Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जगण शिकतोय मी आता.......!

ए — एकप्रवासी, Sun, 03/06/2016 - 12:18
जगण शिकतोय मी आता जुनी कात टाकून, अंकुरापरी मातीतून पुन्हा उगवून काही नवीन तारा जोडून जगण्याची नवीन धून बनवून, जुन्याच शब्दांना जराशी वेगळी चाल देवून, जगण शिकतोय मी आता…. सुखानं सुखाशी थोड गुणून दुखांना दुखाशी घेतलं भागून, बाकी काही उरेल ना उरेल आयुष्याच गणित पाहतोय पुन्हा सोडवून, जगण शिकतोय मी आता…. स्वप्नांना जरा पुन्हा जाग करून तुटलेल्या वाटां सांकवाना जोडून, निशब्द नात्यांना हळुवारपणे पुन्हा पुन्हा हसवून, जगण शिकतोय मी आता…. चुकांना किती जायचो घाबरून अपयशाला रोज कंटाळून हार जीत आता खूप दूर राहिलेत मी प्रयत्नांनाच बसतो कवटाळून, जगण शिकतोय मी आता….

प्रतिक्रिया द्या
1516 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रचेतस Sun, 03/06/2016 - 12:24 नवीन
जगण का जगणं?
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 03/06/2016 - 12:32 नवीन
मला वाटलं कोणा जगन नावाच्या मित्राला हाक मारताहेत ते! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ए
एकप्रवासी Sun, 03/06/2016 - 12:38 नवीन
थोडया शाब्दिक चुका समजून घ्याल हि अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्रचेतस Sun, 03/06/2016 - 13:06 नवीन
एकवेळ गद्यात शाब्दिक चुका क्षम्य आहेत पण पद्यात असू नयेत नाहीतर अर्थच बदलतो हो. अगदी मोकलाया दाही दिशा होऊन जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकप्रवासी
ए
एकप्रवासी Sun, 03/06/2016 - 13:33 नवीन
सहमत आहे तुमच्या मताशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ए
एकप्रवासी Sun, 03/06/2016 - 12:35 नवीन
"जगणं" च लिहायचं होत, चुकून जगण लिहिलं गेलंय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा