कंटाळा आल्यावर काय करावे ?
कंटाळा आल्यावर काय करावे ?
ऑफीसात बसुन कंटाळा आल्यावर काय करावे हा एक गहन प्रश्न आहे. ऑफिसात इतर साईट उघडणे धोकादायक ठरु शकते . ( मिसळपाव आजवर कसे बॅन झाले नाही हेच आश्चर्य आहे. ) शिवाय सारखे सारखे काँपुटर पाहुन डोळ्यांना त्रास होतो. मग क्यॅन्टीन मधे गेलो तरी तिथे ही डोळ्यांना त्रास होतो शिवाय विनाकारण चहा कॉफी पिली जाते , तातुन एक्स्ट्रा सुगर कन्झुम केली जाते त्याने त्रास होतो तो निराळाच. क्यॅरम खेळत बसलो कि ज्युनियर वर राँग इम्प्रेशन पडते . मेन लॉबीत पेपर वाचत बसलो तर समोरची रिशेस्पशनिस्ट 'काय काम नाही का आज' ह्या अविर्भावात बघत रहाते. बरं ऑफीसातुन बाहेर पडुन चहा सिगरेट मारावी तर बाहेर उन्हाळा सुरु झाल्याने परत त्याचा त्रास होतो.
अशावेळी ऑफीसात कंटाळा आल्यावर काय करावे ?
----
अवांतरः जास्त लिव्हवत नाही , लिहायचा कंटाळा आला .
💬 प्रतिसाद
(81)
अ
अभ्या..
Fri, 03/11/2016 - 11:24
नवीन
अगागागागागागा
एक पितळी तुतारी घ्यावी.
त्याची दोन्ही तोंडे धुवून घ्यावी.
वाळल्यावर मावळ्याचा ड्रेस चढवावा.
छाती श्वासाने गच्च भरुन घ्यावी
एक पाऊल पुढे
दुसरे थोडे वक्र
तुतारी उंचवावी.
.
.
.
.
हे डोळ्यासमोर दिसायले ना भौ. :)
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 03/11/2016 - 11:25
नवीन
लोउल
- Log in or register to post comments
म
मन१
Fri, 03/11/2016 - 11:24
नवीन
नेमकं!
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 13:13
नवीन
हे खरे आहे, कोर्सेरावर काही कोर्स केले , अत्ता कंटाळा म्हणजे निव्वळ लेथार्जी आलेली असल्यावर तेही नको वाटते.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 03/11/2016 - 11:49
नवीन
स्केचेस काढा
गणिताची आवड असेल तर कागद पेन घेवून कोडी सोडवा (हवं तर कोड्यांकरिता एक धागा काढा मिपावर, मजा येईल)
मग पुन्हा असली टाइमपास कोडी सोडवायसाठी तुमच्या आवडत्या लँग्वेजमध्ये कोड लिहा.
शेअर मार्केट बघत रहा
पार्किंगमध्ये जावून आपली गाडी पुसून काढा (घरातून निघताना घाईगडबडीत पुसलेली नसेलच !!)
आवडीची पुस्तकं आणून वाचा : म्हणजे कथा कादंबर्या नव्हेत पण एखाद्या विषयाची , उदा: फिजिक्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स ई. शिक्षण घेत असताना एखादा तरी विषय खूप आवडीचा असेलच ना, पुन्हा त्याच विषयाची पुस्तक वाचा मजा येईल. अशा पुस्तकांबद्दल कुणी काही बोलूही शकणार नाही.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 13:24
नवीन
ह्म्म , गुड आयडीया ! लगेच जाऊन गाडी पुसुन येतो !
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Fri, 03/11/2016 - 12:01
नवीन
रिकामा वेळ असतो तेव्हा मी हापिसात खूप वाचन करते, लेखन करते, संगीत ऐकते, अगदी चिंतन मनन ही करते,
(आता तुम्ही म्हणाल कामाशी रिलेटेड काहीच करत नाही का तर ते कायम सुरू असतेच, हे त्याशिवायचे इतर :)
यामुळे मेंदूला चालना मिळते आणि मरगळलेलं मन फ्रेश, रिचार्ज होतं. शिक्षणात वाया घालवलेल्या अनेक वर्षांनी ते नाही शिकवलं जे मी गेल्या काही वर्षांत निव्वळ वाचन करून, ते आचरणात आणून शिकले, अगदी जगण्यासकट.
मिपावर आल्यापासून हापिसात वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडत नाही, लिहायची हौसही भागवली जाते, अल्प बुध्दित, ज्ञानात भर पडते ती वेगळीच, इथल्या अवली लोकांशी गप्पा मारता येतात.
मिपा वाळवंटातील ओअॅसिस सारखं आहे :)
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 03/11/2016 - 12:09
नवीन
मिपा, मायबोली आणि उपक्रम अशा संस्थळांवरच्या तुमच्या आवडीच्या लेखमाला वर्डमध्ये एकाखाली एक अशा पेस्ट करा. नंतर त्याच्या फॉरमॅटिंग किंवा रिअलाईनमेंटमध्ये भरपूर वेळ जातो. हवे तेंव्हा हवे ते वाचू शकता. अगदीच एखादी भन्नाट लेखमाला असेल तर PDF मध्ये कन्व्हर्ट करा आणि मोबाईलमध्ये साठवा. बसमध्ये, विमानात, कुठेही बसल्याबसल्या उघडून वाचता येते. (इंद्राज पवारांनी लिहिलेले माणेकशॉ, सोन्याबापूंची अकादमी, मनरावची लेहवारी, एक्का काकांचा पृथ्वीतलावरचा प्रवास अशा अनेक लेखमाला मी साठवलेल्या आहेत. "मोकलाया" साठवू नका कुठेही अचानक जोरात हसाल आणि अडचणीत याल.)
आणखी वेळ शिल्लक राहणार असेल तर गूगल इमेज वर जावून "चिंटू" सर्च करा आणि मिळतील ते सगळे चिंटू वर्डवर पेस्ट करून व त्याची सजावट करून पुस्तक तयार करा आणि भाचे / पुतणे कंपनीला खुश करा.
अशा कामात मजा येत असेल तर "happiness is.." अशीही एक सिरीज आहे, अमूलच्या अॅड आहेत, कॉपी करा, एकाखाली एक पेस्टवा, प्रिंट काढा. (तयार पुस्तके विकत मिळतात पण असे काहीतरी करण्याची मजा वेगळीच असते.)
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Fri, 03/11/2016 - 12:45
नवीन
तुझ्या जवळच्या पीडीएफ पाठव की मला.
आळशी क्र. ६४४०
सौरभ
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 03/11/2016 - 12:12
नवीन
तुमच्या ऑफिसात काम नसते? मज्जाच की!
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 03/11/2016 - 12:13
नवीन
मध्ये आहेत ते असेच असते तिथे
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 03/11/2016 - 12:32
नवीन
हे आले, आयटीद्वेष्टे!!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 03/11/2016 - 12:37
नवीन
अच्चं झालं तर!
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 03/11/2016 - 12:44
नवीन
=)) =))
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 03/11/2016 - 12:13
नवीन
तुमच्या मॅनेजरला विचारा काय करु ते.. त्यालापण कंटाळा आला असल्यास त्याच्या मॅनेजरला विचारा.. त्यालापण कंटाळा आला असल्यास त्याच्या ............
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Fri, 03/11/2016 - 12:45
नवीन
एच आर ला भेटा ;)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 13:14
नवीन
एच आर ने नुकताच आमचा के.एल.पी.डी केला असल्यानेच काम करण्यावरुन मण उडाले आहे ... दुत्त दुत्त एच आर .... ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 03/11/2016 - 13:28
नवीन
आयला तुम्ही एचारसोबत काय करत होता म्हणे? =))
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Fri, 03/11/2016 - 12:52
नवीन
- आंजा वर भरपूर कोडी मिळतात. मध्यंतरी काही काम नव्हते तेव्हा मी आणि माझा मेंटर यांत स्पर्धा चालू होती जास्तीत जास्त कोडी सोडवायची.
- टायपिंग ट्युटर चा गेम खेळत बसायचं. टायपिंग चा वेगही वाढतो.
- स्टार वॉर्स बघा.
- आपल्या प्रणालीच्या महत्त्वाच्या फाइल्स उडवून द्याव्या. मग संगणक बंद पडतो. टेक सपोर्ट ला डोकं फोडताना बघायला मजा येते. तसेच सिस्टीम चे रिजोल्युशन फुल करून देखील सिस्टीम बंद पडता येईल.
- लोकांच्या संगणकाच्या माउस ला लेजर वर स्टीकर लाऊन ठेवा. १०-१५ मिनिटे वैतागलेले लोक आणि मग वैतागलेले टेक सपोर्ट पाहायला मजा येते. अधिक चांगला प्रकार म्हणजे माउस च्या लेजर वर मार्कर ने रंगवा.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Fri, 03/11/2016 - 14:52
नवीन
य क नं ब र !
ヾ(。>﹏<。)ノ゙✧*。
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Fri, 03/11/2016 - 16:30
नवीन
बेक्कार हस्लो या आयडियांना!
"प्रतेक्ष अन्भव हीच खातरी" या धर्तीवर ऑफिसात गेल्या गेल्या हे क्रून पाहिल्या जाईल!
=))
Sandy
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 03/11/2016 - 13:11
नवीन
अत्यंत स्लो प्रोसेस आहे ही पण वेळ मस्त जाईल. स्वतः च्या आत डोकावून पहा ... अहंकारावर विजय मिळवा.
- Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ
Fri, 03/11/2016 - 13:13
नवीन
देवाला बोर झालं म्हणून त्याने माणुस बनिवला अन त्यों अन माणूस पुन्हा बोर होउ लागले तवा त्याने इस्त्री बनीवली पण हायला ते तिघेबी ब्वारच होउ र्हाय्ले अन बाइमान्साने मुलं जन्माला घातली तर तिबी ब्वार होउन आख्खा संसार जन्माला आला तुमि आम्ही जन्मलो अन तेव्हांपासुन तुम्ही आम्ही अन देव अजुनही ब्वार होतच आहोत यावर कोणताही उपाय नाय :(:(
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 03/11/2016 - 13:28
नवीन
मचाक वाचावे आणि जमल्यास 'माझे मचाकविश्व' नामक मालिका लिहिण्यास हाती घ्यावी.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 03/11/2016 - 14:49
नवीन
मचाककथा लिहील्यास आम्हाला मेल करावी, आमचे अकाँट नाही तिथे..
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 03/11/2016 - 13:58
नवीन
खूप मिपाकर हिंजवडीतले (म्हणजे हिंजवडीतील कार्यालयांत काम्/टीपी करणारे) दिसतात. एक धावता हिंजवडी कट्टा होवू शकतो...काय म्हणता ?
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Fri, 03/11/2016 - 14:53
नवीन
नको
बैठा कटटा चालेल
- Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज
Fri, 03/11/2016 - 15:18
नवीन
प्रश्न :-ऑफीसात कंटाळा आल्यावर काय करावे ?
उत्तर:- सोप्पये, टाईम पास करावा.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Wed, 04/25/2018 - 02:10
नवीन
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 04/25/2018 - 03:44
नवीन
बेस्ट !
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 04/25/2018 - 10:00
नवीन
ज्या ज्या गोष्टींचा कंटाळा आला आहे त्या त्या गोष्टींचे पहिल्या १० सेकंदांचे काम करावे. म्हणजे पेपर वाचायचा कंटाळा आला असेल तर १० सेकंद पेपर वाचावा.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2