Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(शाक दाट वाटान्याची)

र — रातराणी, गुरुवार, 03/10/2016 - 06:23
पैजारबुवा, नीमोतै आणि सध्या अद्रुश्य झालेले/ल्या दमामि येऊन षटकार ठोकून जायच्या आधी दोन रन काढून ठेवते. प्रेरणा द्यायचा कंटाळा आला आहे. घेतो खीर ओरपून ही किमया गोडाची बेल्ट जरा सैलावून चिंता करतो घेराची पुरीआड दडती भजी भय घालती केलरी डोळे वटारता बायको देऊ मोत्यांच्या सरी येता ताटात पुलाव शोधू काजूचे काप कसा टाकू शिल्लक नको माथी पाप डायट मारती माथी इथे सारेच पापड* जो मारतो मिटक्या त्याला म्हणती खादाड कशी सरता सरेना शाक दाट वाटान्याची गच्च भरल्या पोटाला ओढ भारी मठ्ठ्याची *पापड : बारीक या अर्थाने.

प्रतिक्रिया द्या
5076 वाचन

💬 प्रतिसाद (15)
S
sagarpdy गुरुवार, 03/10/2016 - 06:25 नवीन
च्यामारी सोताच सोताचे विडंबन !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 03/10/2016 - 06:29 नवीन
मस्त! रच्याकने म्हाळाची आठवण झाली.:)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 03/10/2016 - 06:31 नवीन
मस्त! रच्याकने म्हाळाची आठवण झाली.:)
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 03/10/2016 - 06:34 नवीन
आधी एवढं सुरेख काव्य लिहायचं आणि वर स्वतःच त्याचं असं भजं करायचं :p
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 03/10/2016 - 06:59 नवीन
दहशत तुमची अजून काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नाखु गुरुवार, 03/10/2016 - 07:05 नवीन
म्हंतेत आपलाच पतंग आपणच काटणे. (दुसर्याला काटण्याचं सुखंही मिळू द्यायच नाही) या असहिष्णुतेबद्दल कुणीच* पुरस्कार का वापस देईना ते !!! कुणीच* मध्ये आद्य विडंबनकार अपेक्षीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
च
चांदणे संदीप गुरुवार, 03/10/2016 - 07:08 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सस्नेह गुरुवार, 03/10/2016 - 11:06 नवीन
भजं नव्हे, शाक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
य
यशोधरा गुरुवार, 03/10/2016 - 06:47 नवीन
अर्र, काय हे!
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 03/10/2016 - 07:04 नवीन
यात एक मोठी चूक झाली आहे. शाक शक्यतो पातळ कटाच्या आमटीला म्हणतात. इथे वाटान्याच्या दाट्सर रस्स्याला शाक असं म्हणणं बरोबर नाही. भाजी म्हणाव तर जरा मिळमिलीत वाटतं. हम्म. ही चूक पोटात घ्या मंडळी.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 03/10/2016 - 07:31 नवीन
छानेहो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 03/10/2016 - 08:30 नवीन
खाउ पोट फुगेपर्यंत नाही कुणाची भिती.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 03/10/2016 - 14:51 नवीन
च्या मायला लयच भारी
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 03/10/2016 - 17:06 नवीन
कविता आवडली.वाटाण्याच्या आमटीला सांबार म्हणतात.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/11/2016 - 04:56 नवीन
अरे हे काही बरोबर नाही. मी किती उत्साहाने बाह्या सरसावल्या होत्या. एकाही बॉल न खेळता रन आउट झाल्यासारखे वाटले. हे म्हणजे अमिताभ बच्चन सारखे झाले सिनेमाचा हिरो पण तोच आणि कॉमेडियन पण तोच. हा काव्यिकदहशतवाद आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा