवती अस्लेल्या मोकळ्या जागेत सध्या बिळ खोदलेली दिसली.सुरवातीला हा घुशीचा प्रकार असावा म्हणुन प्रतिबंधात्मक उपाय करुन पाहिल..पण पुन्हा बिळे खोदलेली दिसली. काल घरी असताना खुडखुड आवाज आला आणी खालील मंडळी दिसली अक्षरक्षहा झुंडीन हजर.. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 03/12/2016 - 05:53 नवीन
१. तिथे पुपा लावा ' इथे फेरीवाले, सेल्समन आणि सापांना सक्त मनाई आहे. सोसायटीच्या आवारास **वर चटके देण्यात येतील (हवा काढण्यात येईल या धर्तीवर).(चटके कसे द्यायचे त्यासाठी वेगळ्या धाग्याचे पैसे पडतील). साप जर साक्षर असेल तर तुमचा प्रश्न तडीस जाईल. २. साप एकटा राहतो कि फ्यामिली वाला आहे ते विचारा, ब्याचलर एकटा असल्यास ' सोसायटीमध्ये ब्याचलर सापांना राहणयास परवानगी नाही अशी नोटीस बजावा'. ३. नाहीतर आणखी एक गांधीवादी उपाय आहे. सापाशी मैत्री करून त्याला घरात बोलवा. त्याला भरपूर उंदीर खायला घाला आणि घरातल्या सोफ्यावर बसवा. मग तो एक तर सोफ्यावर झोपेल किंवा सोफ्याची वाट लावेल. पण बिळात घुसणार नाही. ४. सापाला बिन वाजवून मी मनपा कडे तक्रार करेन अशी विनंती करा ५. टीव्ही वाहिन्यांना बोलवा त्यात त्या सापाची मिडिया ट्रायल घ्यायाला सांगा, त्यात त्या सापाला सुद्धा आमंत्रण द्या, लगेच बिळ काय देश सुद्धा सोडून जायची शक्यता आहे. ६. ते नाहि जमल्यास सोसायटीची मिटिंग अटेंड करायला सांगा, परत सोसायटीच्या आसपास पण नाही फिरकणार तो दुत्त दुत्त साप. ७. अथवा हे हि नाही जमल्यास साप : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! असा लेख लिहा व बिळाजवळ जाउन मोठ्याने वाचन करा आपोआप त्रास दूर होईल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा