Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निशब्द

ह — हरिदास, Mon, 03/07/2016 - 08:51
शब्दांनी आज बंड केले होते नव्हते सर्व नेले उरावे हाती असे जमवलेच नाही क्षणभंगुर लालसेने षंड केले वाटते वाचा पांगुळ झाली निराशा आशेस वांझ झाली ओहोटीने भरतीस दिला नकार नकळे कोणती ही भूल झाली प्रकाशाने रविसंगे घात केला वसंताला ग्रिष्माने आघात केला डोळ्यांनीच काळजाची वाट पुसली लेखणीचा प्राण का गर्भात गेला शायराच्या शायरीतून भाव गेला काटयांनीच गुलाबाशी घाव केला दिव्यास पतंगाने का बदनाम केले शब्दांनी भावनांशी लपंडाव केला शब्दास शब्दांनी हे शब्द द्यावे शब्दांचे शब्द शब्दात ल्यावे शब्दाविण ना आधार आम्हास कुणाचा शब्दसुमने रसिकांनी निशब्द व्हावे

प्रतिक्रिया द्या
761 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ग
गणेशा Mon, 03/07/2016 - 10:00 नवीन
छान ! पहिली ४ कडवी आणि शेवटचे कडवे यात खुप विरोधाभास वाटला. की वरील कवितेला , कवीने शब्दानी काय केले पाहिजे हे ५ व्या कडव्यात सांगितले आहे ? बाकी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा