वाट दाट वणव्याची
जातो सूर्य झाकोळून
ही किमया वेळाची,
पाश येते आवळून
काळभूल अंधाराची...
दाराआड दडती स्वप्नं
मन भरारी आभाळी,
पंख छाटता दयावंत
शाप मिरवू कपाळी...
येता डोळ्यांत कणव
कुणा जन्मीचे ऋण,
किती फेडू म्हणता
भर पडते नवीन...
बेड्या घालून चालती
इथे सारेच बंदी,
मुक्त होऊन रांगती
त्याला म्हणती छंदी...
अशी सरता सरेना
वाट दाट वणव्याची,
भिजलेल्या हुंदक्यांना
खोड भारी चालण्याची...
💬 प्रतिसाद
(13)
य
यशोधरा
गुरुवार, 03/10/2016 - 02:12
नवीन
वा!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 03/10/2016 - 05:37
नवीन
जबरदस्त! आवडली कविता!
Sandy
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 03/10/2016 - 06:02
नवीन
रारा, क्या बात!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/10/2016 - 06:50
नवीन
अप्रतिम !!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 03/10/2016 - 06:53
नवीन
अहाहाहाहा
सुपर्ब.
- Log in or register to post comments
र
रातराणी
गुरुवार, 03/10/2016 - 07:05
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 03/10/2016 - 08:27
नवीन
फारच छान!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 03/10/2016 - 11:02
नवीन
सुंदर अभिव्यक्ती !
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 03/10/2016 - 14:49
नवीन
वा वा वा
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
गुरुवार, 03/10/2016 - 17:21
नवीन
क्या बात है.सुरेख.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/10/2016 - 17:59
नवीन
इस कवितामें जान हैं!!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 03/11/2016 - 04:42
नवीन
चांगली कविता.
आवडली.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Fri, 03/11/2016 - 07:52
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments