Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आमच्या ऑफिस मध्ये रोज होत असलेली चर्चा - शेतकऱ्यांना सरकार करत असलेली मदत

उ
उमेश पाटील
Mon, 03/07/2016 - 09:45
🗣 55 प्रतिसाद
खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्ती रोज अनंत समस्यांना तोंड देत असतात किंबहुना त्यांच्यावर नेहमी या ना त्या कारणाने नोकरी जाण्याची टांगती तलवार असते. मग जसे आपले सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफी वैगेरे देते, नुकसान भरपाई देते तशी काही मागणी ह्या वर्ग कडून आली तर त्यावर आपले काय मत असेल ? कारण एक वर्ग असा विचार करणारा बघण्यात आला आहे कि आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो आणि त्यातलाच पैसा वापरून सरकार शेतकऱ्यांना मदत करते मग आमच्यासाठी काय? किंवा त्यांनी अशी मागणी करावी कि नाही ह्यावर आपले काय मत आहे. मला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यात मदत करा.
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
8484 वाचन

💬 प्रतिसाद (55)
उ
उमेश पाटील Fri, 03/11/2016 - 09:48 नवीन
प्रत्येक नैसर्गिक आपत्ती मध्ये सरकारने मदत करावी किंवा नुकसान भरपाई द्यावी मागणी चुकीची वाटते. स्वताचेही आर्थिक नियोजन हे असणारच ना. आमच्या गावी गेल्या ५ वर्षात पुरेसा पाऊस पडलेला नाही (सध्या प्यायला पण पाणी नाहीये) तरी पण काही ओळखीतले शेतकरी त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालवतांना दिसतात.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 03/11/2016 - 09:57 नवीन
काहि दिवसापुर्वी एका मुलीने पासचे 260 रु. नाहीत म्हणुन आत्महत्या केली.सरकारने लगेच पास माफी योजना आणली. पण सत्य कल्पनेपेक्षा विचीत्र असत..
  • Log in or register to post comments
उ
उमेश पाटील Fri, 03/11/2016 - 10:06 नवीन
सत्य कल्पनेपेक्षा विचीत्र असत. हे पण तितकेच खरे आहे
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 03/11/2016 - 10:22 नवीन
सरकारने शेतकऱ्यांना यथायोग्य मदत केलीच पाहिजे बाकी कोणी कितीही ओरडो, मागे65000 करोड कर्ज माफी दिली तेव्हाही म्हणाले कि महागाई वाढेल आणि आता जो वेतन आयोग लागू होतोय त्याने महागाई वाढणार नाही का,देशातल्या सर्व क्षेत्रातल्या (काही सन्माननीय अपवाद वगळून) नोकरदार मंडळीच अस म्हणणे असते कि देशात जे विकास कामे,आपत्ती भरपाई इत्यादी चालू आहे ते सर्व ह्यांच्या टॅक्स मुळे होतय,बर होतही असलं तरी समाजाचं काही देणं लागतो म्हणून दुर्लक्ष करायला काही हरकत नाही,जर तुम्हाला नोकरी लागली नसती तर तुम्हीही असेच रोजगारासाठी केलेच असते कि नाही।
  • Log in or register to post comments
R
Rahul D Fri, 03/11/2016 - 11:23 नवीन
विजय मल्ल्याची संपूर्ण कर्जवसूली होईपर्यंत शेतक-यांनी कुठलेही बँकेची कर्ज फेडू नये. तशी प्रतिज्ञापत्रे न्यायालयात दाखल केले तर? ज्यांच्यावर काही हजार कोटींच कर्ज आहे ते सहजपणे हा देश सोडतात आणि ज्यांच्यावर फक्त काही हजारांच कर्ज आहे ते हे जगच सोडतात... दुर्दैव आहे आपले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा